फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजत्या चार संपादकांचा फोन आणि...

त्या चार संपादकांचा फोन आणि…

Advertisements
(हिवाळी अधिवेशन विशेष)

नागपूर,ता.९ डिसेंबर २०२५: सध्या महाराष्ट्राची संपूर्ण सरकार उपराजधानीत हिवाळी अधिवेशनासाठी आली आहे.विदर्भाचे मुद्दे,प्रश्‍न,समस्या,विदर्भातील नेते,मंत्री,आमदार,अधिकारी,यंत्रणा हे सर्व नागपूरकरांच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आले मात्र,‘ऑफ द रेकॉर्ड’अधिवेशनाच्या पहील्याच दिवशी एका वृत्ताने सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील(मेयो)न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.मकरंद व्यवहारे यांनी महिला डॉक्टरशी केलेला अक्ष्म्य व्यवहाराचा आरोप,मेयोच्या विशाखा समितीने काल या आरोपावर केलेले शिक्कामोर्तब व विषयाचे गांर्भीर्य.
लोकशाहीत ( अवघ्या एका दशकापूर्वीपर्यंत)वृत्तपत्रे हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जात होते.त्यावेळी वृत्तपत्रातील बातमी ही वाचकांच्या विश्‍वासहर्तेच्या कसौटीवर शंभर टक्के खरी उतरत असे.मात्र,२०१४ मध्ये केंद्रात परिवर्तन झाले व काँग्रेसच्या काळात वृत्तपत्रातील जाहीरांतीसाठी अवघ्या तीनशे कोटीचे बजेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता येताच पहील्या कार्यकाळात तीन हजार कोटींचे झाले व सध्या ते चौदा हजार कोटींचे असल्याचे एका अहवालात प्रसिद्ध झाले.प्रश्‍न जाहीराती किंवा बजेटचा नसून बातमी,वाचक,विश्‍वासहर्ता व नैतिकतेचा असल्यानेच डॉ.व्यवहारे यांच्या संबंधी बातमीची चर्चा माध्यम जगतात झाली नसती तर नवलच.
डॉ.व्यवहारे हे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे एक कद्दावर नेते यांचे मेव्हणे असून,एका दशकापूर्वी डॉ.व्यवहारे हे मेडीकलमध्ये देखील प्रमुख पदावर रुजू असताना त्यांच्यावर मेडीकलमधील महिला डॉक्टरसोबत गैरवर्तवणूकीचा गंभीर आरोप झाला होता.
तो काळ राज्यात भाजप-शिवसेनेच्या युतीचा सत्ताकाळ होता व चंद्रपूरचा तो नेता किंबहूना कद्दावर मंत्री यांचे फार मोठे ‘वजन‘विदर्भात यत्र-तत्र-सर्वत्र होते.मुख्यमंत्र्यांची ‘सावली‘झालेले त्या मंत्र्यांचे वृत्तपत्रांचे मालक,संचालक,संपादक,वरिष्ठ पत्रकार आदी यांच्यासोबत देखील ओळखी पलीकडील ‘आपुलकीचे व जिव्हाळ्याचे’संबंध होते.या संबंधांवरही आक्षेप घेण्यासारखेच काहीच नाही मात्र,या संबंधाचा ‘दूरुपयोग’त्यांच्या मेव्हण्यासंबंधीची बातमीच दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रात येऊ नये यासाठी एक दोन नव्हे तर चक्क चार-चार संपादकांचा फोन जेव्हा त्या-त्या वृत्तपत्रातील ज्येष्ठ पत्रकारांना येतो तेव्हा लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाच्या नैतिकतेची चौकट किती खोलवर ढासळली आहे, याची प्रचिती येते.
मेडीकलमधील एक महिला डॉक्टर धाडसाने पुढे येऊन त्या मंत्र्यांचा राजकीय प्रभाव झुगारुन स्वत:च्या आत्मसन्मानाचा लढा देत होती त्यावेळी हे ‘करंटे’ संपादक त्या महिला डॉक्टरच्या पाठीशी उभे राहण्या ऐवजी बातमीशी प्रतारणा करीत,आपापल्या वृत्तपत्राच्या पत्रकारांना फोन करुन ‘मेडीकलमधील घडलेल्या डॉ.व्यवहारेच्या विरोधातील बातमी घेऊ नको’म्हणून एका मागोमाग सांगते झाले…..!
