फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजदसरा मेळाव्यात उदध्व ठाकरेंची तोफ कडाडली

दसरा मेळाव्यात उदध्व ठाकरेंची तोफ कडाडली

Advertisements

मोदी,फडणवीस,हषवर्धन पाटील सर्वांना घेतले शिंगावर

भागवतांच्या हिंदूत्वावरही ‘भाष्य’

मुंबई,ता. १५ ऑक्टोबर २०२१: आपला आवाज कोणी दाबू शकत नाही कोणी दाबू शकणार नाही,आवाज दाबणारा जन्माला येऊ शकणार नाही.बरेच दिवसांनंतर दस-या मेळाव्याच्यानिमित्ताने हिंदू माता-भगिनी साद घालण्याची संधी मिळाली.

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली दसरा मेळाव्याची सुरवात केली होती.तीच परंपरा समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असून याचा सार्थ अभिमान असल्याचे सांगून आज शस्त्रपूजा केली मात्र तुमच्यावर मी फूले उधळली कारण तुम्ही माझे शस्त्र आहात,प्रत्येक जन्मी मला हेच आई-वडील,हेच कुटुंब आणि महाराष्ट्रातच जन्म व्हावा अशीच माझी ईच्छा असल्याचे शिवेसना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दस-या मेळाव्यात सांगितले.याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री राजनाथसिंह,हषवर्धन पाटील यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

सत्ताधीश’ने ठाकरे यांचे शब्दश: टिपलेले भाषण-

फडणवीस यांना टोला-
मी मुख्यमंत्री आहे असं मला कधीही वाटू नये,असा टोला ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हाणला.’मी पुन्हा येईन’म्हणनारे आता ’मी गेलोच नाही’ म्हणू लागले आहेत.ही मात्र माझी संस्कृती नाही,माझे आई-वडील,आजोबा यांनी मला वेगळी शिकवण दिली असल्याचे ते म्हणाले.सत्ता काय आहे?ती येईल आणि जाईल.अहंपणा डोक्यात जाऊ देऊ नको,जो जर गेला तर तू संपलास,नम्र रहा,लोकांचे आर्शिवाद घे,आर्शिवाद मागून मिळत नाहीत,जोरजबरदस्तीनेही मिळत नाही,आर्शिवाद कमावण्याची परंपरा असते आणि तीच मी मिळवली आहे.

माझा वाडा ‘चिरेबंद’-
माझं भाषण कधी होतं आणि कधी मी चिरकतो,याची वाट अनेकजन बघत आहेत.पण मी त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी बोलतो आहे.त्यांना ठाकरे कुटंबावर हल्ले करायचे असतात,ठाकरे कुटूंबाची बदनामी ही त्यांच्यासाठी ‘रोजगार हमी योजना’सारखी झाली आहे.ठाकरे कुटुंबावर हल्ला कराल तर तिथल्या तिथे ठेचून काढू,तुम्ही चिरकत रहा,माझा वाडा ‘चिरेबंद’आहे.
हर्षवर्धनांची पात्रता काय?

हर्षवर्धन पाटील भाजपात गेले,ते भाजपचे ब्रॅण्ड अंबेसेडर झाले पाहिजे.एखाद्या जाहीरातीप्रमाणे ते बोलतात ‘पहले मुझे नींद नही आती थी,फिर मुझे किसीने कहा तूम भाजपा में चले जाओ,अब मुझे कुंभकरण जैसी नींद आती है,किसीने कितना भी दरवाजे पे ठोका तो भी नही उठता हूं‘आपली लायकी काय,पात्रता काय की आम्ही तुमच्या अंगावर येऊ.

तुम्ही फक्त ईडी,सीबीआय,इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातूनच दम देऊ शकता,मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवप्रमुख म्हणून बोलतोय याला नामर्दपणा म्हणतात.

Shivsena Dasara Melava 2021: 'मी पुन्हा येईन बोलणारे आता मी गेलोच नाही  म्हणू लागलेत'; पहिल्याच वाक्यात उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला - Marathi  News | shivsena dasara ...

