फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमतो आणायचा कॉलर्गल्स घरी!कोराडी राणे कुटुंबिय आत्महत्या प्रकरण

तो आणायचा कॉलर्गल्स घरी!कोराडी राणे कुटुंबिय आत्महत्या प्रकरण

Advertisements

तिघांची हत्या करुन सुषमा राणे यांची आत्महत्या: पोलिसांनी केला उलगडा

नागपूर,ता.९ डिसेंबर: कोराडी येथील ओमनगर येथील बहूचर्चित राणे कुटुंबिय आत्महत्या प्रकरणाचा छडा नागपूर गुन्हे शाखने लावला असून या संपूर्ण प्रकरणामागील अनेक बाबींचा उलगडा आज पोलिस जिमखाना येथे आयोजित पत्र परिषदेत करण्यात आला.

डॉ.सुषमा राणे यांचा पती प्राध्यापक धीरज राणे हा बाहेरख्याली चारित्र्याचा असून पत्नी व मुले घरी नसताना तो अनेकदा वेश्‍या व्यवसाय करणा-या तरुणींना घरी बोलवायचा,याशिवाय त्याला पराकोटीचे दारुचे व्यसन जडले होते मात्र आपल्या सत् चारित्र्याच्या व संवेदशनशील मनाच्या पत्नीच्याच चारित्र्यावर तो संशय घ्यायचा,एवढेच नव्हे तर आपल्या डॉ.पत्नीचा मोबाईल क्रमांकच धीरज याने स्वत:च्या मोबाईलव डायवर्ट करुन ठेवला असल्याचा धक्कादायक खुलासा आज पोलीस उप आयुक्त(परि क्र ५) निलोत्पल यांनी पत्र परिषदेत केला.
प्रत्येक संवेदनशील मनाला हादरवणारी घटना ही कोराडी हद्दीत ओमनगर येथे १८ ऑगस्ट २०२० रोजी घडली होती.या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. प्रा. धिरज राणे,डॉ.सुषमा राणे, त्यांची दोन मुले ही मृतावस्थेत आढळली होती.या वृत्तानंतर कोराडी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्ष् क जी.बी.कंकाळ,वरिष्ठ पोलीस निरीक्ष् क वजीर शेख,दिवसपाळी अधिकारी एएसआय खंडाळकर तसेच इतर पोलीस स्टाफ हा घटनास्थळी प्लॉट क्र.११५,संत जगनाडे ले आऊट,ओमनगर येथे दाखल झाला.यावेळ अपर पोलीस आयुक्त जरीपटका,पाेलीस उप आयुक्त परिमंडळ क्र.५ चे नीलोत्पल हे देखील घटनास्थळी पोहोचले.

घरामध्ये एकूण चार मृतकांचे शव त्यांना आढळले.धीरज डिंगाबर राणे वय वर्षे ४३,मुलगा ध्रुव वय वर्ष ११, मुलगी वण्या वय वर्षे ५ हे त्यांच्या बेडरुममधील पलंगावर मृतावस्थेत आढळून आले तर धीरज यांच्या पत्नी डॉ.सुषमा राणे वय वर्षे ४० या बेडरुमलगतच्या स्टोररुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या.सुषमा राणे यांनी लिहलेली सुसाईड नोट देखील पोलीसांना सापडली.
घटनास्थळी chlordiazepoxide गोळ्यांची स्ट्रीप ज्यामध्ये ११ गोळ्या होत्या,वीवो कंपनीचा एक मोबाईल,ओप्पो कंपनीचा एक मोबाईल,तीन रिकाम्या सिरींज, तीन स्टीरीट स्वॅब,सुसाईड नोट असलेली नोटबूक,लाल रंगाचे एक कटर,निळा प्लास्टिकचा स्टूल,एकात एक घातलेल्या दोन बेडशीट्स असे साहित्य पोलीसांनी चौकशीसाठी जप्त केले. यावेळी शासकीय पंचासमक्ष् घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.आयकार फोटोग्राफरद्वारे घटनास्थळाचे व मृतकांचे फोटो घेण्यात आले.

फिर्यादी प्रमिला मधुकर शास्त्रकार यांच्या तक्रारीवरुन २० ऑगस्ट रोजी कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. घटनास्थळी जप्त सर्व मुद्देमाल तपासणीकरीता सी.ए.कार्यालय धंतोली नागपूर येथे जमा करण्यात आले तर चारही मृतकांचे पोस्टमार्टन रिपोर्ट प्राप्त करण्यात आले यात एम.डी.सहाय्यक प्राध्यापक,मेयो रुगण्लयाचे डॉ.सचिन एस गिरी यांनी डॉ.सुषमा राणे यांच्या मृत्यूचे कारण गळफास घेऊन आत्महत्या असे नोंदवले तर इतर तिघांचाही मृत्यू हा विषारी इंजेक्शन दिल्याने झाला असल्याची अहवालात नोंद केली.

