फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजतिसऱ्या लाटेसाठी गावागावात नागरिकांमध्ये जनजागरण सुरू

तिसऱ्या लाटेसाठी गावागावात नागरिकांमध्ये जनजागरण सुरू

Advertisements

⚫प्रशासनासोबत बालरोग तज्ज्ञांची बैठक
⚫उद्या चार टँकर रेल्वे मार्गाने नागपुरात
⚫जिल्ह्यात आज १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन
⚫२,९७३ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण
⚫गावागावात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचे प्रबोधन
⚫पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही प्रोटोकॉलचे शिक्षण
⚫लसीकरणात माघारलेल्या गटांचे मतपरिवर्तन

नागपूर दि ११ : नागपूर जिल्हा प्रशासन जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात माघारलेल्या गावांना प्रबोधनाचा बूस्टर डोस देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, गावातील तरुणांचे लसीकरण व पॉझिटिव्ह संख्या कमी करण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. दरम्यान, आज रात्री ५० हजार लसी प्राप्त होणार आहेत. यामुळे लसीकरणाला गती प्राप्त होण्याची आशा आहे.

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता १५ तालुक्यांमध्ये माघारलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, कोरोना काळात गावेच्यागावे पिंजून काढत आहे.

गावातील भेटीदरम्यान सध्या त्रिसूत्रीवर लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये कोरोना आजाराची तीव्रता सांगणारी सहा मिनिटांची वॉकिंग टेस्ट, कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांसाठी आवश्यक उपचार पद्धती आणि तिसऱ्या संभाव्य लाटेमध्ये लहान मुलांचे कोरोनापासून कशा पद्धतीने संरक्षण करायचे याबाबतचे मार्गदर्शन या भेटीमध्ये केले जात आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, तसेच गावांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना देखील यामध्ये सहभागी केले जात आहे. गावातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कोविड सदृश्य रुग्णाला आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय औषधोपचार करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या ओडीसा राज्यातून अंगुळ येथून चार टँकर ऑक्सीजन रात्री उशीरा नागपूरला रेल्वेद्वारे पोहोचणार आहे. आज जिल्ह्यात १२४ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे. ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन ऑक्सिजन टॅंकर सुलभतेने शहरात पोहचण्यापासून वैद्यकीय आस्थापनांना सुलभतेने मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे.

दरम्यान, आज जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात नागपूर येथील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. जिल्ह्यामध्ये संभाव्य तिस-या लाटेमध्ये मुलांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी बाल रोगतज्ञ यांनी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात व त्याचे वितरण जिल्हा प्रशासनामार्फत आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांना केले जाईल, असे आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आजच्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ बालरोगतज्ञ व बालरोग तज्ञ संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यात आज २९७३ रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण करण्यात आले. या इंजेक्शनची मागणी करणाऱ्या प्रत्येक आस्थापनाला व खाजगी हॉस्पिटलला त्याचे निर्धारीत वितरण होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये लसीकरणासंदर्भातील नकारात्मकता आढळून येते. अशा काही भागांना ओळखून त्या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, जिल्ह्याला ५० हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. या लसीमधून २५ हजार शहरी भागात तर २५ हजार ग्रामीण भागात लसीकरणासाठी वापरले जाणार आहे. ज्या नागरिकांच्या पहिला डोस झाला आहे . त्या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी या लसीचा प्रामुख्याने वापर करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या