फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजड्युटीवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांकरीता महा मेट्रोच्या वतीने फळ आणि थंड पेय वितरीत

ड्युटीवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांकरीता महा मेट्रोच्या वतीने फळ आणि थंड पेय वितरीत

Advertisements

नागपूर ०३ : कोरोना वायरसचा (कोविड-१९) प्रकोप बघता देशव्यापी लॉकडाउनमुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना महा मेट्रोच्या वतीने फळ आणि थंड पेयाचे वाटप शहरातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. तसेच गरजू व्यक्तींना देखील याचे वाटप करण्यात येत आहे.

केंद्र शासनाने घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे पोलीस कर्मचारी शहरातील विविध ठिकाणी कार्यरत आहे. लॉकडाउनमुळे शहरातील हॉटेल,दुकाने बंद आहे. या सर्व बाबींचा विचार करत महा मेट्रोच्या वतीने फळाचे वाटप करण्यात येत आहे.

कोरोना वायरसचा (कोविड-१९) वाढता प्रादुर्भावामुळे महा मेट्रोच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने विविध अंबलबजावनी करण्यात येत आहे. ज्यामध्ये मेट्रो स्टेशन परिसर येते औषधांची फवारणी,प्रवाश्यांची थर्मल स्कॅनिंग तसेच कर्मचारी आणि कामगारांची नियमित चाचणी केल्या जात आहे.

पोलीस कर्मचारी व्यतिरिक्त गरजू व्यक्तींना देखील महा मेट्रोच्या वतीने फळ आणि थंड पेय वितरीत केल्या जात आहे.फळाचे वितरण महा मेट्रोची जलद कृती दलाच्या (QRT) वतीने करण्यात येत आहे. सदर जलद कृती दल मेट्रोच्या सर्व ४ रिच मध्ये पाहणी सोबतच पोलीस कर्मचाऱ्यांना उर्जा प्रदान करण्याकरिता फळ आणि थंड पेय वितरीत करीत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या