युएलसीच्या जागेवरील झोपडपट्टी हटवली: बुद्ध विहाराचीही ३० बाय ३० फूटांची जागा जबरीने हडपली: काही तासात लावले टिनांचे शेड:▪
-भाजपचा नेता मुन्ना यादव यांची करामत:काेणाचा आर्शिवाद?
▪केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोरील आणखी एक अब्जाेवधीचा भूखंड घोटाळा!
▪-फडणवीसांचा निधी पाण्यात : विरोधी पक्ष नेते असताना झोपडपट्टी केली सुविधायुक्त नंतर भाजप नेत्यानेच झोपडपट्टीच उठवली!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,२७ जून २०२४: शहरातील मोकळ्या जागांचा ‘शोध’ आणि ते भूखंड नियमात बसवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवानिवृत्त शासकीय अधिका-यांची ‘फौजच ’कुण्या नेत्याचा दिमतीला असल्यावर काय घडतं?याचे आणखी एक उदाहरण म्हणजे रॅडीसन ब्ल्यूच्या विरुद्ध,रस्त्याच्या पलीकडील(नरेंद्र नगरकडे जाणा-या उड्डान पूलाजवळील)अर्बन लँड सिलिंगची(युएलसी) अरबो रुपयांची जागा, एकाच नंबरच्या खसरा क्रमांकाआड फेरफार करुन लाटण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एकच खसरा क्रमांक असतानाही त्यात दुरुस्ती करुन ते वैध भासवण्यात आले.अंदाजे सव्वा लाख चौ. फुट जागेवर वयवसायिक भाजी मार्केटचा डाव आहे. तर मेट्रो स्टेशन जवळून जाणाऱ्या रोडच्या बाजूला आता पंचतारांकित हॉटेलनिर्माण होणार असल्याचा दावा याच जागेला लागून असणा-या पंचदिप नगर मधील रहीवाश्यांनी खास ‘सत्ताधीश’कडे केला.
खामला ते नरेंद्र नगर उड्डाण पूल आहे. या पुला लगत १.५० हेक्टर अशी मोक्याच्या जागा आहे. तिची किंमत हजार-दीडहजार कोटीच्या घरात जाईल.इतकंच नव्हे तर पंचदिप नगरमधील भीम ज्योती बुद्ध विहाराच्या मागे असलेली तीस बाय तीस फूटांची जागा होती.ती गेल्या अनेक दशकांपासून बुद्ध विहाराच्या अन्नदानासाठी व आंबेडकरी अनुयायांच्या भोजनासाठी वापरल्या जात होती. त्या जागेवरही अतिक्रमण केले. टिनांचे शेड टाकून, बुद्ध विहारापासून पुढे गेलेले १० इलेक्ट्रीक खांबे तोडले. झाडे मूळासकट उपडून त्यावर राजकीय कब्जा करण्याची घटना समोर आली आहे. त्या जागेवर २०१५ पासून या ठिकाणी टिनाचे शेड लावले. त्या जागेवर भाजी मार्केट उभारणार आहेत. तर जयप्रकाश मेट्रो स्टेशन ते पंचदीप नगर पर्यंतच्या मोकळ्या जागेवर लवकरच पंचतारांकित हॉटेलची निर्मिती होणार आहे असा दावा,पंचदीप नगरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठोंबरे यांनी केला. अर्बन लॅड सिलिंगच्या अशा किमान दहा जागा भूमाफिया टोळीने हडपल्या. त्यात या दोन जागांचा समावेश आहे.
एकिकडे जयप्रकाश मेट्रो स्टेशन आहे. दुसरीकडे रेल्वे मार्ग आहे. मधल्या जागेत पंचदीप नगर आहे. तिथे बंगले आहेत. बंगल्यांच्या ओळीमध्ये भीम ज्योती बुध्द विहार आहे. बंगले आणि विहाराच्या पाठीमागे युएलसीची मोकऴी जागा होती. त्यावर १९९० मध्ये झोपडपट्टी वसली. पन्नासांवर कुटूंबांना छत मिळाले. कॉंग्रेस सरकारने सरकारी जागेवरील झोपडपट्ट्या नियमित केल्या. झोपडपट्टीत रस्ते, नळ आले. बोअरवेल झाली. झोपडपट्टीवासी मोलमजुरी करून निर्धास्त जगत होते. त्या मोक्याच्या वस्तीवर भू-माफियाची नजर पडली. एका नंबरचे दोन खसरे होते. खसरा नंबर ३३ बटे३५\१.
