फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजदंगल पूर्वनियोजितच:आ.दटके यांचा आरोप

दंगल पूर्वनियोजितच:आ.दटके यांचा आरोप

Advertisements

नागपूर,ता.१८ मार्च २०२५: सध्या महाराष्ट्रात विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे मात्र,नागपूरात काल घडलेल्या दंगलीमुळे मी तातडीने मुंबईवरुन आलो व आपल्या मतदारसंघाचा दौरा केला.दंगलीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मला इतकंच कळलं की ही दंगल पूर्वनियोजित आहे ,कारण मी आता हंसापुरीच्या ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीत हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक राहतात मात्र,कालच्या दंगलीत फक्त आणि फक्त हिंदूंच्या घरांना व गाड्यांना टार्गेट करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
दंगलखोर हे नागपूरातील विविध वस्त्यांमधून आले होते.कोणी मोमिनपुरा,कोणी भालदारपुरा,कोणी ताजबाग,कोणी हसनबागेतून आले आणि जी काही दंगल काल झाली ती अतिशय नियोजनबद्धरित्या करण्यात आली,याचे सर्व व्हिडीयो माझ्यापर्यंत पोहोचले.एकाच गल्लीत राहत असूनही फक्त हिंदूंच्याच गाड्या जाळण्यात आल्या.हिंदूंच्याच घरांवर तूफान दगडफेक झाली.अगदी तिस-या माळ्यापर्यंत दगडफेक करण्यात आली.एक ही मुस्लिम बांधवाची गाडी जाळण्यात आली नाही,ज्या रस्त्यावर दररोज हिंदू आणि मुस्लिम आपापल्या गाड्या पार्क करतात,काल दूपारपासून त्या रस्त्यांवर एक ही मुस्लिम बांधवाची गाडी पार्क करण्यात आली नव्हती,असा आरोप त्यांनी केला.
याचा अर्थ ही पूर्वनियोजित दंगल आहे तसेच ज्या तहसील पोलिसांच्या अंतर्गत हा भाग येतो त्या पोलिस ठाण्यातील पोलिसांनी येथील नागरिकांच्या सुरक्षेत कमालीचा हलगर्जीपणा केला असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.तहसील पोलिस ठाण्यातील पोलिसांनी,घाबरलेल्या नागरिकंनी वारंवार फोन करुन सुरक्षेची मागणी केल्यानंतरही कोणतीही हालचाल केली नाही,परिणामी कालच्या भयक्रांत करणा-या दंगलीला माझ्या मतदारसंघातील नागरिकांना सामोरे जावे लागले.
महिलांना अश्‍लील शिवीगाळ करने,मोठमोठ्याने नारे देणे,घरा समोरील गाड्यांना आग लावणे,कार जाळून देणे,मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या घरांवर दगडफेक करने,त्यांची दूकाने जाळणे,दवाखाना जाळणे हे कृत्य दंगलखोर करु शकले कारण तहसील पोलिस मुळीच गंभीर नव्हती.या सर्व घटनांची चौकशी करुन जे पोलिस अधिकारी यात दोषी आढळतील त्यांच्यावर  कठोर कारवाई करण्याची मागणी मी स्वत: करणार आहे,असा संतप्त इशारा दटके यांनी दिला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)
……………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या