फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजतो ‘बाप’ ही...बापाचा ‘मूलगा’ ही!

तो ‘बाप’ ही…बापाचा ‘मूलगा’ ही!

Advertisements

पत्रकार श्रीकांत कुरुंभटे यांची अशी ही ‘नात्यांची’परिक्षा

‘एकाच वेळी’ साहली सहचरणीच्या बाळतंपणाची वेदना व वडीलांचा मेडीकलचा प्रवास

जागतिक पितृ दिवस विशेष

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २० जून(रविवार): ही गोष्ट अगदी खरी आहे की पितृत्वाच्या भावनेवर साहित्य क्षेत्रात फार कमी लिहल्या गेलं.‘बाप’हा फार कमी साहित्यकांनी आपल्या शब्दात शब्दबद्ध केला.पाल्याच्या सृजनात पती-पत्नी दोघांचाही समसमान वाटा असली तरी आजवर ‘आई’लाच झूकते माप मिळाले कारण ती ‘नवसृजन’घडवित असताना बाळंतपणाची असहनीय वेदना साहत असते.मात्र असे असले तरी आपल्या आजूबाजूलाच असे अनेक ‘बाप’ आढळतात ज्यांची नियतीने ‘बाप’म्हणून चांगलीच परिक्षाघेतली असते.नागपूरचे असेच युवा पत्रकार श्रीकांत कुरुंभटे यांची १७ ऑक्टोबर २०१८ रोजी नियतीने अशीच परिक्षा घेतली जेव्हा एकीकडे त्यांची जीवनसंगिनी महाल येथील मातृसेवा संघात नवसृजनाला जन्म देण्यासाठी भरती झाली आणि त्याचवेळी ज्याने जग दाखवले तो ‘बाप‘ब्रेन पॅरेलिसिसमुळे‘मेडीकलमध्ये भरती झाला……!

श्रीकांत यांचं हे दूसर अपत्य होतं.१७ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी सतरंजीपुरा येथे आमदार कृष्णा खोपडे यांची बाईट घेण्यासाठी ते महेश शिंपी या सहका-या सोबत गेले असताना सायंकाळी ६ वाजता त्यांचा फोन खणाखला.बायकाे श्रेयाचा फोन होता.‘मला थोडा त्रास होत असल्याने मी मातृसेवा संघात जात आहे,तुम्ही लवकर या’घरुन असा काळजीचा फोन येताच श्रीकांत हे लगबगीने मातृसेवा संघाकडे निघाले,त्या गडबडीत पैशांचे पाकीट आ.खोपडे यांच्या टेबलवरच राहून गेले!

मातृसेवा संघात पोहोचल्यावर पाहतात तर काय?बायको रुग्णालयाच्या गाऊनमध्ये ऑपरेशन थियेटरमध्ये जाण्यासाठी सज्ज!तातडीने सीझर करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला होता. काऊंटरवर जवळपास ५-६ हजार रुपये भरायचे होते,पण पाकीट?ते तर टेबलरवरच विसरले होते.सहजा शुटींग करताना पैशांचं पाकीट बाजूला काढून ठेवण्याची श्रीकांतची सवयच आहे.

महेशला फोन लावला तर महेश घरी निघून गेला होता आणि ऑफिस बंद झालं होतं!दुस-या दिवशी दसरा होता,ऑफिस उघडतं की नाही,पाकीटातच एटीएमही होतं?गंभीर प्रश्‍न पडला.महेश म्हणाला माझ्याकडे आहे,पण उद्या दसरा,मला ही पैशांची गरज आहे,उद्याची उद्या बघू,रात्री ११ वाजता महेश याने श्रीकांतला मातृसेवासंघात पैसे पाेहोचवले तर पैसे भरण्याचं काऊंटर बंद!

