
तीन महिन्यापर्यंत संपूर्ण पगार काढण्यास सभागृहाची अनुमती

नागपूर: सफाई कामगारांच्या कामगिरीवरी लक्ष् ठेवण्यासाठी त्यांच्या हातावर जीपीएस घड्याळ बांधण्याची व्यवस्था ३० डिसेंबर २०१७ पासून नागपूर महापालिकेने स्वीकारली होती मात्र या तांत्रिक व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. सफाई कामगारांनी २६ दिवस काम करुन देखील त्यांच्या नावासमोर ‘शून्य’ उपस्थिती दाखवण्यात आली व त्यांचे पगार ही काढण्यात आले नाही यामुळे सफाई कामगारांमध्ये पराकोटीचा राेष होता,मंगळवारी महाल,नगर भवनात महापालिकेची विशेष सभा पार पडली,यावेळी हजारो सफाई कामगारांनी सभागृहासमोर धरणे आंदोलन केले.
घड्याळीची व्यवस्था पूर्णपणे बंद करावी व पूर्वीप्रमाणेच हजेरी पटानुसार पगार काढावे अशी मागणी त्यांनी रेटून धरली. मोठ्या प्रमाणात नारेबाजी करण्यात आली. प्रशासन विरोधात पराकोटीचा विरोध सफाई कामगारांमध्ये आढळून आला. मागणी मान्य झाल्याशिवाय धरणे-आंदोलन संपवणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. सभागृहात सत्ता पक्ष् नेते संदीप जोशी यांनी या आंदोलनाची दखल घेत भारतीय सुदर्शन समाजाचा विराट मोर्चा सभागृहाच्या दारावर धडकला असल्याचे सांगितले. घड्याळ बंद करणे ही त्यांची मागणी नसून त्यांच्या कामानुसार त्यांचा पगार निघत नाही हे दूर्देव असल्याचे ते म्हणाले. शहरात स्वच्छता होत नाही म्हणून घड्याळीची व्यवस्था महापालिकेने स्वीकारली होती मात्र या योजनेचा उद्देश्य हा प्रामाणिक सफाई कामगारांवर अन्याय व्हावा असा नव्हता. जीपीएस घड्याळ प्रणालीमुळे स्वच्छता अभियानात गुण ही मिळत असतात, एवढ्या चांगल्या प्रणालीमध्ये दोष निर्माण झाल्यास कोण दोषी आहे? यासाठी आरोग्य समितीच्या अध्यक्ष् तेखाली चौकशी समिती गठीत करण्याची मागणी त्यांनी केली. समितीत अति.आयुक्त हे सदस्य राहतील. पुढील तीन महिन्यात ३१ ऑक्टोबर पूर्वी समितीचा अहवाल पटलावर ठेवण्याचे आदेश द्यावे अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. समितीचा अहवाल येईपर्यंत तीन महिने सफाई कामगारांचा पूर्ण पगार पूर्वीप्रमाणेच रजिस्टर नोंदणीवरुन देण्यात यावी अशी मागणी केली.
माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांनी जीपीएस घड्याळी पुरवठा करणारी कंपनी ही केंद्र शासनाने निर्देशित केली असल्याचे सांगितले. ही कंपनी कुठे आहे? कंपनीचे अधिकारी वा तंत्रज्ञ कोण आहेत? ते कुठे बसतात? घड्याळीत बिघाड झाला असल्यास कोणत्या यंत्रणेला संपर्क साधावा? याची प्रशासनाने माहिती देण्याची मागणी केली. जयंत दांडेगांवकर हे उपायुक्त असताना त्यांनी पुढाकार घेऊन ही केंद्रिय शासकीय यंत्रणा स्वीकारली असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यांची बदली झाल्यावर शेख साहेब काही काळ हे पद सांभाळत होते मात्र लगेच त्यांच्याकडे कॅफोची जबाबदारी आली असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या बाबीकडेेेे लक्ष् देण्यास सक्ष् म अधिकारी नसल्याचे उत्तर प्रशासनाने दिले.
यावर ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आक्ष्ेप नोंदवत प्रशासनाकडे कॅफो नाही का?चाललंय काय? अशी विचारणा केली. घड्याळ असली पाहिजे,शिस्त लागली पाहिजे मात्र शिस्तीचा अर्थ ‘शोषण’ नसल्याचे प्रवीण दटके म्हणाले. जे बाहेर आंदोलन करतात आहेत ते ही म्हणतात घड्याळ पाहिजे मात्र २६ दिवस काम करुन पगार एक दिवसाचा निघत असेल किवा उपस्थिती शून्य दाखवत असेल तर हे शोषणच आहे, शासकीय कंपनीला काम दिले मात्र यासाठी कोणतेही टेंडर काढण्यात आले नाही याकडे त्यांनी महापौरांचे लक्ष् वेधले. या कपंनीसोबत झालेल्या कराराची माहिती सभागृहाला देण्यात यावी अशी मागणी दटके यांनी केली. या कंपनीसोबत सात वर्षांचा म्हणजे ८४ दिवसांचा करार झाला असून महापालिका किवा कंपनीने मुदतीपूर्वी करार मोडल्यास ४२ महिन्यांची संपूर्ण रक्कम करार मोडणाऱ्याला द्यावी लागेल अशी माहिती प्रशासनाने दिली. सुनील अग्रवाल यांनी देखील कंपनीच्या जबाबदारीचे काय? कराराचे मुद्दे काय? असा प्रश्न उपस्थित केला. प्रशासननो यावर कंपनीसोबत ८ हजार यूनिटचा करार झाल्याचे सांगितले. जास्त यूनिट लागले तर मनपाला जास्त पैसा द्यावा लागेल, कमी यूनिट लागले तरी ८ हजार यूनिटचे पैसे कंपनीला देण्यात येईल अशी माहिती दिली. गणवीर सारखे अधिकारी निलंबित करण्यात आले, पण कंत्राटदारांचे काम सुरु होते, कनकची एक ही गाडी मनपाच्या नावाची नाही, मनपाने उत्तम वकीलांमार्फत चौकशी करावी अशी विनंती दटके यांनी केली.
दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या स्वत:च्या प्रभागात सफाई कामगार हा दररोज कामावर रुजू असताना उपस्थिती शून्य काढण्यात आली असल्याची माहिती सभागृहात दिली. घड्याळ असायला हवी मात्र जबाबदारीही निश्चित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. यावर महापौर नंदा जिचकार यांनी आरोग्य समितीच्या सभापतीच्या नेतृत्वात अति.आयुक्तांनी उपरोक्त सर्व बाबींचा मागोवा घेऊन अहवाल पटलावर ठेवण्याचे निर्देश दिले. एकंदरीत सफाई कामगारांची घड्याळ व त्यांचे आंदोलन यावर सत्तापक्ष् व प्रशासन यांच्यातच वाद जुंपला होता.
…………………………..




आमचे चॅनल subscribe करा
