

– अभिनेते शरद पोंक्षे यांचे विरोधकांना आव्हान
– विश्वकेसरी फाउंडेशनतर्फे सत्कार
नागपूर २४ मे २०२२: स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तुम्ही कितीही अपमान केला, त्यांच्यावर कितीही आरोप लावले, इतिहासाच्या पुस्तकांमधून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला तरी सावरकर विचार तुम्ही कधीही संपवू शकणार नाही कारण हिंदुत्व, राष्ट्रप्रेम ही सावरकरांची, त्यांच्या विचारांची ताकद होती, अशा शब्दात सावरकर अभ्यासक व प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
विश्वकेसरी फाउंडेशनच्यावतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी सायंटिफिक सभागृहात ‘सावरकर विचारदर्शन’ या विषयावर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शरद पोंक्षे यांचा यावेळी विश्वकेसरी फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कर्करोगाशी लढताना मोठे आर्थिक संकट समोर उभे राहिले होते. त्यावेळी विश्वकेसरीसारख्या अनेक संस्था पाठीशी उभ्या राहिल्या असे म्हणत शरद पोक्षे यांनी विश्वकेसरीच्या ब्राह्मण समाजातील गरजू व गरीब बांधवांना मदतकार्याचे कौतूक केले.
सावरकरांना हा अख्खा हिंदुस्तान आपला वाटायचा म्हणून त्याच्या स्वातंत्र्यासाठी ते लढले. त्यांना हिंदूराष्ट्रवाद पाहिजे होता पण कॉंग्रेस हिंदी राष्ट्रवादावर ठाम होती. त्यांनी मुस्लीम, ख्रिश्चन यांची व्होटबँक पाहिजे होती. हिंदू हा धर्म असून निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. त्यामुळे अनेक आक्रमणे होऊनही हा धर्म मिटू शकला नाही. सावरकरांनी मांडलेल्या हिंदू राष्ट्राशी संकल्पना आता लवकरच होणार असून आपले राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जाईल, असा आशावाद शरद पोंक्षे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला डॉ. पी. के. देशपांडे, डॉ. अशोक देशपांडे, स्वाती देशपांडे, अभिनेते देवेंद्र दोडके, ब्रिगेडियर सुनील गावपांडे, भुपेंद्र शहाणे, शशीमोहन जोशी यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्वेता शेलगावकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मकरंद भालेराव, पंकज आद्य, अजित लाखे, राम घरजोडे, भागवत कुळकर्णी, अभिमन्यू जोग, पवन देवसंत, समीर डांगे, तुषार सावदेकर, भूषण पांढरे, , श्रेयस इंदूरकर, अरविंद देशपांडे, अश्विनी डबली, अनघा पेंडके, अश्विनी सावदेकर, जयश्री लाखे, मनीषा कुथे, ध्येया चासकर, कविता देशमुख, ऋतुजा घरजोडे, मनोज पिदडी, गौरव टांकसाळे, श्रेया खराबे टांकसाळे यांचे सहकार्य लाभले.




आमचे चॅनल subscribe करा
