फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजतेली समाजातील हा मतदारांचा विजय: प्रा.डॉ.रमेश पिसे

तेली समाजातील हा मतदारांचा विजय: प्रा.डॉ.रमेश पिसे

Advertisements
जवाहर विद्यार्थी गृहाची निवडणूक

विजयी संताजी विकास पॅनलला पदभार सोपविण्यास अडथळे
नागपूर,ता.६ जुलै २०२५: नुकतीच १५ जून २०२५ रोजी जवाहर विद्यार्थी गृहाची निवडणूक पार पडली, यात शेखर सावरबांधे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण संताजी विकास पॅनलच्या कार्यकारिणी सदस्यांचा विजय झाला मात्र,गेल्या साढे तीन दशकांपासून ज्या पुरोगामी पॅनलचे एकहाती अधिपत्य या संस्थेवर होते त्यांनी समाजाच्या हितासाठी तसेच तेली समाजाकडे असणा-या कायदेशीर मालमत्तेच्या वाढीसाठी कोणतेही कार्य केले नाही,उलट अनेक भ्रष्ट कामे करुन समाजाचे व संस्थेचे अपरिमित नुकसान केल्याचा आरोप प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन माजी उपमहापौर शेखर सावरबांधे यांनी केले होते.१५ जून रोजी मतदान पार पडले,१६ जून रोजी मतमोजणी झाली,इतकंच नव्हे तर निवडणूक अधिकारी म्हणून सुप्रसिद्ध सरकारी वकील ॲड.नितीन  तेलगोटे यांनी आम सभेत संताजी पॅनलच्या अध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणी सदस्यांना विजयी घोषित केले मात्र,अचानक पडद्यामागील सूत्र हलले व विरोधी पक्षाच्या पुरोगामी पॅनलच्या काही सदस्यांनी फेर मतमोजणीचा मागणीचा अर्ज तेलगोटे यांच्याकडे सादर केला.
परिणामी,नियमानुसार विजयी पदाधिकारी यांच्याकडे पदभार सोपवणे गरजेचे असताना,पडद्या मागून त्यात बरीच आडकाठी आणण्यात आली मात्र,विजय हा अखेर सत्याचा झाला असे अखिल तेली समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रमेश पिसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.ते सक्करदरा चौक उमरेड रोड येथील सेवादल महिला महाविद्यालयात विदर्भ तेली समाज महासंघ तसेच अखिल तेली समाज महासंघ-संताजी सृष्टितर्फे आयोजित, जवाहर विद्यार्थी गृहाच्या निवडणूकीत निवडून आलेले पदाधिकारी व सदस्यगण यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की जवाहर विद्यार्थी गृहाच्या निवडणूकीत आमचा संताजी विकास पॅनल किवा विरोधी पक्ष असणारा पुरोगामी पॅनल यांचा ‘जय-पराजय’ झाला नसून आमचा मतदार व मतदारांचा विश्‍वास जिंकला आहे.तेली समाज महासभेला १२५ वर्षांचा गौरवशाली इतिहास असल्याचे ते म्हणाले.त्यामुळेच आज जो सत्कार पार पडला त्या संबंधी विजयी पदाधिका-यांनी महिला,विद्यार्थी यांच्या हिताचे उपक्रम पार पाडावे तसेच तेली समाजाच्या सांस्कृतिक,शैक्षणिक उत्कर्षाचे उपक्रम पार पाडावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजकारणाचा पायवाच जरी संस्थेची निवडणूक असली, तरी राजकारणाला आम्ही या समारंभापासून दूर ठेवले असल्याचे प्रा.पिसे सांगतात.तेली समाजाच्या मतदारांनी परंपरागत प्रस्थापितांना मत न देता आमच्या संताजी विकास पॅनलवर विश्‍वास दाखवला आहे.त्यामुळे तीन वर्षांचा जो कार्यकाळ आम्हा पदाधिका-यांना मिळाला आहे तो ख-या अर्थाने आव्हानात्मक आहे.या तीन वर्षांमध्ये आम्हाला गेल्या ३३ वर्षांचा हिशेब द्यायचा आहे.३३ वर्षांपासून समाजासाठी पुरोगामी पॅनलने जे केले नाही,त्या बाबत मतदार आम्हाला विचारणा करतील ज्याचे उत्तर आम्हाला आमच्या कामातून आमच्यावर विश्‍वास दाखविणा-या मतदारांना द्यायचे आहे.
त्यामुळे आमचे सर्वात पहीले ध्येय हे खुली सदस्य नोंदणी असणार आहे.याशिवाय पॅनलवरील कोणताही पदाधिकारी दोन टर्मपेक्षा अधिक काळ कुठल्याही पदावर राहणार नाही.याचं जाळं पूर्ण विदर्भभर असणार आहे.याशिवाय संताजी व मेघनाद साहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वर्षभर कार्यक्रम आम्ही करणार असल्याचे प्रा.पिसे यांनी सांगितले.येत्या ८ डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती आहे,ती धूमधडाक्याने साजरी केली जाईल.या कार्यक्रमातून देखील समजाची सांस्कृतिक व शैक्षणिक घडण साधली जाईल.त्यामुळेच जवाहर विद्यार्थी गृहाच्या निवडणूकीकडे आम्ही जय-पराजयाच्या दृष्टिकोणातून बघत नाही तर समाज बांधणीसाठी एकत्रितपणे कसा उपयोग होऊ शकतो,या दृष्टिकोणातून या निवडणूकीकडे बघत असल्याचे प्रा.पिसे म्हणाले.
