

राष्ट्रीय महामार्ग निर्मितीबरोबरच जलसमृद्धी केली साध्य
नागपूर: बुलढाणा जिल्ह्यात पथदर्शी व नाविन्यपूर्ण काम झाले. बुलढाण्यात राष्ट्रीय महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धन व जलसमृद्धीचे ध्येय साधता आले,यासाठी राज्य सरकारला एक पैसा ही खर्च करावा लागला नाही. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग विकासाचे १२ प्रकल्प ज्याची एकूण लांबी ४९१ किमी आहे ते मंजूर करण्यात आले होते.महामार्ग विकासाबरोबरच जलसंवर्धनाचे काम व त्यातून निर्मित बहुआयामी जलसमृद्धीचे कार्य साध्य करण्यात आले,या कामासाठी कोणत्याही भू-संपादनाची गरज पडली नाही, कुणाचेही विस्थापन झाले नाही,राज्य सरकारला एक पैसा ही खर्च करावा लागला नाही उलट या कामासाठी राज्य सरकारला १८७ कोटींचा खर्च आला असता,आम्ही हे काम फूकट करुन दिले, नदी खाेलीकरणामुळे पूराचा धोका टळला, अतिशय दुष्काळी क्ष्ेत्रात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली, पाण्याचे संवर्धन झाले,हा उपक्रम आता देशपातळीवर राबवणे गरजेचे आहे कारण जलसमृद्धीचं काम हे मानवतेचं काम असल्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे म्हणाले.
ते रविवार दि. २४ नोव्हेंबर रोजी रेशिम बाग मैदानात सुरु असलेल्या ॲग्रो व्हीजन मेळाव्यातील डोममध्ये आयोजित पत्र-परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विकासासोबतच जलसमृद्धि आणि जलसंवर्धन आदर्श अभिसरणातून खास ‘बुलढाणा पॅटर्न’या विषयावर विशेष कार्यशाळा तसेच बाळासाहेब ठेंग यांचे विशेष सादरीकरण व पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की माझ्या कारकीर्दीत आजवर वरळी-सी-फेस,हाय-वे इ. अनेक कामे पार पडली मात्र ‘बुलढाणा पॅटर्न’हे काम मी माझ्या कारकीर्दीतील सर्वाधिक चांगले काम मानतो. बुलढाणा जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. येथील पिके आणि पशुधन तर सोडा माणसे देखील पाण्यावाचून तडफडत होती.मात्र येथे राष्ट्रीय महामार्ग विकसाचे १२ प्रकल्प ज्याची एकूण लांबी ४९१ किमी अाहे ते मंजूर करण्यात आले. यावर केलेल्या कल्पक कार्यातून बुलढाणा जिल्ह्यात विनाखर्चाने सुमारे ५५.१० लाख घनमिटर म्हणजेच ५५१० टी.सी.एम. अतिरिक्त भूपृष्ठीय जलसाठे निर्माण झाले. या समृद्ध जलसाठ्यांमुळे सुमारे १०००० टी.सी.एम. एवढे वार्षिक योगदान भूजलसाठ्यांसाठी पुनर्भरणातून होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील या जलसमृद्धीच्या कार्यक्ष्ेत्रात सुमारे १५२ गावे लाभान्वित झाली आहेत व यामुळे सुमारे ४,८३ ००० लोकसंख्येला लाभ मिळणार आहे. या बहुआयामी व नाविण्यपूर्ण कामातून बुलढाणा जिल्ह्यात सुमारे २२८०० विहीरींचे पुनर्भरण झाले. या जलसमद्धीतून संरक्ष्ति व नियमित सिंचनाला भरपूर पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्ष्ेत्रात १५२८ हेक्टर्सने वाढ होणार आहे. संरक्ष्ति सिंचनाचे लाभ भूजलाच्या ११०००० सहस्त्र घनमिटर(टीसीएम) साठ्याला गृहीत धरल्यास सुमारे ५००० हेक्टर क्ष्ेत्राला संरक्ष्ति सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच या कामामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ८१ पाणी पुरवठा योजनांच्या विहीरिचे पूर्नभरण होऊन ही गावे आता टँकरमुक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनदायी व बहुआयामी जलसमृद्धीच्या बुलढाणा पॅटर्नचे अनुकरण महाराष्ट्राच्या इतर भागात काही प्रमाणात झाले आहे. गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रात जे राष्ट्रीय महामार्ग विकासाचे ६० प्रकल्प हाती घेण्यात आले होते त्यातून ४१९ स्थानांवर व जलस्त्रोतांवर जलसंवर्धन व भूजल पुनर्भरण कार्य हे साकार झाले आहे. या बहुमोल कार्यातून या राज्यात १२६ लाख घनमिटर म्हणजे (१२६०५ टी.सी.एम) पाण्याचा अतिरिक्त साठा निर्माण झाला आहे. ज्यातून सुमारे २५००० टी.सी.एम पाण्याचे योगदान दरवर्षी भूजल साठ्यांना मिळणार असून भूजलाच्या समृद्ध साठ्यांमुळे सुमारे १२००० हेक्टर क्ष्ेत्राला सरंक्ष्ति सिंचन मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. हा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितपणे पाठबळ देणारा आहे. कारण बहुतांशी भागात पावसाचे पाणी हा पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. ते साठविणे, त्याचे संवर्धन करणे यातून समृद्ध भूपृष्ठीय जलसाठे व भूजल साठे निर्मित करण्याचे मोलाचे कार्य महामार्ग विकासाबरोबरच होत आहेत.
