फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेश'झी.'..एका भारतीय वाहीनीची‘शेअर’कथा

‘झी.’..एका भारतीय वाहीनीची‘शेअर’कथा

Advertisements

INVESCO शेअर हाेल्डर, मालक नाही:डॉ.सुभाषचंद्रा यांचा दावा

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ७ ऑक्टोबर: भारतात जेवढ्या काही वृत्त वाहिन्या किवा मनोरंजनाच्या वाहीन्या आहेत त्या सर्व विदेशी मालकांच्या असून त्यांच्या दिशानिर्देशानुसार किंबहूना ‘विचारधारेप्रमाणे’चालणे भारतातील या वृत्त वाहीन्यांना भाग आहे.विदेशी मालकांच्या वाहीन्यांमध्ये देशातील व्यवस्थापंकाना किवा भाग धारकांना विचारस्वातंत्र्य,कृतीस्वातंत्र्य असूच शकत नाही व तसे त्यांना स्वातंत्र्य ही नाही हे पुन्हा एकदा ‘झी‘वाहीनीच्या प्रकरणावरुन ठलकपणे काल अधोरेखित झाले.

झी’ची सुरवात भारतामध्ये १९९२ साली झाली.यात भारतीय भाग धारक डॉ.सुभाषचंद्रा यांची ३.९९ टक्क्यांची भागीदारी आहे आणि तेच ‘झी’चे संस्थापक ही अाहेत तर INVESCO या अमेरिकन कंपनीचे १८ टक्के शेअर्स आहेत.अचानक या अमेरिकन कंपनीला आता भारतातील व्यवस्थापक संचालक पुनीत गाेयनका यांना पदावरुन हटवायचे आहे तसेच कंपनीच्या जनरल बॉडीमध्ये मोठे बदल करायचे आहेत.

झी‘वर दररोज रात्री ९ वा.सादर हाेणारा व लोकप्रिय ज्येष्ठ पत्रकार व संपादक सुधीर चौधरी सादर करीत असलेला सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘डीएनए’हा काल बुधवार दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी म्हणूनच ‘न भूतो ना भविष्यती’असा सादर झाला.यात स्वत:सुधीर चौधरी यांनी या अमेरिकन कंपनीच्या दादागिरीची भूमिका ठलकपणे अधोरेखित केली,ही कंपनी कदाचित चायनाच्या दडपनाखाली ‘झी‘ ला आता ‘टेक ओवर‘करण्यासाठी सरसावली आहे अशी माहिती देत ‘झी’चे संस्थापक सुभाषचंद्रा यांना पडद्यावरील स्क्रीनवर त्यांनी या संपूर्ण गौडबंगालविषयी बोलते केले.

७१ वर्षाच्या वर वय असणा-या सुभाषचंद्रा बोलत असताना अनेकवेळा भावूक झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले.यावरुन ‘झी‘किती मोठ्या अडचणीत सापडला आहे याची जाणीवही प्रेक्षकांना झाली.गेल्या २९ वर्षांत या वाहीनीने अनेक रंगरुप बदलताना पाहीले.९० च्या दशकात सरकारी दूरदर्शन नंतर ‘झी‘वाहीनी ही एकमेव अशी वाहीनी होती जिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

यात ‘हम पांच’,‘कसम की’सा रे ग म प’अंताक्षरी ‘तारा’,‘पवित्र रिश्‍ता’‘घर जमाई’,हॉरर मालिका ‘दस्तक‘ इत्यादी अश्‍या अनेक मालिकांची नावे घेता येईल ज्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते.जवळपास तीन पिढ्या या ‘झी’च्या प्रेक्षक राहील्या असून २१ सा व्या शतकात आता चौथी पिढी या वाहिनीची प्रेक्षक आहे.

त्या वेळी मनोरंजन व बातम्यांसाठी फक्त सरकारी ‘दूरदर्शन’ही एकमेव वाहीनी उपलब्ध होती व त्यावर अनेक सरकारी मर्यादा देखील होत्या.परिणामी ‘झी‘ने लहान पडदा व्यापत असतानाच, लाखोच्या संख्येने कौतूक करणारे पत्र,पोस्ट कार्ड हे ‘झी‘च्या लोखंडवाला येथील कार्यालयात देशभरातून तसेच परदेशातून येऊ लागले.आताही त्याच गोडाऊनमध्ये १० कोटी पत्रे तशीच असल्याची माहिती सुभाषचंद्रा यांनी दिली.
मात्र आता या वाहीनीवरच ‘विदेशी खतरा मंडरा रहा है’या शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली.मला १९९४ मध्येही विदेशी भाग धारकांनी आपले समभाग विकण्यासाठी ५०० मिलियन डॉलरची ऑफर दिली होती मात्र तेव्हाही मी ‘इंडिया इस नॉट फॉर सेल’ असे उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आता अमेरिकन भाग धारक कंपनी ज्याप्रमाणे भारतीय व्यवस्थापनात संपूर्ण बदल करु इच्छित आहे ते बघता, त्यांना आता ही मी हेच सांगतो ते फक्त ‘भाग धारक आहे मालक नाहीत’त्यांनी मालकासारखा नाही तर फक्त कंपनीच्या भागधारकासारखाच व्यवहार करण्याचा सल्ला सुभाषचंद्रा यांनी दिले.
या वाहीनीचे मालक हे ९० कोटी भारतीय प्रेक्षक आहेत त्याच सोबत ६० कोटी विदेशी प्रेक्षक ही या वाहीनीचे मालक असून ही वाहीनी या १५० कोटी प्रेक्षकांची असल्याचे ते म्हणाले.मी किवा पुनीत गाेयनका कोणीही या वाहिनीचे मालक नाहीत.

