

नागपूर,ता. ६ नोव्हेंबर: इलेक्ट्रिक कार उत्पादन करणारी आघाडीची कंपनी ‘टेस्लाचा’ प्रकल्प मिहान परिसरात स्थापन करण्यासाठी महाआघाडी सरकारने पुढाकार घ्यावा,अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव विशाल मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,प्रदेशाध्यक्ष् तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
मुत्तेमवार यांनी मुंबईत उभय नेत्यांना निवेदन देताना कंपनीचे धोरण व मिहानमधील सोयींकडे लक्ष् वेधले.टेस्ला कंपनीने भारतात प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील कंपनीच्या अधिका-यांशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करुन महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने कंपनीला विशेष सवलती सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शवली.
या पार्श्वभूमीवर राज्यात मिहानमधील विशेष आर्थिक क्ष्ेत्र सर्वोत्तम आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ,ऑप्टिक फायबर,मुबलक वीज,पाणी यासह अभियांत्रिकी महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात अभियंते तयार होतात.तांत्रिक कामांच्या प्रशिक्ष् णासाठी आयटीआय आहेत.कंपनीला आवश्यक कुशल मनुष्यबळ सहज उपलब्ध होईल.या सर्व बाबींचा विचार केल्यास सर्वदृष्टिने मिहान योग्य क्ष्ेत्र सिद्ध होईल,असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला.

सद्यस्थितीत मिहानमध्ये इन्फोसिस,टीसीएस,हेक्झावेअर,बीपीएस,टाल,ल्यूपिन फार्मा,एमआरओ,डसॉल्ट यासारख्या नामांकित कंपन्या आहेत.कॉन्कोरचे मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्कचे काम प्रगतीपथावर आहे.नागपूरची भौगोलिक स्थिती लक्ष्ात घेता पैसे व वेळेची बचत करुन कच्चा माल उपलब्ध होईल.
केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या कोणत्याही दिशेला मालवाहतूक शक्य आहे. मिहानमध्ये उद्योग उभारण्यासाठी ज़ीएसटी,मुद्रांक शुल्क व इतर करात अनेक सवलती आहेत.केंद्र व राज्याच्या मंजुरीसाठी एक खिडकी योजना आहे.टेस्लाच्या प्रकल्पाचा लाभ या भागाच्या विकासाला हातभार लावील,याकडे विशाल मुत्तेमवार यांनी निवेदनातून लक्ष् वेधले.
याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल,असे आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिले.




आमचे चॅनल subscribe करा