गंमत म्हणजे,एका नामांकित इंग्रजी दैनिकाच्या वरिष्ठ महिला पत्रकारासह चारही दैनिकांचे वरिष्ठ पत्रकार त्यावेळी एकाच ठिकाणी चर्चा करीत बसले होते.मेडीकलसारख्या शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरसोबत घडलेल्या त्या अशलाघ्य घटनेची व महिला डॉक्टरने केलेल्या तक्रारीची प्रत हातात घेऊन हे पत्रकार चर्चा करीत असताना,इंग्रजी दैनिकाच्या त्या महिला पत्रकाराने सरळ डॉ.व्यवहारे यांनाच फोन लावला व घटनेची सत्यता विचारली.
डॉ.व्यवहारे यांनी सारवासारव करणारे उत्तर दिले व फोन ठेवला.अवघ्या काही वेळात महाराष्ट्रातील ’नंबर वन’चा दावा करणा-या मराठी दैनिकातील तत्कालीन संपादकाने त्यांच्या मेडीकल बिट पाहणा-या पत्रकाराला फोन केला व डॉ.व्यवहारे विरुद्धची बातमी घेऊ नकोस म्हणून ‘सूचना’केली!त्या पत्रकाराने फोन खालीच ठेवला होता तर नंबर वनची दावेदारी करणा-या दुस-या वृत्तपत्राच्या तत्कालीन संपदाकाचाही फोन त्यांच्या पत्रकाराला अाला व हीच सूचना त्यांनी देखील केली.त्या पत्रकारानेही फोन बंद केलाच होता की तिस-या दैनिकाच्या संपादकाचाही फोन त्यांच्या पत्रकाराला आला,डॉ.व्यवहारेंविरुदध्ची बातमी न घेण्याची सूचना त्या तिस-याही पत्रकाराला मिळालीच होती की ’एकमेव निष्पक्ष वृत्तपत्रा’चा दावा करणा-या एका मराठी दैनिकाच्याही संपादकाचा त्यांच्या पत्रकाराला फोन आला,घंटी वाजताच पत्रकराने फोन उचलला व संपादक बोलण्या पूर्वीच ’हो मी बातमी नाही घेणार’असे म्हणताच,पलीकडील संपादक साफ उडालाच!हसण्याचा आव आणून संपादकाने फोन ठेवला.
मात्र,संपादकांच्या त्या ‘योगायोगाची’चर्चा पुन्हा एकदा आज डॉ.व्यवहारेंवर मेयोच्या विशाखा समितीने गैरवर्तणूकीचा ठपका ठेवताच पत्रकार जगतात स्मृति पटलावर उमटली.त्याच वेळी डॉ.व्यवहारेे यांच्या अशलाघ्य कृतीला वृत्तपत्र माध्यमांनी सत्याच्या चौकटी राहून ठलकपणे प्रसिद्धी दिली असती तर…!.व्यवहारे यांनी इंग्रजी दैनिकाच्या महिला पत्रकारासोबत बोलल्यानंतर तत्परतेने राजकीय वरदहस्त मिळवण्याचा प्रयत्न केला.मंत्र्याच्या ‘लोख मोलाच्या अर्थलाभातून’पार वाकलेल्या त्या चारही संपादकांनी,बातमी,वाचक व पत्रकारितेच्या आत्म्याशीच प्रतारणा करीत ज्या तत्परतेने आपापल्या पत्रकारांना फोन करुन बातमी न घेण्याची सूचना केली,ती लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरविण्याची वृत्तपत्रांची शेवटची घटीकाच होती,या दुमत नाहीच.
