
नागपूर: एनडीए सरकारला देशाची अर्थव्यवस्था चालवता येत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचे चार मूलभूत टप्पे आहेत,बचत,खर्च,गूंतवणूक आणि रोजगार, या चारही बाबतीत मोदी सरकार ही अपयशी ठरली आहे. मोदींनी दहा कोटी रोजगाराचे आश्वासन जनतेला दिले होते,फडणवीस आणि गडकरी यांनी ५० हजार रोजगार दर वर्षी देण्याचे वचन दिले होते,६५ टक्के लोकसंख्या ज्याच्यावर निर्भर आहे तो शेतकरी वर्गच सर्वाधिक अडचणीत आला आहे, देशातील अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे,देशात गूंतवणूक ठप्प झाली आहे, बेरोजगारीचा प्रश्न विकट झाला आहे, परदेशी गूंतवणूक तशीही ज्या देशात सांप्रदायिक सौहाद्र नाही त्या देशात होत नसते अशी टिका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार व प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.
बुधवार दि.१६ ऑक्टोबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख, विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले,की नुकतेच नोबेल पुरस्कार ज्यांना जाहीर झाला ते अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी देखील दिलेल्या मुलाखतीत भारताची अर्थव्यवस्था ही हेलकावे घेत असल्याचे सांगितले. पंजाब ॲण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळ्याने जगात चूकीचा संदेश गेला. ज्या देशात बँका सुरक्ष्ति नाही, जनतेच्या कष्टाचा पैसा सुरक्ष्ति नाही,त्या देशात गूंतवणूक करण्यास कोणी पुढे येत नसल्याचे ते म्हणाले.पीएमबी घोटाळ्यामुळे तीन खातेदारकांचा दूर्देवी मृत्यू झाला. देशाच्या इतिहासात एवढा मोठा दरोडा जनतेच्या पैशांवर कधीही पडला नाही. महाराष्ट्रच्या जनतेने मतदान करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष् देण्याचे त्यांनी आवाहन केले. परकला प्रभाकर हे भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांच्या पतीने देखील देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी गंभीर चिंता जाहीर केली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात दुष्काळ,रोजगार,सिंचन,भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर फडणवीस सरकार हे पूर्णपणे अपयशी ठरलले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अर्थव्यवस्थेच्या या गंभीर स्थितीला या सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. यूपीए सरकारने देशातील ९० कोटी लोकांना दहा वर्षात गरीबी रेषेच्या वर उचलले.देशात सध्या भीति आणि दहशतीचा माहोल असल्याचा आरोप त्यांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीनंतर काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर काँग्रेसने आत्मचिंतन केले का?या प्रश्नावर बोलताना देशाची जनता या सरकारलाही थोडा वेळ देऊ इच्छित होती असे ते म्हणाले. यूपीए सरकारलाही दहा वर्षांचा कालावधी मिळाला होता. १९९१ नंतरच्या जागतिकरणाच्या काळानंतर देशाची अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत होती त्याची काय अवस्था केली आहे हा प्रश्न मतदारांनी एनडीए सरकारला विचारण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
राष्ट्रवादाचे नारे दिल्याने लोकांचे पोट भरत नाही-
देशाचे आर्थिक दिवाळे काढून, राष्ट्रवादाचे नारे दिले जात आहेत मात्र याने लोकांचे पोट भरत नाही. राष्ट्रवाद ही भाजपची मक्तेदारी नाही. उलट भाजपची विरासत तर ती आहे ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात कधी सहभागच घेतला नाही.त्यांच्या तोंडी राष्ट्रवादची भाषा शोभत नाही. अर्थव्यवस्थेला लकवा मारला गेला आहे. काँग्रेस नेतृत्वालाही लकवा मारला गेला आहे का?या प्रश्नावर राहूल गांधी यांनी लोकसभेच्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला असल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी या १८ वर्ष काँग्रेसच्या अध्यक्ष्ा राहील्या आहेत,त्यांनीच नेतृत्व स्वीकारले. २००४ मध्ये काँग्रेसच्या १४२ जागा,२००९ मध्ये २०६,२०१४ मध्ये ४४ तर २०१९ मध्ये आम्हाला ५२ जागा मिळाल्या. या परिस्थितीचे आम्ही आत्मचिंतन करीत असल्याचे ते म्हणाले.
गांधी हत्येमध्ये सावरकरांचे नाव-
सध्या देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी होत असल्याकडे लक्ष् वेधले असता, गांधी हत्येमध्ये सावरकरांवर आरोपी असण्याचा ठपका होता तर नथूराम गोडसे हे गुन्हेगार होते. १९६९ च्या कपूर कमिशनने सावरकर आणि त्यांच्या काही सहकारी यांना गोडसे यांच्या कृत्याबाबत जानेवरी १९४८ मध्येच माहिती असल्याचा ठपका ठेवला आहे.याप्रसंगी त्यांनी राफेल,शेतकरी इ.अनेक विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्र सरकारने चांगले आणि लोककल्याणकारी सरकार चालवले असते तर आपली कामे जनते पुढे मांडली असती असा टोला त्यांनी लगावला. परफॉर्मस के नाम पे ये सरकार ‘नील बटा सन्नाटा’ असल्याची टिका त्यांनी केली. भापजतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचे नाव जाहीर झाले तर शिवसेनेतर्फे आदित्य ठाकरे यांचे नाव जाहीर झाले,काँग्रेसने मुख्यमंत्री कोण होणार हे का जाहीर केले नाही?या प्रश्नावर बोलताना आमचा पक्ष् लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष् असल्याचे त्यांनी सांगितले. २८८ जागांवर निवडून येणारे उमेदवार हे बहूमताच्या आधारावर आपला नेता निवडतील. महाराष्ट्रात मात्र एकाच मुख्यमंत्र्यांच्या जागेसाठी ’दोन’ उमेदवार उभे असल्याची कोटी त्यांनी केली. राम मंदिराच्या प्रश्नाला त्यांनी बगल देत न्यायालयाने ज्याप्रमाणे आपला निर्णय सुरक्षित ठेवला त्याप्रमाणे आम्ही देखील आमचे वक्तव्य सुरक्षित ठेवतो आहोत मात्र सर्वाच्च न्यायालय जे काही निर्णय देईल तो काँग्रेस पक्ष्ाला स्वीकार्य असेल असे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
