जेन-Z लग्नं का करीत नाही, जेन-Z पहिल्याच नोकरीवर टिकून का राहत नाहीत?अश्या ब-याच चर्चा होतात आणि मुख्य म्हणजे आपल्या घरात सुद्धा ही समस्या असते की जेन-Z असं का वागतात?
यासोबतच उद्योजगता त्यांना खूप आवडते.घरात आई-वडिलांनी एखादा उद्योग हा शून्या पासून तर ९० पर्यंत नेऊन ठेवला असेल तर ते त्याला शंभर किवा दोनशे पर्यंत करणार नाहीत!.ते थिंक ’आऊट ऑफ द बॉक्स’ त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं आणि ते संपूर्णपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात आम्ही कसे बरोबर आहोत, त्यामुळे आपण त्यांचा मतांचा स्वीकार करा,अशी अपेक्षा ते ठेवतात,असं डॉ.प्राजक्ता यांनी जेन- Z चं वैशिष्ठ उलगडताना सांगितलं.
जेन-Z ही जी काही सगळी वैशिष्ट्ये आहे ही सगळी मोठ्या प्रमाणात आपल्याला घरोघरी दिसून पडते. त्यातल्या त्यात आपण जी व्यवहारिकता म्हणतो, ती जेन-Z म्हणजे मोठ्या प्रमाणात आढळून येते.आपली पिढी ही खूप विचार करणारी आहे, त्यामुळेच आपल्या या पिढीला ‘सँडविच’ जनरेशन म्हणतात.त्यामुळेच कदाचित आपल्या जनरेशन मध्येच प्रॉब्लेम आहे ,आपणच घाबरट आहोत असं आपल्या पिढीसाठी म्हटल्या जातं, पण हीच ‘सँडविच’ जनरेशन आज दुसऱ्या जनरेशनला सांभाळते आहे. तेव्हा हे प्रेग्नेटिझम खूप महत्त्वाचं आहे. यालाच आपण यथार्थवादी, व्यवहारवादी म्हणतो. जेन-Z ने हाच यथार्थवाद किंवा व्यवहारवाद त्यांच्या आयुष्यात कसा घेतलेला आहे, हे डॉक्टर जयश्री यांनी उलगडून दाखवलं.
डॉ.जयश्री सांगतात की,यर्थाथवाद हे या जनरेशनचं खूप मोठा वैशिष्ट्य आहे. मूळात व्यवहारवाद ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. ९० च्या दशकामध्ये ती आधी तिथे आली मग नैसर्गिकरित्या जश्या इतर गोष्टी आल्या तशी ती संकल्पना तिथून भारतात आली.जेन- Z हे खूप व्यवहारवादी असून ते खूप हवेत गप्पा करणार नाही किंवा खूप त्यागाच्या गप्पा करीन नसून जे करण्यायोग्य आहे तेच करीत असतात आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या पिढीत कसा राहणार आहे?
आपली पिढी ही परंरपरावादी आहे.आपण पुष्कळ आयुष्यं भावनेच्या भरात जगलो आहोत.अनेक अशी उदाहरणे आहेत ज्यात मोठ्या भावांनी आपल्या कुटंबियांसाठी शिक्षण सोडलं आहे, लवकर नोकरी केली आहे किंवा घरात एखादी वहिनी असते जी आपल्या आवडी-निवडी बाजूला ठेऊन सगळ्या कुटूंबाची काळजी घेतली होती. महत्वाचं म्हणजे त्यांच्या या त्यागाचा सन्मान देखील होत होता.त्यांनी केलेया त्यागाची दखलही घेतली गेली.त्यांच्या विषयी आदरयुक्त सन्मान प्रत्येकाच्या मनात असे.पण हीच गोष्ट तुम्ही जर या जनरेशनला म्हटलं की,अरे तुझ्या भावाला अमूक शिक्षण घ्यायचं आहे, तुझ्या सुविधांमध्ये किंवा शिक्षणामध्ये थोडंसं कमी केलं तर चालेल का? तर ‘ दे विल नॉट टोलरेट दिस’..ते चक्क ‘नाही’ म्हणतील.हा जो एक खूप मोठा फरक आहे दोन्ही जनरेशन मध्ये. दोन पिढ्यांमध्ये वैचारिक विसंगतीची कारणे खूप आहेत. कारण पालकांची भावनिकता ही मुलं समजून घेत नाही आणि या मुलांचं प्रॅक्टिकल थिंकिंग पालक समजून घेऊ शकत नाही. त्यामुळेच गरज आहे ती जेन- Z नी ही जी त्यांची व्यवहारिक वृत्ती ,ती कशी वापरायची, कुठे वापरायची आणि किती प्रमाणात वापरायची, ज्यायोगे त्यांना तसेच कुटुंबाला ,समाजाला त्याचा फायदा होईल.
डॉ.जयश्री सांगतात की,हळूहळू त्यांच्या शिक्षणातलं हे जे प्रेग्नेटिझम आहे हे त्यांच्या व्यवहारात येतं. मी कशाला शिकू, हे लिहून काय होणार ,आता कोण लिहितो, पैसे देखील आपण आजच्या काळात हाताळत नाही, डिजिटल पेमेंट करतो. परिणामी,तिसरी, चौथी, पाचवीच्या मुलांना हा प्रश्न असतो मी लिहू कशाला, त्यांना लिहिण्याचा भयंकर कंटाळा येत असतो.
पूर्वी नोकरी मिळाली तर आपल्या पिढीला सुरक्षित वाटत होतं की चला आता स्टेबल झालो .पण जेन- Z चं तसं नाही आहे. ही नोकरी तर सुरुवात आहे ,त्यानंतर मी आणखी चांगली नोकरी मिळवणार,या त्यांच्या जीवनदृष्टिमुळे आणखी प्रॉब्लेम येतात.मी ‘चील‘ करणार आहे. एक वर्षाची गॅप घेणार आहे. जग फिरून येणार आहे. लग्नाच्या बाबतीत सुद्धा हाच त्यांचा व्यवहारी दृष्टिकोन असतो. लग्ना संदर्भात त्यांना कमिटमेंटच करायची नाही. तिच्यापेक्षा आणखी चांगली मिळेल किंवा त्याच्यापेक्षा चांगला मिळेल हा त्यांचा शोध सुरु असतो.असं करता करता लग्नाचं वय उलटून २८,२९,३० च्या पल्याड पोहोचतं. मुल होण्याच्या संदर्भात सुद्धा जेन-Z ची खूप प्रॅक्टिकल थिंकिंग असते की जर आम्ही ‘केअर’ घेऊ शकत नाही तर कशाला उगाच मुलं जन्माला घालायची… मुलांच्या पालन-पोषणात जो वेळ द्यायचा आहे तो आम्ही देऊ शकत नाही तर कशाला कुटूंबियांच्या भरवश्यावर मुल जन्माला घालायची.. आम्ही मूल ‘अफोर्ड’ करू शकत नाही ,इतकं प्रॅक्टिकल थिंकिंग जेन-Z चं बरेचदा कुटूंबामध्ये मागच्या पिढीला पचवता येत नाही आणि बरेचदा त्यांच्यामध्ये विसंवाद ,गैरसमज आणि तणाव निर्माण होताे. त्यामुळेच या दोन्ही पिढींच्या वैचारिक आणि मानसिक दृष्टिकाेणात कुठेतरी एक ‘मध्य’ शोधता आला पाहिजे. तो आपण समजून घेतला तर त्यांना पण त्यांच्या निर्णय स्वातंत्र्यावर गदा येत नाही असं वाटेल आणि त्यांच्या निर्णय क्षमतेत त्यांना मदत होईल आणि आपण पण त्यांचा स्वीकार आणखी चांगल्या पद्धतीने करू शकू,असे डॉ.जयश्री म्हणाल्या.
याप्रसंगी एम्सच्या डॉ. पाठक यांनी जेन-Z मधील शरीरक्रियाशास्त्र उलगडून दाखवताना सांगितलं की,अनेकांना ही उत्सुकता असते की आधीच्या पिढीपेक्षा जेन-Z मध्ये शरिर रचना काही बदलली आहे का? तर याचं उत्तर ‘हो’आहे.त्या म्हणाल्या की, शरीराच्या ज्या क्रिया आहेत, चलन आहे ते जेन-Z मध्ये काही वेगळं आहेत. ती कशाप्रकारे वेगळी आहे यावार खूप संशोधन झालं आहे. कॅलिफोर्निया ,मॅक्वीन इत्यादी तसेच भारताच्या काही विद्यापीठांमध्ये यावर संशोधन झालं आहे. या संशोधनातून असं जाणवलं आहे की .जेन-Z मध्ये प्रखरतेने शरीर क्रियेमध्ये व मेंदूच्या चलनामध्ये बदल झाले आहेत.

(छायाचित्र: डॉ.मृणाल पाठक)
ही जी पिढी आहे ती पूर्णपणे ’डिजिटल’ पिढी आहे. या पिढीला सर्व काही डिजिटल करायचं असतं. लिखाण आवडत नाही ,वाचन आवडत नाही, जे काही वाचायचं ते ‘आभासी’(व्हीज्यूअली)पद्धतीनं वाचायचं .स्क्रीनवर वाचायचं. सोशल मीडिया जेन-Z च्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे. जर तुम्ही सोशल मीडियावर नाही आहात, जर तुमचा इंस्टाग्राम पेज नाही आहे किंवा तुम्ही एक्स तसेच फेसबुकवर नाही आहात तर तुम्ही जेन-Z च्या जगाच्या बाहेरच्या आहात.
जेन-Z हा सतत स्क्रीनवर असतो.सोशल मीडिया, नेटफ्लिक्स, टीव्ही इत्यादी हे सर्व इतकं जास्त त्यांच्या आयुष्यात आहे की, कंटिन्यूअल इम्पल्सस त्यांच्यावर बोंबार्डिंग करत असतं. त्यांच्या ब्रेनमध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये यामुळे एक प्रकारचं रि-वायरिंग झालेलं आहे .नवीन प्रकारचे मज्जातंतूत सेल निर्माण झाले आहे.