आज डिजिटल माध्यमाच्या युगात हीच वृत्तपत्रे स्वत:च्या अस्तित्वासाठी ‘केविलवाणी’धडपड करताना दिसतेय.या मागचे कारण काही वृत्तपत्रांचे मालक,संपादक,मुख्य वार्ताहर,वरिष्ठ पत्रकार यांची ‘लोभी’वृत्ती गंगा-जमुनातील गणिकांनाही लाजवणारी कृती…!
मेडीकलमधून त्या घटनेनंतर राजकीय दबावातून डॉ.व्यवहारे यांची गच्छंती गोंदियामध्ये झाली मात्र,राजकीय वरदहस्तातून अवघ्या सहा महिन्यात गंभीर आरोप असणारे डॉ.व्यवहारे पुन्हा उजळ माथ्याने राज्याच्या उपराजधानीत परतले व गोर गरीबांचे आरोग्यस्थान असलेल्या मेयोमध्ये विभागप्रमुख म्हणून पुन्हा एकदा जवाबदारीच्या पदावर रुजू झाले….!येथेही त्यांनी आपला ‘व्यवहार’ मात्र,सुधारलाच नाही व अखेर महिला डॉक्टरसोबत केलेल्या अक्षम्य वर्तवणुकीवर विशाखा समितीने केलेल्या शिक्कामोर्तबानंतर त्या चारही संपादकांचा विषय चव्हाट्यावर आला नसता तर नवलच.
वाचकांपासून ‘सत्य’लपविण्याचे ’पाप’ज्या संपादकांनी एक दशकांपूर्वी  केले व आजही उजळ माथ्याने अनेक कार्यक्रमात वृत्तपत्र,लोकशाही,चौथा स्तंभ,वृत्तपत्रांची वाचकांप्रतीची बांधिलकी,नैतिकता इत्यादीवर भाषणे ठोकताना आढळतात तेव्हा दिशाहीन व भरकटेल्या पत्रकारितेची ‘कीव’ करावीशी वाटते….!
अतिशय अयोग्य व्यक्ति इतक्या जवाबदारीच्या पदांवर राजकीय वरदहस्तातून जेव्हा रुजू होतात,महिलांसोबत वारंवार गैरवर्तवणूक करतात, तेव्हा ‘सत्य’जनतेपर्यंत पोहोचविणे त्या संपादकांचे नैतिक कर्तव्य होते मात्र,असे घडले नाही.
आता तक्रारकर्ती महिला डॉक्टरांचे वैद्यकीय कर्तव्य व अन्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अभ्यासक्रम भयमुक्त वातावरणात होणे शक्य नाही,डॉ.व्यवहारेंना केवळ समज देऊन किवा बदली करुन प्रकरण मिटवण्याची चूक पुन्हा एकदा राजकीय वरदहस्तातून घडू नये,दिशाहीन व आपापल्या स्वार्थासाठी लाचारीचे टोक गाठलेल्या त्या संपादकांनाही आपली चूक सुधरविण्यासाठी ही घटना निर्वाणीचा इशाराच आहे, असेच आता म्हणावे लागेल…!
…………………………………………….
तळटीप:-
श्‍वानप्रेमी महिलांसाठी भाजपच्या प्रमोद नावाच्या बिहार येथील आमदाराने अतिशय अशलाघ्य टिपण्णी करत ‘ दिल्ली की जो फिमेल डॉग लव्हर्स है, कुत्तो के साथ सो कर ही उन्हे संतुष्टि मिलती है!असे धक्कादायक विधान केले.दूर्देवाने एकेकाळी भाजपसारख्या ‘सुसंस्कृत’समजल्या जाणा-या राजकीय पक्षात अश्‍या नीच विचारसरणीचे आमदार जनता निवडून तरी कशी देते?असा सवाल मोठ्या प्रमाणात समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.‘मत चोरी करुन’सत्ता मिळविण्याचा आरोप पुन्हा एकदा समाज माध्यमात ठलकपणे उमटत आहे.भाजपच्या सत्ताकाळात उच्चविद्याभूषित महिलाडॉक्टर्स पासून तर सर्वसामान्य महिला या सुरक्षीत नसल्याची जोरदार टिका समाज माध्यमात उमटली….!
……………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या