फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांचे 'जलत्याग' आंदोलन: प्रकृती ढासळली

ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांचे ‘जलत्याग’ आंदोलन: प्रकृती ढासळली

Advertisements

नागपूर: ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांचे ‘जलत्याग’ आंदोलनास ३२ तासाहून अधिक कालावधी झाल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली आहे. शुक्रवार रात्रीपासून त्यांनी ‘अन्नत्याग’ ही केले असून, शनिवारी रात्री त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना रूग्णालयात नेण्याच्या पोलिसांच्या आग्रहामुळे काही काळ वातावरण तापले होते. त्यांचे आंदोलन महापौर व आयुक्त येईस्तोवर सुरूच राहणार असून, लेखी आश्वासन मिळावे यावर त्या ठाम आहेत.

सतरंजीपुरा झोन कार्यालयात प्रभागातील पाणी प्रश्नावर शुक्रवार सकाळ ११ पासून त्यांनी आंदोलनास सुरूवात केली. आधी जलत्याग आणि आता अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती बिघडली आहे. आंदोलनात काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणेही त्यांच्या समर्थनार्थ आहेत. शनिवारी नगरसेवक बंटी शेळके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आंदोलनस्थळास भेट दिली. पाणी प्रश्नावर आभा पांडे आक्रमक आहेत. सभागृहात व बाहेरही त्या कायम पाणीप्रश्नावर बोलत असतात. त्यांनी यापूर्वी दोनदा पाणी प्रश्नावर स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र, सभागृहात महापौरांनी चर्चा नाकारली. गुरूवार, २० जूनच्या महासभेतही त्यांचा पाणीप्रश्नावरील स्थगन पुकारण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त होत त्यांनी सभागृहात विषयपत्रिका फाडून सभेवर ब​हिष्कार घातला होता. त्यानंतर जलत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सतरंजीपुरा झोन कार्यालयात आंदोलनास सुरूवात झाली. जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी यांच्यासह ओसीडब्लूच्या अधिकाऱ्यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. परंतु महापौर नंदा ​जिचकार व आयुक्त अभिजित बांगर यांनी येऊन लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या