बहूतांशपणे असं आढळून आलं या संशोधनांमध्ये की फ्रंटल लोप जो आहे ज्याच्यामध्ये आपली पर्सनॅलिटी बनते, आपला इंटेलिजन्स असतो किंवा आपले विचार करण्याची क्षमता असते तिथेच त्यांचं असं झालंय की, ते फार ‘जलद‘झालंय.जेन-Z ला सगळं काही खूप पटापट बदल पाहिजे असतात. खूप हळुवारपणे जर आपण काही सांगायला गेलो त्यांना, थोडा वेळ घेतला तर त्यांचं अटेंशन राहत नाही. ही पिढी अतिशय हुशार आहे.इंटेलिजंट आहे. पण त्यांच्या एकाग्रतेचा स्पॅन इतका कमी झालाय की, ते एक तासाचा वर लेक्चर ऐकू शकत नाही. ४० मिनिटं झाली त्यांची चुळबुळ चालू होते. तीस मिनिटं ठीक आहे. ते संयम ठेवून असतात पण ही त्यांची चुकी नसते.त्यांचं ब्रेनच रि-वायरिंग झालं आहे. अध्यापन करीत असताना त्यांना छोटे छोटे एपिसोड्स दाखवावे लागतात. पूर्वीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ते सलग एक तास एकाग्रतेनी लेक्चर अटेंड करु शकत नाहीत. हा काळ २०-२० चा आहे.एक दिवसीय क्रीकेट मॅच कालबार्ह्य झाली आहे. या पिढीची आवड बधून पुढील काळात १०-१० देखील येऊ शकेल,असं डॉ.जयश्री म्हणाल्या.
त्या सांगतात की,जेव्हा हे अशा प्रकारचे सतत बाँर्बेडिंग म्हणजे माहितीचे स्त्राेत त्यांच्या मेंदूवर आदळत राहतात, सोशल मीडियाची दृष्यमानता,चांगल्या-वाईट माहितीचा स्फोट यामुळे सतत त्यांचा मेंदू हा माहितीच्या भडीमारामुळे स्क्रीनवर असतो.ते समजून घेणं त्यांच्यासाठीही फार कठीण होतं आणि यामुळे मानसिक नैराश्य येतं एक प्रकारचं ‘फोमो’म्हणजे भीती या पिढीमध्ये असल्याची आपल्याला दिसून पडते.
‘फियर ऑफ मिसिंग आऊट’ म्हणजे ‘फोमो’.याचा अर्थ जेन-Z आजच्या डिजिटल युगात एक प्रकारची ‘आभासी’स्पर्धा अनुभव आहेत.त्यांना सतत – सतत खूप काही, सोशल मीडियावर टाकायचं असतं. मी कुठे बसलोय. मी काय खातोय, मी काय करतो आहे. मी कोणत्या मूड मधून जात आहे.. याचा अर्थ तुम्ही सतत निरीक्षणाखाली असता. आणि हे जे‘ फियर ऑफ मिसिंग आऊट ’आहे की कोणीतरी ,आभासी जगतात सतत काहीतरी करतोय आणि जर मी काही नाही केलं तर माझ्यातच काही तरी कमतरता आहे,ही भीती पण त्यांना अतिशय एका स्पर्धात्मक स्पिरिटमध्ये नेतं आणि हे सर्व काही त्यांना मेंटल डिप्रेशन कडे घेऊन जात असतं ,असं डॉ.जयश्री सांगतात.
असं असलं तरीही ही पिढी खूप जागरूक असते की ही आपल्याला मेंटल डिप्रेशन येत आहे. आपल्याला मदतीची,उपचाराची गरज आहे. ते यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करतात ही एक चांगली बाब आहे की त्यांना माहिती आहे की आपण अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये आहोत.
याशिवाय ज्याला आपण कार्डियाक फटिक म्हणतो. जसं आपण बघतो आहे की खूप कमी वयात हृदयाघात होत आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी देखील तरुणांना हार्टअटॅक येत आहेत. अचानक हार्टअटॅक ,अचानक मृत्यू हे का होत आहे? तर फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीही नाही. सतत मानसिक तणाव आणि खाण्याच्या अतिशय वाईट सवयी. झोमॅटो आणि स्विगी हेच त्यांचे आहार झाले आहेत. पोळी-भाजी रोज कोण खाणार? आम्हाला पिझ्झा पाहिजे पास्ता पाहिजे. त्यामुळे या आहारपद्धतीत आणि जीवन पद्धतीत सुधारणा खूप गरजेचं झालं आहे. प्रथिनयुक्त आहार,नियमित व्यायाम,कोणत्याही प्रकारचा तनाव न घेणं व दररोज काही वेळ डिजिटल डिटॉक्स म्हणजे स्क्रीन-मुक्त काळ ,हे सर्व जर केलं तर ही पिढी अत्यंत हुशार होईल ,असं डॉ.जयश्री सांगतात.
याशिवाय या पिढीमध्ये दृष्टि विकार देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात.दिवस-रात्र मिळून अनेक तास स्क्रीन बघत असल्याने त्यांना डोळ्याचे विकार होतात आहे. ‘विज्युअल फटीक ’हा पण आजार आढळून येतो तसेच मस्कुलर स्केलेटन म्हणजे व्यायाम जास्त करत नाही. मान सुद्धा वाकडी व्हायला लागलेली असते,, सारखं मोबाईल सारखं लॅपटॉप अशाप्रकारे आजार जेन-Z मध्ये दिसून पडतात याची काळजी घेण्याची नितांत गरज त्यांनी प्रतिपादित केली.
याप्रसंगी डॉ.चैतन्य शेंबेकर यांनी देखील जेन- Z च्या मनोविश्वात नेमकं काय चाललं आहे याचा अतिशय सोप्या शब्दात उलगडा केला.अतिशय त्रोटक शब्दांचा वापर करणारी जेन- Z पिढी ‘बेस्ट फ्रेंड फोरेवर’साठीही ‘बी एफ एस’या अक्षरांचा वापर करते.त्यांच्यातील रिलेशनशिप किंवा सिच्युएशनशिपसाठी देखील जेन- Z ही स्पष्टपणे व्यक्त होताना दिसून पडते. कधीकधी ते म्हणतात ‘ हा बेस्ट फ्रेंड आहे पण हजबंड मटेरियल नाही ’’नेमकं हे जे या पिढीमध्ये नातेसबंधांबाबत चाललंय यावर डॉ.शेंबेकर यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केलं.

(छायाचित्र: डॉ.चैतन्य शेंबेकर जेन-Z चं मनोविश्व उलगडताना)
जेन- Z च्या मनोविश्वात आधीच्या पिढीपेक्षा खूप बदल जाणवतं याचं मुख्य कारण आहे ,एकदम बदललेला समाज,आज फ्री सोसायटी झालेली आहे .दुसरं म्हणजे ‘फ्रीडम ऑफ थॉट्स‘ आणि तिसरं म्हणजे मीडियाचा आणि सोशल मीडियाचा आपल्या समाजावर झालेला प्रभाव, या तीन मुख्य कारणांमुळे जेन- Z पिढीमध्ये नातेसबंधांमधील गुंतागुुंत वाढली असल्याचे डॉ.शेंबेकर सांगतात.
पूर्वीच्या काळी कम्युनिकेशनची साधने इतकी कमी होती की फ्रेंडशिप मेंटेन करायला आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात व्हायला कम्युनिकेशनच व्हायचं नाही आणि त्याच्यामुळे असे अनेक प्रेमी होते जे ,आपल्या मनातले विचार पण प्रकट करू शकले नाहीत आणि त्यांना आवडणा-या मुलीचं लग्न होऊन गेलं. आजकाल तर इन्स्टा वरून किंवा facebook वरनं जेन- Z चं ‘स्टेटस’ काय आहे रिलेशनशिपचं , हे तुम्हाला सगळ्यांनाच कळून जातं असं ते म्हणाले. जसं ‘सिंगल -रेडी टू मिंगल’ किंवा ‘वेरी मच इन लव ’किंवा ‘मॅरीड’ किंवा ‘इट्स कॉम्प्लिकेटेड‘ म्हणजे काय तुम्ही समजून घ्या. जेन- Z च्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना उघडपणे त्यांच्या स्टेट्सवरुन कळतात.
जेन- Z चा हा स्पष्टपणा,कोणतीही लपवाछपवी नसणे ही खूप चांगली गोष्ट आहे,असं डॉ.शेंबेकर सांगतात. कारण आमच्या लहानपणी आम्ही ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मुलींसोबत एक शब्द ही बोलता येत नव्हतं. अगदी मुले आणि मुलींचा वर्गात जाण्यासाठीचा जिना देखील वेगवेगळा होता. त्याच्यामुळे काय व्हायचं की मुली समोर आल्या की आम्ही ‘पायलट’ व्हायचो, म्हणजे आम्ही हवेत जायचो नाही तर ,आमचे पाय ‘लटलट’ कापायला लागायचे! आमच्या हाता पायाला घाम फुटायचा. आमच्या घशाला कोरड पडायची आणि मला असं वाटतं की ते काही बरोबर नाही होतं.
नंतर काय झालं की हेच सगळे प्रॉब्लेम्स कॉलेजमध्ये पण मेंटेन झाले आणि कॉलेजमध्ये पण मुलींनी कधीच आम्हाला ‘भाव’ दिला नाही आणि नेहमी आम्हाला ‘भावा’च्याच नजरेने पाहिलं.परिणामी मी अगदी लग्नं ठरेपर्यंत माझं स्टेटस ‘सिंगल- रेडी टू मिंगलच’ राहिलं.माझ्या तारुण्यात माझं जगणं राहून गेलं कारण एक भीती होती मुलींशी बोलायची. आज या मंचावर कबूल करण्यास काहीच हरकत की मला खरंच असं खूप तीव्रतेनं वाटतं की, यार मी या जेन- Z पिढीत का नाही जन्माला आलो?मला मुलींबरोबर चांगलं फिरता आलं असतं.अशी मिश्किली त्यांनी केली. आमची पिढी या मोकळेपणाला मुकली. त्या गोष्टीची मजाच वेगळी असते. तर सांगायचा उद्देश हाच आहे जेन- Z पिढी जशी आहेत तशी त्यांच्या नैसर्गिक स्वभावाप्रमाणे वागते .समजाचा दडपण ते ठेवत नाही ते काहीही लपवून ठेवत नाही आणि ती गोष्ट नक्कीच चांगली असं मला वाटतं
आता ते आपल्या पिढीसारखं ‘लोग क्या कहेंगे’ याची पर्वा न करता ‘कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना, छोडो बेकार के बातो में कही बीत ना जाये रैना’या आपल्या जुन्या मंत्राचाच त्यांच्या जीवनात उपयोग करताना दिसून पडतात. जेन-Z मधील नातेसबंधांबद्दल जर बाेलायचं झाले तर जेन-Z मध्ये मोबाईलमुळे नात्यांच्या वेगवेगळ्या छटा पाहायला मिळतात .