एका खस-याचा खरेदी विक्री व्यवहार झाला. त्याच्या चर्तुसिमा अशा होत्या. पूर्वेस लक्ष्मण बोरकुटे यांचे शेत,पश्चिमेस आजाद हिंद सोसायटीची जागा,उत्तरेस रस्ता आणि दक्षिणेस आर्डिन्स फॅक्ट्रीची रेल्वे लाईन आहे. या जागेचे विक्री पत्र १६ मे १९८८ साली करण्यात आले. दुसरा भूखंड १.५० हेक्टर असून दोन भूखंडात सुमारे हजार फुटाचे अंतर आहे.
पहिल्या भूखंडावर बंगले झाले. त्या सभोवताल मजबूत सुरक्षा भिंत बांधण्यात आली. दुस-या भूखंडावर झोपडपट्टी वसली.अन् बाकी जागा मोकळी होती. या जागेवर भूमाफियांची नजर पडली. या टोळीने दुस-या खस-याची जागा बळकावण्याचे षडयंत्र रचले . त्यासाठी उपनिबंधक कार्यालयाकडे दुरूस्ती रजिस्ट्री अर्ज केला.ही जागा १٠50 हेक्टर जागा आहे. त्यात वेगळ्या चर्तूसिमा दाखविल्या. दुरूस्ती रजिस्ट्रीचा अर्ज केला. महत्वाचे म्हणजे हा अर्ज तब्बल २५ वर्षानंतर केला गेला….. !
एका खस-याचा खरेदी विक्री व्यवहार झाला. त्याच्या चर्तुसिमा अशा आहेत. पूर्वेस लक्ष्मण बोरकुटे यांचे शेत,पश्चिमेस आजाद हिंद सोसायटीची जागा,उत्तरेस रस्ता आणि दक्षिणेस रेल्वे लाईन आहे. या जागेचे विक्री पत्र १६ मे १९८९ साली करण्यात आले. दुसरा भूखंड अडीच एकराचा . दोन भूखंडात सुमारे चारशे फुटाचे अंतर आहे.
त्यासाठी जुनी रेल्वे लाईन काढली. त्या ठिकाणी नरेंद्रनगर उड्डाण पूल बांधले. या बदलाने झोपडपट्टी असलेल्या खसरा नंबरच्या दक्षिणेला मनिषनगरातून जाणारी मोठी रेल्वे लाईन आली. हा बदल भूमाफियासाठी खास तयार करून दिलेली संधी ठरली.या टोळीच्या मदतीला कांचनगंगा डेव्हलपर्स लि. कंपनी आली. तिने साम, दाम, दंड,भेद अंमलात आणला. त्यातून भूखंडाचा श्रीखंड झाला. अशा पध्दतीने दुसरा भूखंड लाटला. उपनिबंधक, तलाटी, युएलसी अधिकारांच्या संगनमताने हा प्रकार घडला. दुरूस्ती रजिस्ट्री दुस-या भूखंडावर होऊ शकत नाही. दुरूस्ती मुळ भूखंड रजिस्ट्रीतच करता येते,हा महसूली नियम आहे. दुसऱ्या भूखंडासाठी वेगळी स्वतंत्र रजिस्ट्री लावावी लागते.येथे मात्र शासकीय चमत्कार घडवून आणण्यात आला…! ती रजिस्ट्री टाळून भूमाफिया टोळीने सरकारी तिजोरीचेही खुल्या दिलाने नुकसान केले.एकाच्या मोबदल्यात दोन भूखंड लाटले. महसुल खात्यातील हा अफलातून प्रकार होय. ‘दुरूस्ती रजिस्ट्री’ हा प्रकारच गैर आहे. तरी अधिका-यांच्या संगनमताने हा प्रकार घडला. अर्थात यात मोठा आर्थिक व्यवहार झाला. त्या यंत्रणेनेच या ठिकाणची झोपडपट्टी हटविण्यात हातभार लावला.
(छायाचित्र: पूलाच्या पलीकडील,गडकरी निवासाच्या लेनमधील हेच ते भुखंड…. पूलाच्या अलीकडे आणि पलीकडे..दोन भूखंडात सुमारे चारशे फुटाचे अंतर..मूळ भूखंडा ऐवजी साधण्यात आलेले दुरुस्ती रजिस्ट्रीचे गौडबंगाल…!)