या अमेरिकन कंपनीला कोणाची,कोणत्या देशाची,कोणत्या विचारधारेच्या माणसांची फूस आहे हे मला नाही सांगता येणार मात्र एवढा मोठा नेटवर्क एक खासगी भागधारक कंपनी नाहीच चालवू शकत यात शंका नाही.मूळात त्यांना ’झी‘चालवायचाच नाही तर संपुष्टात आणायचा असल्याचा अप्रत्यक्ष आरोप ही त्यांनी केला.

ही अमेरिकन कंपनी जे काही करत आहे ते भारत सरकारच्या कंपनी कायद्याच्याही विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.कंपनी कायद्याच्या मागे लपून या अमेकिरन कंपनीला हा व्यवहार करायचा आहे व ‘झी‘ला बळकावयाचे आहे.‘झी’मध्ये ६ बोर्ड मेंबर्स तसेच गाेयनका यांना धरुन ७ सभासद आहेत.हा बोर्ड स्वतंत्र असून त्यांनी देखील अमेरिकन कंपनीच्या या पावित्र्याबाबत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मत घेतले,माननीय न्यायाधीशांनी देखील या अमेकिरन कंपनीची ही कृती अवैध असल्याचा सल्ला दिला.

अवैधरित्या या अमेरिकन कंपनीला ‘झी‘बळकावयाचा आहे.माझे हे वैयक्तीक मत आहे की कोणीतरी या अमेरिकन कंपनीमधला भागधारक बेईमानी करीत आहे.आता ही कंपनी ती नाही राहीली जी आधी होती,९० च्या दशकातली.आता ही कदाचित चायनाची झाली आहे.‘झी‘च्या बोर्ड मेंबर्सने या अमेरिकन कंपनीसोबत बोलले पाहिजे मात्र ती कंपनी बोर्ड मेंबर्सची बैठक देखील बोलवू देत नाही.

ही कंपनी चुकीची प्रतिमा जगभरात निर्माण करतेय.त्यांना चुकीच्या पद्धतीने ही वाहिनी बळकावयाची असल्याचा आरोप आपल्या संभाषणात सुभाषचंद्रा यांनी केला.भारत देशाचा कायद्या त्यांना अशी मान्यता देणार नाही,अशा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.पण त्यांचे प्रयत्न कायद्याच्या मागे लपण्याचा आहे.ते मालक नाहीत फक्त भागधारक आहेत त्यांनी आपले ७५ टक्के शेअर्स ओपन मार्केटमध्ये विकावे पण ते असे करत नाही कारण त्यांचा ‘हेतू’चुकीचा आहे.

भारताच्या सेबी,भारत संचार विभाग इ..िवविध विभागांनी पारदर्शकतेने या कंपनीला प्रश्‍न विचारले पाहिजे कारण ’झी ये बिजनेस नही ९० करोड दर्शको की मिल्कीयत है’असे भावूक उद् गार त्यांनी काढले.

कॉरपोरेट मंत्रालयानेसुद्धा या प्रकरणाचे सज्ञान घ्यायला हवे कारण संपूर्ण कुटुंब एक साथ बसून जर कोणती वाहीनी बघू शकत असतील तर ती….‘झी‘आहे.

यावर सुधीर चौधरीने प्रश्‍न विचारला ‘झी‘ला त्या कंपनीने टेक ओवर केले तर तुमच्याकडे काय पर्याय आहे?’मी शेवटपर्यंत न्यायासाठी भांडणार,असे सुभाषचंद्रा उत्तरले.मी स्वत:प्रति प्रामाणिक राहणार.मी भारत आणि १३३ कोटी भारतीयांप्रति प्रामाणिक राहणार,त्यांनी खुशाल टेक ओवर करावे मात्र खुल्या मार्केटमध्ये आपले आधी ७५ टक्के शेअर्स विक्रीसाठी काढावे.पण ते असे करणार नाही आणि या देशाची सरकार त्यांना हे अवैध काम करु देणार नाही,असा मला विश्‍वास आहे.

देशातील इतर वाहीन्या विदेशी कंपन्यांच्या हातात कधीच्याच गेल्या.‘झी‘एकमेव अशी वाहीनी आहे जी एवढ्या दशकांनंतरही ‘भारतीय‘आहे.