जेन-Z हे नात्यात असले तर मग मुलगा असो किंवा मुलगी ,नातेसंबंधात‘कुशनिंग’हा शब्द हमखास वापरला जाताे. आमच्या लहानपणी पण आमच्या कॉलेजच्या काळात पण काही मुलं असायचं की नात्याव्यतिरिक्तही त्यांची इतर मुलींशी प्रगाढ मैत्री असायची,आम्ही त्याला ‘स्टेपनी’संबोधत होतो. जेन-Z असं ही करते की उगाच कोणामध्ये तरी आवड किंवा रुची दाखवून द्यायची आणि उगाच एखादा मॅसेज टाकून द्यायचा मग मात्र, काहीच नाही बोलायचं.त्याला जेन-Z च्या भाषेत ‘ब्रेड कम्बिंग’ म्हणतात आणि काही काही लोक ‘सिच्युएशनशिप’मध्ये असतात म्हणजे ‘रिलेशनशिप बियॉण्ड फ्रेंडशिप ’म्हणजे खूप चांगली रिलेशनशिप आहे पण रोमांटिक रिलेशनशिप नाही आहे. याशिवाय ‘ऑर्बिटिंग’ म्हणजे इन्स्टावर कोणालातरी फॉलो करायचं,खूप फॉलो करायचं त्याच्या प्रत्येक पोस्टला लाईक करायचं पण बोलायचं मात्र नाही.
याशिवाय जेन-Z च्या जगात एक शब्द ‘सॉफ्ट लाँचिंग’हा शब्द पण दिसून पडतो.याचा अर्थ त्यांचं लग्न ठरलं किंवा ते प्रेमात पडले तरी सरळ-सरळ कधीही सांगत नाही. सर्वांना कोड्यात टाकणारा एखादा फोटो टाकून देतात एखादी सटल पोस्ट टाकून द्यायची,याचा अर्थ तुम्हीच शोध घेत बसा नेमकं माझ्या जीवनात काय घडतंय ते.कधी कधी जेन-Z ही प्रेमात पडले असताना अचानक ब्लॉक करून टाकतात.ते ही कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय नातं तोडून देतात याला म्हणतात ‘घोस्टींग’ यामुळे काय झालं काहीही कळतंच नाही.काही समजायला मार्गच नसतो.याविषयी करीना कपूरच उदाहरण दिलं जातं की तिने सुद्धा पोस्ट टाकूनच तिच्या जीवनातलं नातं संपवलं होतं .
याशिवाय जेन- Z कधी कधी काय करतात तर ’लव बॉम्बिंग’ .म्हणजे खूप खूप प्रेमाचा वर्षाव करतात पण असं असतं की तो प्रेमाचा वर्षाव समोरच्याला मॅन्यूपलेट(हाताळणीसाठी किंवा लबाडीसाठी) करण्यासाठी असतो. याशिवाय जेन- Z ला कधी कधी प्रेमात कोणालातरी ‘तातकळत’(आप कतार में हैं सारखं) ठेवायचं असतं.यालाच जेन- Z च्या भाषेत ‘बेंचिंग’ म्हणतात. कधीतरी आपल्याला ‘हो म्हणेल, हो म्हणेल’ .
पूर्वीची पिढीतील अनेक जण मात्र, प्रेम भंग झाल्यानंतर लग्नच करीत नव्हती.चक्क ‘देवदास’बनत होती. जेन- Z मात्र,प्रेमभंग झाल्यावरही चक्क ‘ब्रेकअप ’पार्टी सुद्धा साजरी करताना दिसून पडते आणि ब्रेकअप पार्टीनंतर ‘रिबोर्ड रिलेशनशिप’ साजरी करताना दिसते .याचा अर्थ आपली रिलेशनशिप तुटल्यानंतर देखील मी खूप खुश आहे,मला काहीही फरक पडत नाही,वगैरे दाखवण्यासाठी. मात्र,हे सगळं बोलायला ,सांगायला चांगलं वाटत असलं तरी रिलेशनशिप हा अतिशय नाजूक विषय आहे आणि या रिलेशनशिप मधील या ’लोच्याच्या’ त्यांच्या अभ्यासावर, त्यांच्या एकाग्रतेवर किंवा ते जे काही काम करत असतील त्यांच्या ध्येयावर निश्चितच दुष्परिणाम होत असला पाहिजे, कारण रिलेशनशिप अशी बाब जी सगळ्यात जास्त हाताळण्यासाठी कठीण असते .म्हणूनच जेन- Z ने याबाबतीमध्ये थोडं ’Go Slow’आणि ‘मॅच्युअर’ असायला पाहिजे असा सल्ला डॉ.शेंबेकर यांनी दिला.
याशिवाय मागच्या पिढीमध्ये ’लोक क्या कहेंगे ’ही समाजाची भीती होती त्यामुळे मनाची गुंतवणूक असली तरी देखील मित्र-मैत्रिणींना आपली ओळख ‘मानलेली बहीण’ असं करून देण्याचा प्रघात होता. नंतर कळायचं की हा तर तिचा ‘दादाभाई नवरोजी’ होता,आज जेन- Z मध्ये हे मानलेली बहीण वगैरे काही राहिलं नाही .ते डायरेक्ट ओळख करून देतात आणि त्यांचे निर्णय देखील हे ‘Yes or No ’मध्येच असतात.
आता यात आणखी एक काळजीची गोष्ट म्हणजे मी प्रसुतीतज्ज्ञ व वंध्यत्वतज्ज्ञ असल्यामुळे माझ्याकडे काही पालक जेन- Z ला पाठवतात आणि सांगतात की थोडं यांना समजावून सांग, यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहे किंवा नुकतेच लग्न झाले आहे. मात्र, माझ्याकडे हे दाम्पत्य आल्यानंतर त्यांना काही समजत नाही की त्यांना नेमकं कशासाठी आमच्याकडे पाठवलं आहे! मी त्यांच्याकडे काही प्रश्न करतो आता काही प्रेग्नेंसी प्लान वगैरे केली आहे का, सं विचारलं तर ते आपल्याला अगदी ’ब्लँक लूक’ देतात ! काय बोलतोय हा! या पिढीला खरं तर लग्नं करायची इच्छा नसते किंवा जबाबदारी घ्यायची नसते.लग्न झालं तरी मुलं बाळ होण्याची जबाबदारी घ्यायची नसते. ‘डबल इन्कम नो Kid’. कुत्रे मांजरीलाच पाळायचं, त्यांच्याशी खेळायचं ,त्यांच्यातच रमायचं ,त्यांच्यातच आनंद शोधायचा, हे खूप वाढत चाललंय .त्यामुळे फर्टिलिटी रेट हा कमी होत चालला आहे .
तुम्ही लग्न केलंय ना मग जबाबदारी का टाळता? मुलांना जन्माला घाला,त्यांची जबाबदारी घ्या. ज्या ज्या वेळेस जी-जी गोष्ट निसर्गाने आपल्याला सांगितली आहे, ती करण्यास मग ती पिढी कोणतीही असू दे, त्यांनी निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नये, मानवाला निसर्गांनी जी गोष्ट करायला सांगितली ती करावीच लागेल तिला टाळता येणार नाही,असं ठाम मत याप्रसंगी डॉ.शेंबेकर यांनी मांडले.
२००८ साली मी जेव्हा जर्मनीला गेलो होतो आणि तीन आठवडे राहीलो होतो,तिथे मला पहिल्यांदा ‘एलजीबीटीक्यू’ या समुदाया विषयी कळलं. तेव्हा मला ‘गे’, ’लेसबियन’ हे शब्द पहिल्यांदा कळले आणि हे सुद्धा कळलं की त्यांच्या घरावर वेगळ्या रंगाचे झेंडे असतात .याचा अर्थ तेथील लोकं वेगळे आहेत हे तिथल्या समाजाला देखील माहिती असतं की हे कोण आहेत !भारतात देखील या समुदायाची चर्चा येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. या समुदायाच्या लोकांचं म्हणणं आहे की हे, सगळं नैसर्गिक आहे .हीच नैसर्गिक रिलेशनशिप आहे आणि अशीच रिलेशनशिप असायला पाहिजे. एवढंच नाही तर या मुलांचे मायबाप देखील ‘एलजीबीटीक्यू’ च्या परेडमध्ये सहभागी होतान दिसून पडतात कारण त्या पालकांना हे दाखवावं लागतं की आम्ही आमच्या मुलांच्या निर्णयांच्या सोबत आहोत.
मागे आम्ही ’एलजीबीटीक्यू’ समुदायासोबत एक छोटासा संवाद साधला होता. या संवादाच्या कार्यक्रमात एक वकील होते त्यांनी या कार्यक्रमात या समुदायासाठी असलेल्या सगळ्या लीगल बाबी समजावून सांगितल्या मात्र,त्यांना जेव्हा हे विचारलं की तू तुमचं काय मत आहे ?तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की माझ्या मुलांनी या समुदायाचा भाग होऊ नये, माझी पोरं गे किंवा लेस्बीयन नाही झाले पाहिजे असं मत त्या वकीलांनी व्यक्त केलं होतं. ही भीती अनेकांच्या मनात असते. जेन- Z च्या पिढीतील हा देखील एक समुदाय ,एक प्रश्न,एक समस्या असल्याची आढळून येते.
