

कर्मचारी सरळ घरीच गेले निघून!
नागपूर,ता.५ डिसेंबर: नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघाचा निकाल काल शुक्रवारी जाहीर झाला यात महापौर संदीप जोशी यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांचा विजय झाला.दुपारी निकाल जाहीर होताच,शासकीय सुटी नसतानाही मनपाच्या कर्मचा-यांनी चक्क घरी जाऊन झोपणे पसंद केले,कोणता कर्मचारी काम सोडून घरी गेला,हे विचारायला प्रशासनाच्या अधिका-यांनाही वेळ नव्हता.जोशींच्या पराभवाची बातमी मनपात धडकताच,अनेक कर्मचा-यांच्या मनात ‘मातम’ तर अनेक कर्मचा-यांच्या मनात ‘आनंदाची’ भावना दाटली,अशी माहिती सूत्राकडून मिळाली.
संदीप जोशीं यांच्या पराभवाबाबत चर्चा करताना ओबीसी समाजाने फक्त सतरंज्याच उचलायच्या का?असा सूर मनपातही ऐकू आला!ही बीजेपी गडकरी यांची बीजेपी नाही,असा देखील संताप अनेकांच्या मनात खदखदत होता.विदर्भात भाजपाला तळागाळात पोहोचवणारे केंद्रिय मंत्री नितीन गडकरीच होते,गडकरी यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही,मात्र आताची बीजेपी ही पूर्वीची बीजेपी नाही,असे स्पष्टपणे बोलले जात आहे.आज जे नेते बीजेपीचे कार्यकर्ते होण्याचा दावा करीत आहेत ते कोणत्याही कष्टाशिवाय केवळ ‘बापाच्या’पुण्याईच्या बळावर नेते झालेत,त्यांनी कधीही पक्ष्ासाठी खस्ता खालल्या नाहीत किवा सतरंज्याही उचलल्या नाहीत,असे परखड मत अनेक मनपा कर्मचारी व्यक्त करीत होते.
नागपूर शहरातील भाजप पक्ष् म्हणजे ‘त्रिकूटांचा चक्रव्यूह’असल्याचे गमतीने बोलले जात असते.प्रतिमा डागाळलेला नेता हा ओबीसी समाजाचा असला तरी त्याला समाज,आपला नेता मानत नाही,तसे ही तो समाजाचा नसून ‘पक्ष्ाचा’असतो,यामुळेच पदवीधर निवडणूकीत ॲड.अभिजित वंजारीसाठी मनपातील अनेक कर्मचारी हे ओबीसी समाजासाठी मनापासून झटताना दिसले,एवढेच नव्हे तर १ डिसेंबर रोजी झालेल्या बंपर वोटींगनंतर अनेकांनी मतमोजणी प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच समाजमाध्यमांवर ॲड.अभिजित वंजारी यांच्या अग्रीम विजयाच्या पोस्ट्स झळकावल्या!
जोशी यांच्यावर ब्राम्हण वर्ग ही नाराज!
मराठा आरक्ष् णाला घेऊन भारतीय जनता पक्ष्ाने विशेषत: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली आहे,ती ब्राम्हण वर्गाला दुखावणारी ठरली.या वर्गाच्या मनामध्ये ही आतल्याआत रोष खदखदत होता,परिणामी पदवीधर निकालानंतर सोशल मिडीयावर ज्या पोस्ट झळकल्यात त्यात सवर्ण वर्गातील अनेक सुशिक्ष्तिांनी जोशी यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत जाणेच पसंद केले नाही,असे नमूद केले होते.एका-एका कुटुंबातील १६-१६ मते असताना फडणवीस यांच्यावरील रोषामुळे भाजपचा हा परंपरागत मतदार देखील पराकोटीचा दुखावला गेला असल्यामुळे,बहूतांश सवर्णांचे वोट हे जोशी यांना मिळू शकले नाहीत,ही जमीनी वास्तविकता आहे.दूसरीकडे मात्र ओबीसींची गठ्ठावार मते ॲड.वंजारी यांना सहज मिळवता आली,हे निकालानेच सिद्ध केले .परिणामी आगामी महानगरपालिकेच्या निवडणूकीत किवा विधान सभेच्या निवडणूकीत जनतेचा हाच कल कायम राहीला तर….भाजपला मनपात ५० जागा ही मिळवणे शक्य होणार नाही…असे मत व्यक्त केले जात होते!
महापौर पद सोडतील का?
एवढेच नव्हे तर पदवीधर निवडणूक हरल्यानंतर संदीप जोशी हे येत्या काही दिवसात ठरलेल्या फॉर्म्यूल्याप्रमाणे महापौर पद सोडतील का?याबाबत देखील चांगलाच खल मनपात काल ऐकू आला.संदीप जोशी विजयी झाले असते तर महापौर पदाची माळ सहज भाजपचे ज्येष्ठ नेते दयाशंकर तिवारी यांच्याच गळ्यात पडली असती मात्र आता चित्र पार पालटले आहे,पद हे कोणालाही सूटत नाही,त्यामुळे महापौर पदासाठी भाजपमध्येच येत्या काळात फार मोठी रस्सीखेच होताना दिसेल,असेही भाकीत अनेक कर्मचारी वर्तवून मोकळे झालेत!
जोशी लाडके तर विधान परिषदेत मे महिन्यातच का पोहोचले नाहीत?
याच वर्षी १८ मे रोजी माजी महापौर व भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी विधान परिषदेची आमदार म्हणून शपथ घेतली.संदीप जोशी व प्रवीण दटके हे दोन्ही नेते फडणवीस यांच्या जवळच्या ‘कोट्यातील’म्हणून गणले जातात.मात्र संदीप जोशी यांच्या वाट्याला पदवीधर मतदार संघासारखी खडतर निवडणूक ती ही ईव्हीएमने नव्हे तर ‘बॅलेट पेपरने’लढणारी देण्यात आली मात्र मे महीन्यात दटके यांना सरळ भाजपच्या कोट्यातून परिषदेवर पाठवण्यात आले,याबाबत देखील मनपात काल चांगलीच चर्चा रंगली,अनेकांनी तर जोशी हे ‘बळीचा बकरा’ झालेत अशी सहानूभुती देखील व्यक्त केली.
जयंत पाटील खरे बोललेत!
महाराष्ट्रातील सहाही शिक्ष् क व पदवीधर मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणूकीत एकमेव धुळे-नंदूरबारची जागा वगळता भाजपचा पार धुव्वा उडाला.सर्वात मोठा पराभव हा नागपूरात फडणवीसांना बसला.मात्र तरी देखील पराभव मान्य न करता,फडणवीस यांनी आघाडीच्या एकत्रित मतांचा अंदाज आला नाही,असे विधान केले,यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांना ’तुम्ही विधान सभेच्या अामदारकीचा राजीनामा द्या व पुन्हा तुमच्याच मतदासंघातून निवडून येऊन दाखवा’असे उघड आव्हान केले,जयंत पाटील हे अगदी खरे बोललेत,फडणवीस यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये नागपूरातील दक्ष्ि ण-पश्चिम मतदार संघातून जी ७० हजारांची लीड घेऊन निवडणूक जिंकली तो आता ‘इतिहास’झाला आहे,आघाडीच्या एकत्रित मतदानासमोर यावेळी फडणवीस यांना त्यांची देखील सीट वाचवता येणार नसल्याची चर्चा देखील मनपात चांगलीच रंगली होती.




आमचे चॅनल subscribe करा