या वाहिनीचे ‘सोनी पिक्चर्स मोशन नेटवर्क‘सोबत विलीगीकरण होणार आहे मात्र सोनी ही जापानी कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या अश्‍या कोणत्याही अटी नाहीत,भारतातील व्यवस्थापनाबाबत सोनीला काही एक घेणेदेणे नाही मात्र या अमेरिकन कपंनीची नीती मात्र संशयास्पद असल्याची शंंंंंंका यावेळी डॉ.सुभाषचंद्रा यांनी बोलून दाखवली.

मूळात ‘झी’ने २०२०-२१ मध्ये ८०० कोटींचा नफा कंपनीला मिळवून दिल्यानंतर ही त्या कंपनीला ‘झी‘ला टेक ओवर करण्यामागे काय उद्देश्‍य आहे.एखादवेळी तोट्यात चालणा-या कंपनीसाठी असे निर्णय योग्य असतीलही मात्र जगातील १९० देशात १५० कोटी प्रेक्षक असणा-या व एवढ्या नफ्यात चालणारी वाहीनी त्या अमेरिकन शेअर होल्डर कंपनीला मूळात हवीच कशाला?

ज्यावेळी ‘झी‘चे ‘सोनी’सोबत विलगीकरण होणार असल्याचा निर्णय झाला तेव्हा शेअर मार्केटमध्ये ‘झी‘च्या शेअर्सने २८१ वरुन ३३६ वर उसळी घेतली मग तरीही त्या अमेरिक शेअर होल्डर्सना ‘झी’वर मालकी ताबा का मिळवायचा आहे?हे अनाकलनीय व अकल्पीत असल्याचे डॉ.सुभाषचंद्रा यांनी सांगितले.

माझ्या मागे भारतीयांची ताकद आहे म्हूणन मी कमजाेर नाही पडणार.सरकारने यात हस्तक्षेप करावा,जनतेने देखील कोणत्याही माध्यमातून का होईना पाठींबा द्यावा,मी तुमच्यासोबत आहे तुम्ही भारतीय माझ्यासोबत रहा,असे आवाहन त्यांनी केले.
‘झी‘चा प्रवास एक शानदार प्रवास राहीला आहे,माझ्यावर प्रेक्षकांनी फक्त प्रेमच नाही केले तर मला काळे झेंडे देखील दाखवले आहे.जोड्यांचा हार देखील गळ्यात घातला अाहे कारण वाहीनीवर चुकीची हिंदी बोलली जात आहे,असा त्यांचा राग होता मात्र माझ्यावर प्रेमही तितकेच केले अन्यथा २९ वर्षांचा प्रवास हा त्यांच्या प्रेमाशिवाय घडू शकला नसता,अशी भावूक टिपण्णी ही त्यांनी केली.

INVESCO कंपनीचा काळाकुट्ट इतिहास-
या कंपनीवर २००४ साली ४५० मिलियन डॉलर्सचा दंड अमेरिकेच्या न्यायालयाने आकारला होता,त्यांच्यावर म्यूचल फंड ट्रेडिंगमध्ये गडबडी केल्याचा आरोप सिद्ध झाला होता.यामुळे लहान निवेशकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले होते.याशिवाय २०१४ मध्ये देखील ब्रिटेनच्या न्यायालयाने या कंपनीवर २०० कोटींचा दंड ठोठावला कारण या कंपनीने एका योजनेमध्ये निवेशकांची दिशाभूल केली होती.

थोडक्यात काल ‘झी’च्या भारतीय प्रेक्षकांना डीएनएवरील हे संपूर्ण सत्य ऐकून धक्का बसला.वाहीनी किवा विचारधारा कोणतीही असली तरी ‘भारतीय’म्हणून आपल्याला ‘जयचंद’होता येत नाही.भारतात असे अनेक डाव्या विचारसरणीची मंडळी आहे ज्यांना ‘झी’चा हा पडता काळ बघून सुखद आश्‍चर्याचा धक्का बसला मात्र….जे आज सुपात आहे ते उद्या जात्यात येतीलच.

मूळात कोणत्याही देशाचं ‘सार्वभौमत्व’हेच त्या देशाचा अंर्तआत्मा असतो,विदेशी विचारधारांच्या हातात जवळपास सर्वच वृत्तवाहीन्या गेल्या आहेत.या वाहीन्यांवरुन एक विशिष्ट मानसिकता तयार करण्याच्या षडयंत्राबाबत देशातील अनेक बुद्धिजीवींनी वारंवार भारताला जागरुक केले आहे.डावी-उजवी,मधली ,कोणतीही विचारधारा असू द्या त्यावर विदेशी षडयंत्राची सावली पडता काम नये,यामुळे देश अस्थिर होतो याचे परिणाम शेवटी नागरिकांवरच होतात त्यामुळेच ‘झी’वर ओढवलेले हे तांत्रिक संकट कोट्यावधी भारतीयांना त्यांच्या सार्वभौमत्वावर आलेले संकट वाटले आणि त्यांनी ट्टीटरवर भरभरुन ‘झी‘ला प्रतिसाद दिला.काल ‘देश का झी’हा हॅश टॅग उगाच नाही सर्चिंगमध्ये पहील्या क्रमांकावर होता.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या