फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजज्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले तेच आता विरोधात करतात प्रचार!

ज्याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले तेच आता विरोधात करतात प्रचार!

Advertisements


पत्रकार परिषदेत गडकरी यांचा नेमका कोणावर निशाणा?

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.१६ एप्रिल २०२४: नागपूरात मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे.येत्या १९ तारखेला लोकसभेच्या पहील्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.प्रचारासाठी सर्व लोकसभेच्या उमेदवारांना फक्त १६ दिवस मिळाले होते.उद्या गुरुवारी प्रचार तोफा सायंकाळी पाच वाजता थंडावतील मात्र,त्या आधी केंद्रिय मंत्री व नागपूरातील दोन टर्मचे खासदार असलेले नितीन गडकरी यांची तोफ अचानक आज पत्रकार परिषदेत बोलता-बोलता डागल्या गेली आणि उपस्थितांना त्यांनी कोड्यात टाकले.

‘ज्याला जेलमध्ये जाण्यापासून मी वाचवले तेच आता विरोधात प्रचार करीत आहेत’असे गडकरी बोलून गेलेत.त्यामुळे आता नेमके कोणाला जेलमध्ये जाण्यापासून गडकरी यांनी वाचवले?कोण नेमका त्यांच्या विरोधात प्रचार करीत आहेत?विचार करुन-करुन उपस्थितांच्या डोक्याचा भुगा झाला मात्र,उत्तर काही सापडेना.

नागपूर मतदारसंघातून एकूण २६ उमेदवार रिंगणात आहेत,त्यातील एक स्वत:गडकरी सोडलेत तर इतर २५ मध्ये असा कोणता उमेदवार आहे ज्याला गडकरी यांनी तुरुंगात जाण्यापासून वाचवले असावे आणि जो आता त्यांचे उपकार विसरुन विरोधात प्रचार करीत आहे?संतांची एक म्हण आहे ’उपकार करणा-यांची परतफेड वाटल्यास करु नका मात्र अपकार ही करु नका’गडकरी यांच्या विषयी नेमके विपरीतच घडले.‘राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किवा मित्र नसतो’ हीच म्हण ,संतांच्या म्हणीपेक्षा खरी,असे आता म्हणायची वेळ आली आहे.

नागपूरात सुरवातीला एकतर्फी वाटणारी लढत आता चांगलीच तुल्यबळ झालेली आहे त्यामुळे या निवडणूकीत दीड -दोन लाख असणारी मुस्लिम मते ही बाजी पलटवू शकतात याची जाणीव प्रस्थापित उमेदवारांना देखील आहे.या पार्श्वभूमीवर ईद निमित्त गडकरी हे शुभेच्छा द्यायला मोमिनपुरा येथे गेले असताना मुस्लिमांचा त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला.रात्री बारा वाजता ते मोमिनपुरा येथे गेले होते मात्र,अवघ्या दहा-पंधरा मिनिटात चार हजारच्या जवळपास मुस्लिम बांधव एकत्रित झालेत.एवढंच नव्हे तर रात्रीच्या बारा वाजता त्यांनी गडकरी यांच्या सन्मानार्थ घोषणा ही देण्यास सुरवात केली.ही बाब आचार संहितेचे उल्लंघन करणारी असल्याने गडकरी यांनी तिथून काढता पाय घेतला.ही बाब आज पत्रकार परिषदेत स्वत:गडकरी यांनीच सांगितली.

एका पत्रकाराने,तुम्हाला मोमिनपुरा येथून ७० टक्के मत पडणार असल्याचे भाकीतच वर्तवले,यावर गडकरी अतिशय खुश होऊन,तुमच्या तोंडात सारख पडो,असे आनंदाने म्हणाले.

हे बोलताना,राजकारणात जे होईल ते होईल,सगळे मला खूप चांगल्याने ओळखतात,मी माझ्या जीवनात कधीही जात-पात,धर्म,भाषा किवा राजकीय पक्ष बघून भेदभाव केला नसल्याचे ते म्हणाले.लोकांचं प्रेमच हीच माझी पुंजी आहे,अनेक काँग्रेसवाल्यांची कामे मी करुन दिली.तेच आज माझ्या विरोधात शहरात फिरत आहेत.जो विरोध मे घूम रहे थे वो जेल में जाने की स्थिती मे थे और उनकी अरेस्ट मैने बचाई,असे बोलण्याच्या ओघात गडकरी बोलून गेलेत,मात्र माझा यावर काही आक्षेप नाही,अशी पुश्‍तीही त्यांनी लगेच जोडली.

थोडक्यात,गडकरी यांचा स्वभाव कितीही दिलदार असला तरी,मंत्री पदाचा वापर हा एखाद्याला कायद्यापासून संरक्षण देण्यासाठी योग्य होते का?हा नवा प्रश्‍न त्यातून निर्माण झाला आहे.

मंत्रीपदाची शपथ संविधानावर हात ठेऊन घेतली जाते.तोच संविधान समानतेचे आणि कायद्याचे राज्य याची अपेक्षा संविधान राबविणा-यांकडून करीत असतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच २५ नोव्हेंबर १९४९ या दिवशी संविधान सभेतील शब्द आहेत,‘संविधान कितीही चांगले असो ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे,ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.जसेच संविधान कितीही वाईट असो,ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे,ते जर प्रामाणिक असलीत तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही’

मग गडकरी म्हणतात,त्यांनी एका काँग्रेसवाल्याला तुरुंगात जाण्यापासून वाचवले तर ही त्यांनी केलेली संविधानाचीच प्रतारणा नव्हती का?जे आज गडकरींच्या विरोधात प्रचारात आहेत तेच उद्या याच संविधानाची शपथ घेऊन आमदार,खासदार,मंत्री होतील,त्यावेळी कदाचित भ्रष्टाचारांचे आरोप असतील, या संविधानाची शपथ घेऊन राज्यकारभार हाकतील त्यावेळी सर्वसामान्य जनतेच्या मतांचे आणि विश्‍वासाचे अवमूल्यन होणार नाही का?

आता नागपूरच्या मतदार राजा समोर फार मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे,त्यांनी मत कोणाला द्यावे?उपकार करणा-याला कि उपकाराची परतफेड अपकाराने करणा-याला….!‘हमाम में सब नंगे और नंगो से खुदा डरे’ही नवी म्हण म्हणायची वेळ नागपूरच्या मतदारांवर आली आहे,असेच आता म्हणावे लागेल.
…………………………………….

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या