भागवत,हिंदूत्व आणि सत्तापिपासूपणा-
आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी हिंदूत्व म्हणजे काय?यावर भाष्य केले.मी त्यांची माफी मागून हेच सांगतो,आपलीच माणसे तुमचं ऐकत नसतील तर मेळाव्याचे ‘शेर’करायचे काय?संघ आणि आमचे हिंदूत्व एकच आहे पण धारा वेगळ्या आहेत.हिंदूत्वाच्या मुद्दावरच युती केली होती.ते मुख्यमंत्री राहील असते जर त्यांनी शिवसेनेसोबतचे वचन मोडले नसते तर.मी जवाबदारीने हे पद स्वीकारले कारण मी माझ्या पित्याला वचन दिले होते‘तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवीन’मोठ्या विचाराने बोलतो आहे ‘दाखवीनच’.त्यांनी जर वचन पाळले असते तर ‘कदाचित’मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. पूत्र कर्तव्यामुळे उभा राहीलो.

भागवत म्हणतात ‘आपले पूर्वज एकच होते’,मग विराेधी पक्षाचे पूर्वज हे काय परग्रहातून आलेत काय?लखीमपूरात शेतकरी मारले गेलेत त्यांचे पूर्वज परग्रहातील होते का?भागवतांना तरी हे पटतंय का?जनतेलाच विचारतो त्यांना तरी हे पटतं का?तुमच्या हातात ‘मत‘आहे,रंकाचा राजा आणि राजाचा रंक करण्याची ताकद तुमच्यात आहे.

भागवत हे सत्तापिपासूपणावर प्रहार करतात,जे सत्तापिपासूपणातून संघर्ष करतात आहेत,त्यांना शिकवणी परत लावा.सत्तेचं व्यसन हे अम्ली पदार्थासारखेच आहे.भाजपला हे व्यसन असून त्यांना ‘बाजारसमित्यांपासून तर दिल्लीपर्यंतची’ फक्त सत्ताच हवी आहे.
मोदींवरही शरसंधान-

मै तो फकीर हूं झोली लेकर जाऊंगा’असं ते बोलतात.हे झोली वगैरे असे कर्मदरिद्रीपणाचे विचार आमचे नाही.आमचे हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. आम्ही आधी ‘माणूस’आहोत नंतर जात,पात,धर्म चिकटत असतो.आपला धर्म घरात ठेवायचा असतो.एकदा घरा बाहेर पडतात तर‘देश हाच माझा धर्म’आहे.असलाच पाहिजे.हेच हिंदूत्व आहे,हेच शिकलो.

shivsena dasara melava : 'उद्या 2 वर्ष होतील, सरकार पाडूनच दाखवा' उद्धव  ठाकरेंचं संपूर्ण भाषण VIDEO – News18 Lokmat

भाजपचा ’छापा आणि कांटा’-
भाजपवर चांगलेच तोंडसूख घेत उद्धव ठाकरे यांनी भाजप गेल्या २ वर्षांपासून अनेक प्रयत्न करीत आहे ,हिंमत असेल तर पाडून दाखवा आमचे सरकार.फक्त ‘छापा आणि कांट्याचा’खेळ सुरु आहे.टाकला छापा,काढला कांटा.जास्त वेळ हा खेळ चालू शकत नाही.

ममता बॅनर्जींची स्तुती-
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असून देशाच्या स्वातंत्र्यात लाल,बाल आणि पाल यांचे योगदान अमुल्य आहेत.नुकतीच ममता दीदींनी बंगालमध्ये पुन्हा आपले कर्तृत्व दाखवले,तशीच जिद्द महाराष्ट्राच्याही रगारगात असायला हवी.‘हर हर महादेव’हा जयघोष दिल्लीच्या तख्त्यापर्यंत दाखवण्याची वेळ येऊ नये,आलीच तर दाखवावंच लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

नवहिंदूंपासून खरा धोका-
मला दू:ख,राग का येतो?हा सत्तापिपासूपणा बघून राग येतो.१९९२-९३ मध्ये शिवसेनेचे मर्द उतरलेत नाही का?माहितीच्या अधिकारात हिंदूत्व धोक्यात आहे का अशी विचारणा झाली असता,गृहमंत्रालयातून उत्तर मिळतं,आता हिंदूत्वाला कोणताही धोका नाही.हे जरी खरे असले तरी ‘आता नव हिंदूंपासून खरा धोका‘असल्याचे भाकीत ठाकरे यांनी वर्तवले.

