
नागरिक हवालदिल: नेत्यांना चमकोगिरीचा हव्यास
नागपूर,ता. ६ एप्रिल: पालकमंत्री नितीन राऊत यांनी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शहरात ३० एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली यावर भारतीय जनता पक्ष्ाचे शहराध्यक्ष् व आमदार प्रवीण दटके यांनी पालकमंत्री हे शहरातील नागरिक तसेच व्यापरांमध्ये स्पष्ट सूचना निगर्मित न करता संभ्रम निर्माण करत असल्याची जळजळीत टिका केली मात्र त्यांच्याच पक्ष्ाचे ज्येष्ठ नगरसेवक व माजी सत्ता पक्ष् नेते विक्की कुकरेजा हे लगेच लॉक डाऊनच्या संदर्भात नागरिकांना ‘सल्लेगिरी‘देणारा व्हिडीयो व्हायरल करतात,एकीकडे लॉकडाऊनमुळे आम जनता परेशान झाली असली तरी दूसरीकडे भाजपचे काही नेते मात्र याचा उपयोग‘चमकोगिरी’साठी करीत असल्याने संताप व्यक्त केला जात अाहे.
व्हीडीयोच्या मार्फत संदेश देताना प्रवीण दटके यांनी उघड-उघड पालकमंत्री यांच्यावर जनतेला संभ्रमित करणा-या निर्णयावर टिका केली असताना कुकरेजा हे पक्ष्ाची ‘रि’न ओढता लॉक डाऊनच्या संदर्भात जनतेने काय करावे,काय करु नये,जरीपटक्यात लसीकरणाची माहिती प्रसिद्ध करीत असल्याने त्यांची भूमिका ही पक्ष्ापेक्ष्ा वेगळी दिसून पडत असल्याचे म्हटले जात आहे.अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व बाबी बंद करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने कश्याप्रकारे केला आहे याचे ‘स्तुतीगान’ कुकरेजा यांनी केला.
३० एप्रिलपर्यंत ’ब्रेक द चेन’संकल्पनेला घेऊन मनपाने हे काम केले असल्याचा डिमडिमही त्यांनी पिटून टाकला मात्र दूसरीकडे दटके यांनी पालकमंत्री यांनी कडक लॉकडाऊन लावला त्याचप्रमाणे महानगरपालकेने देखील आदेश काढला मात्र त्यात एवढा संभ्रम निर्माण झाला आहे रात्री आठ वाजतापासून काय सुरु राहणार आहे काय बंद राहणार आहे?त्यांच्या सूचनेत फक्त रात्री ७ पासून सकाळी ८ पर्यंत हे बंद राहील ते बंद राहील,सरकार यांचं,मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेतात मात्र जनतेपर्यंत साध्यासरळ पद्धतीने निर्णय पोहोचवत नसल्याची त्यांनी टिका केली.
आमच्या नेत्यांनी देखील या लॉक डाऊनला बैठकीत समर्थन केलं मात्र जनतेमध्ये आणि शहरातील व्यापरांमध्ये प्रचंड संभ्रम आहे की काय सुरु आहे काय बंद आहे?ही स्थिती शासन व प्रशासनस्तरावर ताबडतोब सुस्पष्ट करण्याची मागणीही दटके यांनी केली.
यात कोणीही राजकारण करु नये असा सल्ला देतानाच त्यांच्याच पक्ष्ाचे कुकरेजा हे लॉकडाऊनवर राजकारण करीत असल्याची टिका होत आहे.जे खरं आहे ते व्यापा-यांना,जनतेला सांगण्याची अपेक्ष्ा दटके यांनी व्यक्त केली.संभ्रम कायम असताना दूकाने उघडली आणि मनपाच्या शोध उपद्रव पथकाने त्यांच्यावर कारवाई केला तर दंड भरेल कोण?त्याला जवाबदार कोण असेल?असा प्रश्न दटके यांनी उपस्थित केला.
व्यापारी आधीच व्यवसाय बुडाला असल्यामुळे आर्थिक अडचणीत आहे त्यात त्यांच्यावरच पुन्हा दंडाचा बडगा उगारला जाईल,त्यामुळे पालकमंत्री यांनी काय सुरु राहील काय बंद राहील याची तात्काळ स्पष्टता करण्याची मागणी दटके यांनी केली.
दूसरीकडे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेप्रमाणे शहरासाठी सुस्पष्टपणे दिशानिर्देश जारी केले असतानाही कुकरेजा हे जनतेचे हित साधण्याचा आव आणीत लॉक डाऊनविषयी माहती देण्याचा आड आपली ‘राजकारणाची पोळी’शेकून घेत असल्याची टिका केली जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