ते पैसे नियतीचा ‘बाळा’ ऐवजी ‘बापा’वर खर्च करण्याचा डाव असावा,पहाटे ५ वाजता बाबांना प्रदीपराव कुरुंभटे वय वर्षे ६५ यांना दुस-यांदा ब्रेन पॅरलिसिसचा अटॅक आला!दसरा असल्यामुळे शहरातील मोठी रुग्णालये बंदच होती.शेवटी मेडीकलमध्ये बाबांना भरती गेले. पहाटे साढे पाच वाजता स्ट्रेचरवर बाबांना आतेभाऊच्या मदतीने ओढत नेले….!

एकीकडे अष्टमीला आदल्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता दुस-यांदा मुलाचा ‘बाप’होण्याचा आनंद होतो न होतो तेच अापल्याच ‘बापाला’पहाटेच स्ट्रेचरवर ओढून नेण्याची वेळ श्रीकांतवर आली.ते नगदी पैसे मेडीकलमध्ये कामी पडले तरी प्रश्‍न होता आता बाबांकडे कोण लक्ष् देईल?

ओली बांळतीण बायको हीला पहाटेच चहा,बिस्कीटे,फळ,डबा पोहोचवण्याची धावपळ तर दूसरीकडे ‘बापा‘कडे धाव घेणे…..!५५ वर्षीय आई विजया कुरुंभटे या एवढ्या साध्या की त्यांना मेडीकलमधील दुस-या मजल्यावरुन बाबांसाठी डॉक्टर लिहून देत असलेली औषधे आणनेही जमत नव्हते.

अर्धा दिवस स्वत:च्या बाळाकडे तर अर्धा दिवस जन्मदात्याकडे अशीच श्रीकांत यांची धावपळ तब्बल ७ दिवस सुरु होती.अखेर २३ ऑक्टोबरला बायको व बापाला एकाच दिवशी रुग्णालयातनू सुटी मिळाली…..!

एकमेव विवाहीत बहीण हिला देखील १०२ ताप अंगात!त्यामुळे तिची ही मदत त्यावेळी होऊ शकली नाही.अश्‍यावेळी घरातल्यासारख्याच सविता बाई या धाऊन आल्या.बाळंतीणीच्या डब्या पासून तर बाबांच्या डब्यापर्यंत त्या माऊलीनेच मांजघर सांभाळले.

श्रीकांत यांचा मोठा मूलगा ४ वर्षीय श्रेयस कुरुंभटे याचा देखील त्यांनीच सांभाळ केला.ज्याच्या आगमनाच्या वेळेत श्रीकांत यांच्या जीवनात एवढं ‘श्रावण बाळ व राजा दशरथसारखे रामायण घडले’ त्या नवसृजनाचे नाव ‘श्रेयांश‘ठेवण्यात आलं.

श्रीकांतसाठी ‘बाप’म्हणून त्या नवसृजनाचा चेहरा शेवटी मनभरुन बघायला सातवा दिवस उजाडावा लागला तर वडील हे ब्राम्हण भिक्षूक असल्याकारणाने रामनाम चरणीच लीन झाले.आज देखील ते संसारातून अलिप्त होऊन घराजवळील राममंदीरातच वास्तव्य करतात.
आजही श्रीकांत ते दिवस आठवतात तर मातृसेवा संघ आणि मेडीकल दरम्यानची ती धावपळ आठवून कोणी हे सगळं साहण्यास त्यावेळी बळ दिलं याचा विचार करीत असतो.नियतीने नवसृजनाचा ‘बाप’म्हणून आणि बापाचा ’मूलगा’म्हणून घेतलेली परिक्षा चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण केल्याचे समाधान आज ही कायम त्यांच्या चेह-यावर दिसून पडतं.

श्रीकांत यांच्या त्या हळव्या ‘पितृत्वाला’सलाम तर बापासाठी मूलगा म्हणून पार पाडलेल्या ‘कर्तव्याला’ ‘सत्ताधीश’चा मानाचा मुजरा.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या