देशाचे गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यावर प्रहार करताना ते गांधी,सावरकर यांच्यावर कसे बोलू शकतात?आजपर्यंत कोणत्या आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे?त्यांची लायकी नाही गांधी,सावरकर यांंच्यावर बोलण्याची!महिला अत्याचारावर बोलले जाते.‘माय मरो पण गाय जगो’हे आमचे हिंदूत्व नाही.झुंडबळी घेणारे हे हिंदू नाहीत‘असे भागवत सांगतात,मग कोणाकडे हिंदूत्व शिकायचं?जेव्हा-जेव्हा हिंदूत्व धोक्यात आलं तेव्हा एकमेव बाळासाहेब हिंदूत्वाच्या दुश्‍मनांसमोर उभे राहीले.त्यांना अनेक धमक्या यायच्या.ते म्हणायचे ‘ज्या रंगाची गोळी मला लागेल तो रंग हिंदूस्तानातून पुसल्याशिवाय राहणार नाही’.

१९९२ मध्ये बाबारी पडल्यानंतर शेपट्या कापत-कापत बिळामध्ये लपले होेते तेव्हा बाळासाहेबांनीच हिंदूत्वाचा हूंकार भरीत ‘गर्व से कहो हम हिंदू है’चा नारा दिला होता.मुंबई वाचवली.पोलीस,लष्कर सगळेच शिवसेनेला पिटत होते.कुर्लातील एका झोपडीत रक्ताचा सडा पडला होता.एका अबला महिलेला उचलून नेत होते,त्यांच्याकडे काेयते-तलवारी होत्या.शिवसैनिकांनी पडक्या झोपडीच्या भिंतीला लाथ घालून पाडले,पडक्या भिंतींच्या विटांनी त्या नराधमांना पिटाळले.

उद्धव ठाकरे : शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं नातं काय आहे? - BBC  News मराठी

आता शिवसेना तुमची पालखी वाहत नाही म्हणून ते भ्रष्टाचारी झालेत.हर्षवर्धन पाटील भाजपात जातात तर पवित्र होतात.तुमच्यात आले तर पवित्र गंगा इतरत्र गेलेत तर गटार गंगा होते!नामर्दासारखे वैयक्तीक हल्ले पत्नी,मुलांवर करता?आम्ही त्यांना ‘अख्खरमाशा’संबोधतो.वडीलोपार्जित संपत्ती असल्यामुळे असे शब्द वापरतो मात्र मांसाहेबांचेही संस्कार आहेत त्यामुळे हातचे राखूनच बोलतोय.नाही तर फाडायला वेळ लागणार नाही. काटा बोचत नाही अजून नशीबवान समजा.

बंगालची पुर्नरावृत्ती महाराष्ट्रात करण्याची तयारी ठेवा.हिंदूत्व आता खरं धोक्यात आलं आहे.हिंदूत्वाची शिडी वापरुन सत्तेच्या सोपानावर स्वार झालेले आता इंग्रजांची फोडा,झोडा,तोडाची नीती वापरत आहेत.यासाठीच मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा,मराठी-अमराठी मिळून हिंदूत्वाची भक्कम एकज़ूट बांधा.‘मराठा तितूका मिळवावा’या उक्तीप्रमाणे ‘हिंदू तितुका मिळवावा हिंदूत्व धर्म वाढवावा’.

निवडणूकीतही ‘उपरे’लागतात-
पंढरपूरची निवडणूक झाली आता दूसरी निवडणूक पार पडली.स्वत:चे उमेदवार नाहीच आहेत कुठे. ‘उपरे’लागतात यांना निवडणूक जिंकायला आणि स्वत:ला जगातला सर्वात मोठा पक्ष समजतात.गरब्याला परवानगी देत नाही म्हणून आम्हाला‘ हे कसले हिंदू’ म्हणून दूषणे दिली जातात.ठाणेकरांनी नवरात्रीत ९ दिवस रक्तदान केले.कोणत्या पक्षामध्ये धमक होती हे करण्याची?परोपकाराची जाणीव शिल्लक राहीली नाही.हे रक्त कोणत्या हिंदू,मुसलमान,मराठी,अमराठीला दिले जाणार हे माहिती नसतं तरीही विक्रमी रक्तदान शिबिरे झालीत.तुम्ही किमान रक्तदानाचा एक ‘बॅनर’तरी लाऊन दाखवा,रक्तदान ही तर दूरची गोष्ट आहे.

