

जकीय व सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा आरोप
नागपूर,ता. १४ जुलै: भारतीय जनता पक्ष्ाचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांनी तहसील पोलीस ठाण्यात साहील सैय्यद, डॉ.प्रविण गंटावार तसेच एका अज्ञात व्यक्तिच्या नावे तक्रार दाखल केली आहे.
आपल्या तक्रारीत दयाशंकर यांनी नमूद केल्याप्रमाणे १२ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५ वा. त्यांना अनेक लोकांचे फोन आलेत की त्यांच्याविषयी एका मराठी वाहीनीवर बातमी प्रसारित होत आहे ज्यात त्यांना एका स्त्रीसोबतच्या संबंधामध्ये अडकवण्याचे तसेच माझा राजकीय बळी घेण्याविषयीची चर्चा केली जात आहे. या बातमीत दोन अज्ञात व्यक्ति हे फोनवर बोलत असून गैरअर्जदार डॉ.प्रवीण गंटावार, साहील सैय्यद व एक अज्ञात व्यक्तिचे समर्थन त्या संभाषणात ते करीत आहे.
हे ऐकून मलाही आश्चर्याचा धक्का बसला व मी देखील ती बातमी त्या वाहीनीवर बघितली. मला या बातमीमुळे वैयक्तिकरित्या दू:खं झाले व मी याची सखोल माहिती घेतली असता डॉ.गंटावार यांच्या विरोधात मी नुकतेच पार पडलेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत आवाज उठवल्यानेच डॉ.गंटावार यांच्या समर्थकांनी याचा सूड घेण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी ही योजना आखल्याचे त्यांनी नमूद केले. या संवादात मला स्त्रियांचा शौक असल्याचे सांगून मला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याची योजना रचली जात असल्याने मी गैरअर्जदार क्र.२ डॉ.गंटावार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करीत आहे.
याशिवाय मी गैरअर्जदार क्र.१ साहिल सैय्यद याला देखील ओळखत असून काही कामानिमित्त तो माझ्याकडे महानगरपालिकेत भेटायला आला होता. त्या ऑडीयो क्लिपमधील एक आवाज हा साहील सैय्यदचा असल्याचा माल दाट संशय आहे. सय्यद याने माझ्या विरोधात राजकीय साठगाठ करुन माझ्या विरोधात अपराधिक षडयंत्र करीत माझ्या राजकीय व सामाजिक प्रतिष्ठेला तडा देण्याचा तसेच माझी हत्या करण्याची योजना आखण्याचा प्रयत्न केला आहे. या तिघांच्याही अश्या कृकृत्यामुळे माझ्या परिचितांमध्ये माझ्या सन्मानाला ठेच पोहोचली असून या तिन्ही गैरअर्जदारांनी हेतूपूर्वक,सुनियोजितपणे माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत.या तक्रारीची योग्य ती दखल घेऊन तातडीने या तिन्ही आरोपींच्या विरोधात कठोर करवाई करण्याची मागणी दयाशंकर तिवारी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केली आहे.
सध्या नागपूरात महापौर संदीप जोशी तसेच नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना ’हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचे षडयंत्र रचणारी ‘ऑडियो क्लिप’ व्हायरल झाली असल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून,यामागे कोणाचे षडयंत्र आहे,याची चर्चा सुरु झाली आहे.या संदर्भात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून गृहमंत्री नितीन राऊत यांनी हे प्रकरण गंभीरतेने घ्यावे अशी मागणी भाजप करीत आहे.
दोन दिवसांपूर्वी काही वरीष्ठ पोलीस अधिका-यांसह अनेक लोकांच्या मोबाईलवर ही क्लिीप पाेहोचली. या क्लिीपमध्ये दोन अज्ञानत व्यक्ती बोलत असून महापौर संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून अडचणीत आणण्यासंदर्भात त्यांचे संभाषण रंगले आहे. दयाशंकर तिवारी यांना अडचणीत आणण्यासाठी यात दोघांची चर्चा झाली असून मनपातून निलंबित करण्यात आलेल्या डॉ.गंटावार यांचा देखील यात उल्लेख आहे. दोन्ही नेत्यांना अडचणीत आणताना कुठेही समोर यायचे नाही व पडद्यामागे राहूनच हालचाली करायच्या आहेत,अशी देखील चर्चा या दोघांमध्ये रंगली. महापौर संदीप जोशी व दयाशंकर तिवारी यांना अडचणीत आणण्यासाठी नेमके कोण कटकारस्थान करत आहेत,यांचा करविता धनी कोण?इ.प्रश्न यातून उपस्थित झाले आहेत.
या क्लिपमध्ये दोन्ही व्यक्ति एका डॉक्टरबाबत चर्चा करीत असून,आपण अगोदर सरांच्या धंतोली येथील रुग्णालयात भेटलो असल्याचे सांगत आहेत. तेथेच बसून पुढील बैठक करु,त्यांचे आता बैद्यनाथ चौकामध्ये नवीन रुग्णालय बनत आहे,असा संवाद यात ऐकू येत आहे. ते नेमके कोणत्या डॉक्टरबाबत बोलत आहेत,हे देखील गुपितच आहे.
यासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहले असून या ‘क्लिप’मध्ये भाजपच्या नेत्यांविरोधात ‘हनी ट्रॅप’करुन त्यांना अडकविण्याच्या गुन्हेगारी कटकारस्थानाचा उल्लेख केला आहे. शिवाय गृहमंत्र्यांचेच नाव घेऊन शहरात गुन्हेगारांना अभय दिले जात असल्याचे दोन्ही अज्ञात व्यक्ति बोलत आहेत. न्यायव्यवस्थेबाबत देखील अयोग्य भाषा वापरली गेली आहे. ही बाब गंभीर असून या क्लिपची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात तात्काळ आदेश देण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे.
विशेष म्हणजे या ऑडीयो क्लिपमध्ये धंतोली येथील तसेच बैद्यनाथ चौकातील त्या डॉक्टाराचे मोठे रुग्णालय बनत असल्याचे संभाषण ऐकू येत आहे. धंतोली येथे नागपूर महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचेच ‘कोलंबिया’रुग्णालय असून बैद्यनाथ चौकात देखील त्यांचेच अत्याधूनिक कोलंबिया रुग्णालयाचे बांधकाम सुरु असल्याचे सांगितले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