रिलेशनशिप असो की जबाबदारीपासूनची टाळाटाळ असो, जेन- Z ने कोणत्याही गोष्टीचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ द्यायला नको आणि थोडंसं ‘स्थिर चित्त’ ठेवायला हवं , ते फार महत्त्वाचं आहे,असं डॉ.शेंबेकर म्हणाले.
डॉ.प्राजक्ता म्हणाल्या की,जेन- Z बाबत बोलण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत, त्यांतच्या खूप काही समस्या देखील डॉक्टर्स म्हणून आमच्यासमोर येत असतात. मोबाईल स्क्रीन, सोशल मीडिया हा जेन- Z नव्हे तर आपल्या देखील आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. पण फरक हा आहे की आपण पूर्णपणे डेव्हलप झाल्यानंतर या गोष्टीला सामोरे गेलो. ही पिढी डेव्हलप होतानाच एक्सप्रेस झाली मग यांचं शिक्षण असो कम्युनिकेशन असो सामाजिकरण असो किंवा एंटरटेनमेंट असो सगळं काही डिजिटल संक्रमण काळात झालं आहे.

(छायाचित्र : डॉ.प्राजक्ता कडूस्कर)
डॉ.शेंबेकरांचे वंध्यत्व,प्रसुतीकरणात तसेच स्वत:चे नामांकित रुग्णालय यामुळे जेन- Z सोबत त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात संवाद होत असतो.
’बेस्ट फ्रेंड फोरेवर’ऐवजी ‘
बी एफ एस’असं किंवा ‘
हा तर माझा बेस्ट फ्रॅण्ड आहे पण हसबंड मटेरियल नाही’ असं स्पष्टपणे व्यक्त होणा-या जेन-Z नी असे- असे शब्द निर्माण केले आहे की जे शब्दकोशात तर सापडणार नाही. त्याचा शोध
‘गुगल’वर घ्यावा लागतो. सध्या जेन- Z मध्ये सर्वाधिक प्रचलित
‘व्हाईब्स’या विषयी.शेंबेकरांना विचारलं असता,
‘व्हाईब्स’ हा शब्द जेन- Z च्या रोजच्या वापरात येईल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वापरला जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं डॉक्टर शेंबेकर म्हणाले. जेन- Z त्यांचे मूड्स,त्याच्या फिलिंग्स म्हणजे त्यांच्या भावना,आजू‘व्हाईब्स मॅचबाजूचं वातावरण म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी.त्यांच्या मनामध्ये नेमंक काय चालू आहे या सगळ्या गोष्टींसाठी ही पिढी ‘व्हाईब्स’हा शब्द हमखास वापरताना दिसते.
‘व्हाईब्स’जे असतात ती ही यंग जनरेशन कॅरी करताना दिसून पडते. जसं आय एम वायपिंग ..म्हणजे काय तर एन्जॉयिंग द मूमेंट.. किंवा ‘व्हाईब्स’चेक म्हणजे म्हणजे मूड कसा आहे हे पाहायचं .आपल्या काळातील भाषेत जर सांगायचं तर ‘हाल कैसा है जनाब का?क्या ख्याल है आप का’.या सारखं,रोमँटिक मूड आहे की नाही हे चेक जर करायचं असेल ते हमखास ’ ‘व्हाईब्स’शब्दाचा प्रयोग करतात.याशिवाय ‘कुल’व्हाईब्स, ’ यांचा ही प्रयोग होतो,आमचे व्हाईब्स खूप चांगले चालले आहे म्हणजे आमची गट्टी खूप चांगली जमली आहे ,किंवा ‘चील’व्हाईब्स म्हणजे कूल , टॅटू, स्टर्ड यातून व्यक्त होतात.‘लेफ्ट इस राईट’ याचा अर्थ मुलांनी डाव्या कानामध्ये स्टर्ड घातलं तर तो नॉर्मल आहे ,त्यांनी उजव्या कानात स्टर्ड घातलं असेल तर तो ‘गे’ आहे, दोन्ही कानांमध्ये घातले असेल तरी ते ही नॉर्मल आहे,अशी माहिती डॉ.शेंबेकर यांनी दिली.
आमची दोन्ही मुले ही जेन-Z आहेत आणि आता सून पण आली आहे. याशिवाय आमच्या हॉस्पिटलमध्ये जेन-Z पिढीचे डॉक्टर्स पण आहेत. माझ्याकडे फेलोशिपचे कोर्सेस असल्याने एम. एस असलेले गायनिक आमच्याकडे असतात ज्यांचं वय २५-२६ वगैरे असतं. यांच्यासोबत काम करताना आम्हालाही कळतं की जेन-Z च्या व्बाईस काय आहेत. हे आता मला आणि माझी पत्नी सुप्रसिद्ध भूलतत्ज्ञ डॉक्टर मनीषा शेंबेकर हिला खूप चांगल्याने कळायला लागलं आहे आणि आम्ही हे एन्जॉय पण करायला लागलो आहोत, कारण आम्ही इतक्या तरुण पिढीसोबत काम करतो आहोत आणि त्यांची जी ऊर्जा आहे ती आम्हाला देखील आनंदी ठेवते ऊर्जावान करते आणि आम्हाला पण तरुण बनवते .अनेक गोष्टी आम्हाला या पिढीकडून शिकायला मिळतात. मला पण कामाच्या ताणातून रिलीफ होण्यासाठी रिल्स बनवण्याचा व त्या फेसबुक,इन्स्टावर, युट्युब वर टाकण्याची खूप हौस आहे.पण तांत्रिक बाबीमध्ये मी जेव्हा अडतो तेव्हा ते माझी मदत करतात आणि खूप सोप्या पद्धतीने सांगतात की हे असं नाही असं करा. त्यामुळे जेन-Z च्या ब्वाईस मला खूप चांगल्यानी माहिती असल्याचे डॉ.शेंबेकर सांगतात.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेन-Z मध्ये जो शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे तो खूप नॉर्मल झालेला आहे. उदाहरणत: त्यांच्या चिंता काय आहेत याबाबत ते स्पष्ट बोलतात. बॉडी शेमिंग, कॉम्प्लेक्सशन, एन्व्हायरमेंट याविषयी पण ते भरभरून बोलतात आणि त्यांची काही ठाम मत असतात. आमच्या वेळेस असं होतं की आम्ही शालेय जीवनामध्ये एकमेकांना मोट्या, पतलू ,कल्लू, भुऱ्या अशी विशेषणे लावत होतो आणि यात आम्हाला काहीही वावगं वाटत नव्हतं पण जेन-Z या नवीन पिढीला हे योग्य वाटत नाही आणि ते आम्हाला चक्क सांगतात की तुम्ही बॉडी शेमिंग करीत आहात, आता आम्ही कधी असं जिव्हाळ्याच्या नात्यानेही मित्राला बोलायला गेलो तर मुलं सांगतात की ‘बाबा हे असं बरोबर नाही.’
याशिवाय या मुलांमध्ये आणखी एक गोष्ट खूप चांगली आहे ती म्हणजे ‘वर्क लाइफ बॅलेन्स’. हे ही पिढी खूप चांगल्याने करीत असते. ‘वर्क कार्ड पार्टी हार्ड’ असं या तरुणांचं जीवन असतं. कधी कधी मला असं वाटतं की जे लोक खूप यशस्वी असतात ,जे एक मिशन घेऊन काम करत असतात ,जे खूप झपाटलेले असतात ते लोक वर्क लाईफ बॅलन्सला महत्त्व देत नाही. त्यांच्यासमोर फक्त एक मिशन असतं आणि ते मिशन पूर्ण करण्यासाठीच ते प्रयत्न करत असतात. त्यामुळेच तुमची पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे ही प्रत्येक जनरेशनच्या मुलांनी ओळखलं पाहिजे. काही मुलांमध्ये लीडरशिप क्वालिटी असते. तुम्हाला पण मोठं व्हावं असं आतून अगदी मनातून वाटतं पण प्रत्येकाला ते साध्य होणं शक्यच नाही.तुम्ही ‘ Also Rank’ मध्ये सुद्धा येताच. जसं कुठल्याही नाटकामध्ये रंगमंचावर एकच नायक असतो मात्र पडद्या मागे देखील अनेक पात्र असतात जे तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळेच तुम्हाला मुख्य कलाकार व्हायचं आहे की पडद्यामागचे यशस्वी कलाकार हे तुम्हाला ठरवायचं आहे .फक्त तुमच्या संकल्पना या अतिशय स्पष्ट असायला पाहिजे. मग तुम्हाला जर कोणी समोर जात असेल तर त्याच्याबद्दल ईर्ष्या मनात राहायला नको.
‘ ना किसी से इर्ष्या ना किसी से होड, मेरी अपनी मंजिल मेरी अपनी दौड’,याचा अर्थ आपण आपल्या मस्त मजेत राहायचं .इन्फोसिसचे उदाहरण आपल्याला देता येईल. इन्फोसिस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते नारायण मूर्ती. मात्र ही कंपनी चार जणांनी मिळून भागीदारीत सुरू केली आहे व यशाच्या उच्चांकावर नेली असली तरी बाकीच्यांची नावे आपल्याला माहितीच नाहीये ,पण याचा अर्थ असा नाही की उर्वरित तीन भागीदारांचं परिश्रम, कर्तुत्व ,बुद्धिमत्ता ही महत्त्वाची नाही म्हणूनच नवीन पिढीने त्यांचा रोल काय असावा हे ठरवणं गरजेचं आहे.असा सल्ला डॉ.शेंबेकर देतात.
