

तात्या टोपे नगरातून निघाली मुख्यमंत्र्यांची प्रचार पदयात्रा
नागपूर १४ ऑक्टोबर: अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नागपुरात भाजपच्या प्रचारतोफा दणाणून कडाडत आहेत. प्रचार रणधुमाळीच्या याच ओळीत दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्रातून भाजपच्या तिकीटावर निवडणुकीच्या फडात उतरलेले उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचाराचा वेग चांगलाच वाढला आहे. या अनुशंगाने दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्राचा भाग असलेल्या तात्या टोपे नगर येथून सोमवारी सकाळी भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली होती.
याचे नेतृत्व महापौर नंदाताई जिचकार यांनी केले. तर प्रचार प्रमुख संदीप जोशी या वेळेस प्रमुखतेने उपस्थित होते. या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि फडणवीस यांचे समर्थक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, शहर महापौर नंदा जिचकार यासुद्धा पदयात्रेत सहभागी झाल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला होता. कार्यकर्ते ‘जय नरेंद्र, जय देवेंद्र’ आणि ‘अब की बार, फिर सें भाजप सरकार’ अशा घोषणा देत मार्गक्रमण करत होते. ही प्रचार पदयात्रा आनंद नगर, देव नगर, अत्रे ले आऊट, धनगरपुरा, कोतवाल नगर आणि प्रतापनगर परिसरातून फिरली.

या दरम्यान जोशी आणि जिचकार या दोघांनी नागरिकांशी संवाद साधून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील ५ वर्षांत केलेल्या विकासकामांचा दाखला दिला. त्यांनी अल्पावधीतच नागपुरचा चेहरा-मोहरा बदलविला. नागरिकांना याची जाणीव असून ते फडणवीस यांना पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान करतील, असा विश्वास संदीप जोशी यांनी व्यक्त केला. स्थानिक नागरिकांनी पदयात्रेचे पुष्पवर्षावाने स्वागत केले. तर काही माता-भगिनींनी पदयात्रेत सहभागी पदाधिकाऱ्यांची आरती ओवाळून त्यांना भाजपच्या महाविजयासाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांनी तर जोशी आणि जिचकार यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या कार्यावर आपण समाधानी असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री फडणीस यांच्या समर्थनार्थ निघालेल्या या पदयात्रेत नगरसेवक दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू, माजी नगरसेवक गिरीश देशमुख, माजी नगरसेवक गोपाल बोहरे, परेश जोशी, अनुसूया गुप्ता, तुषार ठावरे, शंतनु येरपुड़े, रवि कुलकर्णी, माधुरी इंदूरकर, आशीष भिड़े, प्रदीप चौधरी, नितीन महाजन यांसह शेकडोच्या संख्येने भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते.




आमचे चॅनल subscribe करा