थोडक्यात शेतीची ही जागा मूळ मालक बाेरकुटे यांनी १९८९ साली आजाद हिंद हाऊसिंग सोसायटीच्या नावे रजिस्ट्री करुन दिली.दुरुस्ती पत्र २४ सप्टेंबर १९९१ मध्ये झाले.यानंतर २०१४ मध्ये आजाद हिंद हाऊसिंग सोसायटीने ही जागा कांचनगंगा डेव्हलपर्सला विकली.त्यावेळी देखील एकच खसरा क्रमांकावर या दोन्ही जागा होत्या.कांचनगंगाने ही जागा घेतल्यानंतर अचानक नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासला जाग आली आणि त्यांनी झोपडपट्टीधारकांना मूळ कागदपत्रांसह कार्यालयात बोलावले!सरकारी आदेश बघून झोपडपट्टीधारकांच्या मनात धडकी भरली त्यांनी त्याच भागात राहणारे भीम ज्योती बुध्द विहार समितीचे अध्यक्ष प्रकाश ठोंबरे यांच्याकडे धाव घेतली.ठोंबरे यांनी कायदेशीर पाऊल टाकताच,या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या नोटीस मागे घेतल्या.यानंतर ‘बाय हूक’ काम झाले नसल्याने ’बाय क्रूक’चा आधार घेण्यात आला.२०१५ साली झोपडपट्टीवासियांनी ठोंबरे यांच्या नेतृत्वात सत्र न्यायालयात धाव घेतली मात्र,त्यांची याचिका खारिज झाली!
२०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले होते ‘योगायोगाने’ अब्जोवधीच्या भूखंडाचा (गैर)व्यहार ही पूर्ण झाला होता.यानंतर भाजपचे नेते मुन्ना यादव यांच्या भावाने गुंडगर्दीतून येथील झोपडपट्टीवासीयांना धमकावणे सुरु केले.हत्याराचा देखील धाक दाखविण्यात आल्याची माहिती ठोंबरे देतात.परिणामी,झोपडपट्टीधारक हे पुन्हा ठोंबरे यांच्याकडे गेले.ठाेंबरे यांनी झोपडपट्टीधारकांसोबत मुन्ना यादव याचे घर गाठले.त्यावेळी बुद्ध विहारामध्ये या प्रश्नावर सभा घेण्याचे ठरले.मे महिन्यात बुद्ध जयंतीच्या दिवशी सभेत किमान १५ लाख रुपये प्रत्येकी देण्याची मागणी करण्यात आली.मुन्ना यादव यांच्याकडे ६ कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती ऐकिव आहे,असे येथील रहीवाशी सांगतात. जवळपास ५० झोपडपट्टीधारकांना १० लाख प्रत्येकी देण्यात आले व त्याच दिवशी,अगदी त्याच वेळी, आहे त्या कपड्यानिशी त्यांच्या झोपडया रिकाम्या करण्यात आल्या! त्यांचे सामान त्यांना हव्या त्या ठिकाणी पोहोचवण्याची ही व्यवस्था करण्यात आली व तातडीने मोठमोठ्या टिनाची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु झाले.ऐन बुद्ध जयंतीचा दिवस ही ‘बाहूबलींनी ‘झोपडपट्टीवासियांना साजरा करु दिला नाही कारण…१० लाख रुपये प्रत्येकी मोजून देण्यात आले होते!पैशांसमोर नीती-अनीती सारख्या गोष्टी गैरलागू ठरतात!
२ ५० झोपडपट्टीधारकांना १० लाख प्रत्येकी देण्यात आले व त्याच दिवशी,अगदी त्याच वेळी, आहे त्या कपड्यानिशी त्यांच्या झोपडया रिकाम्या करण्यात आल्या! त्यांचे सामान त्यांना हव्या त्या ठिकाणी पोहोचवण्याची ही व्यवस्था करण्यात आली व तातडीने मोठमोठ्या टिनाची संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरु झाले.ऐन बुद्ध जयंतीचा दिवस ही ‘बाहूबलींनी ‘झोपडपट्टीवासियांना साजरा करु दिला नाही कारण…१० लाख रुपये प्रत्येकी मोजून देण्यात आले होते!पैशांसमोर नीती-अनीती सारख्या गोष्टी गैरलागू ठरतात!
