फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमते भ्रूण पुरोहित रुग्णालयाचे....! गोलमाल है भई सब गोलमाल है:पब्लिकचा दावा

ते भ्रूण पुरोहित रुग्णालयाचे….! गोलमाल है भई सब गोलमाल है:पब्लिकचा दावा

Advertisements

 

कबाडीवाल्याने फेकले कच-याच्या ढिगा-यात:लकडगंज पोलिसांची माहिती

घरात अभ्रके जतन करुन ठेवणे कायदेशीर गुन्हाच:पोलिस पुरोहित नर्सिंग होमच्या संचालकांवर गुन्हा नोंदवणार का?संवेदनशील जनतेचा पोलिसांना प्रश्‍न

पुरोहित नर्सिंग होममध्ये ग्रामीण भागातून येणा-या रुग्णांची नावे पोलिस तपासणार का?सापडलेली अर्भके मुलींचीच कशी?

डॉ.यशोदा पुरोहित यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पती व डॉ.स्नुषा नर्सिंग होम चालवित असल्याबाबत पोलिस तपास करणार का?

अर्भकांच्या शवविच्छेदन अहवालात ते किती जुने आहेत किवा ताजे आहेत याची माहिती पोलिसांकडून माहितीच्या अधिकारात मागवणार:मानवाधिकार कार्यकर्त्यांचा निर्धार

नागपूर,ता,१० मार्च २०२२: काल क्वेटा कॉलनीसारख्या पॉश वस्तीत के.टी.वाईन शॉप समोरील मोकळ्या मैदानाच्या सुरक्षा भिंतीजवळ सापडेल्या ६ अर्भकांचा छडा लकडगंज पोलिसांनी लावला असून हे अर्भक पुरोहित नर्सिंग होममधून ‘अनावधानाने’ कचराकुंडीत पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे.हे नर्सिंग होम डॉ.यशोदा पुरोहित या स्त्रीरोगतज्ज्ञाचे असून त्यांचा २०१६ मध्ये मृत्यू झाला.
त्या प्रसूतीतज्ज्ञ होत्या तसेच नंदनवन होमियोपॅथी महाविद्यालयात प्राध्यापिका देखील होत्या.विद्यार्थ्यांना शिकवताना अडचण येऊ नये यासाठी त्यांनी घरीच ही अर्भके जतन करुन ठेवली असल्याचे लकडगंज पोलिस ठाण्यातील सहपोलिस निरीक्षक यांनी माध्यमांना सांगितले.

यशोदा पुरोहित यांच्या मृत्यूनंतर आता या नर्सिंग होमच्या पुर्नबांधणीचे काम हातात घेण्यात आले होते.नर्सिंग होमच्या देखरेखीसाठी विपिन साहू याला नेमण्यात आले आहे.त्यानेच कबाडीवाल्याला कबाडीचे सामान विकले होते.हा कबाडीवाला सामान रिक्क्षात टाकून जाऊ लागला तेव्हा साहूने त्या कबाडीवाल्याला नर्सिंग होममधील बायो मेडिकल वेस्टही घेऊन जाण्यास सांगितले व जवळच्या कचराकुंडीत टाकण्यास सांगितले अशी माहिती लकडगंज पोलिस ठाण्यातील सहपोलिस निरीक्षक सचिन थोरबोले यांनी दिली.कबाडीवाला कच-यात अभ्रकांची काळी पिशवी फेकत असतानाचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आले.पुढील तपास सुरु असून तपासाअंतीच पुढील बाब सांगू शकू असे ते म्हणाले.

असा हा पोलिसांचा जरी तपास असला तरी मूळात प्रश्‍न निर्माण होतो,भारतात डॉक्टर प्राध्यापिकेला अशी अर्भके घरी किवा नर्सिंग होमध्ये कोणत्याही कारणासाठी जतन करुन ठेवता येऊ शकते का?भारताचा वैद्यकीय मानक कायदा त्यांना अशी परवानगी प्रदान करतो का?अशी अर्भके विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी फक्त शासकीय मेडीकल कॉलेजच जतन करुन ठेऊ शकते ते देखील अनेक कठोर कायद्यांची अंमलबजावणी केल्यानंतरच.यासाठी त्यांना ॲनोटॉमी विभाग अर्थात ज्या विभागात मृतकांचे शवविच्छेदन केले जाते व फॉरेंसिग विभागात त्याची नोंद करावी लागते.पुरोहित यांच्या नर्सिंग होमला अश्‍याप्रकारे अर्भके जतन करण्याची कायदेशीर परवानगीच नसताना लकडगंज पोलिस आता पुरोहित नर्सिंग होमच्या विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल करेल का?

या नर्सिंग होमचा संपूर्ण रेकॉर्ड ताब्यात घेऊन आतापर्यंत ग्रामीण भागातून किती रुग्णांवर उपचार झालेत?त्यांच्या नावानिशी नोंदीचे रेकॉर्ड पोलिसांनी जप्त करुन सखोल तपास करण्याची मागणी पुढे येत आहे.याशिवाय पुरोहित यांचा संपूर्ण बँक रेकॉर्ड हा देखील तपासला जावा,त्यांच्या एकूण संपत्तीची,कायदेशीर-बेकायदेशरी मालमत्तेची तपासणी केली जावी,आयचे स्त्रोत कोणते?किती आयकर भरला जातो?या संपूर्ण बाबीचा तपास लकडगंज पोलिसांनी करण्याची मागणी पुढे येत असून,कचराकुंडीत एकसाथ सहा मानवी अर्भके,ती देखील सगळीच मुलींची,संशय निर्माण करणारी असून त्या अर्भकांना न्याय देण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्ते सरसावले आहेत.

