

३९८७ मतांनी खेचून आणला विजय
नागपूर: दक्षिण नागपूर मतदार संघात दुहेरी,तिरंगी नव्हे तर चांगली पंचरंगी लढत रंगली होती. या मतदार संघात भारतीय जनता पक्ष्ाने माजी आमदार मोहन मते यांच्यावर कमान सोपवून सुधाकर कोहळे यांची तिकीट कापली होती. सुरवातीपासूनच या मतदारसंघाकडे संपूर्ण नागपूरचे लक्ष् लागले होते. मात्र दक्ष्णिेत एकूण २५ फेऱ्या झाल्या,प्रत्येक फेरीत प्रत्येक केंद्रातून मोहन मते यांना मते मिळत गेली हे विशेष. दक्षिणची लंका सर करण्याचा प्रयत्न अनेक आजी-माजी महापौर,उपमहापौर,अपक्ष् यांनी केला, मात्र शेवटी माेहन मते यांनी ही लंका ३,९८६ मतांनी सर करुन दिग्विजय मिळवला.
या मतदार संघात काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी शेवटच्या फेरीपर्यंत खूप चांगली लढत दिली.त्यांना ७८,६५८ मते पडली मात्र मते यांनी ८२,१२७ मते घेऊन त्यांच्या विजयाचे स्वप्न धूळीस मिळवले. याच मतदार संघातून भाजपाशी बंडखोरी करुन माजी महापौर सतीश होले यांनी अपक्ष् म्हणून निवडणूक लढवली तर शिवसेनेतर्फे किशोर कुमेरिया यांनी बंडखोरी करत अपक्ष् म्हणून लढत दिली होती,या दोन्ही बंडखोरांना दक्षिणच्या मतदारांनी साफ नाकारले. होले यांना ४०११ मते तर कुमेरिया यांना १३२० मते पडली. २००९ साली हा मतदार संघ युतीत शिवसेनेकडे गेला असल्याने तत्कालीन आमदार मोहन मते यांनी बंडखोरी करुन अपक्ष् म्हणून निवडणूक लढवली होती, परिणामी या मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. २०१४ साली युती तुटल्यामुळे पुन्हा हा मतदार संघ भाजपकडे आला असला तरी सुधाकर कोहळे यांना उमेदवारीची लॉटरी लागली,यामुळे मते समर्थक हे नाराज होते मात्र मते यांनी तरीही आपल्या मतदार संघात चांगला जनसंपर्क ठेवला. कार्यकर्त्यांची मजबूत फळी ही त्यांची जमेची बाजू आहे. मतदारांमध्ये मते यांची प्रतिमा चांगली असल्याने आणि घरी येणार्या प्रत्येक माणसाशी आपुलकीचे नाते ठेवल्याचा फायदाही त्यांना या निवडणूकीत झाला.
याच मतदार संघातून निर्मल उज्जवलचे सर्वेसर्वा प्रमोद मानमोडे यांनी देखील अपक्ष् म्हणून निवडणूक लढवली मात्र त्यांना ३,२७६ मतांवर समाधान मानावे लागले.गेल्या दोन वर्षांपासून ते या मतदार संघात सक्रिय होते.शेवटच्या काही दिवसात त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्वही स्वीकारले होते मात्र पक्ष्ाने त्यांना तिकीट न देता गिरीश पांडव यांच्यावर दारोमदार सोपवले. गिरीश पांडव यांनी मते यांना अखेरच्या फेरीपर्यंत कडवी झूंज दिली मात्र विजयाची माळ शेवटी मते यांच्या गळ्यात पडली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दक्षिण हा एकमेव मतदार संघ असा होता जिथे पंचरंगी लढत होती. मात्र शूर पुरुष हा समोर किती शत्रू आहेत याकडे लक्ष् देत नाही तर फक्त लढण्याकडे लक्ष् देतात असे मते यांचे समर्थक आता अभिमानाने सांगतात आहे.मानमोडे यांनी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या ‘प्रतिमा’निर्मितीवर बरीच माया खर्च केली मात्र त्यांच्या ‘मार्केटिंग’ला दक्षिणच्या मतदारांनी सपशेल नाकारल्याचे निकालावरुन स्पष्ट झाले. मते यांचा दांडगा जनसंपर्क विजयश्री खेचून आणण्यात मोलाचा ठरला असे म्हटले जाते. भाजपने दाखवलेला विश्वास शेवटी त्यांनी सार्थक ठरवला व नागपूरच्या दक्षिणची सीट पक्ष्ाला मिळवून दिली. या मतदारसंघात ‘नोटा’चा प्रभाव जाणवला नाही. फक्त ९९ मते ही नोटाला पडली.
