

हर्षद टोपरे यांचा पत्र परिषदेत गंभीर आरोप
न्यायालयाचे इंडियन मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे आदेश
नागपूर,ता. २६ ऑगस्ट: एखाद्या पुरुषाच्या आयुष्यातला सर्वात सुखद क्ष् ण कोणता असेल तर तो जेव्हा पहील्यांदा बाप बनणार असतो तो क्ष ण असतो. वाठोडा ले-आऊट,चैतन्येश्वर नगर येथे राहणारे ३५ वर्षीय हर्षद टोपरे हे देखील २ जुलै २०२० रोजी असेच आनंदी होते जेव्हा तिरंगा चौकातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अभिलाषा देशमुख यांच्या रुग्णालयात त्यांनी पत्नीला बाळंतपणासाठी डॉक्टरांच्या सूचनेनुसार भर्ती केले मात्र नियतीच्या मनात वेगळाच डाव असावा,पत्नीतर जग सोडून गेलीच पण प्रसुती झाल्यानंतर ज्या बाळाला त्यांनी पाहीले ते बाळ ही रडले नसल्याचे कारण सांगून धंतोली येथील बालरोगतज्ज्ञ डॉ.हर्षल इंगोले यांच्या रुग्णालयात बाळाला भरती करावं लागलं मात्र ते ही दगावलं असल्याचे सांगून दुस-या दिवशी मुला ऐवजी मुलीचे कलेवर त्यांच्या हाती सोपवण्यात आले!या संपूर्ण गौडबंगालविरोधात हर्षद यांनी न्यायालयीन लढाई लढल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हर्षद यांना आधी ‘इंडियन मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाकडे’ दाद मागण्याचे निर्देश दिले.
हर्षद यांची पत्नी गायत्री यांची ९ व्या महिन्याची सोनाग्राफी २ जुलै २०२० रोजी करण्यात आली.मात्र डॉ.अभिलाषा देशमुख यांनी बाळाचं वजन साढे तीन किलो असून पोटही खाली आले असल्याचे सांगितले.याशिवाय गर्भवती महिलांच्या साखरेचे प्रमाण ही नैसर्गिरित्या वाढत असल्याने गायत्री यांची देखील रक्तातील साखर वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.परिणामी ७ जुलै रोजी रात्री ८.३० वा.गायत्री यांना भरती होण्यास सांगितले.८ जुलै रोजी सकाळी सीझर करु असे त्या म्हणाल्या,त्याप्रमाणे हर्षल यांनी पत्नीला ७ जुलै रोजी रात्री रुग्णालयात भरती केले.या ही वेळी तपासणी दरम्यान देखील डॉ.अभिलाषा यांनी ‘बेबी ॲण्ड मदर आर हेल्दी’ असेच सांगितले व रात्रभर गायत्री यांना ऑब्जरवेशन खोलीत ठेवण्यात आले.या ठिकाणी एक परिचारिका देखील त्यांच्यावर लक्ष् ठेऊन होत्या.

(छायाचित्र:आपलं गोंडस बाळ घेऊन या रुग्णालयातून सुखरुप घरी परत जाणार आणि आयुष्याच्या जोडीदाराच्या आयुष्यात अवर्णातीत आंनद फूलवणार या वेड्या आशेने रुग्णालयाच्या पाय-यांकडे जाताना गायत्री टोपरे:नियतीने मात्र वेगळाच डाव साधला….!)
मात्र डॉ.अभिलाषा यांनी हर्षद यांना सांगितल्याप्रमाणे रात्रभरात गायत्री यांच्या तपासणीसाठी तीन राऊंड त्यांनी घेतलेच नाही अर्थात रात्री १०.३० वाजता त्या वरती घरी गेल्या त्या रात्रभरात खाली फिरकल्याच नाहीत!आल्यात त्या सरळ सकाळी ६.३० वाजता.गायत्री यांची तब्येत मात्र २ वाजतापासून खराब होऊ लागली होती.वारंवार हर्षद यांनी मॅडमला बोलावून आणा,अशी विनंती करुनही परिचारिका यांनी डॉक्टरांना खाली बोलावले नसल्याचे हर्षद यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत सांगितले.