याच वेळी बुद्ध विहाराच्या मागच्या बाजूची अंदाजे ३० बाय ३० फूटांची जागा जी अनेक दशकांपासून विहार अन्नदानासाठी वापरत होती त्या जागेवर देखील टिना ठोकण्यात आल्या.विहाराला पाणी पुरवठा करणारे नळ,विजेचे खांब उखडून फेकण्यात आले.ठोंबरे यांनी या मोगलाई कृतीचा विरोध करीत पोलिस ठाणे गाठले.पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.दूपारपर्यंत पोलिस होते तोपर्यंत काम थांबले,पोलिस हटताच संपूर्ण परिसर टिनाने बंदिस्त करण्यात आला!ठोंबरे यांनी महावितरणला देखील तक्रार केली मात्र,सरकारी वीजेचे खांब उखडून फेकण्यात आले,अनेक हिरव्यागार झाडांचा बळी घेण्यात आला तरी ‘बाहूबलींच्या’या कृती पुढे महावितरण आणि मनपाचा उद्यान विभाग मूग गिळून गप्प बसले कारण….केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे!
या टोळीने यानंतर नागपुरात अशा अनेक रजिस्ट्री केल्याचे ऐकीवात आहे. त्या सर्व प्रकारांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी ठोंबरे यांनी केली आहे. सरकारी जमिनी बेभाव लाटणारी नागपूरी भूमाफिया टोळी (आपल्या आकांसोबत)आता मुंबईत सक्रिय असल्याची माहिती येथील काही रहीवाशी देतात. या टोळीने हा भूखंड लाटल्यानंतर त्याची परस्पर विक्री केली. ही सरकारी जमीन असून तिचा सार्वजनिक उपयोगासाठीच वापर करता येतो.सरकारी जमीनीचा या शहरात कोणीच वाली नाही आहे का?असा बोचरा सवाल ठोंबरे करतात.
या जमीनीचा वापर सार्वजनिक कामासाठीच होत असल्याचे दाखविण्यासाठी तात्पुरते स्पोर्ट अँकेडमी उभारण्यात आले आहे. हा केवळ देखावा आहे. प्रकरण थंडावले की व्यवसायिक मोठे बांधकाम उभारण्यात येईल. तर मेट्रो स्टेशनजवळ पंचतारांकित हॉटलची योजना आहे.यात अडसर ठरणारी काही घरे अद्याप मार्गात असून त्यांना देखील सरकारी ‘नोटीस’ आल्या असल्याची माहिती तेथील रहीवासी देतात!
क्रीडापटूंची लुबाडणूक..!
महत्वाचे म्हणजे सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर खासगी स्पोट्स कॉम्पलेक्स उभारण्यात आले असून क्रीडापटूंकडून प्रति दोन व चार तासांचे अडीच हजार ते साढे चार हजार रुपये उकळण्यात येतात!
ही खासगी क्रीडा संस्था नेमकी कोणाची असून हा बक्कळ पैसा नेमका कोणाच्या खिशात जात आहे?असा प्रश्न पंचदिप नगरचे जागरुक रहीवासी विचारत आहेत.या परिसरात राहणा-या भाजपच्या एका कार्यकर्त्याने येथील युएलसी,रेल्वे आणि झोपडपट्टीच्या जागेची समस्या घेऊन एका मोठ्या नेत्याकडे गेले असता,या जागेची ‘किंमत’त्यांना कळली,असे येथील रहीवासी सांगतात.यानंतर आमच्या मागे नोटीसींचा ससेमिरा लागला۔
एकीकडे मेट्रोसिटी झालेल्या नागपूरात मोकळे भूखंड,मैदाने ही मोठ्या प्रमाणात गायब होत असून क्रीडापटूंना खेळायला मैदाने उपलब्ध नाहीत.असे असताना मोकळ्या सार्वजनिक भूखंडावर अनाधिकृतपणे स्पोट्स कॉम्पलेक्स उभारुन त्यातूनही बक्कळ कमाईचा जबरदस्त फंडा हा सामान्य नागरिकांना संताप आणणाराच आहे.महत्वाचे म्हणजे हा सगळा गैरकारभार नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या रॅडीसन ब्ल्यू जवळील निवासस्थानासमोरच घडत असून ते या भूखंडाच्या गैरव्यवहाराविषयी अनभिज्ञ कसे?असा सवाल आता नागपूरकर नागरिक करत आहे.
मनपाचा नालाच केला गायब!