आणि शेवटी इतकंच ,की ज्या काळात आपण राहतो त्या काळानुरूपच आपण वागायला हवं, आपण जर २०२६ मध्ये आहोत तर आपल्याला २०२६ जसं चाललंय तसंच प्रत्येकाने वागायला पाहिजे यात काही वाईट नाही आहे.अनेक वर्षांपासून संथ गतीने जग चाललं होतं .मागील तिसरी आणि चौथी पिढी यांच्यामधील सामाजिक जीवनमान हे जवळपास सारखंच होतं पण अचानक जेन-Z पिढीमध्ये इंटरनेट, मोबाईल यामुळे अमुलाग्र बदल झाला.ते ही फार जलद गतीने. या बदलाला, सोबतच घेऊन ते जन्माला आले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं जीवन आपल्यापेक्षा वेगळं राहणारच आहे. त्यांना तर हे नैसर्गिक आहे …आपल्याला मात्र हे सगळं शिकावं लागत आहे आणि म्हणूनच आजचा विषय इतका रोचक झाला आहे असं डॉक्टर शेंबेकर म्हणाले.
डॉ.जयश्री म्हणाल्या की,जेन-Z च्या मानसिक आरोग्यावर देखील बरीच चर्चा या चर्चासत्रात झाली, ही एक सकारात्मक गोष्ट आहे की ते त्यांच्या हेल्थ प्रति जागरूक आहेत आणि गरज पडली तर ते त्यांच्या डॉक्टर्स सोबत बोलत देखील असतात.ते स्पष्टपणे शेअर करतात सध्या माझी मानसिक स्थिती बरोबर नाही आहे आणि मला बोलण्याची गरज आहे,हा स्पष्टपणा आणि अशी सकारात्मकता आपल्या पिढीमध्ये आढळून येत नव्हती.
या पिढीमध्ये मानसिक आरोग्याच्या बाबातीत तीन गोष्टी प्रामुख्याने आढळून येतात. एक आपण सबकॉन्शियस ट्रेस म्हणतो की कुठेतरी युद्ध सुरू आहे. प्लेनचा एक्सीडेंट होत आहे. पर्यावरणीय बदल होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. जग संपणार आहे, हे असल्या गोष्टी खूप सातत्याने त्यांच्या कानावर आदळत असतात .तेव्हा मनामध्ये एक ‘सबकॉन्शियस इनसिक्युरिटी फीलिंग ’म्हणजे त्यांच्या अचेतन मनात एक अनामिक भीती तयार होते. ती इतकी असते की घरातून बाहेर पडलेला माणूस परत येणार आहे की नाही,असं त्यांना वाटतं. त्या तुलनेत आपल्या पिढीला एवढं एक्सपोझर नव्हतं ,कारण माहितीचे इतके साधन आपल्याकडे नव्हते .आपण टीव्ही वर बातमी एकदाच पाहिली असायची.आता २४ तास एकच घटना ही वारंवार हॅमर होते .तो एक तणाव असतो, जो सोशल मीडियामुळे येतो.
याशिवाय जेन- Z आपल्याकडे काय आहे या विषयी कृतज्ञता बाळगत नसून त्यापेक्षा माझ्याकडे काय नाही आणि मी काय ‘मिस आऊट’ करतोय ही त्यांची यादी खूप मोठी असते. त्यामुळे ज्याला आपण ‘Have Not ’म्हणतो की हे माझ्याकडे नाही आहे किंवा हे माझे आई-बाबा मला देतच नाही, मुलं सांगतात की सगळ्यांकडे मोबाईल आहे तसं नसतं ,पण त्यांचा हा समाज असतो की सगळ्यांकडे मोबाईल आहे फक्त माझ्याचकडे नाहीये यामुळे देखील त्यांच्या मनात हळूहळू मानसिक तनाव निर्माण होत असतो.
आणि जेन- Z मधील तिसरी गोष्ट म्हणजे नोकरी त्यांना अगदी ४०-५० हजाराच्या वरच हवी असते .तो जरी २१ किंवा २२ वर्षाचा असला तरी तो म्हणतो वीस पंचवीस हजार रुपयात काय होतं? पण सुरुवात इथूनच होते हे ते मानत नाहीत.लहान नोकरी, लहान व्यवसायापासून ते जीवनाची सुरुवात करू शकतात, पण,ही संकल्पनाच त्यांना पटत नाही. त्यांच्या अपेक्षा फार जास्त आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन देशा बाहेरच जाणार आहे. पण आता सध्या संधी नाही आहे तरी देखील ती जी ‘गॅप’ आहे ती त्यांना भरून काढायची नसते. त्यामुळे खूप विरोधाभास आहे .एकीकडे वाटतं की ते खूप आरोग्या विषयी जागरूक आहेत, खूप डायट बघणार, व्यायाम करणार पण जाऊन जंक खाणार आणि रात्री झोपणार नाही ! जेन- Z खूप ग्लोबल आहे कुठे काय होत आहे पण आपल्या कल्चर ,कम्युनिटी आणि आपल्या मुलांशी ते ‘कनेक्ट’ नसतात आणि ते असणं खूप गरजेचं आहे,असं डॉ.जयश्री म्हणाल्या.
सरते शेवटी आपला जो धर्म असेल, समाज असेल, कुटुंब असेल याच्यातून जी सकारात्मकता मिळते ती दुसऱ्या कशानेही मिळत नाही. तो कनेक्ट त्यांचा ढासळत चालला आहे त्यामुळे पण त्यांच्यात मानसिक तणाव असलेला दिसून पडतो.
यासोबतच एक समाधानाची भावना आणि एक प्रामाणिकपणा असतो, की मी या कंपनीसाठी काम करत आहे. कंपनी मला त्याचापगार देत आहे. ‘आय एम ओके’ पण जेन- Z चं तसं नसंत,मी इथे काम करतो आहे पण मला जायचं तिकडे आहे ही सततची जी भावना आहे, त्याच्यामुळे देखील त्यांचा मानसिक तनाव वारंवार वाढत जातो. त्यांना कुठेही समाधान नाही आहे. कनेक्ट गेलेले आहे, सन्मान गेलेला आहे .भलेही ते इंटंल ऍक्च्युअल आणि नॉर्मल असतील. हुशार असतील पण संवाद गेलेला आहे त्यामुळे आपण पाहतो त्यांना भरपूर समस्या आहे. त्यामुळे हे खूपच डायनॅमिक असतात आणि जेन- Z मध्ये ‘आत्महत्या ’सारख्या घटना आपण पाहतो ,तेव्हा ते हिमालयाचं एक टोक असतं. त्यामुळे फक्त आणि फक्त त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे आणि ते फक्त कुटुंबच करू शकतं आणि आज सारखं ‘कम्युनिटी गेट-टुगेदर’ होणं खूप जास्त गरजेचं आहे. आज आपण इथे एक स्टेप घेतलेली आहे. पुन्हा असे उपक्रम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात राबवणे खूप गरजेचे आहे असे डॉ. जयश्री म्हणाल्या .
याप्रसंगी डॉ.अंभईकर यांनी देखील जेन-Z च्या आरोग्याबद्दल मग ते शारिरीक असो किंवा मानसिक, आपल्याला जागरुकता निर्माण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. मी स्वतःच पण जेन-Z चा बाप आहे.त्यामुळेच आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना ‘सल्ला’ देण्यापेक्षा मी माझे ‘अनुभव’ सांगतो. यात तुम्हीच ठरवा काय चूक आहे काय नाही,मी स्वत: संभ्रमात असल्याचे ते म्हणाले.
पहिलीच गोष्ट सांगतो की हा कार्यक्रम ठरला आणि मी माझ्या मुलीला खूप आनंदाने आणि उत्साहाने सांगितलं ,की हा असा कार्यक्रम आम्ही करतोय वगैरे. मला असं वाटलं की खूप उत्सुक होऊन काही तरी विचारेल कार्यक्रमाविषयी पण, तिने मला विचारलं ‘तुम्हाला काय करायचं जेन-Z ला डी-कोड करून? तुम्ही एक्झॅक्टली जाणून घेऊन करणार तरी काय आहे ?हा जो जेन-Z चा फॉरवर्डनेस आहे,तो या पिढीचा तो खूप कौतुकास्पद आहे की सरळ बोलायचं. मग समजावून सांगण्याची जबाबदारी माझ्यावर होती की, इतके मोठे मोठे पाहुणे येणार, इतक्या गंभीर विषयावर मत व्यक्त करणार,मग तिला थोड्याफार प्रमाणात ते पटलं.

(छायाचित्र : डॉ.अभिजित अंभईकर)
जेन-Z मध्ये शारिरिक आणि मानसिक समस्यांच्याबाबतीत प्रकर्षानं जाणवतं ते लठ्ठपणा आणि कमी वयामध्ये उच्च रक्तदाब ,मधुमेह. पण त्याच वेळी एक दुसरा स्पेक्ट्रम जेन-Z च्या मुलांमध्ये बघायला मिळतो.ते त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत ही तितकेच जागरुक असतात.अतिशय व्यायाम करणारे, न चुकता जिम मध्ये जाणार तिथलं तेच खाणार हर्बल वगैरे ,याची पण जाणीव खूप चांगल्याने ठेवणार. जेन-Z मध्ये इतकी जास्त जाणीव असते ,की एकदा एका मित्राने मला रात्री फोन करून सांगितलं की हा जेन-Z पिढीतला माझा मुलगा मला प्रोटीनचा ४५ हजार रुपयांचा डब्बा घेऊन मागत आहे .आपल्या पिढीसाठी ४५००० ही फार मोठी रक्कम असते पण नवीन पिढीला ४५ हजार खूप काही वाटत नाही !
या शिवाय डॉ.अंभईकर म्हणाले की, जेन-Z ही एक चिंताग्रस्त पिढी म्हणूनही आढळते याचं कारण सोशल मिडीयातील माहितीच्या भडीमारामुळे खूपदा या पिढीला चुकीची सुद्धा माहिती मिळत असते.
इंजीनियरिंग मधला एक ओळखीचा मुलगा मला रात्री ११.३० वाजता फोन करून सांगतो की मला ‘रेबिज’ झालेला आहे मी काय करू ?आता मला एक गंमत करण्याचीच लहर आली ,मी त्याला म्हटलं की ‘अरे काही नाही, तुझ्या सगळ्या नातेवाईकांना वगैरे बोलावून घे कारण उद्या सकाळचा सूर्य तू काय पाहणार नाहीयेस’, तुम्ही माझी गंमत करताय म्हणून त्याने म्हटलं, ‘अरे मी तुझी गंमत नाही करत आहे तूच माझी गंमत करतोय’असं मी त्याला सांगितलं. मी डॉक्टर आहे, मला तू डायग्नोसीस सांगून राहिलाय .तो म्हटला आता काय ट्रीटमेंट करु?कुठेतरी एक गुगलचं पेज त्याने वाचलं होतं,त्याच्यात काहीतरी लक्षणे त्याला जडलेल्या आजारात त्याला समान वाटत होती,झालं त्याचं डायग्नोसि की त्याला ‘रेबिज’झाला आहे.
