

डॉ.सुषमा राणे आत्महत्या घटनेवर अद्यापही समाजमनामध्ये संशयकल्लोळ
नागपूर,ता. २० ऑगस्ट: सोमवारी रात्री कोराडी येथील राणे कुटुंबियांसोबत जे आक्रित घडले त्यासाठी अद्यापही समाज माध्यमात तसेच त्यांच्या परिचितांमध्ये हीच घटना चर्चेचा विषय ठरत आहे. डॉ.सुषमा राणे हे धंतोलीतील ज्या रुग्णालयात कार्यरत होत्या तेथील सर्व परिचितांनी हेच सांगितले की त्या आपल्या कामात अत्यंत चोख होत्या,त्यांच्यावर रुग्णालयाने खूप महत्वाच्या जवाबदा-या सोपवल्या होत्या.हस-या होत्या मात्र…बोलक्या नव्हत्या,त्यांनी कधीही घर आणि कामाचे ठिकाण यात गल्लत केली नाही,इतर सर्व महिला सहका-यांचे दू:खं त्या ऐकून घेत होत्या मात्र…आपल्या मनातलं दू:खं,जिवनातला,जगण्यातला तनाव त्यांनी कधीही,कोणाशीही शेअर केला नाही!
हीच बाब त्यांच्या मुलांच्या शाळेच्या शिक्षकांकडून देखील ऐकू आली. पालक सभेदरम्यान आपल्या पाल्यांच्या प्रगतीबाबत त्या नेहमीच शाश्वत असायच्या. शिक्ष्किेंसोबत हसून बोलायच्या. कधीच…कधीही वाटलं नाही त्या आपल्या मनात तनावाचं,दू:खाचं एक अख्खं वादळ घेऊन वावरतात आहेत!डॉ.सुषमा यांना ओळखणारे असे अनेक परिचित हेच सांगत आहेत,त्या एक सामान्य व्यक्ति होत्या,त्यांचं वागणं,जगणं हे देखील इतरांसारखच सामान्य होतं.त्यांच्या मृत्यूनंतरच कळलं…‘मिसळूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा’कविवर्य सुरेश भटांच्या या ओळीच जणू त्या अक्ष् रश: जगत होत्या.
आता माध्यमांमध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत, किती शांत डोक्याने त्यांनी पती व मुलांची हत्या केली,एवढे क्रूर पाऊल उचलले, सुखवस्तू असताना देखील आर्थिक चणचण होती,कर्ज झाले होते, प्रोफेसर राणे यांच्या नोकरीचे तनाव होते इत्यादी इत्यादी.मात्र मृत्यूपूर्वी डॉ.सुषमा यांनी सुसाईड नोटसोबत कागदावर उल्लेख् केलेला अमूक व्यक्तिला इतके हजार द्यायचे आहेत,तमूक व्यक्तिला इतके हजार द्यायचे आहे,हे कशाचे द्योतक आहे?त्या आपल्या कामात किती चोख होत्या,याचे हे द्योतक आहे कारण त्या हिशोबाच्या चिठ्टीवर त्यांनी आपला एटीएम देखील ठेवला होता!
मिळालेल्या माहीतीप्रमाणे प्रो.राणे यांच्यावर कर्जाचा डोंगर साचला होता,त्यांना पिण्याचेही व्यसन होते, परिणामी डॉ.सुषमा यांना यातून सूटकेचा इतर कोणताही दूसरा मार्ग दिसला नाही. नव-याचे व्यसन दूर होऊ शकत नाही,आताचे कर्ज फेडले तरी पुन्हा नव्याने कर्जाचा बोजा हा चढतच जाणार,याची त्यांना खात्री पटली,परिणामी त्यांनी हा किस्साच कायमचा थांबविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.शेवटची आशाही जिथे मावळते तिथे….अंधाराशिवाय मग काहीच उरत नाही!असाच अंधार डॉ.सुषमा यांच्या मनात,जिवनात दाटून आला होता आणि मृत्यू नावाच्या काळोखात राणे कुटुंबिय हे कायमचे विसावले…!शेवटच्या चिठ्ठीत डॉ.सुषमा यांचे हेच वाक्य होते…तू बदललास आहे…आता तू पूर्वीसारखा राहीला नाहीस….!
आधी जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या मग विषारी इंजेक्शन टोचले…..! आयुष्याची रडकथा संपली.निरागस मुलांना का मारले?हा प्रश्न सुजाण समाजमनाला वारंवार छळतो आहे,त्याचेही एक साधेसोपे उत्तर हेच आहे..जगातील कोणतीही आई जिने आपल्या गर्भात नऊ महिने घडवून बाळांना जन्म दिला ती आई मुलांचे तिच्या पश्चात हाल व्हावे,तिच्यासाठी मुलांनी आयुष्यभर झुरावे या कल्पनेनेच ती सैरभैर होते,आणि मुलांना दू:खात जगवण्यापेक्ष्ा स्वत:समोर ठार मारणे हेच तिला समाधानकारक वाटतं….!
मानसिक आजारी असण्याची शक्यता! मानसोपचारतज्ज्ञाचे मत
सुखवस्तू कुटुंबातील व्यक्ति ही देखील मनोरुग्ण असू शकते.मानसिक व्याधी असल्याशिवाय कोणीही असे कृत्य करु शकत नाही असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सुशील गावंडे व्यक्त करतात.सामान्य व्यक्ति अश्या प्रकारचे हत्याकांड घडवून आणू शकत नाही.कोणत्याही समस्यांबाबत सामान्य व्यक्ति ही वेगळा मार्ग काढणे पसंद करते मात्र मृत्यूला अश्याप्रकारे कवटाळत नाही.सामान्य व्यक्ति ही जिवनात निराश असेल तर स्वत:शी वाद घालेल,स्वत:ला संपवेल,नव-याशी वाद असेल तर नव-याला संपवेल मात्र मुले???मुलांना विषारी इंजेक्शन लावण्याचे काळीज तरी होईल का एखाद्या सामान्य आईला?
डॉ.सुषमा यांना साधं डिप्रेशन असंत तर एकटीने आत्महत्या केली असती.सर्वांना मारुन टाकून मग आत्महत्या करणे हे आमच्या शास्त्रात विक्ष्प्तिपणा समजला जातो. मेंदूतील असंतुलीत स्त्राव यासाठी कारणीभूत ठरतात.विशेष म्हणजे स्वभावातील हा विक्ष्प्तिपणा त्यांच्यासोबत चोवीस तास राहणारे यांनाच ओळखू येतो,मुलांच्या शाळेतील शिक्ष् क असो किवा त्या जिथे कार्यरत होत्या त्या रुग्णालयातील स्टाफ असो,तिथे त्या वेगळे वागण्याची शक्यताच जास्त आहे.
काहीही असले तरी, डॉ.सुषमा राणे यांनी इतर महिला जश्या कामाच्या ठिकाणी घरातील तानतनावांचा निचरा करतात,सहका-यांशी मनमाेकळा संवाद साधतात,सुख दू:खं वाटून घेतात,तसे सर्वकाही वाटून घेतले असते तर…!तर हे आक्रित घडलेच नसते…असं आजही अनेकांना वाटंतय…!




आमचे चॅनल subscribe करा
