फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजैवविविधता उद्यान नागपूरला ही अनमोल भेट;गडकरी

जैवविविधता उद्यान नागपूरला ही अनमोल भेट;गडकरी

जैवविविधता उद्यानाचा लोकार्पण सोहळा

नागपूर,२८ जुलै २०१९: आपलं शहर हे ग्रीन नागपूर व्हावं,प्रदुषणापासून मुक्त व्हाव, पाणी आणि वायू प्रदुषणापासून मुक्तता मिळावी हे सर्वांचंच स्वप्न होतं, परिणय फुके यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वप्नं प्रत्यक्ष्ात साकारलं आणि नागपूरला जैवविविधता उद्यानाची अनमोल भेट दिली असे विधान केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

ते वाडी-हिंगणा मार्गावरील अंबाझरी गेट क्र.४ येथील नवनिर्मित जैव विविधता उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त बोलत होते.याप्रसंगी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, महापौर नंदा जिचकार, वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके, जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल आदी उपस्थित होते.पुढे बोलताना गडकरी म्हणाले, की आज संपूर्ण जगात निसर्गाचा समतोलच बिघडला आहे, तो समतोल साधण्याची गरज आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ३३ कोटी वृक्ष् लावण्याचा संकल्प केला आणि मला विश्‍वास आहे ते हा संकल्प शंभर टक्के पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.

दिल्लीतही मी सांगितले महाराष्ट्राकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. लवकरच राष्ट्रीय महामार्गावरील झाडे लावण्याबाबतचा करार दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून करणार असल्याचे ते म्हणाले. जैव विविधता प्रकल्पामुळे अंबाझरीचे पाणीही शुद्ध होईल, स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्या जवळ मेट्रो स्टेशन राहणार आहे या ठिकाणी जल क्रिडा सुरु करण्याचा मानस असून पर्यटनाच्या दृष्टिने हा भाग विकसित होणार आहे यामुळे नागपूरच्या पर्यटनामध्ये देखील भर पडणार असल्याचे ते म्हणाले. फुके यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे उद्यान नागपूरचे वैभव वाढवणारे असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना मुनगंटीवार म्हणाले,की वन हे फक्त एका विभागाचे कार्य असता कामा नये तर संपूर्ण समाजाचे कार्य असले पाहिजे.लोकसहभागामुळेच महाराष्ट्रात ८ कोटींपेक्ष्ा जास्त वृक्ष्ारोपण राज्यात झाले. आपल्या व्यस्तम वेळेतून गडकरी व मुख्यमंत्री हे नेहमी वनाचं महत्व लोकांना कळावं यासाठी वेळ देतात. जगात जो कोणी जन्माला येतो त्याला जगात आल्याबरोबर श्‍वास हा लागतो आणि हा श्‍वास फक्त झाडे देतात. त्यामुळेच वसुंधरेचं हे कर्ज असतं माणसावर त्याने वसुंधरेचं संरक्ष् ण करुन हे ऋण फेडलेच पाहिजे. ३३ कोटी वृक्ष्ारोपण म्हणजे माझ्यासाठी ३३ कोटी देवाज्ञा आहे. देवानेच जणू गुप्त जीआर पाठवला आहे, जैविक सृष्टी टिकवायची असेल तर प्रत्येकाने हातभार लावण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

