फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदक्षिण नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध: मोहन मते

दक्षिण नागपूरच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध: मोहन मते

Advertisements

नागपूर, ता.१२: दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार मोहन मते यांनी आज येथे केले.  प्रभाग क्रमांक 32 मधील पदयात्रेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

साई मंदिर, दुर्गा नगर, शिर्के नगर, लाडीकर लेआउट, महालक्ष्मी नगर, श्री नगर, सच्चिदानंद नगर, अंबिका नगर, उदय नगर, जम्मु दीप नगर, जुना सुभेदार, स्वीपर कॉलनी, आदिवासी नगर, खानखोजे नगर या भागातून निघालेली मोहन मते यांची जनसंपर्क यात्रा सर्व परिसर दुमदुमून गेली. विविध संघटना तसेच महिला आणि तरुणाईने मोहन मते यांचे जल्लोषात स्वागत केले. दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघाचा विकास भारतीय जनता पार्टी शिवाय कोणीही करू शकणार नाही ही असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते . या संपर्क यात्रेत मोहन माते यांच्यासोबत शिवसेनेचे नेते शेखर सावरबांधे, नगरसेविका रूपाली ठाकूर, कल्पना कुंभलकर, नगरसेवक अभय गोटेकर, दीपक चौधरी, राजू नागुलवार, मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, विलास करांगळे, गजानन तांबोळी, मधु घाटे, प्रभागाचे अध्यक्ष सोमलवार गुरुजी कैलासजी चुटे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सायंकाळी निघालेल्या संपर्क यात्रेत भवानी मंदिर, विश्वकर्मा नगर, आदिवासी नगर, ताज नगर, बजरंग नगर, जवाहर नगर, जुना सुभेदार, कैलास नगर, तसेच नवीन सुभेदार या भागातील नागरिकांनी मोहन न त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या