दुसरा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला .असं झालं की हा मुलगा गेला मुंबईला नोकरीला. तीन-चार महिने सगळं चांगलं होतं .त्याच्यानंतर याला ताप आला. ताप आला तर त्याने लोकल डॉक्टरचं औषध घेतलं पण त्याचा ताप काही बरा झाला नाही. मग कोणीतरी म्हणे, कंपनीच्या डॉक्टरकडे जा. कंपनीच्या डॉक्टरचं औषध घेतलं तरी ताप गेला नाही. मग कोणीतरी म्हणे नाही ‘एमडी’ डॉक्टरकडे जा. मग एमडी डॉक्टर कडे गेला तरी पण ताप गेला नाही .मग काय झालं की, त्याची पुण्याला मावशी राहत होती. तिने सांगितलं की नाही ते सोड,तुझ्या मुंबईचे डॉक्टर ,तू ये पुण्याला माझ्या पुण्याच्या डॉक्टरला दाखवू .हा मुलगा पुण्याला गेला. पुण्याला एक डॉक्टर झाले. उपयोग झाला नाही आणखी दुसरे डॉक्टर झाले. नाही उपयोग .शेवटी वडील घाबरले ते म्हणाले ’जाऊ दे मुंबई पुणे ,नागपूरला ये’.
नागपूरला सुद्धा एका कुठल्यातरी डॉक्टरकडे ते जाऊन आले होते आणि माझा आठवा नंबर होता. त्यामुळे खूपच मोठा प्रॉब्लेम होता की आता काय करायचं तरी काय?गंमत कशी झाली की ते समोर बसले होते आणि मुलगा तिथे एक एक्झामिनेशन टेबलवर लोटला. त्यांना अशी अपेक्षा होती की ,हे डॉक्टर असं विचारतील किंवा कसा ताप येतो, काही सर्दी खोकला आहे का ,काही पोट दुखत आहे का?पण मी त्यांना विचारलं ,हा ‘गुगल’ वाला पोरगा आहे का? दोन मिनिटं तर त्यांना प्रश्नच कळला नाही .मग दोन मिनिटांनी हळूहळू मान हलवली. डॉक्टर तुमचं अगदी बरोबर आहे हा फार गुगल पाहतो .मी म्हटलं हे बघा हा पोरगा काय करतो, डॉक्टर्सचे डिस्क्रिप्शन घेतो, घरी येतो गुगलवर टॅली करतो सगळे डोस सगळे औषध स्वतः बदलतो आणि त्याच्या मनाने औषध घेतो.आता तुम्ही माझं प्रिस्कप्शन गुगल वर टॅली केलेलं मला कळलं तर मी याला हाकलून देईल, ते म्हणाले नाही नाही तो असं काहीच करणार नाही ..
त्यानंतर नॉर्मल जे काय मी डायग्नोसिस केलं असेल त्या हिशोबाने त्याला औषध दिलं आणि चार-पाच दिवसांनी तो मुलगा येऊन एकदम माझ्या पाया पडायला लागला. मी त्याला म्हटलं, अरे बाबा माझे पाय नको धरू ,तु ज्या पहिला डॉक्टरकडे गेलेा होतास ना त्यांचे जाऊन पाय जाऊन धर,त्यांनी तुला अगदी बरोबर औषधं दिली होती.आता यात जर कोणाची ही चूक असेल तर जेन-Z च्या चुकीच्या चिकीत्सक स्वभावाची. तेव्हापासून माझ्या चेंबरमध्ये मी एक बोर्ड लावला की ‘ट्रस्ट युवर डॉक्टर ही Knows बेटर दॅन युअर इंटरनेट सर्च ’.
असाच एक मजेदार किस्सा डॉ.अंभईकर यांनी जेन-Z च्या बाबतीत सांगितला.एका मुलाच्या बाबतीमध्ये त्याचे वडील सारखे मला फोन करायचे आणि मला फोनवरच सगळं विचारत होते. एकदा मी त्यांना म्हटलं की, बाबा रे एकदा तरी तुम्ही पेशंटला घेऊन या ना प्रत्येक गोष्ट तुम्ही फोनवरच मला विचाराल तर कसं काय उत्तर देणार आहे? ते म्हणाले डॉक्टर मी त्याला घेऊन येतो. तो मुलगा स्वतःच रिपोर्ट काढायचा .ते रिपोर्ट स्वतः पाहायचा. त्याचा अभ्यास करायचा. त्याचा अर्थ काढायचा, मग बापाला त्रास द्यायचा व वडील म्हणायचे की नाही असं नसतं .मग ते वडील मला फोन करायचे .म्हणजे वडिलांचे डायरेक्शन माझ्याकडे यायचं .शेवटी मग मी त्याला म्हटलं हा पोरगा तुम्हाला त्रास देतोय तर मग त्याच्या वडिलांना एकदम ती जाणीव झाली. हा आपल्याला उगाचच छळतोय.त्या मुलाच्या वडिलांनी सांगितलं ,आम्ही भिलाईला होतो, तिथं लगेच त्याला इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळाली मात्र कोविड महामारी सुरू झाली .तीन वर्ष हा कॉलेजमध्येच गेला नाही घरीच होता .त्याच्यानंतर त्याने इंजिनिअरिंगचं फायनल केलं पण ,त्याच्यानंतर माझी बदली नागपूरला झाली .नागपूरला माझ्यासोबत आला.
याला कोणीही मित्र नाही ना हा कोणाला ओळखत. कॉलेजमध्ये गेलाच नाही भिलाईला, दोन चार मित्र होते ते बदली झाल्यामुळे ती सुद्धा मैत्री सुटली .त्यामुळे दिवसभर घरीच असतो. दिवसभर काहीतरी गुगलवर बघतो आणि प्रश्न सोडवण्या ऐवजी प्रश्न निर्माण करत असतो…!
मात्र, जेन-Z मध्ये सगळ्या तापदायकच गोष्टी आहेत,असा त्याचा अर्थ होत नाही.एक तरुण मुलगा चांगल्या कंपनीत चांगल्या पोस्टवर आहे. तो माझा नियमित पेशंट आहे.एक दिवस त्याच्यासोबत साधारणपणे १९-२० वर्षाची एक मुलगी तपासण्यासाठी माझ्याकडे आली. आणि गंमत अशी आहे की ते दोघेही एका समाजाचे नाही ना एका भाषेचे आहेत. एकदा रात्री बारा साडेबारा वाजता त्या मुलीचा मला फोन आला की ,सर मला पोटात खूप दुखत आहे आणि मला तुम्हाला दाखवायला यायचं आहे. म्हटलं ठीक आहे .आता मला हे एक्स्पेक्टेड होतं की तिची आई ,तिचे वडील किंवा असं कोणीतरी सोबत ती येईल.पण ही त्या मुलासोबत आली.
मी त्यांचं जे काही रिलेशनशिप ऑब्झर्व्ह केलं ते बघून आनंदाने सांगतो ,रात्री साडेबारा वाजता दुसऱ्या मुलासोबत डॉक्टरकडे जायला तिला काहीच भीती वाटली नाही. म्हणजे एवढा विश्वास त्या मुलीचा त्या मुलावर आहे .कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या पिढीमध्ये हे जे अंडरस्टँडिंग मॅन अँड वूमन ह्याच्यामधलं जे होतं ते आपल्या पिढीमध्ये नव्हतं .हे या नवीन पिढीमध्ये जे आहे ना हा खूप पॉझिटिव्ह बदल घडलेला आहे असं मला वाटतं की कुठेही त्या मुलीला पण असं काही हे वाटलं नाही की आपल्या मित्राला म्हणावं की मला डॉक्टर कडे रात्री बारा वाजता घेऊन चल आणि किंबहुना मला असं वाटतं की विश्वास असेल तेव्हाच ती गोष्ट झाली.
याप्रसंगी बोलताना डॉ. प्राजक्ता म्हणाल्या,की जेन-Z बद्दल आज आपण बोलतोय ,पण मला असं वाटतं की डिजिटल मीडियाचे आज सगळेच त्याचे एडिक्ट झालेले आहेत. अगदी मागच्या दोन पिढ्या या देखील.इतकंच नव्हे तर आज जे बीटा जनरेशनचे आहेत,जे २०२५ मध्ये जन्मला आले ते देखील व्हॅक्सिनेशन घेताना त्यांना व्हिडिओ बघायचा असतो.महत्वाचं म्हणजे या पिढीमध्ये जे काही संशय आहेत मग ते आपल्या पारंपारिक संस्थांविषयी असो किंवा लग्नं आणि मुलांना जन्माला घालण्याविषयी असो.या सगळ्यांचा समावेश डिजिटल मध्येच होत असतो. आमच्या पिढीने फक्त ‘इलू इलू’ शिकलं होतं ही पिढी’आय एल यु ’च्या पुढे जाऊन पण आता ते ’टे लुलु ते सोलुलू’ पर्यंत पोहोचली आहे आणि हे खरंच खूप खूप समजण्यास कठीण आहे.
महत्त्वाचं म्हणजे आज डिजिटल माध्यममे हे पॉझिटिव्ह गोष्टी देत आहेत तितकच निगेटिव्ह गोष्टी सुद्धा देत आहेत. आता समजा डेजर्ट मध्ये हरवलं तरी ते ‘हॅशटॅक इन डेझर्ट’ पोस्ट करतील. जेन-Z ची आज जी डिमांड आहे रिक्वायरमेंट आहे ती फक्त आणि फक्त ‘इंटरनेट’ कनेक्शन झाली आहे.
