फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदटके:नेत्यांचा कार्यकर्ता,कार्यकर्त्यांच्या नेत्याला अखेर मिळाले निष्ठेचे फळ

दटके:नेत्यांचा कार्यकर्ता,कार्यकर्त्यांच्या नेत्याला अखेर मिळाले निष्ठेचे फळ

Advertisements

दटके:नेत्यांचा कार्यकर्ता,कार्यकर्त्यांच्या नेत्याला अखेर मिळाले निष्ठेचे फळ
दाेनवेळा आमदारकीने हूलकावणी देऊन शेवटी आमदारकी गळ्यात: नागपूरकर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ८ मे: बुधवारी ६ मे च्या रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील ओबीसींचे कद्दावर नेते व माजी आमदार एकनाथ खडसे यांना विधान परिषदेतील आमदारकी मिळणार,तुमचे नाव पाठवले असल्याचा फोनही आला मात्र दोन दिवसात, कपाळावरची राजकारण नावाची भाग्य रेषा बदलली आणि दोन वेळा आमदारकीने हूलकावणी दिलेल्या नागपूरचे भाजप शहराध्यक्ष् व माजी महापौर प्रवीण दटके यांच्या गळ्यात अखेर आमदारीची माळ पडली.

दटके यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आले.सर्व कागदोपत्री तांत्रिक बाबी पार पडल्या,आता फक्त औपचारिक निवडणूक बाकी आहे.दटके यांचे नावे अनपेक्ष्तिपणे नागपूरातून परिषदेसाठी गेल्याने अनेकांना आश्‍चर्यही वाटलं.मात्र या वेळी खरोखरीच भाग्याची साथ लाभल्यानेच यशाने दटके यांना हूलकावणी दिली नाही. २०१६ मध्ये दटके यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्‍चित झाले होते. त्यांनी निवडणूकीचा अर्ज ही भरला.सर्व औपचारिकता पूर्ण ही झाल्या मात्र भाजप प्रवक्ते गिरीश व्यास यांचे भाग्य फळफळले आणि परिषदेतील आमदारकी गिरीश व्यास यांना मिळाली.

त्यावेळी देखील दटके यांनी पक्ष्ाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्ष्ाचा निर्णय मौनपणे स्वीकारला.एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधान सभेच्या निवडणूकीत देखील दटके यांचे नाव मध्य नागपूर मतदार संघातून आघाडीवर होते. मात्र त्यावेळी देखील यशाने त्यांना हूलकावणी दिली. ऐनवेळी पक्ष्ाने आमदार विकास कुंभारे यांनाच हलबा समाजाच्या मतांच्या गोळाबेरिजेतून पुन्हा आमदारकीचे तिकीट दिल्या गेले आणि दटके यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.एवढेच नव्हे तर पक्ष्ाच्या युवा कार्यकर्त्यांनी बडकस चौकात आपल्याच पक्ष्ाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले.

मात्र पुन्हा पक्ष्ाचा निष्ठावंत कार्यकर्ता पुढे सरसावला आणि पक्ष्ाचा निर्णय मान्य करुन पक्ष्ाने दिलेल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी कामाला लागला. यावेळी मध्य नागपूरातून काँग्रेसचे युवा उमेदवार बंटी शेळकेनी कुंभारे यांना शेवटच्या राऊंडच्या मतगणनेपर्यंत अतिशय चुरशीची लढत दिली. २५ हजार मताधिक्याने विजयी होणारे कुंभारे यांना अखेर २५०० च्या मताधिक्याने निसटता विजय मिळाला आणि पक्ष्ाने सुटकेचा श्‍वास सोडला.

दटके हे पक्ष्ाच्या नेत्यांसाठी नेहमीच एक योग्य कार्यकर्ता राहीले तर कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच एक खूप चांगले नेते राहीले आहेत.

‘आमचा नेता अखेर आमदार झाला’हा जल्लोष त्यांना मोठ्या प्रमाणात साजरा करायचा होता मात्र कोरोनामुळे शहरात लागलेल्या संचार बंदीमुळे हा संपूर्ण जल्लोष सध्या व्हॉटस ॲप ग्रूपवर साजरा होत आहे.विशेष आनंद म्हणजे पक्ष्ाने खडसे,पंकजा मुंडे,चंद्रशेखर बावणकुळे यासारख्या दिग्गजांचीच चर्चा माध्यमात होत असताना,नागपूर शहरातील पक्ष्ाच्या शहराध्यक्ष्ाची निवड केली,यातच दटके यांच्या कार्यकुशलतेची,संयमाची व सर्वांना घेऊन चालण्याच्या कार्यपद्धतीची पावती मिळते. विरोधी पक्ष्ात देखील दटके यांनी मैत्री संबंध राखले असून विरोधी पक्ष्ातील नगरसेवकांच्या कामांसाठी देखील दटके हे सदैव तत्पर राहीले.

दटके यांना आमदारकी मिळाल्याने ते भारतीय जनता पक्ष्ाचे शहरातील आठवे आमदार ठरले आहेत.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्ष्णि-पश्‍चिमचे आमदार असून,मध्य नागपूरातून आ. विकास कुंभारे, पूर्व नागपूरातून आ.कृष्णा खोपडे,दक्ष्णि नागपूरातून आ.मोहन मते, विधान परिषदेतील आ.गिरीश व्यास तसेच पदवीधर मतदार संघातून आ. अनिल सोले तसेच शिक्ष्क संघाचे ना.गो.गाणार यांच्यासोबतच दटके आता परिषदेत आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पक्ष्ाचे शहरातील आठवे आमदार राहतील.

