
मोदींना एकट्याने श्रेय घेण्याची सवयच: अतुल लोंढे यांची जहाल टिका
नागपूर,९ डिसेंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित नागपूर दौरा दोन दिवसांवर येऊन ठेपला असून ,नागपूरात अनेक विकासकामांचे उद् घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे,या दौ-यात ते नागपूरकरांना मेट्रो टप्पा २ प्रकल्प व नागनदी संवर्धन,सौंदर्यीकरणासाठी देखील निधी देत आहेत मात्र अहंआश्यर्च, या कामांचे संपूर्ण श्रेय हे फक्त पंतप्रधान मोदींना ‘थँक्यू मोदी’द्वारे जाहीरात फलकांच्या माध्यमातून देण्यात आल्याने, अनेकांच्या भूवया उंचावल्या. या श्रेय नामावलीतून हेतुपुरस्सर शहराचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरींना डावलण्यात आल्याने, मोदींना एकट्याला प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्याची सवयच असल्याची घणाघाती टिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
वास्तवतेत, राज्याच्या उपराजधानी नागपूरात मुंबईनंतर मेट्रो आणण्यची मूळ संकल्पना ही काँग्रेचीच होती मात्र राज्यात २०१४ साली सत्तांतर झाले व सरकार बदलल्याने हा प्रकल्प सर्वस्वी गडकरी यांनीच साकारला असल्याचे लोंढे म्हणाले.काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मेट्रोसाठी केंद्रिय मंत्रीमंडळाने ९ हजार ८०० कोटी मंजूर देखील केले होते.मात्र,गडकरींनी या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी खेचून आणला आणि आज राज्याच्या उपराजधानीत महामेट्रो प्रवाश्यांसाठी यशस्वीपणे धावत आहे.
आता नागपूर शहराला ग्रामीण भागाशी जोडणारा महत्वाकांक्षी मेट्रोच्या दुस-या टप्प्याला केंद्रिय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून यामुळे कन्हान,बुटीबोरी,कापसी व हिंगण्यापर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकल्पासाठी केंद्रिय अर्थमंत्र्यांनी मागील वर्षी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती.मात्र,यासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
एवढंच नव्हे तर नागपूर मेट्राचे नाव डबल डेकर पूलामुळे गिनीज बुकमध्ये देखील गेलं,याचा ही सार्थ अभिमान नागपूरकरांना व महाराष्ट्रालाही झाला.तरी देखील आता मेट्रोच्या जाहीरातीतील श्रेय नामावलीत गडकरींचे नावच गायब करण्यात आले,यावर परखड टिका करीत अतुल लोंढे म्हणाले की,आमचे पंतप्रधान एवढे नासिस्ट आहेत की दोन रुपये,पाच रुपयांच्या अन्नधान्याच्या किटवरही स्वत:चे छायाचित्र छापून आणनारे पंतप्रधान, महामेट्रोसारख्या हजारो काेटींच्या प्रकल्पाचे श्रेय गडकरी यांना कसे देऊ शकतील?असा टोला ही लोंढे यांनी हाणला.
गडकरी यांनीच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नागपूर मेट्रोच्या दुस-या टप्प्पयाला मंजूरीचा प्रस्ताव केंद्रिय मंत्री मंडळाकडे पाठवला होता,हे विशेष!त्या वेळी राज्यात महाविकासआघाडीची सरकार होती.
मात्र,गडकरी यांचे खच्चीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळातूनच त्यांना वगळण्याची खेळी भाजपच्या दिल्लीश्वरांनी केली.पक्षातील निर्णयप्रक्रियेत सर्वोच्च स्थान म्हणजे संसदीय मंडळ आहे,त्यामुळेच त्यातील बदलांचा विशेष अर्थ देखील आहे.गडकरींना बाजूला करतानाच नागपूरातील दुसरे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदोन्नती देऊन केंद्रीय निवडणूक समितीत सामावून घेण्यात आले.यामुळेच गडकरी यांचे हेतूपुस्सर अवमूल्यन व फडणवीस यांची पदोन्नतीची देखील चर्चा या वर्षी ऑगस्ट मध्ये माध्यमात चांगलीच रंगली होेती.
नागपूरातील महामेट्रोच्या दुस-या टप्प्याच्या प्रकल्पाच्या जाहीरातरुपी श्रेय नामावलीतून गडकरी यांचेच नाव गायब करने,त्यामुळेच हा देखील आता चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या प्रकाराबाबत चांगलेच ताशेरे ओढले व अश्या नासिस्ट प्रवृत्तीच्या मोदींकडून इतरांना श्रेय देण्याची अपेक्षाही करता येत नसल्याची जहाल टिका त्यांनी केली.
असा कॅप्टन फक्त भाजपमध्येच होऊ शकतो.त्यामुळेच भाजपच्याच कार्यकर्त्यांप्रमाणे आमचा देखील यावर आता विश्वास बसायला लागला आहे की गडकरींना २०२४ ची खासदारकीसाठी लोकसभेची निवडणूक तरी लढायला मिळणार की नाही?हे आता वास्तव वाटायला लागलं असल्याची बोचरी टिका ही त्यांनी केली.




आमचे चॅनल subscribe करा