थिंकिंग ऑफ ‘व्हेर टू गो ’पेक्षा ‘थिंकिंग ऑफ इंटरनेट’ असं झालंय. त्यांच्या गरजा बदलल्या आहेत आणि हे इतक्या जलद गतीने झाले आहे की, त्यात आपली संस्कृती ,आपली ओळख हरवते आहे का?हे बिना समजून घेता, हे बरोबर आहे ही अस्वीकार्य आहे याचा विचार न होता मोठ्या प्रमाणात ते आत्मसात केले जात आहे. यामुळे जो काही बदल झाला आहे तो आता आपण बदलू शकत नाही याचाच अर्थ आपण मागे जाऊ शकत नाही .आपल्याला आता पुढेच जावं लागणार आहे ,फक्त जेन-Z ला आपल्याला एज्युकेट करावं लागणार आहे. जर आपण म्हणतो अठरा वर्षाचे होईपर्यंत पाल्यांना गाडी चालवायला देऊ नका. आपण गाडी चालवायला देतो त्याच्या आधी त्याच्या हातात ड्रायव्हिंग लायसन्स देतो कारण कायदा आपल्याला माहिती आहे ,पण आपण आपल्या पाल्यांच्या हातात डिजिटल माध्यमे देत असताना हा विचार कधीच केला नाही.आपण जेन-Z पिढीला फोन खूप सहजतेने अवेलेबल करून दिला .त्यात कोविड-१९ ची जागतिक महामारी पण आली. त्यामुळे आपल्याच कडून थोडीशी ही चूक झाली, हे कबूल करावेच लागेल. त्यामुळे आपण त्यांना काही बोलण्यापेक्षा ज्यांच्याशी जुळवून का नाही घेऊ शकत आणि हे त्यांच्यासोबतच्या संवादातूनच शक्य आहे,असे डॉ.प्राजक्ता म्हणाल्या.
गमतीने असं म्हटलं जातं की घरात कोणीतरी शिरलंय आणि आईवर त्याने अटॅक केला पण आई चोराला सांगते बाबा रे, तुला जे काही घेऊन जायचं असेल ते घेऊन जा फक्त ते बटन बंद कर. चोर पण म्हणतो की बटनमध्ये असं काय आहे .का बरं बटन बंद करायला लावते. ती म्हणते तू जे हवं ते घेऊन जा पण ते बटन आधी बंद कर आणि तो चोर ते बटन बंद केल्यानंतर घरातले सगळे लोक फक्त एका मिनिटात आपापल्या खोलीच्या बाहेर येतात कारण ते इंटरनेटचं बटन असतं.
त्या म्हणाल्या की, अशा परिस्थितीत ही मुलं जन्माला आली, वाढतात आहेत त्यातही ते निर्भर नाहीत तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात सगळ्या गोष्टी कळत असतात .त्यांना हे ही कळलंय की ‘वर्क लाइफ बॅलेन्स काय असतं,ते आपल्यासारखं झटून काम करत राहत नाही. ते त्यांच्या मताशी खूप ठाम असतात की मी जास्त काम करणार नाही. मी स्मार्टवर्क करेल. डिजिटलमुळे मला सगळं काही अवेलेबल आहे. याच्यात चॅट जी टी पी आहे ,इतर एप्स आहेत, मी त्याच्यासाठी माझा वेळ घालवणार नाही. हे या सगळ्या गोष्टींसाठी ते अगदी स्पष्ट असतात.
परिणाम असा झाला की ही सगळी माध्यमे आपला आपले ‘सांगाती’ झाले आहे .प्रशांत दामले आपल्या नाटकात सांगतो की मोबाईल आपल्या सांगाती झालाय .परंतु याही पुढे जाऊन मोबाईल हा या पिढीचा ‘मितवा ’झालाय .मित्र,तत्त्वज्ञ आणि वाटाड्या म्हणजे मितवा. या तिन्ही गोष्टी या मुलांच्या लाईफ मध्ये म्हणजे फक्त आणि फक्त मोबाईल फोन आहे. तो आता आपण त्यांच्याकडून घेऊ तर शकत नाही. त्यामुळे आपल्यालाच काही गोष्टी आता स्वीकाराव्या लागतील. त्यांचं अवेरनेस एज्युकेशन वाढवत जायचं. असं करशील तर तो तुझा वेळ घालवतोय एवढेच सांगणं आपल्या हातात असतं .तू youtube वर इन्फ्लुयर्स पाहतोय तुझा वेळ घालवतोय ते त्यांची एन्जॉयमेंट करतात आहे आणि ते तुझ्या वेळेतून कमाई देखील करीत आहेत.असं आपल्याला वारंवार थोड्याफार प्रमाणात बोलत राहायचं आहे.
‘सॉफ्ट हॅमरिंग’ ज्याला आपण म्हणतो हेच करू शकतो. खूप जास्त इंटरफिअर केलं तर ते चढून बसणार. रिल आणि रियल लाईफ बॅलन्स काय आहे, तुमच्या डिजिटल एक्स माध्यमातील नकारात्मक सकारात्मक गोष्टी काय आहे ,याचा विचार करायला शिका आणि या सोबतच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण आज इतके ॲप्स अवेलेबल आहे की ते ॲप्स देखील त्यांना फिट ठेवण्यास मदत करत असतात ही पण एक चांगली गोष्ट आहे ,असं डॉ.प्राजक्ता सांगतात.या सगळ्या गोष्टी सोबत- सोबत असल्याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी समजून घ्या आणि सकारात्मकता आत्मसात करण्यास शिका ,नकारात्मक सोडा डिजिटल मीडिया आणि आरोग्यामध्ये’ एज्युकेशन’ हीच एक गुरुकिल्ली आहे असं डॉक्टर प्राजक्ता सांगतात.
डॉ प्राजक्ता म्हणाल्या, तरुण पिढीच्या ‘वाईब्स’ आपल्याला कळाल्या पण या फक्त कळून पुरेसं नाही, तर हे आपण कम्युनिकेट कसं करू शकतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे .त्यांच्या संवाद फक्त व्हिज्युअल, डिजिटल असतो.त्यामुळे त्यांचा वादही होत नाही आणि संवादही होत नाही, मात्र आपण त्यांच्यासोबत कम्युनिकेट कसं होऊ शकतो याबद्दल डॉक्टर अंभईकर म्हणाले की ,नवीन पिढी सोबत आपलं कम्यूनिकेशन हे कमी झालं आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल. पूर्वीच्या काळी आपल्या घरी खूप पाहुणे येत होते. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण आपल्या गावाला नातेवाईकांमध्ये जात होतो .रात्री आपण पत्त्यांची सत्ती लावणे वगैरे खेळत बसायचो, कुल्फी आईस्क्रीमचा एखाद्या कार्यक्रम असायचा. अंगणात सर्वांनी मिळून झोपायचं. चांदण्या बघत धमाल करायची ,पण आता तसं काही राहिलं नाही. आता असं जगणं दिसून पडत नाही. आता आई- वडील आणि फक्त एक मूल किंवा जास्तीत जास्त दोन मुलं असं कुटुंबाचं स्वरूप झालं आहे.
आताची कुटुंब म्हणजे ‘न्यूक्लिअर’ फॅमिली झाली आहे आणि त्यातल्या त्यात घर जर मोठं असेल तर हे कुटुंबाचे सदस्य हे देखील आपापल्या खोलीत आपापल्या डिवाइस सोबतच मग्न असतात. प्रत्येक जण आपापली गॅझेट घेऊन बसला आहे तर कम्युनिकेशन कसं होणार? त्यामुळेच कुटुंबात काही काही छोटे -छोटे नियम पाळायला हरकत नाही. निदान रात्रीचे जेवण हे सगळ्यांनी आपापले गॅजेट्स आपापल्या खोलीत ठेवून डायनिंग टेबलवर एकत्रित येऊन घ्यावं. याने किमान संवाद साधता येतो आणि एकमेकांच्या आयुष्यातले प्रश्न, समस्या, विचार यांचं आदान प्रदान देखील चांगल्या रीतीने होतं.
पण मुळात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, असलं कम्युनिकेशन असलंच पाहिजे हा मुद्दा . याचं कारण आपण मागच्या पिढी सोबत वाढलो आहोत. ते संस्कार काही आपल्या वरचे गेलेले नाही म्हणजे माझं कुटुंब, माझे आई-वडील, माझी मुले, माझे नातेवाईक,माझे शेजारी सगळ्यांशी माझे संबंध चांगले राहिले पाहिजे हाच आपला पिढीचा प्रयत्न राहिला आहे,आपल्या विचारसरणीत आपला समाज आणि देश सुद्धा समाविष्ट आहे. आपल्या पिढीमध्ये ती सर्व आपली जबाबदारी होती आणि आहे, आणि मला असं वाटतं की हे सगळं आपल्या मुलांनी देखील फॉलो केलं पाहिजे. त्याच्यासाठी हे कम्युनिकेशन आवश्यक आहे पण यासाठी आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल. पण बोलायचं कसं ?कारण ते आयपॅड घेऊनच आपल्यासमोर बसलेले असतात .आई-वडील दोघेही बाजूला बसून त्याच्या तोंडाकडे फक्त पाहू शकतात.
याशिवाय कम्युनिकेशनचे अनेक प्रकार आहेत.भावंडांमधल आपापसातलं कम्युनिकेशन, त्यांचं मित्रांमध्ये असणार कम्युनिकेशन्स, त्यांच्या शिक्षकांशी असणार कम्युनिकेशन, त्यांच्या आई-वडिलांशी असणारं कम्युनिकेशन. शेजारी असणा-यांशी असलेलं कम्युनिकेशन हे देखील महत्वाचं असल्याचं सांगून , डिजिटल मीडिया आणि हे सगळं काही असलं त्यांच्या जीवनात तरी देखील जेन- Z ही खूप समजदार पिढी आहे, मला असं वाटतं प्रत्येकाने आपापल्या परीने थोडे थोडे उपाय केले पाहिजे,असं डॉ.अंभईकर म्हणाले.
