Homeनागपूर न्यूजजनता कफ्यूर्ला प्रामाणिक नागरिकांचे उस्फूर्त सहकार्य:काहींचा अपवाद

जनता कफ्यूर्ला प्रामाणिक नागरिकांचे उस्फूर्त सहकार्य:काहींचा अपवाद

Advertisements
Advertisements

हम नही सुधरेंंगे,हम तो डूबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे!

नागपूर,ता. २५ जुलै: शहरात कोरानाचा उद्रेग बघता दोन दिवसांचा ’जनता कर्फ्यू’हा लिटमस टेस्ट म्हणून आजपासून लागू करण्यात आला. नागपूरकरांनी जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद देऊन घराबाहेर पडण्याचे टाळले. आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. कुठे ही दिवसभरात नियमांचे उल्लंघन किवा कायदा व सुव्यवस्था मोडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत मात्र तरी

 

[धाबा,वाडी]

देखील शहरात असे काही ’महाभाग’होतेच ज्यांना अद्यापही ’करोनाचाच’अर्थ कळला नाही, त्यांना ‘जनता कर्फ्यूचा’अर्थ तो काय कळणार?बार्ह्य नागपूरात अनेकांनी जनता कर्फ्यूला गांर्भीयाने घेतल्याचे दिसून पडले नाही.

एकीकडे पदाधिकारी व प्रशासन नागरिकांना,व्यवसायिकांना व व्यापारी दूकानदारांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वांरवांर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे. मात्र असे न घडल्यामुळेच नागरिकांवर वीक ऐंडला घरात डांबून राहण्याची वेळ आली आहे. येत्या शुक्रवारी पुन्हा पदाधिकारी व प्रशासनातर्फे होणा-या बैठकीत ‘जनता कर्फ्यू’किवा ’प्रशासकीय कर्फ्यू’याबाबतचा निर्णय घेतल्या जाणार आहे. वास्तविक पाहता कर्फ्यू कोणालाही नको आहे मात्र शहरातील काही बेजवाबदार दूकानदार,तरुणाई व नागरिक हे मास्क वापरत नाही,नियमांचे पालन करीत नाही,सेनिटायझरचा वापर करीत नाही,करोनासारख्या संसर्गजन्य महामारीला पाच महिने होत आले तरी फार हलक्याने घेणारे दूकानदार,तरुणाई व नागरिक याच शहरात अद्यापही आहेत.

परिणामी त्यांच्या बेजवाबदार वर्तवणूकीमुळे प्रामाणिकपणे नियमांचे पालन करणा-यांवर देखील लॉक डाऊनमध्ये घुसमटण्याची वेळ येत आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासन प्रत्येक व्यक्तिच्या मागे करोनाचा संसर्ग थांबविण्याकरीता पोलीस देऊ शकत नाही. ही नागरिकांची,दूकानदारांची,नोकरदारांची आणि तरुणाईची सामुहिक जवाबदारी आहे. सुरक्ष्ति अंतर राखा,मास्क वापरा,सेनिटायझरचा वापर करा व अनावश्‍यकरित्या घराबाहेर पडू नका.३ जूनच्या अनलॉक-१ नंतर एवढे जरी पालन केले असते तरी नागपूर किवा ग्रामीण भागात करोनाचा असा उद्रेग होऊन एक हजारापेक्ष्ा कमी असणा-या संख्यने एवढ्या झपाट्याने तीन हजारांचा टप्पा ओलोंडला नसता,असे आयुक्तांचे म्हणने आहे.

( गंगा नगर)

अनलॉक नंतर जणू करोना संपला या भ्रमात नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावर सुरुच ठेवला,परिणामी नागरिकांनाच पुन्हा वीक ऐंडला अश्‍या ’जनता कर्फ्यू’ला सामोरे जावे लागले.पुढील महिन्यात लागोपठ येणारे सण या पार्श्वभूमीवर बाजारात होणारी गर्दी व त्यानिमित्ताने होणारे संक्रमण या काळजीतून मनपा प्रशासनाचा संपूर्ण मानस हा १५ दिवसांचा ‘प्रशासकीय कर्फ्यू’लावण्याचाच आहे. मात्र महापौर संदीप जोशी तसेच इतर आमदार व पदाधिकारी,प्रशासकीय अधिकारी यांनी शनिवार,रविवार अश्‍या दोन दिवसांचा ’जनता कर्फ्यू’ लादून सध्यातरी जनतेवरच अनुशासन पालनाची जवाबदारी सोपवल्याचं दिसून पडतंय.