प्रास्ताविकेत परिणय फुके म्हणाले,की अंबाझरी हा भाग १८०० एकर जागेवर विस्तारीत असून स्वातंत्र्य पूर्व काळात भोसले यांनी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती. यानंतर हा संपूर्ण भू-भाग वन विभागाच्या अधीन आला. २००७ साली नगरसेवक असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष् तोड सुरु होती, असामाजिक तत्वे जंगलाची अतोनात हानी करीत होती. २०१२ साली जयदीप दास, स्वानंद देशपांडे यासारख्या अनेक मित्रांच्या मदतीने या क्ष्ेत्राचे संरक्ष् ण व संवर्धन करण्याचे ठरवले. २०१३ पर्यंत अनेकदा मागण्याकरुन देखील तत्कालीन सरकारने कोणतेही सहाय्य केले नाही.मात्र २०१४ साली भारतीय जनता पक्ष् ाचे सरकार आल्याबरोबर साढे चार कोटी रुपये खर्च करुन साढे सात कि.मी.ची संरक्ष् ण भिंत तयार केली. वनमंत्री मुनगंटीवार यांनी २०१६ साली महाराष्ट्रात ३३ कोटी वृक्ष्ाराेपणचा संकल्प केल्याबरोबर आधी या ठिकाणी १० हजार मग २० हजार असे करीत एक लाख झाडांचे वृक्ष्ारोपण आणि संवर्धन करण्यात आले. तलावाचे पाणी वाडी व एमआयडीसीमुळे प्रदूषित होत होते त्यासाठी एसटीपी प्लान्ट टाकण्यात आला.याच पाण्याने येथील झाडे जगवली जातात.पक्ष्ी निरीक्ष् कांसाठी हे क्ष्ेत्र पक्ष्यांचा स्वर्ग झाले असल्याचे ते म्हणाले. २०१५ साली या प्रकल्पाचे भूमिपूजन नगरसेवक म्हणून झाले आज वन राज्यमंत्री म्हणून लोकापर्ण होत असल्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

संचालन श्‍वेता शेलगांवकर व रेखा दंडिगे-घिये यांनी केले. आभार राजन तळमळे यांनी मानले.

पर्यटक सिंगापूरला न जाता नागपूरला येतील-मुख्यमंत्री
फूके यांनी गेली सात-आठ वर्षे अंबाझरीचे जैव विविधता उद्यान झाले पाहिजे हा एकच ध्यास घेतला होता. जैव विविधतेचे संवर्धन झाले पाहिजे, पक्ष्ी प्रेमींना पक्ष्यांचे दर्शनही झाले पाहिजे ही मोहिमच मित्रांसोबत त्यांनी हाती घेतली होती. सुदैवाने आमचे सरकार आल्यानंतर त्यांच्या या मोहिमेला आम्ही संपूर्णपणे पाठींबा दिला. या मेहनतीमुळेच ते वन विभागाचे राज्यमंत्री ही झाले. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात अतिशय सुंदर काम त्यांनी केले आहे. आम्ही सत्तेवर येण्यापूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री टिकत नाही, उद्याने देखील तयार होत नाही अशी स्थिती होती. आता उद्यानेही तयार होतात आणि मुख्यमंत्री हे देखील टिकतात अशी कोपरखळी त्यांनी यावेळी मारली.
गडकरी यांच्या प्रयत्नातून नागपूरात बॉटनिकल उद्यान झाले. गोरेवाडा प्राणी संग्रहालय लवकरच पूर्ण होण्याचा मार्गावर आहे. येत्या सप्टेंबरमध्ये पहील्या आठवड्यातच या प्राणी संग्रहालयाचे उद् घाटन निश्‍चिमपणे आम्ही करु. या जैव विविधतो उद्यानामध्ये १६० प्रजातीचे पक्ष्ी बघायला मिळतात त्याचप्रमाणे गोरेवाडा प्राणी संग्रहालयात देखील अनेक प्रजातीचे वन्य जीव नागपूरकरांना बघायला मिळणार आहेत. लोकं सिंगापूरला न जाता नागपूरला प्राणी संग्रहालय बघायला येतील. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या ३३ कोटी वृक्ष्ारोपणच्या संकल्पनेला महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. यात सर्वात जास्त सहभाग शालेय विद्यार्थ्यांनी नोंदवला. आपली पिढी व आपल्या आधीच्या पिढीने पर्यावरण संरक्ष् णाकडे मुळीच लक्ष् न दिल्यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी झाली आहे. पण ही पिढी ही हानि भरुन काढत असल्याचे ते म्हणाले. पर्यावरणात संतुलन राखण्याच्या कार्यात शालेय विद्यार्थी व त्यांचे शिक्ष् क यांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या