राज्यातील भावी राजकारणात ओबीसींचे नेते म्हणून प्रवीण दटके ओळख निर्माण करणार असल्याचे आता बोलले जात आहे.

१६ डिसेंबर १९७८ रोजी जन्माला आलेले प्रवीण दटके हे दिवंगत आमदार प्रभाकरराव दटके यांचे सुपुत्र.तीन बहीणींच्या प्रेमळ सानिध्यात वाढलेला एकमेव भाऊ.वयाच्या २२ साव्या वर्षीच ते सर्वात तरुण नगरसेवक म्हणून महालातून निवडून आले.तेव्हा ते पॉलिटेक्नीक शिकत होते.१५ मार्च १९९९ हे त्यांच्या जिवनातलं टर्निंग पॉईंट ठरलं. वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईला राजकारणात येण्याची विचारणा झाली मात्र त्यांनी नकार दिला मात्र प्रवीण यांनी राजकारणात यावं व वडीलांचा समाजसेवेचा वारसा सांभाळावा,अशी आईंची ईच्छा होती.

पुढे राजकारणात प्रवीण यांनी यशाचे अनेक टप्पे पार पाडले. यश आणि संघर्षाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टि प्रवीण यांच्या अंगी आनुवांशिकतेनेच आली.नगरसेवक पदाच्या दुस-या कार्यकाळातच महापौर पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. अतिशय धडाडीने निर्णय घेणे,लवकर निर्णय घेणे हे त्यांचे गूण असून महापौर पदी असताना त्यांच्यातील निर्णय क्ष् मता शहरवासियांनी बघितली.पुढे पक्ष्ाने शहराध्यक्ष् पदाची देखील जवाबदारी त्यांच्यावर सोपवली. त्यांच्या कार्यकाळात पक्ष्ाला शहरात ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवता आला.कार्यकर्त्यांची मोठ ते अत्यंत हुशारीने बांधण्यात पारंगत आहेत. कार्यर्त्यांचा नेता शेवटी आमदार झाला याचा पराकोटीचा आनंद भाजपचे अनेक नगरसेवक तसेच कार्यकर्ते बाेलून दाखवत आहेत.युवा कार्यकर्त्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असणारे दटके हे भारतीय जनता पक्ष्ाच्या युवा मोर्च्याचे २०१० साली अध्यक्ष् देखील राहीले आहेत या शिवाय राष्ट्रीय युवा मोर्च्यांचे सभासद म्हणूनही त्यांनी आपली भूमिका बजावली. २०१४ ते २०१७ दरम्यान महापौर म्हणून त्यांची धडाडी ही वाखाण्यासारखी होती. फेब्रुवारी २०१७ साली ते पुन्हा महाल मधून नगरसेवक म्हणून निवडून आले.

मैत्रिणीनेच केक आणला घरी-प्रवदा दटके

प्रवीण दटके यांना विधान परिषदेतील आमदारकी जाहीर होताच कार्यकर्त्यांसाबेत आई प्रतिभा दटके तसेच पत्नी प्रवदा दटके यांनाही अत्यंतिक आनंद झाला. ‘सत्ताधीश’ने फोनवर घेतलेल्या प्रतिक्रियेदरम्यान प्रवदा यांचा आनंद हा शब्दात मावत नव्हता.मैत्रीणीनेच केक घरी आणला असे त्यांनी सांगितले. बुधवारी ही गोड बातमी कळाली तेव्हा आईनेच देवा पुढे गोड साखर व सुखा मेवा ठेवला.प्रवीण यांच्या तिन्ही बहीणींना आधी फोन करुन ही अतिशय आनंदाची बातमी कळवली. त्यांनाही खूप आनंद झाला.प्रवीण यांनी बाबांसारखेच आमदार व्हावे,ही आईंखी खूप ईच्छा होती,आईंची तर ईच्छाच पूर्ण झाली.कोरोनाचा धोका टळल्यावर सर्वांसाेबत धडाक्यात हा आनंद साजरा करणार.दटके हे सध्या मुंबईतच असून साेमवारी उशिरा रात्री घरी परततील असे त्यांनी सांगितले.

आज कार्यकर्त्याला विजय मिळाला- कार्यकर्त्यांची मार्मिक प्रतिक्रिया
निस्वा:र्थी व्यक्तिमत्व.सर्वांच्या मदतीला धावून जाणारा,अचूक निर्णय क्ष् मता असणारा नेता, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणारा कौटूंबिक सदस्य,कार्यकर्त्यांच्या अडचणीत धावून जाणारा खूप चांगला माणूस,मोठ मोठी पदे भूषवल्यानंतर ही सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे जमिनीवर राहणारा आदर्श कार्यकर्त्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,आमचा नेता,आमच्यातला कार्यकर्ता आमदार झाला याच्या झालेल्या आनंदा पुढे आज आम्हाला आभाळ ही ठेंगणे झाले असल्याची प्रतिक्रिया प्रभाग क्र.१३(ब)च्या नगरसेविका व मनपात पक्ष्ाच्या उपनेत्या वर्षा ठाकरे तसेच कार्यकर्ते कुणाल गडेकर यांनी दिली.

काेरोनाची बंधणे नसती तर संपूर्ण शहर हे भाजपामय करुन टाकले असते. असा जल्लोष की नागपूरकर बघत राहीले असते. हा आनंद पुढे शहरातील परिस्थिती सावरल्यानंतर नक्कीच साजरा करणार अशी पक्ष्ाच्या अनेक नगरसेवकांची प्रतिक्रिया होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या