जाती-पातीचे राजकारण या मतदारसंघात नव्हते मात्र ऐनवेळी सुधाकर कोहळे यांची कापण्यात आलेली उमेदवारी, त्यांच्या समर्थकांची नाराजी हे सगळे फॅक्टर निवडणूकीत प्रभाव टाकणारे होते. कोहळे यांच्या समर्थकांनी मते यांच्यासाठी प्रचार केलाच नसल्याचे बोलले जाते.मात्र याचा परिणाम मते यांना पराजय मिळवून देण्यात झाला नाही.
शिवसेनेने लावले कुमेरियांच्या मागे पाठबळ
मुंबईत जरी भाजप-सेनेची युती झाली असली तरी मुख्यमंत्री यांच्याच शहरात भाजप-सेना यांची दिलजमाई या निवडणूकीत झालीच नाही. कुमेरिया हे शिवसेनेचे असल्यामुळे दक्ष्णिेतील शिवसेैनिकांनी आपले संपूर्ण पाठबळ कुमेरिया यांच्यामागे लावल्याचे उघडपणे बोलले जात होते मात्र कुमेरिया फक्त १३३० मतेच खेचू शकले. मते यांना पांडव यांच्या विरोधात शिवसैनिकांच्या सहकार्याची गरज होती मात्र फक्त शेखर सावरबांधे हेच त्यांच्या प्रचारात शेवटपर्यंत दिसले. सावरबांधे यांचे मते यांच्याशी आपुलकीचे नाते असल्यामुळे शिवसेनेतर्फे त्यांनी एकट्यानीच मते यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली.
एकूण २५ टेवबलवर २५ फेर्या झाल्यात त्या सर्व फेर्यामध्ये मते यांना लीड मिळत होती यावरुन मते यांच्या दांडग्या जनसंपर्क व स्वच्छ प्रतिमा याची प्रचिती येते. भाजपाच्या धोरणांना विरोध असणारे मतदार यांनी देखील मते यांच्या नावापुढे मतदान केल्याचे स्पष्ट झाले.
ड्यूटी मध्यमध्ये लक्ष् दक्षिणकडे-
काटाेल राेडवरील जिल्हा परिषद शाळेत मध्य नागपूरच्या मतमोजणी केंद्रात निवडणूक कर्तव्य बजावणारे काही कर्मचारी हे वारंवार मिडीया रुममध्ये येऊन मते यांचे मताधिक्य जाणून घेत होते. सायंकाळी ६ नंतर संपूर्ण २५ सा व्या फेरी नंतर मते हे अवघे ३९८७ मतांनी जिंकले असल्याची माहिती त्यांना देताच जणू तेच या निवडणूकीत जिंकल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर पसरला. मते यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर त्यांनी मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.
मतमोजणी दरम्यान मतेंचा आश्रय होता भवानी मंदिरात-
गुरुवार,दि.२४ ऑक्टोबर हा दिवस प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत तनावाचा दिवस होता. अनेक उमेदवार हे कार्यकर्त्यांसोबत टी.व्ही.समोर बसून अपडेट्स जाणून घेत होते मात्र मते हे निवडणूकीच्या गोंगाटापासून दूर, पारडी येथील त्यांचे आराध्य दैवत असणारे भवानी मंदिरात रिलेक्स मूडमध्ये बसून होते. दर वर्षी नवरात्रात या मंदिरात नऊ ही दिवस मते यांच्याकडून या मंदिरात भोजनदानाचा उपक्रम राबवला जातो. मते यांची सामाजिक कार्याची पावती देखील या निवडणूकीत उमटली. सायंकाळी फक्त ते प्रमाणपत्र घेण्यासाठी मतमोजणी केंद्रावर पोहोचले. स्वयंसेवक असणारे मते हे जय आणि पराजय तेवढ्याच विनम्रतेने स्वीकारतात,ही त्यांची स्वभाव वैशिष्ठ अनेकांच्या मनात त्यांच्या विषयी आदर निर्माण करतात हे विशेष!
दक्षिणेत मिळवलेला दिग्विजय देखील त्यांनी तेवढ्याच विनम्रतेने स्वीकारला आणि सायंकाळी धंतोलीतील प्रादेशिक कार्यालयात पक्ष्ाच्या बैठकीत सहभाग नोंदवला. नागपूरातून पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे यांच्याच बरोबरीने मते यांची देखील मंत्री पदी वर्णी लागण्याकडे आता त्यांच्या समर्थकांचे लक्ष् लागले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