यावर डॉक्टर प्राजक्ता म्हणाला की या पिढीला
‘फोमो’ वरनं ‘जोमो’ वर शिफ्ट करायला शिकता आलं पाहिजे म्हणजे
‘फियर ऑफ मिसिंग वर्क ’पासून
‘जॉय ऑफ मिसिंग वर्क’ पर्यंत येता आलं पाहिजे.
याप्रसंगी बोलताना,डॉक्टर पाठक म्हणाल्या की माझ्या तीस वर्षाच्या वैद्यकीय अध्यापनामध्ये मिलेनियर स्टुडंट्स पण होते, जेन – Z पण आहे आणि आता माझी जी नातवंडे आहे जी जेन- अल्फा पण आहे .त्यामुळे सगळ्यांना शिकवण्याचा एक अनुभव मला मिळाला आहे .जे जेन-Y मेडिकल स्टूडेंट्स होते ते अतिशय हुशार होते .ते विद्यार्थी सेल्फ मोटिवेटेड होते. स्वतः शिकायचे.हा माझा जीएमसीचा(मेडीकल कॉलेज नागपूर) अनुभव आहे की, अटेंडन्स जरी कमी असला तरी एकदम टॉपची मुलं होती. सगळ्यांना खूपच चांगले गुण मिळायचे. ते आजही तसंच आहे. जी एम सी च्या मुलांना अटेंडन्स अनिवार्य कधीही नव्हता, पण ते कसं शिकायचे? मुलं खूप हुशार होती आणि प्रॅक्टिकलला अगदी बरोबर हजर राहायची.
प्रॅक्टिकल शिकून जायचे, थेअरीला बंक मारायचे. मात्र एम्सच्या विद्यार्थ्यांना अटेंडन्स कंपल्सरी केल्या आहेत.त्यांना ७५ टक्के अटेंडन्स असायलाच हवं नाहीतर परीक्षेला बसू दिल जात नाही. त्यामुळे ही अनिवार्यता जेन- Z साठी अतिशय जीवघेणी ठरत आहे. कशी येतात ती वर्गात? आपापल्या गॅझेट्ससोबत शेवटच्या बेंचवर बसतात.वर्गातील माग ेबसणारा अटेंडंट आम्हाला सांगतात की तुमचा अमुक अमुक स्टुडन्ट आयपॅड वर चित्रपट सिरीयल किंवा काहीतरी बघत बसलेला असतो.
ते फक्त येतात .ही पिढी जे लेक्चर मॅडम किंवा सर शिकवतात तेच कुठनं तरी युट्युब वरनं काढायचं आणि ऐकायचं आणि ठरवतात हे बरोबर आहे का? हे असं आहे का? मग यांचं कशाला ऐकायचं.. ही जी पद्धत झालेली आहे की पुस्तक वाचायची नाही ,वर्गामध्ये लक्ष द्यायचं नाही, जे काही अभ्यासायचं ते सगळं युट्युब वर,कारण अनेक लेक्चरर त्यांचे फीचर्स youtube वर टाकतात .हा बिजनेस पण रेवेन्यू देणारा आहे.पण हे लेक्चर बघून ही मुलं डॉक्टरकी शिकतात! यांनी काय होतं तर परत तणाव.. परत झोप येत नाही.. पुन्हा तेच डिजिटल स्क्रीन बघत राहणार ..त्यामुळे हे सगळे इश्यू जे आहे, ते अभ्यासात पण जाणवतं की सारखं डिजिटलच्या सानिध्यात राहुन, ते इतके डिजिटल -डिजिटल -डिजिटल च्या सानिध्यात राहतात की जेव्हा ते परीक्षेत लिहायला बसतात तेव्हा मात्र मुळीच लिहू शकत नाही !अक्षरं इतकं वाईट असतं, डिस्क्रिप्टिव्ह पावर त्यांच्यात नसतं आणि ते काहीच लिहू शकत नाही, हा एक ड्रॉबॅक आहे, पण यामध्ये एक पॉझिटिव्ह बाब ही आहे की हीच मुलं प्रॅक्टिकल मध्ये खूप चांगला परफॉर्म देतात. प्रॅक्टिकल एक्स्पेक्ट त्यांच्याकडे खूप चांगली आहे.ते खूप चांगलं बोलतात आणि ते शिकण्यामध्ये खूप हुशार असतात त्यामुळे काहीतरी आशा आहे की कुठेतरी ही पिढी सुधारू शकते .असा अनुभव एम्सच्या माजी संस्थापक संचालिका डॉ.पाठक यांनी सांगितला.
जेन-Z च्या वर्क कल्चर विषयी बोलताना,त्या म्हणाल्या की,आम्ही जेव्हा एम्समध्ये जॉईन झालो. सुरुवात झाली होती जी एम सी मध्ये दोन खोल्यांमध्ये एम्सची. सकाळी जेव्हा आम्ही यायचो तेव्हा आधी टेबल पुसावा लागत होता मला. तिथे अटेंडंट पण नव्हता, एकच संगणक होता, तो ही क्लर्क सुद्धा वापरायचा. अशा तऱ्हेने आम्ही एम्सची सुरूवात केली. जीएमसीच्या लायब्ररी मधून.
हळूहळू ते वाढत गेलं, सुविधा मिळाल्या, खोल्या मिळाल्या, चांगला क्लिनिंग स्टाफ मिळाला ,एसी खोल्या, पण आता जे जेन-Z रुजू झालेले आहेत ते या एम्सची तुलना, इतर एम्ससोबत करतात की अरे तिथे तर अमुक मिळतं, प्रत्येकाला लॅपटॉप मिळतो, इथं असं कसं? हे कसं एम्स आहे? जेन-Z ची ही वृत्ती झाली आहे की आल्या आल्या मला एक लाख रुपये पगार मिळायला हवा, तेवढाच मिळालाच पाहिजे ,त्याच्याहून कमी आम्ही सर्वाईव पण नाही करू शकत. आम्हाला एसी पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला अमुक सुविधा पाहिजे, ही जी मागणी वाढली आहे ते बघून जेव्हा आम्ही एम्सची सुरुवात सांगतो, अडचणी सांगतो ,कशी सुरुवात केली तेव्हा ते म्हणतात की ‘तुम्ही केली असेल आम्ही नाही करू शकत, आम्हालाही बेसिक रिक्वायरमेंट आहेत आम्हाला हे पाहिजेच नाही तर आम्ही सोडून दुसऱ्या एम्स मध्ये जातो काही फरक नाही पडत’,
दोन पिढींमध्ये हा मला प्राध्यापक डॉक्टर म्हणून हा फरक प्रकर्षाने जाणवतो असं डॉ.पाठक म्हणाल्या. पण ही पिढी इतकी शक्तिमान आहे की ती पूर्ण जगाचा कायापालट करू शकते असं मला वाटतं. ते करिअर ओरिएंटेड आहे .त्यांना जर आपण एक ॲक्शन प्लॅन दिला तर ते बरोबर सगळं नीट करतात. त्यांना जरा रोट लर्निंग दिला की हे तुम्हाला शिकलंच पाहिजे, आलंच पाहिजे, केलंच पाहिजे, एक तास माझं लेक्चर ऐकून असं -असं लिहिलंच पाहिजे ,ते त्यांना आवडत नाही.
त्यांना जर आपण प्रॅक्टिकल व्ह्यूज सांगितले, की हे तुम्हाला पेशंट आल्यानंतर कशाप्रकारे उपयोगी पडणार आहे, तुम्ही याचा उपयोग पुढे खऱ्या आयुष्यात करणार आहात आणि मग समस्या सोडवणार आहात रुग्णांची, हे जर त्यांना समजू शकलो आपण तरच ते लक्षपूर्वक आपल्याला ऐकत असतात.लेक्चर सुद्धा अगदी लक्षपूर्वक ऐकतील, बसतील, त्याच्यात सहभाग घेतील, आम्ही मुलांना बरेच सेमिनार देतो. काही इंटर ऍक्टिव्ह सेशन्स देतो. ते इतके मस्त आयडियाज घेऊन येतात की आम्हालाही आश्चर्य वाटतं , इतकं अनुभवी असताना आम्हाला ते सुचूही शकत नाही .
अशाप्रकारे ही पिढी अतिशय इंटर ऍक्टिव्हल, गोल ओरिएंटेड ,शॉर्ट स्पॅनमध्ये चांगला रिझल्ट देणारी असून,आमची पण एक जबाबदारी आहे की त्यांना योग्य प्रकारे शिकवून, त्यांचे सर्व गुण योग्य प्रकारे बाहेर आणण्याची आमच्यावर जबाबदारी असते,असे डॉ.पाठक म्हणाल्या.
यावेळी, जेन- Z चं प्रतिनिधत्व करणारा ईशांत म्हणाला की, सरर्फिंग मध्ये आमचा जास्त वेळ जातो. चॉईस पॅरॅलिसिस जाणवतो. दोन तासाची मूवी असेल तर एक तास तर सरर्फिंग मध्ये जातो,‘वाईब्स’ विषय बोलताना तो म्हणाला की वाईब्स हे सक्सेसफुल मेंटल हेल्थ इश्यूसाठी चांगलं आहे. आजच्या शोच्या वाईब्स मस्त होत्या.आपल्या एम्समधील मेडीकलच्या आयुष्याविषयी बोलताना ईशांत म्हणाला की,जसं की कडूस्कर मॅडमने ,पाठक मॅडमनी सांगितलं,आम्ही मेडिकल स्टूडेंट फेमस आणि बदनाम दोन्ही आहोत.

(इशांत कडूस्कर जेन- Z चं प्रतिनिधित्व करताना)
ईशांत म्हणाला की,आजचा हा उपक्रम म्हणजे जजिंगला सोडून ,समजून घेण्यासाठी सुरुवात आहे. जेन-Z डिसिजन पटकन घेते, खूप जास्त विचार केला जात नाही. टेक नेकचं एक उदाहरण चांगलं होतं मी पण कॉलेजला जातो तर सगळे लोक आयपॅड वर असतात. अभ्यास पण डिजिटलाईझ झाला आहे,हो मागे बसून आयपॅडवर चित्रपट सिरीयल बघितल्या जातात आणि यात जेन-Z ला काहीही वावगं वाटत नाही.
………………………..
[