(फेंड्स कॉलनी)

(गिट्टी खदान)

शटर चालू-बंद करुन हात दूखायचे हो-

मनपा प्रशासनाच्या नियमानुसार एका ओळीतील पाचच दूकाने ही सुरु ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता.त्यातही वेळेचं बंधनही घालण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांच्या लॉक डाऊननंतर अनेक दूकानदार,व्यवसायिक,व्यापारी वर्गाने तीन महिन्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी कोणत्याही नियमांचे पालनच केले नसल्याचे दृष्य नागपूरकरांनी बघितले.सर्वात जास्त गर्दी ही मोबाईल, संगणकांच्या दूकानात पाहयाला मिळाली. या मागील ‘सत्ताधीश’ने मागोवा घेतला असता,सध्या राज्यातील शिक्ष् ण पद्धती ही सर्वस्वी ‘ऑन लाईन’ सुरु आहे,नुकतेच केजी ते दूसरीपर्यंतचे शिक्ष् ण देखील सरकारने ऑन लाईन घेण्याची सूचना काढली आहे,याशिवाय अनेक कंपन्यांचे कर्मचारी हे ‘वर्क ॲट होम’सेवा देत आहेत परिणामी संगणक व मोबाईल डिवायसेसची मागणी प्रचंड वाढली आहे.यामुळे जिवनावश्‍यक वस्तूंच्या दूकानासोबतच या दूकानात देखील ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली. एका मोबाईलच्या विक्रेत्याने ’प्रामाणिकपणे’ सांगितले ’मॅडम’उपद्रव शोध पथकच्या भीतीने दूकानाचे शटर ’चालू-बंद’करुन-करुनच हात दूखले होते खूप,आता लॉक डाऊनमुळे दोन दिवस हातांनाही आराम मिळाला!

मनपा आयुक्तांनी फेसबूक लाईव्ह दरम्यान करोनाच्या उद्रेगासाठी बिजनेस वर्गालाच दोषी ठरवले होते,हे विशेष. अश्‍या व्यापारी वर्गाकडे अनेक भागातून ग्राहक आलेत व करोना घेऊन गेले किवा देऊन गेल्याचे चित्र बघायला मिळाले. अश्‍या ग्राहकांची साखळी शोधणे अशक्यप्राय गोष्ट असल्यामुळे,प्रशासनाजवळ देखील साखळी खंडीत करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ’कर्फ्यूसह लॉक डाऊन’उरला आहे.
या पुढे ही नागरिक,शासकीय व खाजगी नोकरदार वर्ग,दूकानदार व व्यापारी,व्ययसायिक वर्ग,भाजी विक्रेते, हॉकर्स,गृहीणी ते तरुणाई वर्ग यांना जर लॉक डाऊन नको असेल तर,करोनाबाबतचे शासनाचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे असून,स्वत: नव्हे तर इतरांनाही नियम पाळण्यास प्रवृत्त करण्याची खरी जवाबदारी नागरिकांवरच असल्याची, शहरातील हा दोन दिवसांचा ’जनता कर्फ्यू’ने संदेश दिला आहे,असेच म्हणावे लागेल.

महापौर संदीप जोशी यांनी आज सकाळपासूनच शहराचा आढावा घेत दौरा काढला. अनुशासनाचे पालन करुन करोनाला हद्दपार करण्याचा उपाय हा सर्वस्वी नागपूरकर जनतेच्याच हाती असल्याचे ते म्हणाले तर जनता कर्फ्यूसारखे अनुशासन अबाधित ठेवल्यास प्रशासकीय कर्फ्यूची गरज भासणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

(छायाचित्रे-यांना कोण सुधरवेल?उपद्रव शोध पथकाला फक्त बाजारातील दूकानांनवरच कारवाई करण्यात रस का?यांच्याकडून नियमांचे पालन करवून घेण्याची जवबादारी कोणाची?यांची प्रवृत्तीच आहे ’हम तो डूबेंगे सनम तुमको भी ले डूबेंगे!’ यासारख्या काही महाभागांमुळेच संपूर्ण नागपूरकरांवर लॉक डाऊनमध्ये राहण्याची वेळ येते,प्रशासन पाेहोचू शकत नाही तिथे तेथील इतर नागरिकांची व तरुणाईची यांना रोखण्याची जवाबदारी नाही का?(सर्व छायाचित्रे ’सत्ताधीश’फोटो जर्नलिस्ट बोनी))

 

Latest बातम्या