रात्री गायत्री यांना सलाईनमधून २ इंजेक्शन्स लावण्यात आले होते,ते लेबर पेनचे होते की नाही सांगता येत नाही,मात्र रात्री ४ वाजता गायत्री या रडत आणि वेदनेने तडफडत होत्या,असे हर्षद सांगतात.सकाळी ६.३० वाजता डॉ.अभिलाषा या खाली आल्या,गायत्रीची तपासणी केली,सगळं काही चांगलं होईल,असा धीर दिला व हर्षद यांना सांगितलं,काळजी करु नका आपण नॉर्मल डिलीव्हरी करु,‘नाॅर्मल!’पण डॉक्टर यांनी तर २ जुलै रोजीच बाळाचं वजन जास्त असल्याने ‘सीझर’ करावं लागणार असल्याचं सांगितलं होतं!
हर्षद यांनी हा प्रश्न विचारताच डॉ.अभिलाषा यांनी त्यांना घरुन गरम पाणी घेऊन यायला सांगितले.वैणींना गायत्री यांच्याकडेच थांबवून हर्षद हे घरी गरम पाणी घेण्यास गेले असता वैणींचा त्यांना फाेन आला,लवकर या इथे सगळे गायत्री असलेल्या ऑपरेशन थेटरकडेच धाव घेत आहेत!हर्षद यांनी गरम पाण्याची केन बाहेरच ठेवली आणि गायत्रीला बघितले असता त्या नीळ्या पडल्या होत्या…..त्या क्ष् णी कारण नव्हते कळले मात्र यूट्यूबवर सर्च केले असता प्राणवायुच्या कमतरतेमुळे गर्भवती महीला या नीळ्या पडतात असे समजले…..!
डॉ.अभिलाषा यांनी रात्री राऊंड मारला असता व गायत्री यांची तपासणी केली असती तर…..!अश्यातही गायत्री यांची डिलीव्हरी झाली आणि सकाळी ७.३० वाजता त्यांना मुलगा झाल्याचे कळले,बालरोगतज्ज्ञ डॉ.हर्षल इंगोले यांनी बाळ ४ मिनिटे झाली तरी रडला नाही याला त्यांच्या धंतोली येथील ‘हेल्थ ॲण्ड चिल्ड्रन सिटी हॉस्पीटल’मध्ये भर्ती करावं लागणार असल्याचं हर्षद यांना सांगितलं.हे जेव्हा डॉ.हर्षल बोलत होते तेव्हा हर्षद यांनी बाळाकडे पाहीलं,नर्स बाळाचा पाय उचलून कापसाने पुसत होती,बाळाची नाळ आणि त्याचे वृषण हर्षद यांना दिसले.
८ जुलै रोजी सकाळी ८.१५ मिनिटांनी बाळाला डॉ.हर्षल यांच्या रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.संपूर्ण पैसे भरुन व कागदोपत्रांचे सोपस्कार पार पाडून हर्षद यांनी पत्नीकडे धाव घेतली मात्र…..त्यांना डॉ.अभिलाषा यांनी हर्षद यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता किवा कळविण्याचे देखील सौजन्य न दाखवता ८ जुलै रोजी सकाळी ९.१५ मिनटांवर सेव्हन स्टार रुग्णालयात दाखल केले हाेते…..!
हर्षद यांना बघताच गायत्री यांनी त्यांना पाणी मागितले.या ठिकाणी डॉ.आशिष कुबडे हे गायत्री यांच्यावर उपचार करीत होते,हर्षद यांना त्यांनी सांगितले फक्त ५० टक्के शक्यता आहे जिवंत राहण्याची…..!हर्षद म्हणाले,काहीही झाले तरी डॉक्टर प्रयत्न चालू राहू द्या…!
रात्री १०.३० वाजता डॉ.हर्षल इंगोले यांच्या रुग्णालयातून हर्षद यांना फोन आला…बाळाचा मृत्यू झाला आहे….!हर्षद यांनी त्यांना सांगितले उद्या सकाळी भाऊ त्याचे कलेवर घेण्यास येईल,माझ्या पत्नीची हालत गंभीर आहे मी नाही येऊ शकणार..!
