फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमडॉ.गंटावार दामपत्यांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल:वैद्य उत्पन्नाच्या ४३.६ टक्के असपंदा!

डॉ.गंटावार दामपत्यांविरोधात अपसंपदेचा गुन्हा दाखल:वैद्य उत्पन्नाच्या ४३.६ टक्के असपंदा!

Advertisements

लाचलुचपत प्रतिबंधक विभगाची कारवाई

नागपूर,ता. १ जुलै: महापालिकेतील नुकत्याच पार पडलेल्या पाच दिवसीय सर्वसाधारण सभेत ज्या डॉ.गंटावर व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांची नावे प्रामुख्याने गाजली,त्याच गंटावार दामपत्यांविरोधात आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करुन अपसंपदा जमविल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गंटावार दाम्पत्यांनी आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करुन२,५२,८५,७६२ रुपयांची म्हणजेच एकूण वैद्य उत्पन्नाच्या ४३.०६ टक्के अपसंपदा जमविली असल्याचे निष्पन्न झाले आहे!

याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे डॉ.प्रविण मधुकर गंटावार (वय ४८ वर्षे) तसेच त्यांची पत्नी डॉ.शीलू प्रविण गंटावार(वय वर्षे ४५) यांनी आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करुन अपसंपदा जमविली असल्याबाबत तक्रार केली होती. तक्रारीतील आरोप,आक्ष्ेपांची संपूर्ण पडताळणी करुन गैर अर्जदार यांच्याविरुद्ध उघड चौकशी सुरु करण्यात आली.

गैर अर्जदार डॉ.प्रविण गंटावार हे फेब्रुवारी २००७ मध्ये इंदिरा गांधी रुग्णालय महानगरपालिका नागपूर येथे वैद्यकीय अधिकारी(सर्जन) या पदावर नोकरीस लागल्यापासून डिसेंबर २०१५ या कालावधीतील पगारा पासून झालेले उत्पन्न,चल व अचल संपत्ती,मालमत्ता विक्रीपासून मिळालेले उत्पन्न,चलनक्ष् म दस्ताएवाचे मुदतीनंतर मिळालेल्या रकमा आदी उत्पन्नाच्या स्त्रोतांची चौकशी करण्यात आली.या सोबतच आयकर विभाग,इंदिरा गांधी रुग्णालय गांधी नगर,महानगरपालिका, आरोग्य विभाग,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर,सर्व संबधित बँका व वित्तीय आस्थपना,दुय्यम निबंधक कार्यालय,भारतीय आयुर्विमा महामंडळ, मुलांच्या शिक्ष् णा संबधित शैक्ष् णिक संस्था येथून अधिकृत माहिती प्राप्त करण्यात आली तसेच गंटावार दापत्यांनी स्थापन केलेल्या भागीदारी फर्म व प्रा.लि.कंपनी यांची सुद्धा सखोल चौकशी करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सखोल चौकशी अंती डॉ.प्रविण मुधकर गंटावार व त्यांच्या पत्नी डॉ.शीलू प्रविण गंटावार यांनी आपल्या लोकसेवक पदाचा गैरवापर करुन २,५२,८५,७६२ रुपयांची म्हणजेच एकूण वैद्य उत्पन्नाच्या ४३.०६ टक्के अपसंपदा जमविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध सिताबर्डी पोलीस स्टेशन येथे कलम १३(१)(ब) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियिम १९८८ अन्वये आज दि. १ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात अाला आहे.

डॉ.गंटावार यांचे निवासस्थान व कार्यालयांची झडती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या तीन पथकांमार्फत सुरु आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्ष् क रश्‍मि नांदेडकर व पोलीस अधीक्ष् क रमेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्ष् क मोनाली चौधरी,कर्मचारी लक्ष्मण परतेती, गिता चौधरी यांनी केली.

