

नागपूर,ता. ११ जून: ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक वामनराव तेलंग यांचे निधन झाले. बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. वामनराव तेलंग हे दै. तरुण भारतचे माजी संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह आणि विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवार आज अंत्यसंस्कार गुरुवारी सहकारनगर स्मशानभूमीत करण्यात आले.
२२ मार्चला त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच एक गौरविकाही निघणार होती. परंतु, देशात वाढलेल्या कोरोना विषाणुमुळे तो कार्यक्रम रद्द करावा लागला. विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, सरचिटणीस विलास मानेकर, कोषाध्यक्ष विकास लिमये, कार्यकारी मंडळाचे सदस्य नरेश सब्जीवाले, उदय पाटणकर, प्रदीप मुन्शी, माजी व्यवस्थापक प्रदीप मोहिते, डॉ. रवींद्र शोभणे, वसंत वाहोकर यांनी वामन तेलंग यांच्या निवासस्थानी जाऊन अन्त्यदर्शन घेतले. तर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी दूरध्वनीवरून कुटुंबीयांशी संवाद साधून सांत्वन केले. त्याचप्रमाणे शहरातील पत्रकार, लेखक, कवी, कवयित्री, नट, चित्रकार इत्यादींनी देखील आपली विनम्र श्रद्धांजली कळवली.
सध्याची परिस्थिती पाहता लोक उपस्थित राहू शकले नाही. वामन तेलंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य मंहामंडळाचे माजी कार्यवाह प्रकाश पायगुडे, माजी कोषाध्यक्ष सुनील महाजन, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, मराठी वाड्मय परिषद बडोदाचे माजी अध्यक्ष दिलीप खोपकर, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष सुधाकर भाले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर यांच्यासह विदर्भ साहित्य संघाच्या जिल्हा शाखेच्या पदाधिका-यांनी शोकसंवेदना कळवल्या.
विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी, सरचिटणीस विलास मानेकर, कोषाध्यक्ष विकास लिमये, कार्यकारी मंडळ सदस्य नरेश सब्जीवाले,उदय पाटणकर,प्रदीप मुन्शी, माजी व्यवस्थापक प्रदीप मोहिते,डॉ रवींद्र शोभणे,वसंत वाहोकार यांनी वामन तेलंग यांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता लोक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाही: मनोहर म्हैसाळकर
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी दूरध्वनीवरून कुटुंबीयांशी संवाद साधून सांत्वन केले.
वामन तेलंग यांच्या निधनाचे वृत्त संबंधित समुहांवरून कळल्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी,प्रमुख कार्यवाह आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह प्रकाश पायगुडे, माजी कोषाध्यक्ष सुनील महाजन, मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्याध्यक्ष प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ उज्ज्वला मेहेंदळे, मराठी वाङ्मय परिषद बडोदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपकर, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष सुधाकर भाले , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्ष डॉ विद्या देवधर, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष डॉ राजशेखर बालेकर यांनी तसेच विदर्भ साहित्य संघ शाखा वणीतर्फे म.ना.सरपटवार, गोंदिया शाखेतर्फे प्रदीप व्यवहारे व राजश्री धामोरीकर,बुलढाणा शाखेतर्फे नरेंद्र लांजेवार, वाशीम शाखेतर्फे गजानन वाघ, यवतमाळ शाखेतर्फे सचिव डॉ विवेक विश्र्वरूपे, अमरावती शाखेतर्फे डॉ मोना चिमोटे, अकोला शाखेतर्फे सीमा रोठे रामटेक शाखेतर्फे डॉ गिरीश सपाटे, पांढरकवडा शाखेचे नरेंद्र पोतदार, काटोल शाखेतर्फे डॉ देवेंद्र तातोडे, तसेच कारंजा आणि चिखली या विदर्भ साहित्य संघाच्या शाखांतर्फे व्यक्त करण्यात आलेल्या शोकसंवेदना कळविण्यात आल्या.
विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार, ग्रंथालयाच्या संचालक अरूंधती वैद्य, कार्यकारिणी सदस्य नितीन सहस्त्रबुद्धे,यांनीही आपल्या संवेदना कळवल्या.
याशिवाय अविनाश महालक्ष्मे, श्रीराम जोशी, सतीश तराळ, बबन सराडकर, मंगेश नारायण काळे, सुखदेव ढाणके, सुधाकर गायधनी, सुरेश आकोटकर, अरूण आसटकर, डॉ तीर्थराज कापगते, प्रदीप व रंजना दाते,प्रा राजेंद्र मुंढे, प्रभू राजगडकर, कुमार बोबडे, किरण वाघमारे, संजय इंगळे तिगावकर,. डॉ सुभाष गढीकर, डॉ अनुपमा उजगरे, डॉ गणेश चव्हाण, डॉ अंजली कुळकर्णी, अंबादास मोहिते, सुनीती देव, विजया ब्राह्मणकर, विजया मारोतकर,प्रभाकर पावडे, कुसुम आलाम, विष्णू सोळंके,मनोहर नरांजे,अनिल चिकाटे, पद्मरेखा धनकर, डॉ अजय देशपांडे, प्रमोदकुमार अणेराव, दा गो काळे, सुनीता झाडे, डॉ अपर्णा लांजेवार, रेखा दंडिगे घिया, गुलाबराव वझे, अजित दिवाडकर, प्रभाकर आंबोने, संजीव कोलते, आशुतोष अडोणी, धनराज खानोरकर, राजेश पाणूरकर, राजू गायकवाड, गोपी अनियाडी अशा पत्रकार, लेखक, कवी, कवयित्री, नट,चित्रकार, इत्यादींनी देखील आपली विनम्र श्रद्धांजली कळवली आहे.
गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला: मुख्यमंत्री
परखड पत्रकार, सर्जनशील साहित्यिक म्हणून वामन तेलंग महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. एक गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वामन तेलंग यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, तेलंग यांनी दैनिक तरूण भारतचे संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ येथे काम करताना आपला असा ठसा उमटविला. विदर्भात साहित्य तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या तरूणांना तेलंग यांनी जाणीव पूर्वक प्रोत्साहन दिले. या त्यांच्या गुणग्राहकतेमुळे महाराष्ट्राला चांगले लेखक, पत्रकार मिळाले.
विदर्भातील पत्रकारितेत साहित्यिक अभिरूची रुजविण्याचे श्रेयही तेलंग यांना जाते.
परखड आणि प्रांजळ लेखन शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष व्यक्तिमत्वातही होते. त्यांच्या जाण्याने गुणग्राहक संपादक, सर्जनशील साहित्यिक गमावला आहे. तेलंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.




आमचे चॅनल subscribe करा