ग्रामीण भागांसाठी जीवनदायी ठरलेल्या या बहुआयामी कार्याच्या शेकडो यशोगाथा साकार झाल्या आहेत. विनाखर्चात झालेल्या या प्रचंड व परिणामकारक जलसमृद्धी कार्याचे अनुकरण भविष्यात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य व देशात इतर राज्यातही करण्याचा निर्धार असून भविष्यात याबाबत नियोजन व कार्य व्यापक प्रमाणात करण्याचा संकल्प करण्यात आला असून ‘जल हेच जीवन-गावाचे पाणी गावाला-गाव शिवाराला’या तत्वावर आधारित कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोलाची मदत हे सूत्र या बहूमोल कार्याकरीता अंगिकारले असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
केवळ बुलढाणा किवा महाराष्ट्रातच नाही तर देशपातळीवरील ही एक ‘लोकचळवळच’ बनली पाहीजे असे सांगून त्यांनी प्रचार व प्रसार माध्यमांना ही लोकचळवळ देशपातळीवर पोहोचवण्याची विनंती त्यांनी केली. वाहीन्यांनी या कामाला योग्य ती प्रसिद्धी दिल्यास देशात पाण्याची समस्याच राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण आभाळच फाटले आहे,आम्हाला आमच्या मर्यादाही माहिती आहे मात्र सर्वांनी मिळून एकाच दिशेने कार्य केल्यास देशातील पाण्याची,सिंचनाची समस्या ही कायमची संपुष्टात येऊन देशातील एक ही शेतकरी हा आत्महत्या करणार नाही,असे ते म्हणाले. सदर पथदर्शी कार्याला साकार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, तात्कालीन अधीक्ष् क अभियंता बाळासाहेब ठेंग, राष्ट्रीय महामार्गाचे सर्व कार्यकारी अभियंते, कंत्राटदार तसेच बुलढाणा जिल्ह्याचे तात्कालीन जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे गौरवद्गार त्यांनी काढले. या प्रकल्पाचे सादरीकरण व पुस्तिका नव्हे तर ‘जलसमृद्धी गाथा’ तयार करताना स्थापत्य अभियंता माधव कोटस्थाने,दत्ता जामदार यांचीही मदत लाभली. याप्रसंगी माधव कोटस्थाने यांचा सत्कार गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला.
नुकतेच मी पुटुपूर्तीला सत्यसाईबाबा यांच्या जयंतीनिमित्त जाऊन आलो.देश-विदेशातील दोन लाखांपेक्ष्ा जास्त भाविक तेथे जमले होते. या ठिकाणी अद्यावत असे रुग्णालया बांधण्यात आले असून जगभरातील लाखो रुग्ण या रुग्णालयातून मोफत उपचार घेत असतात तर जगभरातील निष्णात डॉक्टर्स हे देखील मोफत आपली सेवा देतात. मात्र या ही ठिकाणी पाण्याचे दूर्भिक्ष् असून बुलढाणा पॅटर्न राबल्यास या ही ठिकाणची पाण्याची समस्या ही कायमची संपेल. म्हणूनच या कार्याचा प्रसार देशभरात होणे गरजेचे असल्याचे गडकरी हे म्हणाले. अख्ख्या देशात याची प्रसिद्धी झाली तर सिंचनाच्या क्ष्ेत्रात एक क्रांतीकारक बदल घडून येईल. देशातील एक ही शेतकरी आत्महत्या करणार नाही.हे काम मानवतेचं असून याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्याचे आवाहन यावेळी गडकरी यांनी केले.
वाशिमच्या जिल्हाधिकारी यांचे सहकार्य मिळत नसल्याची खंत-
ज्याप्रमाणे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांनी तातडीने या प्रकल्पाला सहकार्य केले,शासकीय मंजूरी प्रदान केली वाशिमच्या जिल्हाधिकारी यांनी अद्यापही मंजूरी दिली नसल्याची खंत खूद केंद्रिय मंत्री गडकरी यांनी व्यक्त करताच उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. मूजोर नौकरशाहीचे अनेक किस्से हे जनता-जनतार्दन रोजच बघतात ,भोगतात आणि ऐकतात मात्र खूद केंद्रिय मंत्र्यांच्या प्रस्तावालाच चक्क केर्याची टाेपली दाखवणारे हे बहाद्दर जिल्हाधिकारी कोण याची चांगलीच चर्चा रंगली होती. कमिशनखोरी, रॉयल्टी बुडणे इ. कारणांमुळेच वाशिमच्या जिल्हाधिकारी यांनी या लोकापयोगी कामाला मंजूरी दिली नसल्याचे म्हटले जाते.




आमचे चॅनल subscribe करा
