

दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी
नागपूर : दिल्लीतील तीसहजारी न्यायालयात पोलिसांनी वकिलांवर केलेल्या अमानुष गोळीबार व लाठीमाराच्या घटनेचा आज सोमवारी नागपुरातील वकिलांनी जिल्हा न्यायालयापुढे निदर्शने करून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली.
तीसहजारी न्यायालयात पार्विंâगवरून पोलिस आणि वकिलांमध्ये वाद झाला. यानंतर पोलिस उपायुक्त हरिंदर सिंग यांनी फायरिंग करण्याचा तर, पोलिस आयुक्त संजय सिंग यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या आदेशानंतर न्यायालय परिसरात असलेल्या वकिलांवर गोळीबार तसेच लाठीमार करण्यात आला. या गोळीबारात एक वकील गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सचिव अॅड. अक्षय समर्थ यांनी याप्रसंगी केली. यावेळी अॅड. अभय रणदिवे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून दोषी पोलिस अधिकाऱ्याना शिक्षा झालीच पाहिजे, असे मत मांडले. अन्य वकिलांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
या आंदोलनामध्ये अॅड. उज्ज्वल राऊत, अॅड. शबाना दिवान, अॅड. प्रकाश तिवारी, अॅड. प्रपुâल्ल सोनुले, अॅड. कविता मून, अॅड. शाबाद खान, अॅड. श्याम शाहु, अॅड. ओमप्रकाश यादव, अॅड. सुनील लौउंचेवार, अॅड. सुरेश शिंदे, अॅड. बाबा बाबुळे, अॅड. विलास राऊत, अॅड. सुधाकर तागडे, अॅड. तिलक लारोकर, अॅड. कुलश्री भांगे, अॅड. सुनिता पाल, अॅड. प्रमोद उपाध्याय, अॅड. प्रिया गोंडाने यांच्यासह जवळपास ७० वकील सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले.




आमचे चॅनल subscribe करा