९ जुलै २०२० रोजी हर्षद यांच्या भावाने डायपर घातलेला,पांढ-या कापडात गुंडाळलेले ते कलेवर गंगाबाई घाट येथे दफन केले….!९ जुलै रोजीच गायत्री यांनी दुपारी १२ वाजता जगाचा निरोप घेतला…!हर्षद यांनी डॉ.अभिलाषा यांच्या विरोधात हलगर्जीमुळे पत्नीचा मृत्यू झाला असल्याची तक्रार नंदनवन पोलिस ठाण्यात नोंदवली,परिणामी गायत्री यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडीकलमध्ये नेण्यात आला.११ आणि १२ जुलै दु:खातच गेले,१३ जुलैला बाळाची डेथ समरी घेण्यास गेले असता धक्काच बसला….त्यात….मुलगी अशी नोंद होती…..!
हर्षद यांनी डॉ.हर्षल यांना विचारणा केली,त्या दिवशी तर मी बाळाचे वृषण पाहीले,तो मुलगाच होता तुम्ही मुलगी म्हणून अशी कशी नोंद केली?यावर डॉ.हर्षल यांना घाम फूटला,असे हर्षद सांगतात,ते मी १५-२० मिनिटात चौकशी करुन सांगतो, असे सांगून आत गेले तर बाहेर आलेच नाही,फोनवर त्यांनी कोणासोबत तरी संभाषण साधले,असा आरोप हर्षद यांनी केला.
मी बाळाचे कलेवर पुन्हा काढून गुणसूत्र जुळवणार असल्याचे हर्षद यांनी डॉ.हर्षल यांना दम दिला व धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.पोलिसांनी २३ जुलै रोजी बाळाचे कलेवर दफनभूमीतून बाहेर काढले,गुणसूत्रांची चाचणी ही झाली,अहवालात गुणसूत्रे जुळली असल्याचे नमूद करण्यात आले…..!हा अहवाल मान्य नसल्यानेच उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील ॲड.श्रीरंग भांडारकर यांच्या सहाय्याने न्यायलयात दाद मागितली.
परिचारिका कापसाने बाळाचे पाय वर करुन त्याला पुसत असताना नाळ आणि वृषण मी डोळ्यांनी बघितले,आजही माझा ठाम विश्वास आहे,डॉ.इंगोले यांच्या रुग्णालयातून बाळाची अदलाबदली झाली असून आज ही माझं बाळ कुठे तरी जिवंत आहे,‘जे गेेेले ते येणार नाही पण जे आहे ते मला हवे आहे’अशी आर्त इच्छा व्यक्त करुन,आपल्या पवित्र व्यवसायाशी बेईमानी करणा-या या दोन्ही डॉक्टर्सचे लायसेंस रद्द व्हावे,त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा,माझ्यासोबत जे घडले ते इतर कोणासोबतही घडता कामा नये यासाठीचा माझा हा लढा असल्याचे हर्षद हे सांगतात.
हायकोर्टाने माझी याचिका खारिज करुन आधी मेडीकल काऊंसिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे निर्देश दिले,त्यांचा अहवला आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास संमती देऊ असे न्यायालयाने सांगितले, त्याप्रमाणे काऊंसिलकडे दाद मागितली असल्याचे हर्षद यांनी सांगितले.
डॉ.अभिलाषा यांनी माझ्या पत्नीचा जीव घेतला असा माझा आरोप नाही पण त्यांनी त्या रात्री जो हलगर्जीपणा दाखवला ते कदापि क्ष म्य नाही,त्यांच्या रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या संपूर्ण अहवालामध्ये रात्री १०.३० नंतर सकाळी ६.३० वा.पासून केलेल्या उपचारांची नोंद आहे,रात्रीच त्यांनी उपचार केले असते तर…..!
त्यांच्या या निष्काळजीपणाची शिक्ष्ा मला त्यांना द्यायची आहे,असे हर्षद सांगतात.
(हर्षद टोपरे- ९५५२६१४९८५)




आमचे चॅनल subscribe करा