राज्यपालांवर निशाणा-
खरं आहे महिलांवर अत्याचार होत आहेत.महिलांवरील अत्याचाराबाबत राज्यापालांनी २ दिवसांचे अधिवेशन घेण्याची सूचना केली.आम्ही त्यांना सांगितले हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे.माता-भगिनींवर अत्याचार करण्या-यांवर दया-माया दाखवली जात नाही.त्या नराधमालाही ताबडतोब अटक केली.फासावर लटकवल्याशिवाय सोडणार नाही.

पण?फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महिलांवरील अत्याचार तर देशभरात वाढले मग २ दिवसांचे संसदेचं अधिवशेन बोलावणार का?घटना घडणार नाही यासाठी देशभरात काहीतरी करु ना!महाराष्ट्रात घटना घडली की लगेच ‘लोकशाहीचा खून होतो’उत्तरप्रदेशात झाली की ‘तिथे लोकशाहीचे मळे फूलतात का?’

२६ नोव्हेंबर,मुंबईच्या अतिरेकी हल्ल्यात ओंगळे,करकरे,कामटे शहीद झालेत.त्यांचा स्मृतीदिनही आपण पाळतो.अतिरेकींविरुद्ध मुंबईची पोलिस लढत होती त्यांनाच तुम्ही ‘माफिया’म्हणता!२४ तास शिमगा करता त्यांच्या नावाने.अजून होळी दूर आहे पण यांच्या घरी शिमगा २४ तास सुरु असतो.

अखिलेश यादव,प्रियंका गांधी,छत्तीसगढचे मुख्यमंत्री यांना कशी वागणूक मिळतेय?अखिलेश यादव यांच्या घरावर तर फक्त रणगाडेच चढवणे राहीले होते.’हा सत्तेला नव्हे तर सत्याला जपणारा प्रदेश आहे’अलीकडे नुसती ‘भारतमाता की जय’ओरडण्याची ‘शैली’झाली आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात नुसती रोषणाई केली, १५ ऑगस्टला खिशाला तिरंगा लावला की झालं,काय कसलं अमृतमहोत्सव,त्यापेक्षा ‘अमृत मंथन करा’.

संघराज्यावर पण चर्चा करा-
संघराज्यावर पण चर्चा करा ना,कोणाचे किती अधिकार आहेत.काय आहे संविधानात?संघराज्याच्या संकल्पनेत केंद्राच्या दडपणाखाली राज्यांना जगू देतील का?हा विचार डॉ.आंबेडकरांनीही केला होता.भाषावार प्रांतचरना झाली मात्र डॉ.आंबेडकरांनी संविधान सभेत ठामपणे केंद्रा एवढेच राज्यांना देखील सार्वभौमत्व असल्याचे सांगितले.असले पाहिजे.राज्यांनाही केंद्रासारखेच हक्क आहे फक्त तीन परिस्थितीत,आणीबाणी,परकीय आक्रमण आणि परराष्ट्रीय धोरण सोडून केंद्राला राज्यांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही, नाही तर घटनेची ‘दूर्घटना’ होईल.

यावर मात्र गल्ली बोळ्यातल्या टिकाकारांनी बोलू नये.त्यांची टिका मी के-याच्या टाेपलीत टाकील,देशाच्या तज्ज्ञांनी यावर चर्चा करावी.केंद्राची लुडबूड असू नये हे आता सर्व राज्यांनी ठरवलं पाहिजे.सत्तेचं व्यसन या देशातून उपटून टाकलं पाहिजे.