शहरात सिमेंट-काँक्रिटचे रस्ते निर्माण झाल्यावर तसेही पावसाचे पाणी वाहून नेणारे शहरातील लहान-मोठे नाले हे गायब झाले आहेत त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी तुंबण्याची समस्या ही नवीन
नाही मात्र,पंचदीप नगर,अभिनव कॉलनीच्या रहीवाश्यांना पावसाळ्यात एक-एक आठवडा पाण्यातच राहण्याची सवय झाली असल्याचे उपरोधिक विधान आरबीआय बँकेतून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठोंबरे करतात.कोकाकोला फॅक्टरीतील संपूर्ण सांडपाणी याच मोठ्या नाल्यातून एकेकाळी वाहून जात होते.नाल्याच्या एका बाजूला बुद्ध विहार तर दूस-या बाजूला झोपडपट्टी होती.भू-माफियांनी टिना लावल्यानंतर संपूर्ण नालाच बुजवून टाकला.या ठिकाणी एका इमारतीत जे कोचिंग क्लास सुरु आहे त्यांनी नाल्यावरच बांधकाम करुन नालाच नामशेष केला.आरबीआयच्याच एका सेवानिवृत्त अधिका-यांने घराचे बांधकाम करताना लांबी आणि रुंदी धरुन १० हजार चौ.फू.युएलसीची जागा अतिक्रमण करुन स्वत:च्या हद्दीत घेतली!याच घराच्या भिंतीला लागून भू-माफियांनी टिनाचे शेड उभारलेले दिसून पडतंय.
मनपाचा नालाच केला गायब!
शहरात सिमेंट-काँक्रिटचे रस्ते निर्माण झाल्यावर तसेही पावसाचे पाणी वाहून नेणारे शहरातील लहान-मोठे नाले हे गायब झाले आहेत त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी तुंबण्याची समस्या ही नवीन नाही मात्र,पंचदीप नगर,मेहर कॉलनी,अभिनव कॉलनीच्या रहीवाश्यांना पावसाळ्यात एक-एक आठवडा पाण्यातच राहण्याची सवय झाली असल्याचे उपरोधिक विधान आरबीआय बँकेतून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश ठोंबरे करतात.कोकाकोला फॅक्टरीतील संपूर्ण सांडपाणी याच मोठ्या नाल्यातून एकेकाळी वाहून जात होते.नाल्याच्या एका बाजूला बुद्ध विहार तर दूस-या बाजूला झोपडपट्टी होती.भू-माफियांनी टिना लावल्यानंतर संपूर्ण नालाच बुजवून टाकला.या ठिकाणी एका इमारतीत जे कोचिंग क्लास सुरु आहे त्यांनी नाल्यावरच बांधकाम करुन नालाच नामशेष केला.आरबीआयच्याच एका सेवानिवृत्त अधिका-यांनी घराचे बांधकाम करताना लांबी आणि रुंदी धरुन १० हजार चौ.फू.युएलसीची जागा अतिक्रमण करुन स्वत:च्या हद्दीत घेतली!याच घराच्या भिंतीला लागून भू-माफियांनी टिनाचे शेड उभारलेले दिसून पडतंय.
विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान सभेत विरोधी पक्ष नेते असताना आमच्या विनंतीवरुन ते पंचदिप नगर मध्येे आले होते.झोपडपट्टीवासियांच्या घरात शिरणा-या पाण्याची समस्या बघून त्यांनी त्यांच्या निधीतून या ठिकाणचा नाला हा अंडरग्राऊंड केला होता.आता त्यांच्याच पक्षाच्या भू-माफियाने तो चक्क बुजवून टाकला.पाणी तुंबण्याची समस्या घेऊन आता पंचदिप नगरचे रहीवाशी भाजपच्या नेत्याच्याविरोधात भाजपच्याच नेत्यांकडे गुहार करीत आहेत!असे ठोंबरे सांगतात.
थोडक्यात,भू-माफियांनी विहाराच्या मागच्या भागाला लागून असलेली जागा टिना काढून तातडीने मोकळी करावी,अन्यथा भीमज्योती बुद्ध विहार जागा मुक्ती आंदोलन’ छेडण्याचा इशारा ठोंबरे यांनी दिला. यामुळे, येत्या विधानसभा निवडणूकीच्या आधी विहार मुक्ती आंदोलन, अंबाझरी स्मारक आंदोलना सारखे भडकणार अशी शक्यता आहे.
…………………………..
(संपर्क क्रमांक-प्रकाश ठोंबरे ९४२३१०४२७८)