

निवडणूक प्रतिज्ञापत्रात फौजदारी गुन्ह्याची माहीती लपवल्याचा अारोप
नागपूर,ता.१४ मे: भारतीय जनता पक्ष्ाचे विधानपरिषद निवडणूकीसाठीचे उमेदवार प्रविण दटके यांच्या विरोधात नागपूरातील वकील सतीश उके यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
दटके यांनी त्यांच्यावरील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती आपल्या निवडणूक अर्जामध्ये लपविल्याचा आरोप ॲड.सतीश उके यांनी केला आहे.
प्रविण दटके यांच्या विरोधात २००६ सालच्या फौजदारी प्रकरणात कलम १८१,१८२,२०० नुसार गुन्हा दाखल आहे.यावर नागपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र, होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणूकीसाठी त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये ही माहिती लपविल्याचा आरोप ॲड.उके यांनी केला आहे.
दटके यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम १२५(अ)प्रमाणे कारवाई करण्यात यावी,अशी विनंती ॲड. सतीश उके यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये केली आहे. खोटी माहिती दिल्याबद्दल आयोगाने दटके यांचा अर्ज रद्द करुन निवडणूक प्रमाणपत्र देऊ नये,अशी देखील विनंती त्यांनी अर्जात केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