वाचा आणि थंड बसा-
जुन्या वाचकांनी मार्मिक वाचलं आहे.त्यात एक सदर चालायचं ’वाचा आणि थंड बसा’आपल्याच राज्यात भूमीपुत्रांसोबत जे घडत होतं ते त्यात उमटत होतं.नुकतेच केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी माहितीच्या अधिकारात सांगितल्याप्रमाणे ७५ टक्के निधी एकट्या गुजरातकडे वळवण्यात आला आहे.का?महाराष्ट्र देशाचे घटक राज्य नाही का?सीआरएस फंडातून कोट्यावधीचा निधी हा एकट्या गुजरातच्या स्वयंसेवी संस्थांना देण्यात आला.कॅगचेच ताशेरे आहेत,मोदींच्या काळात गुजरातचा निधी ३५० टक्क्यांनी वाढला आहे.तो थेट संस्थांकडे हस्तांतरीत करण्यात आला.महाराष्ट्राला अतिवृष्टीचे मिळतात १० हजार कोटी,११ हजार कोटी रुपये!

तरीही माजी मुख्यमंत्री म्हणतात आम्ही वसूली करतो ससा सारखी,मदत देतो कासवासारखी!कासवच शेवटी शांत राहून शर्यत जिंकत असतो.करोनाचा निधीही सगळा तिकडेच गेला.महाराष्ट्राने कराेनाची लढाई ही राज्यातील जनतेच्या घामाच्या पैश्‍यांवर लढली.

महाराष्ट्राची चरस-गांजावरुन बदनामी-
संपूर्ण जगात फक्त महाराष्ट्रात गांजा,चरस यांना दिसतो.महाराष्ट्रातील तुळशी-वृंदावन जाऊन चरस-गांजाचे वृंदावन झाले का?का करतात असा नतद्रष्टपणा? मुंद्रा बंदरगाहावर कोट्यावधीचे आम्ली पदार्थ सापडतात त्याचे काय?महाराष्ट्राची पोलिस १५० कोटींचे आम्ली पदार्थ पकडतात त्याची कुठेच चर्चा नाही!चिमूटभर गांजा कोणी हूंकतोय तेच घेऊन बसतात,जामीन मिळाला का,जामीन मिळाला का?

युवाशक्तीला जर काम मिळाले नाही तर हा बॉम्ब बुडाखाली फूटेल.ही युवाशक्ती का वळतेय गुन्हेगारीकडे?युवाशक्ती घडवली नाही तर देशाची घडी विस्कटल्याशिवाय राहणार नाही.‘आधी माझ्या घरातली चूल पेटवा मग सत्तेचे डोहाळ जेवण घाला.’आम्ही महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय तर यांच्या पोटात दूखंतय?महाराष्ट्राला बदनाम करताय?एकतर्फी प्रेमासारखेच,महाराष्ट्राच्या प्रतिमेवर ॲसिड फेकताय!कुठे फेडणार हे पाप?सत्ता देऊन टाकतो,भाेगा तुम्ही.

संयुक्त महाराष्ट्राला ६० वर्षे झाली.संस्कार घडवणारे ‘मराठी भाषा भवन’ची निर्मिती महाराष्ट्र करीत आहे.चौपाटीवरमराठी रंगभूमी दालनाची‘निर्मिती होत आहे.वरळीत जागतिक दर्जाचे मत्सालय तर धारावीत पुर्नवसन करुन ‘आर्थिक केंद्र’करणार आहोत.मुंबईत लष्कराचं संग्रहालय राहणार असून त्यात फक्त रणगाडे राहणार नाहीत तर देशाच्या सीमेवर वेगवेगळ्या तापमानात देशाचा सैनिक कश्‍याप्रकारे कर्तव्यरत असतो त्याचे प्रात्यक्ष्कि अनुभवायला मिळणार आहे.यासाठी वेगवेगळी दालने राहणार आहेत,स्वत:५ मिनिटे त्या विपरीत परिस्थित उभे राहून बघायचं आहे.

विराेधकांना टोला हाणीत स्वत: लढाईत सहभागी नसता निदान लष्कराच्या संग्रहलयात तरी सहभागी व्हा नाहीतर लोकच तुम्हाला संग्रहालयात पाठवतील.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या