घटनेच्या दिवशी डाॅ.सुषमा यांनी सकाळी खासगी रुग्णालातून घेतले विषारी इंजेक्शन!
डॉ.सुषमा राणे यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वा.च्या सुमरास त्यांची मुलगी वण्या हिच्यासह धंतोली येथील त्या काम करीत असलेले खासगी रुग्णालय गाठले.तेथून त्यांनी त्यांचा घरचा कुत्रा त्यांना रात्रभर झोपू देत नसून रात्रभर भूंकत राहतो असे कारण सांगून त्याकरिता स्कोलिंग इंजेक्शन पाहिजे असले रुग्णालयाच्या परिचारिकेला खोटे कारण सांगून तिच्याकडून succinycholine injection ip(sucol) हे औषध व इंजेक्शन सिरीज घेतले.गुड फेथमध्ये त्या परिचारिकेने आयसीयूनमधून डॉ.सुषमा यांना ते सोपवले.

यानंतर त्यांनी घरी जाऊन शांत डोक्याने पती धीरज तसेच दोन्ही मुलांना ते विषारी इंजेक्शन टाेचले.यानंतर त्यांनी स्वत: आत्महत्या केल्याचे पोलीसांनी सांगितले.डॉ.सुषमा राणे यांनी कौटूंबिक अडचणीमुळे व कौटूंबिक नैराश्‍यामुळे हे आत्मविघातक पाऊल उचलले असल्याचे नीलोत्पल यांनी सांगितले.परिणामी त्यांच्या विरुद्ध वरीष्ठ पोलीस निरीक्ष क राजेश पुकळे यांच्या लेखी फिर्यादीवरुन खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून डॉ.सुषमा राणे या स्वत: मयत झाल्या असून गुन्ह्याची ॲबीटेड समरी तयार करुन न्यायालयात मंजूरीसाठी पाठवण्यासाठीची तजवीज ठेवल्याचे नीलोत्पल यांनी पत्र परिषदेत सांगितले.

याप्रसंगी बोलताना ध्रुव व वण्या हे कोराडी येथील नामांकित शाळेचे विद्यार्थी असल्याचे सांगून नुकतेच ध्रुव याने एका खेळामध्ये परराज्यात जाऊन चमकदार खेळाचे प्रदर्शन केले होते,अशी माहिती नीलोत्पल यांनी दिली.

घटनेसाठी तीन कारणे कारणीभूत-
राणे दाम्पत्यांची सांपत्तिक स्थिती ही अतिशय चांगली असून घटनेसाठी संपत्ती किवा आर्थिक अडचण कारणीभूत नसल्याचे नीलोत्पल यांनी स्पष्ट केले.धीरज हे बाहेरख्याली असल्यामुळे पत्नी व मुले घराबाहेर पडताच अनेकदा त्यांनी वेश्‍या व्यवसाय करणा-या तरुणींना घरी बोलावल्याचे त्यांच्या कॉल रेकॉर्डवरुन निष्पन्न झाले.याशिवाय वर्धा येथील एका नातेवाईक महिलेसोबत प्रा.धीरज यांचे अतिशय अश्‍लील संवादाची देखील पोलीसांनी पुष्टी केली.ही दूर्देवी घटना घडण्यामागील दूसरे महत्वाचे कारण म्हणजे गेल्या एका वर्षात दारुचे अतिरेकी व्यसनाने धीरज यांना पोखरुन टाकले होते,ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी देखील कारमध्ये बसून भर दिवसा दारु पिताना आढळले असल्याची माहिती स्पष्ट झाली,तिसरे महत्वाचे कारण म्हणजे स्वत:ला चारित्र्यवान सिद्ध करण्यासाठी धीरज यांनी आपल्या पत्नीच्याच चारित्र्यावर वारंवार शिंतोडे उडवले.एवढेच नव्हे तर डॉ.सुषमा यांचा मोबाईल फोनच त्यांनी आपल्या फोनवर डायवर्ट करुन ठेवला होता,डॉ.सुषमा या आपल्या बहीणीशी देखील बोललेल्या धीरज यांना खपत नसे.एवढ्या जबरदस्त मानसिक दडपणात धीरज यांनी डॉ.सुषमा यांना ठेवले होते.डॉ.सुषमा यांच्या चारित्र्याविषयी मात्र पोलीसांना कोणतेही आपत्तीजनक पुरावे गवसले नाहीत,असा खुलासा नीलोत्पल यांनी केला.

घटनेच्या दिवशी भरपूर प्यायलेला धीरज याने घरासमोर कारमध्ये सुषमा याला बोलावले.जवळपास ४५ मिनिटे त्यांच्यात बोलणे झाले.यानंतर ते दोघेही घरामध्ये गेले.यानंतर हा संपूर्ण घटनाक्रम घडला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या