फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजयताळा भागातील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या कामावर विश्वास

जयताळा भागातील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या कामावर विश्वास

नागपूर १६ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अवघे ६ दिवस शिल्लक राहिले असल्याने प्रत्येक राजकीय पक्षातर्फे मतदारांशी जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा  प्रयत्न केला जात आहे. याच पाश्र्वभूमीवर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार क्षेत्राचे उमेदवार आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार पदयात्रेच्या माध्यमातून संंबंधित मतदार क्षेत्रातील जवळपास सर्वच वस्त्यांंना भेटी देणे सुरू केले आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांचे समर्थक नागरिक यांनी बुधवारी जयताळा भागातून प्रचार पदयात्रेला सुरुवात केली. जनसंपर्कादरम्यान नागरिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ ‘देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र’ अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या कामावर विश्वास दर्शविला

शहर मनपाचे सत्तापक्ष पुढारी संदीप जोशी आणि भाजपचे वरिष्ठ पुढारी  मुन्ना यादव या दोघांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आली होती. जयताळा येथील शेवटच्या बस स्टॉपपासून पदयात्रेची सुरुवात झाली.  दरम्यान नागरिकांच्या भेटी घेत ही पदयात्रा रमाबाई नगर, जयताळा जुनी वस्ती, पूजा ले-आउट, राधेश्याम नगर, पक्कीडे ले आउट, दादाजी नगर, एकात्मता नगर, परिसरातून फिरली.  ज्येष्ठ नागरिकांनी जोशी आणि यादव यांच्याशी संपर्क साधताना देवेंद्र हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.

                       मुख्यमंत्र्यांची पदयात्रा वस्तीमधून फिरली तेव्हा माता-भगिनींचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. यावेळी भगिनींनी भाजप पदाधिकाऱ्यांची आरती ओवाळून त्यांना आशीर्वाद दिला. देवेंद्र हे आपल्याला मोठ्या भावाप्रमाणे आहेत, असे मत भगिनींनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे भावी मुख्यमंत्री राहणार असून त्यांच्या प्रयत्नातून नागपूर देशातील पहिल्या क्रमांकाची स्मार्ट सिटी होईल, असे मत युवकांनी प्रचार पदयात्रेशी केलेल्या संपर्कादरम्यान व्यक्त केले.

शिवनगाव येथे पदयात्रेचा शेवट झाला. जयताळा परिसरातून बुधवारी सकाळी काढण्यात आलेल्या पदयात्रेत नगरसेवक किशोर वानख़ेडे, परेंद्र पटले,हेमंत झोड़, सुबोध देलगावकर, मदन आरसी, राजू वानखेड़े, विवेक बापट, दत्तू भुसारी, विजय राऊत, आशीष पाठक, गणेश लक्षणे, अंकित वानखेड़े, विजू कारंडे, सागर आगलावे, शिव कटरे, राकेश रोकड़े, शुभम पारधी, मयूर सहारे, जीतू पाल, गोल्डी नितनवरे, कानफाडे यांसह शेकडोच्या संख्येने महिला कार्यकर्ता आणि फडणवीस समर्थक सहभागी झाले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या