
कलम ३७६ मधील सेक्शन ९० च्या दोन पोटकलमांच्या काय आहे मर्यादा?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २७: शहरात दररोज दाखल होणा-या गुन्ह्यांची टक्केवारी काढल्यास सर्वाधिक गुन्हे हे प्रेमात फसवणूकीचे व त्यातून बलात्कार झाल्याचे आहेत.याचाच अर्थ प्रेम करताना दोघांचीही संमती असली तरी पुढे त्याने-तिला धोका दिल्यानंतर ती त्याच्यावर भारतीय दंड संहितेतील ३७६ कलम म्हणजे ‘बलात्काराचा’गुन्हा नोंदवते.यात ही कलम ३७६ च्या सेक्शन ९० मध्ये दोन उपकलम जोडली असून याचा अनव्यार्थ जबरीने forcefuly भीती दाखवून जोडण्यात आलेले संबंध तसेच misconception म्हणजे तिला चुकीच्या विचाराचे प्रभावित करुन जोडण्यात आलेले संबंध असे दोन भाग असून यातील एका उपकलमाच्या आधारे पीडीता ही आरोपीविरुद्ध कलम ३७६ चा गुन्हा दाखल करते.
गुन्हा नोंदवल्यानंतर पुढील न्यायालयीन प्रक्रियेत सर्वात महत्वाची भूमिका बजावतात ते वकीली व्यवसाय करणारे वकील.आरोपी किवा पीडीता यांच्या बाजूने बाजू मांडताना त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. अल्पवयीन मुलगी असली तर आरोपीवर बलात्काराचाच गुन्हा दाखल होतो,त्यात पीडीताच्या संमती-असमंतीचा प्रश्नच उद भवत नाही मात्र दोघेही सज्ञान असतील,संमतीने शारिरीक संबध ठेवण्यात आले असतील मात्र पुढे जाऊन काही कारणाने मुलाच्या मनात वितृष्ट येऊन किवा त्या संबंधात राहणे त्याला जड जाऊ लागताच तो तिला टाळू लागतो आणि त्या नात्यातून बाहेर पडतो तेव्हा मात्र इथेच ती कोळमडते आणि पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून शरीर-संबंध जोडले असा बलात्काराचा गुन्हा दाखल होतो आणि पुढे त्यांच्या आयुष्याची लक्तरेच वेशीवर येतात…!का घडतं असं?
खूपच जवळची मैत्रीण असणा-या ॲड.शिल्पा गिरडकर यांच्या कक्ष्ात एक उच्च विद्याभूषित तरुणी ढसाढसा रडत होती…!ती बजाज नगर चौकातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीची विद्यार्थिनी होती. त्याच कॉलेजमध्येच तिची त्या तरुण अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली.पुढे ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. as usual ‘तुझ्याशीच लग्न करणार’म्हणून प्रेमाच्या आणाभाका रचल्या गेल्या.होणारा भावी पती म्हणून त्याच्या शब्दांवर विश्वास ठेऊन त्यांच्यात शरीर सबंध जुळलेत. हे नाते इतक्या पुढे गेलं की ती गर्भवती राहीली पण,दोघेही अद्याप शिकत असल्यामुळे त्याने तिला गर्भपात करण्यास बाध्य केलं आणि…तिच्यापासून अलग् द दूर झाला….!
स्वाभाविक होतं,तिच्या मनावर याचा खोलवर परिणाम झाला. बाई म्हणून किवा माणूस म्हणूनच ती फसवल्या नाही गेली तर..बाळाचाही तिने त्याग केला होता..फक्त त्याच्यावर विश्वास ठेऊन.ही तिच्या अस्तित्वालाच नाही तर आत्मसन्मालाच बसलेली ठेच होती…!तिला काहीही करुन आता त्याच्या क्रूरपणाचा ‘सूड’ घ्यायचा होता..एकच मार्ग होता…पोलीस ठाण्यात कलम ३७६ म्हणणे बलात्काराचा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल करणं…!
एखाद्या खूनाचा गुन्हा सिद्ध करता येतं,पैशांची फसवणूक,भ्रष्टाचारही सिद्ध करता येतो पण…मनाची..विश्वासाची फसवणूक याला पुरावे नसतात.पण न्यायदेवतेला फक्त आणि फक्त पुरावे लागतात…खरंच लग्नाच्या नावाखाली तिची फसवणूक झाली आहे का?न्यायदेवतेच्या नजरेत गुन्हा सिद्ध होण्याआधी ते दोघेही समान गुन्हेगार असतात.अश्याच एका प्रकरणात मुंबई हायकोर्टाचं जजमेंट होंत,दोघेही सज्ञान आहेत,दोघांचीही संबंधासाठी संमती होती मग आरोपीच फक्त गुन्हेगार कसा?आणि त्याला जामिन मिळाला…!यानंतर अश्या गुन्ह्याकडे बघण्याचा बलात्कारासारखी कलम लागली असताना… जगाचाही दृष्टिकोणच बदलला जणू….!
