

नागपूर,ता. २९ सप्टेंबर: उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी १९ वर्षीय एका दलित कन्येवर गँगेरेप झाला. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तो छेडखानीचा! यानंतर हत्येचा प्रयत्न व शेवटी आज ती हे जग सोडून गेल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला.दिल्लीच्या सफदरजगं रुग्णालयात तिने या क्रूर आणि निर्दयी जगाचा अगदी निर्भयासारखाच निरोप घेतला.
तिच्यासोबत क्रोर्याची पराकाष्ठा करणा-यांनी एकानंतर एक तिच्यासोबत आधीतर आपली विकृत वासना तर शमवलीच मात्र तिने कुठे वाच्यता करु नये म्हणून तिची जीभ कापून टाकली…!ती चालून आपल्या घरापर्यंत जाऊ नये म्हणून तिच्या मणक्याचे हाड मोडून टाकले. एवढ्या क्रोर्यानंतरही ती जिवंत राहण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देत राहीली. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तो फक्त ‘छेडखानी’चा!
या घटनेनंतर तब्बल ९ दिवसांनी तिला रुग्णालयात शुद्ध आली मात्र जीभ कापली असल्यामुळे तिला गुदरलेला प्रसंग सांगता ही नाही आला.तिने इशा-यानेच तिच्यासोबत घडलेली घटना बयाण घेण्यासाठी आलेल्या सीओला १९ सप्टेंबररोजी अलीगढच्या जेएन मेडीकल कॉलेजमध्ये भरती असताना सांगितली.तेव्हाच तिची प्रकृती ही अतिशय गंभीर होती.अखेर २१ सप्टेंबर रोजी तिचे बयाण नोंदवण्यात आले. दोन पानेभरुन तिच्यावर गुदरलेला प्रसंग या सीओने नोंदवला. तिच्या गावातीलच चार दबंग तरुणांनी तिच्यासोबत हे अघोरी कृत्य केले. बलात्कारानंतर तिला आधी अलीगढच्या जेएन मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले होते.यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंगमध्ये नेण्यात आले.
राजकारण तापताच शेवटी उत्तर प्रदेशची पोलीस एक्शनमध्ये आली.आणि त्यांनी गावातील चार दंबग संदीप,लवकुश,रामू आणि रवि नावाच्या ४ तरुणांना अटक केली. हाथरस पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे संदीप नावाच्या दंबगाला पोलीसांनी १४ ता.ला अटक केली होती.या घटनेला अनेक दिवस लोटल्यानंतर रामू आण लवकुश यांना अटक करण्यात आली. चौथा आरोपी रवि याला अटक करण्यासाठी दहावा दिवस उजाडावा लागला,२६ सप्टेंबरला या चौथ्या आरोपीला हाथरसच्या पोलिसांनी अटक करुन कारागृहात पाठवले.
हाथरसच्या चांदपा भागात १४ सप्टेंबर रोजी या चारही दबंग तरुणांनी या १९ वर्षीय दलित तरुणीसोबत बाज-याच्या शेतात गँगरेप केला.एवढ्या क्रूर गुन्ह्याची नोंद मात्र बलात्कार किवा हत्येचा प्रयत्न या कलम न लावता फक्त छेडछाडच्या कलमा लावण्यात आल्या!यानंतर हत्येचा प्रयत्नेअंतर्गत कलम ३०७ लावण्यात आली.भीम आर्मी आणि बहूजन पक्ष्ाच्या मायावती यांनी या घटनेवर रणकंदन केले असता आता उत्तरप्रदेशात या घटनेवर चांगलेच राजकारण तापले आहे.
नागपूरातही गँगरेप!
नागपूरातही जरीपटका भागात दहाव्या वर्गात शिकणा-या एका १५ वर्षीय तरुणीसोबत ४ तरुणांनी गॅगेरेप केल्याची घटना तब्बल एका महिन्यापूर्वी घडली मात्र हाथरस घटनेप्रमाणेच गुन्हा आता दाखल झाला.तब्बल एक महिना महाराष्ट्राच्या उपराजधानीत ही घटना समोर आली नाही. या तरुणीला वडील नाहीत तर तिच्या आईला ती एकुलती एक लेक आहे.बलात्कार हा कोणत्याही स्त्रीच्या जिवनावर गुदरलेला अभिशाप आहे.यामुळेच गुन्हा दाखल करण्यासाठी गरजेचं असलेलं मानिसिक धैर्य या माय-लेकीला मिळवण्यास एका महिन्याचा अवधी लागला असावा.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत घटनेचा तपास करण्यात येत असून आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरु झाली असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा योग्य तपास करुन आरोपींच्या विरुद्ध कडक कारवाई करु,असे त्यांनी सांगितले. याविषयी विस्तृत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला तसेच कालच गुन्हा दाखल झाला असून हे संवेदनशील प्रकरण असून याविषयी अधिक बोलणे उचित होणार नसल्याचे ते म्हणाले.घटना ही संवेदनशील असल्यामुळे त्या विषयी देखील त्यांनी अधिक बोलणे टाळले.
निर्भयासारखा नको हैदराबादसारखा न्याय हवा-
आज या घटनेविषयी संपूर्ण सोशल मिडीया व वाहीन्यांवर आक्रोश व्यक्त करताना निर्भयासोबत क्रोर्याची पराकाष्ठा करणा-यांना तब्बल ८ वर्षे जिवंत राहण्याची संधी मिळाली मात्र हैदराबादमधील तरुणीसोबत घडलेल्या घटनेत आठ तासात न्याय मिळाला,परिणामी बलात्कारासारख्या घटनेत आरोपींना न्याय हक्क नाकारुन सरळ गोळ्या घालून यमसदनी पाठवा,असा तीव्र संताप नेटक-यांमध्ये उमटला.
सर्वाधिक संताप त्यांचा पोलीस विभागावर होता यानंतर अश्या घटनांमध्ये राजकारण करणा-यांवर होता.उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी तर निवडणूकीत केलेल्या भाषणात ’बलात्कार करणारे तरुण हे शेवटी नादानच असतात,बेटो से गलती हो जाती है’ आमची सरकार आली तर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात फसलेल्या तरुणांना कारागृहातून बाहेर काढू,असे आश्वासन देऊन मोकळे झाले होते,त्यांच्या या वक्तव्यावर देशभर बरीच टिका झाल्यानंतर त्यांनी ’माझ्या म्हणण्याचा हा उद्देश्य नव्हता’अशी माघार घेतली होती.
मात्र बलात्कारासारख्या स्त्रीच्या अस्मितेवरच घाव घालणा-या घटनांकडे आता तरी संवेदनशीलपणेच बघण्याची गरज असून बलात्कारित तरुणी ही दलित आहे,की सर्वण आहे की मराठा आहे की कठुआतील काश्मिरी आहे, या पलीकडे संवैधानिक कायद्याप्रमाणेच अश्या नराधमांच्या मुसक्या आवळून फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना शिक्ष्ा ही झालीच पाहिजे व त्यासाठी पोलीस विभागालाच आणखी जास्त संवदेनशील होण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया आज सोशल मिडीयावर चांगल्याच उमटल्या.




आमचे चॅनल subscribe करा
