Advertisements

आ.अभिजित वंजारींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव
नागपूर,ता.१९ जून २०२४: दहावी व बारावीचे शिखर यशस्वीपणे सर करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतूक साेहळा तसेच पुढील शिक्षण,करिअरबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन येत्या मंगळवारी दिनांक २५ जून रोजी रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तसेच प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येईल.कार्यक्रमाचे आयोजन सकाळ माध्यम समूह,गोविंदराव वंजारी फाऊंडेशन तसेच सेंट पॉल स्कूलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.यावेळी सुप्रसिद्ध शिक्षण व करिअर मार्गदर्शक सचिन बुरघाटे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
आमदार ॲड.अभिजित वंजारी व सेंट पॉल शाळेचे संचालक राजाभाऊ टांकसाळे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल.
…………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