नागपूरातीलच एका दुस-या पीडीतेने प्रियकराविरुद्ध गुन्हा नोंदवला व त्याचा अगदी जम्मूपर्यंत पिच्छा पुरवला,तिथे तिला त्याच्या आईने व भावाने मारहाण केली,त्याने दिलेल्या धोखा याने तिचे पुरते मानसिक खच्चीकरण झाले असून गेल्या ७ महिन्यापासून ती शारिरीक व मानसिकरित्या इतकी खचली की….ती आता फूफ्फसाच्या कर्करोगाने लढतेय…!
मात्र तरीही तिला काहीही करुन तिच्या जिवंतपणीच त्याला शिक्ष्ा झालेली पाहायची आहे त्यासाठी ती न्याय देवतेच्याच नव्हे तर राजकारणी नेत्यांचेही उंबरठे झिजवतेय…!कधीकाळी ज्याच्यावर जिवापाड प्रेम केलं…विश्वासाने समर्पण केलं..त्याने अपमान केला तिच्या भावनांचा…घात केला तिच्या विश्वासाचा,परिणामी हेच प्रेम धोका खालल्यानंतर परिवर्तित होतं फक्त आणि फक्त सूडभावनेत.म्हटलं ना खूनाला पुरावे मिळतात…तिच्या विश्वासाच्या झालेल्या खूनासाठी पीडीताला न्यायदेवतेसमोर पुरावे देता-देता खूप जड जातं.
भारतीय मानसिकताही अशीच आहे,ती मुलीची जात..तिला समजायला नको होते?लग्नाआधी संबंध जोडलेच कसे?त्याने काहीही केले तरी तो ‘पुरुष’…तिला मात्र प्रेमात असली तरी ‘चारित्र्य’सांभाळूनच वागायला हवं होतं! चमत्कारिक आणि अमानवीय असली तरी हीच…अश्या घटनांकडे बघण्याची अशीच मानसिकता आहे ..!दोषी फक्त तीच कारण..तिने ‘मर्यादा’ओलांडली…तो पुरुष आहे त्याला तर धर्मशास्त्रात कोणतेच बंधने नाहीत..मर्यादा नाहीत…मनात आलं नातं जोडलं..मनात आलं..सोडून दिलं…!
आजच्या आधुनिक जगातली स्त्री मात्र अश्या अन्यायविरोधात गप्प बसत नाही. आपल्या कायदेशीर न्याय हक्कासाठी लढायला ती तत्पर होताना दिसते.मात्र न्यायदेवतेला पुरावे लागतात,फसवणूक झाल्याची…बलात्कार झाल्याचे…!तसेही शंभरपैकी ९० टक्के बलात्काराच्या केसेस या खोट्याच असतात असे ‘गृहीतक’ठरले आहे…!
नागपूर जिल्हा सत्र न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड.सुधीर माळोदे सांगतात असे गुन्हे question of fact असतात.दोघांच्याही संमतीने शारीरिक संबंध जोडले गेलेले असतात.मात्र गुन्हा दाखल झाल्यावर प्रत्येक आरोप हा सिद्ध करावा लागतो..न्यायालय फक्त पुरावे तपासण्याचे काम करते.कुठे भेटले?कशी ओळख झाली?थोडासाही संशय असायाल जागाच नसते.असं होतं की नव्हतं?घटना अशी घडली की नाही?शेवटी तो गुन्हा कलम ३७६ चा असतो..बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला असतो…या गुन्ह्यात किमान ७ वर्षे ते जन्मठेपेची शिक्ष्ा असते परिणामी अश्या गुन्ह्यात न्यायालय हे गंभीरपणे पुरावे तपासण्याचे कार्य करतात. पीडीतेला गुन्हा नोंदवण्यासाठी निश्चितच धाडस लागतं,मात्र जेवढ्या सहजपणे गुन्हा नोंदविल्या जातो तेवढ्या सहजपणे न्यायाची अपेक्ष्ा करता येऊ शकत नाही.
त्यांचं आपापसातील संभाषण,एसएमस,व्हॉट्स ॲप चॅट्स,व्हिडीयो कॉलिंग,दोन्ही पक्ष्ाचे म्हणने ऐकून घेणे,एवढेच नव्हे तर अारोपी आणि पीडीता या कोणत्या,कश्या कौटूंबिक पार्श्वभूमीतून येतात,याचा देखील विचार केला जातो.घरचं वातावरण कसं होतं?असं होऊ शकतं का?शेवटी न्याय देवता आंधळी आहे,ती फक्त पुराव्यांच्या आधारेच न्यायदान करते,पीडीतेच्या भावनेच्या आधारावर न्यायदान होऊ शकत नाही…!
शेवटी प्रेमातील फसवणूक आणि प्रेमाच्या नावाखाली केलेला विश्वासघात हा स्त्री मनाच्या कोमल ह्दयाला झालेला खोलवर आघातच असतो,तिचा न्यायासाठी लढा हाच तिच्याकडे तिच्या सच्चेपणाचा पुरावा असतो.खूनाच्या पुराव्यासारखा ती विश्वासघाताचा पुरावा सादर करु शकत नाही.परिणामी न्यायदेवतेसमोर तिच्या अस्तित्वाशीच जोडला जाणारा असा हा अतिशय गंभीर विषय या पद्धतीने गेला पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