विजय घोषित झाल्यानंतर देखील पदभार देण्यास का विलंब झाला?असा प्रश्‍न केला असता जवाहर विद्यार्थी गृहाच्या घटनेत निवडणूकीच्या निकषात स्पष्टरित्या हे नमूद आहे की दर निवडणूकीत एक निवडणूक अधिकारी नेमावा,यानुसार पुन्हा एकदा सरकारी वकील ॲड.नितीन तेलगोटे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक झाली.आम्हाला त्यांच्या नावावार आक्षेप होता किंबहूना त्यांच्या भूमिकेवर शंका असल्याने आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली होती की आम्हाला यंदाच्या निवडणूकीत निवडणूक अधिकारी बदलून हवा आहे.मात्र,असे घडले नाही आणि निवडणूकीची प्रक्रिया सुरु राहीली.
१५ जून २०२५ रोजी ज्या दिवशी जवाहर विद्यार्थी गृहाची निवडणूक पार पडली.पहील्यांदा असे घडले की त्यांनी आम्हाला कुल्फी खाऊ घालावी व आम्ही त्यांना लस्सी पाजावी,इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली.दुस-या दिवशी १६ जून रोजी मतमोजणी देखील व्यवस्थीतरित्या पार पडली.जवाहर विद्यार्थी गृहाच्या घटनेप्रमाणे निवडणूकीचा निकाल हा आमसभेत जाहीर केला जातो,परिणामी,त्यांनी आमसभा घेतली.त्यापूर्वीच अधिका-यांचे निकाल तयार झाले होते परंतु ते घोषित झाले नव्हते कारण ते आमसभेत घोषित होणार होते.याशिवाय कार्यकारिणी सदस्यांचेही निकाल घोषित व्हायचे होते कारण मतमोजणी पूर्ण झाली नव्हती.ही निवडणूक अतिशय अटीतटीची झाली होती,त्याचवेळी काही सदस्यांनी मौखिक आक्षेप घेतले होते,मात्र,त्यानंतर निकाल घोषित करण्यात आला.स्वत: निवडणूक अधिकारी ॲड.नितीन तेलगोटे यांनी आमदसभेत विजयी झालेल्या पाच पदाधिकारी व चौदा कार्यकारिणी सदस्यांची क्रमांकासह घोषणा केली.या सर्वांची व्हिडीयो रेकाँडिंग उपलब्ध आहे.
हे सगळं झाल्यानंतर ज्यांनी आमसभा बोलावली होती ते उपाध्यक्ष गुलाबराव जुननकर व मुख्य कार्यवाहक शंकरराव भुते यांनी आमसभेत हे घोषित केलं की निकाल जाहीर झाला आहे,आमच्या सर्वाचं अभिनंदन केलं व आमसभा संपली.मात्र,त्याच रात्री निवडणूक अधिकारी ॲड.नितीन तेलगोटे यांनी बॅक डेटमध्ये विरोधी पॅनलच्या दोन पदाधिकारी व चार कार्यकारिणी सदस्य, असे सहा लोकांचे अर्ज घेतले,पाच-पाच हजार त्यांच्याकडून घेतले व आमच्या पॅनलच्या ३३ लोकांना नोटीस पाठवल्या!यापैकी ३२ लोकांनी त्या नोटीसला उत्तरे दिली.
मात्र,यानंतर माहिती नाही जुननकर व भूते यांना काय उपरती झाली व त्यांनी आम्हाला निवडणूकीचा रेकॉर्ड दिला तसेच पदभार सोपवला.आम्ही परवा निवडणूकीच्या प्रोसेडिंगची प्रत देखील त्यांच्याकडून मिळवली.आता आम्ही जवाहर विद्यार्थी गृहाचा रितसर  कार्यभार घेतला आहे.त्याच अनुषंगाने आज सत्कार समारंभ पार पडला असल्याची माहिती प्रा.पिसे यांनी माध्यमांना दिली.
तीन वर्षांचा अवधी आम्हाला काम करण्यासाठी मिळाला आहे.आम्ही आमच्या समाजाच्या अपेक्षेनुसारच काम करु.कोणतीही चूक आमच्याकडून होणार नाही.निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली अभिवचने आम्ही पूर्ण करु.पूर्वीच्या पदाधिका-यांनी अनेक प्रकरणे ही न्यायालयात नेली आहेत.त्यातील जे किरकोळ विषय आहेत त्यातून त्यांनी माघार घ्यावी,न्यायालयात जाण्याचा हेतू जरी चांगला असेल तरी संस्थेची आणि समाजाची हानि होत असेल तर त्यातून माघार घेणे गरजेचे असल्याचे प्रा.पिसे सांगतात.जवाहर विद्यार्थी गृहालगत इंदिरा कॉन्व्हेंटच्या जागेचा वाद सुरु आहे.ती संस्थेची जागा असून आपापसात संवाद साधून तो देखील वाद मिटवता येईल.यासोबतच आमच्या संस्थेच्या सुराबर्डीच्या जागेबाबत सातबाराचा जो विषय आहे तो देखील सोडवता येईल.बुटीबाेरीत देखील आमची एक मोठी जागा असून त्यावर ट्रांसफॉमर ठेवला असून सुरक्षा रक्षक  देखील आहे.तिथे ही आम्ही काम करु.महत्वाचे म्हणजे,शंकरराव जुननकर तसेच भूते यांनी आम्हाला आश्‍वास्त केलं आहे की,कोणतेही मागचे रेकॉर्ड आम्हाला आमच्या कामासाठी हवे असतील तर ते उपलब्ध करुन देण्यात येईल,अशी माहिती देऊन, तेली समाजाच्या सर्व संघटना या समाजाच्या हितासाठी गुण्या गोविंदाने एकमेकांच्या सहकार्याने काम करतील अशी अपेक्षा या प्रसंगी प्रा.पिसे यांनी व्यक्त केली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official या युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या