आयुक्त कोणाला पाठींबा देत आहेत?चर्चेचा मुद्दा-

मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत डॉ.गंटावार दामपत्यांवर आरोपांच्या फैरी झडल्यानंतर देखील त्यांचा बचाव केला होता. त्यांच्या या कृतीबाबत आर्श्चय व्यक्त करण्यात आले होते.शिस्तप्रिय व नियमानुसार काम करणारे ‘प्रामाणिक’ तुकाराम मुंढे यांनी सातत्याने एका भ्रष्ट वैद्यकीय अधिका-याला वाचविण्याचा प्रयत्न केला,त्यांना कायम पाठीशी घातले,एवढेच नव्हे तर एवढ्या कोटींची अपसंपदा जमविण्याचा आरोप पोलीस ठाण्यात दर्ज झाल्यानंतर आता तरी आयुक्त मंुढेंना डॉ.गंटावार दामपत्यांविराेधात आणखी कोणत्या पुराव्यांची गरज आहे?असा मुद्दा आज मनतपाही चर्चिला जात होता.

एवढ्या भ्रष्ट अधिका-याला पाठींबा दिल्याबद्दल,तात्काळ प्रभावाने डॉ.गंटावार दामपत्यांना निलंबित करण्याचा आदेश महापौरांनी दिल्यानंतर देखील त्यांना पाठीशी घातल्यानंतर, आता तरी आयुक्त यांचे डोळे उघडले आहे का?या सवालाची कुजुबजही ऐकू आली. प्रशासनाचा प्रमुख म्हणून आयुक्तांनाच अश्‍या भ्रष्ट,जनेतच्या पैसा लृटणा-या अधिका-यां विरोधात निर्णय घेण्याचा,त्यांना निलंबित करण्याचा,त्यांच्या विरोधात चौकशी गठीत करण्याचा सर्वाधिकार अाहे मात्र,अद्याप प्रामाणिक आयुक्तांकडून कोणतीही हालचाल दिसून पडत नाही,याबाबतही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. आयुक्तांना डॉ.गंटावार दामपत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी, आणखी किती पुराव्यांची गरज आहे?असा प्रश्‍न विचारला जात आहे.आयुक्तांच्या अश्‍या कार्यशैलीमुळेच त्यांच्या प्रामाणिकपणावर देखील प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

मलकापूरात ‘समारंभपूर्वक’पाठवा-
साशल मिडीयावर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फॅन फोलोव्हर्सची संख्या ही अगणिक आहे. सोशल मिडीयावर आयुक्त अगदी ‘क्या बात है आजकल तो बहोत छाये हूये रहते हो’या लोकप्रिय जाहीरातीप्रमाणे अवघ्या महाराष्ट्रातील कानाकोप-यात छाये हूये असतात,यात दूमत नाही. अश्‍याच एका पोस्टमध्ये मलाकपूरातील काही नेटक-यांनी मुंढे यांना तातडीने मलकापूरात पाठविण्यात यावे,कारण मलकापूरात कोरोना बाधितांची संख्या ही सातत्याने वाढत असल्याचे सांगण्यात आले. नागपूरात मुंढे यांच्या ‘महत् प्रयासामुळे व दूरदृष्टिमुळेच’बाधितांची संख्या ही मर्यादित राहीली असल्याचे कौतूक देखील करण्यात आले.

यावर काही नेटक-यांनी आयुक्तांना मलाकपूरात ‘समारंभपूर्वक’पाठवून द्यावे,असे उत्तर दिले. नागपूरात आयुक्तांनी त्यांच्या दूरदृष्टितून जे विलगीकरण केंद्र बनवले, प्रतिबंधक क्ष्ेत्रांची व्यवस्था केली, त्यातून नागपूरकर नागरिकांना अद्याप ही त्या ‘नरकयातना’व ‘बंदिवासातून’ सूटका मिळाली नसल्याचे सांगितले गेले.यातून सूटका मिळवण्यासाठी एकच मार्ग असून आयुक्तांची उचलबांगडी त्वरीत मलकापूरात करण्यात यावी,असे देखील कमेंट नेटक-यांनी केले .

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या