पोलिसांची ‘थ्योरी’ ही न पटण्यासारखी असून पोलिसांनी ती अर्भके न्यायवैद्यकशास्त्रज्ज्ञांकडे पुढील तपासणीसाठी दिली असल्याने आता त्या अहवालातून ती अर्भके खरंच २०१६ पूर्वीची आहेत की आताची ताजी अर्भके आहेत याचा शोध लागेल.माहितीच्या अधिकारात हा अहवाल लकडगंज पोलिसांकडून मागविला जाणार असल्याचे मानवाधिकार कार्यकर्त्यांनी सांगितले.

नागपूर महानगरपालिकेवर देखील याची जवाबदारी निश्‍चित केली जाईल.पीसीएनएनडीटी कायद्याची मनपा किती प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहे?या अर्भक कांडात मनपा फक्त ‘खानापूर्ती’ करण्याच्या भूमिकेत दिसून पडली.
या परिसरातील आजूबाजूच्या नर्सिंग होमची तातडीने तपासणी करने यालाच उशिरा आलेली जाग असेच म्हणता येईल.तहान लागल्यानंतर विहीर खणने म्हणजे नागपूर मनपाचा आरोग्य विभाग हे आता त्यांच्या कार्यपद्धतीवरुन पुरत्या जगाला माहिती झाले आहे.उगाच नाही माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे मनपाच्या दवाखान्यांना ‘उकीरडे’संबोधून गेलेत!मनपाचे दवाखाने असे उकीरडे असल्यानेच शहरातील उकीरड्यांवर निष्पाप अर्भकांचे कलेवर सापडले जात आहेत!

पुन्हा लकडगंज भागातच काल बुधवार दि.९ मार्चरोजी दुपारी तीन ते पावणेचार दरम्यान लकडगंज हद्दीतील देवडीया रुग्णालयाच्या रिकाम्या जागेत अज्ञात आरोपी इसमाने भ्रूण नष्ट करण्याचा प्रयत्न केला.या ठिकाणी आरोपीने भ्रूण लपवून ठेवले.या प्रकरणी फिर्यादी व्यंकटेश सायनारायण नायडू वय वर्ष ३३,राहणार हनुमान मंदिर जवळ यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिस ठाणे लकडगंज येथे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३१५ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अश्‍या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण आजची उन्मुक्त जीवनशैली,शहरभर ’ओयो’ सारख्या हॉटेल्समध्ये तरुणाईला सहज रुम्स उपलब्ध होने,निसर्गाची किमया,अवैध गर्भधारणा व त्यातूनच अवैध गर्भपाताला चालना मिळत असल्याचा उद्रेग कालच्या घटनेनंतर सोशल मिडीयावर उमटला आहे.

अश्‍या प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर वचक बसवणे,होटेल्सवर धाडी टाकणे हे पोलिस विभागाचे काम असून तरुणाईच्या मनात धाक निर्माण झाला पाहीजे,अशी मागणी पुढे येत आहे.

सुरवातीला बिड येथे व यानंतर वर्धा व आर्वी येथील अर्भक कांडनंतर आता मध्य भारताचे मेडीकल हब म्हणून ओळखले जाणारे नागपूर शहर या अश्‍या डॉक्टर्सच्या, माणूसकीला काळीमा फासणा-या कृत्यांमुळे बदनाम होत आहे.पैश्‍यांसाठी जगात येऊ पाहणा-या अश्राप अर्भकांचे स्त्रीच्या गर्भातच चिमटे,कात्र्यांनी मुडदे पाडणे हे डॉक्टर्स या पेशाला शाेभत नाही.आधीच करोना महामारीने या कथित करोनायोद्धाचे माणूसकीवरचे प्रेम व नैतिक कर्तव्य यांचे धिंडवडे निघाले आहे,उजळ प्रतिमा मलिन झाली आहे,विश्‍वासाला खोलवर तडा गेला आहे.सगळेच डॉक्टर्स अगदी कसाई नाहीत मात्र करोना काळात जेव्हा माणूस जगण्यासाठी,प्रत्येक श्‍वासासाठी फक्त आणि फक्त डॉक्टर्स याच वर्गावर अवलंबून होता तेव्हा नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून,आपल्या नोबल पेश्‍याशी इमान न राखता ज्याप्रकारे फक्त लाखो रुपयांची कमाई करण्यासाठी करोना बाधित रुग्णांना,त्यांच्या नातेवाईकांना,आप्त स्वकीयांना एकेका बेडसाठी, श्‍वासासाठी,एकेका रेमडिस्विहरसाठी जेरिस आणले,ती भयाणता व संताप अद्याप सामान्य माणूस विसरला नाही.

त्यामुळेच डॉक्टरचा धर्म करोनाकाळात व नंतर हा रुग्ण बरा होने हा नसून रुग्णाच्या असहायतेचा फायदा लाटत फक्त पैसा कमविणे हाच झाला आहे,त्यामुळेच एखाद्या कचराकुंडीत एकसाथ सहा निष्पाप,अश्राप मुलींची अर्भके सापडतात तेव्हा संवेदनशील मनाचा माणूस हा संतापून उठतो आणि शासकीय विभागाद्वारे आपल्या शासकीय कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास देखील सरसावत असताना दिसून पडतोय.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या