

नागपूर,ता. १९ जून: आजवर नागपूर शहरात कित्येक नाव मीडिया मध्ये आली, ज्यांनी आपल्या आपल्या उत्तम कार्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, त्या मधून एक नाव म्हणजे युवा रंगकर्मी कुणाल गडेकर. बालपणापासून कुणालला नाट्य क्षेत्राची आवड व आजोबा स्व.केशवराव गडेकर (माजी स्थायी समिती अध्यक्ष) यांच्या कडून समाजसेवेची प्रेरणा मिळाली, आणि तीच सेवेची सावली कुणाल यांच्यात दिसून येते.

रंगमंच असो की समाजसेवा कुणालचे दमदार कार्य आपल्याला नेहमी वेगवेगळ्या रूपाने बघायला मिळत असतात, महत्वाचं म्हणजे एखादा अडचणीत असतो तेव्हा त्याला न कळता मदत कशी करायची हे त्याच्या संवेदनशील स्वभावाचे एक आगळेवेगळे वैशिष्ठ.स्वतःचा उद्योग सांभाळून हे सर्व कार्य तो करत असतो.त्याच्या या कार्याची दखल घेत त्याची वर्णी भारत सरकारच्या संस्कृतिक समितीवर लागली.तिथेही त्याने बऱ्याच कलावंतांना मदत करून काम मिळवून दिले.सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असून कुणालने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.आज कोरोना सारख्या भीषण युद्धात तो गरजू गरिबांची योग्य ती मदत करतो.कोणाच्याही हाकेला लगेच धावून जाणारा कुणालचे भविष्य अनेकांच्या आर्शिवचनाने समृद्ध झाले आहे.

गरजू कलावंताना धान्य किटचे वाटप-
टाळेबंदीच्या काळात सर्वच नाट्यगृह बंद असल्याने अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली.अंतर्मन कला अकादमीने या कलावंतांना टाळेबंदीच्या काळात धान्य व किराणा किट्सचे वितरण केले. आता टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात आले असले तरी बॅकस्टेज कलावंतांची स्थिती सुधारली नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांना अद्यापही राज्य शासनाची परवानगी मिळाली नसून नजीकच्या काळातही ती मिळण्याची शक्यता नाही. गर्दी जमा होणा-या प्रत्येक उपक्रमांवर शासनाने बंदी घातली आहे.
कोरानाचा प्रादुर्भाव आता उलट आखची वाढला असून सद्यस्थितील कुटुंबाचे उदर भरण कसे करावे?हा यक्ष् प्रश्न या कलावंतांच्या समाेर उभा असताना अंबर्मन कला अकादमी आणि अखिल भरतीय नाट्य परिषदेच्या महानगरशाखेतर्फे या कलावंतांना धान्य व किराणा किट्सचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे धरमपेठ राजाराम वाचनालय,गोकुळपेठ येथे गरजू नाट्य कलावंतांना किट्सचे वितरण करण्यात आले.यात बॅकस्टेज कलावंत,रंगभूषाकार,वेशभूषाकार यांना धान्य किटचे वाटप करुन आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाची आणखी एक जपवणूक युवा नाट्यकर्मी कुणाल गडेकर याने केली.कुणाल याचे फक्त सांस्कृतिक उपक्रम हे ध्येय नसून‘ कलावंत ’हा या क्ष्ेत्रासाठी जगला पाहिजे या उद्दिष्टाने नेटाने तो कार्य करीत आहे.
लॉक डाऊनच्या काळात नागपूरातील युवा रंगभूषाकार नकूल श्रीवास हा उत्तराखंडमध्ये अडकला असताना कुणाल गडेकर हा सर्वात आधी त्याच्या मदतीला धावला. तमिळ चित्रपटाचे चित्रिकरण असतानाच देशात लॉक डाऊन घोषित झाला आणि तमिळ निर्मात्याने आपली चमू घेऊन स्वत:चे राज्य गाठले.अश्यावेळी अनोळखी शहरात नकूल हा अडकून पडला असता नकूलने नागपूरातील त्याच्या परिचयाच्या मित्रांना कॉल केला.तमिळ निर्मात्याने नकूल याच्या कामाचे कोणतेही मानधन न देता उलट नकूल याचे अत्यंत महागडे मेकअप किट घेऊन निघून गेला.
अश्यावेळी कुणाल याने नागपूरातील आपली संपूर्ण राजकीय ओळख वापरुन नकूल याचे मानधन तसेच मेकअप किट त्या तमिळ निर्मात्याकडून नकूलला मिळवून दिली.आजही नकूल हा अत्यंत हलाकीच्या स्थितीत कुणाल याने केलेले सहाय्य विसरला नाही आहे.
या उपक्रमात त्यांना मुंबईच्या मध्यवर्तीचे माजी कार्यकारिणी सदस्य दिलीप देवरणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी मिथुन मित्रा,मकरंद भालेराव,सचिन गिरी,रामजी श्रीवास,सतीश काळबांडे,लालजी श्रीवास व अनेक कलावंत उपस्थित होते.
नाट्यगृह सुरु झाल्याशिवाय रंगमंचाच्या मागील काम करणा-या कलावंतांची उपासमार टाळता येणार नाही.अश्यावेळी कलावंतांच्या मदतीसाठी अश्या उपक्रमांची नितांत गरज होती असे तो सांगतो व या पुढे देखील अशी मदत माझ्याकडून परमेश्वराने करवून घेत रहावी,हीच सदिच्छा तो सद् गुरु चरणी वाहतो.




आमचे चॅनल subscribe करा
