Advertisements

नागपूर,३० ऑक्टोबर २०२५:तामिळनाडू येथील जॅाय अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वैभव मेश्राम ह्यांचा अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी त्यांच्या नागपूर प्रवासात रवीभवन येथे शॅाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कुलगुरू डॉ. वैभव मेश्राम यांनी एनआयटी कुरुक्षेत्र येथून अभियांत्रिकी पदवी घेतली. आयआयटी मुंबई येथून एम.टेक तर बिट्स पिलानी येथून पीएच.डी केलेली आहे.
सर्वसाधारण परिवारातून येऊन त्यांनी मोठ्या पदावर झेप घेतली, त्यांचे कतृत्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करीत ॲड. मेश्राम यांनी त्यांचे आयोगातर्फे अभिनंदन केले.
………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
