
पत्र परिषदेत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी टार्गेट
नागपूर,ता. ३१ ऑगस्ट:शहरातील एका मोठ्या नेत्याने मनपातील सत्ताधारी भाजपचे काम उत्तम असल्याची आपल्याच मनाने पावती देत जनतेने त्यांना उत्तम कामगिरीचे बक्षीस द्यावे असे विधान केले मात्र जनतेने भाजपच्या या उत्तम कामगिरीचे बक्षीस आधीच दिले असून मनपातील ज्येष्ठ नगरसेवक तसेच महापौर पदी असणा-या संदीप जोशी यांचा पदवीधर निवडणूकीत पराभव केला व अभिजित वंजारी यांना निवडून दिले,येत्या निवडणूकीत देखील नागपूरची जनता भाजपला असेच बक्षीस देणार असल्याची जळजळीत टिका काँग्रेसचे शहराध्यक्ष् व आमदार विकास ठाकरे यांनी केली.ते आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी महासचिव अभिजित वंजारी,विशाल मुत्तेमवार,संदेश सिंगलकर,उमाकांत अग्निहोत्री,तक्ष् शिला वाघधरे,संजय महाकाळकर,विजय बारसे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ.ठाकरे म्हणाले, की पदवीधर निवडणूकीचे अपयश विसरुन पुन्हा आपल्या कामगिरीवर बक्षीस मागितले जात आहेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे,याचा अर्थ मागच्या चार-सहा वर्षांचा कार्यकाळ विसरलेत का?१५ वर्षांपासून मनपात भाजपची सत्ता आहे,केंद्रात ७ वर्षांपासून तर राज्यात ५ वर्षे भाजपचीच सत्ता होती तरीही नागपूर शहराच्या विकासाची झलक काय दिसतेय? जे पहीले करायला हवं होतं ते आता करीत आहेत.एवढ्या वर्षांत मिहान का नाही विकसित केला?वर्षाकाठी ५० हजार स्थानिकांना रोजगार मिळणार होता तो कुठे गेला?शहरातील बगिचे,मैदाने,ऐतिहासिक इमारती नामशेष होत आहेत,१९५० साली अंबाझरीमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक मनपाने त्याकाळी कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधले होते,१७ एकरमध्ये बगिचा निर्माण केला,मनपातील सत्ताधारी भाजपने तो राज्य सरकारला का परत केला?
शासनाने मग तो खासगी कंपनीला दिला,त्या खासगी कंपनीने ते स्मारकच उधवस्त केले.आता त्या स्मारकासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आहेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे,येणा-या निवडणूकीत जनता याचेही बक्षीस देणार असल्याचे ते म्हणाले.
मनपातील भाजपच्या भ्रष्ट कारभारविषयी काँग्रेस आंदोलन का करीत नाही?या प्रश्नावर बोलताना या भ्रष्ट कारभाराचा सातत्याने अधिवेशनात पाठपुरावा केला असल्याचे ठाकरे हे म्हणाले.पहील्या अधिवेशनात १२ तर नंतरच्या अधिवेशनात ६ प्रश्ने उपस्थित केली.संबंधित विभागांशी पत्र व्यवहार ही केला असल्याचे ते म्हणाले.
लवकरच भाजपने सामान्य करदात्यांसोबत कशी ‘चारशेवीशी’ केली आहे हे जनतेसमोर उघड करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.करोनामुळे आंदोलन करण्यावर बंधने असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसने विविध मुद्दांवर मोर्चेच मोर्चे नेले आहे हा इतिहास आहे.५ वर्षात २५ गुन्हे आमच्यावर दाखल झाले आहेत.अधिवेशनात मी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चौकशी समिती देखील गठीत झाली आहे.मागच्या राज्य शासनाचा चुकांसंबंधीची चौकशी, ही समिती संबंधित विभाग प्रमुखांशी करीत असल्याचे ते म्हणाले.
मनपात विरोधी पक्ष् नेता कुठे आहे?कोणत्याही आम सभेत त्यांचे विरोधी पक्ष् नेते म्हणून अस्तित्व का दिसत नाही?या प्रश्नावर बोलताना ज्याला जी जवाबदारी दिली आहे ती पूर्ण केली नाही तर त्याचे फळ पक्ष् देतोच,असा सूचक इशारा आ.विकास ठाकरे यांनी नाव न घेता मनपातील विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांना दिला.आम सभेत बुद्धिजीवी काँग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भाजप विरोधात आवाज उठवला पण ज्यांनी नाकर्तेपणा केला असेल त्याचा पक्ष् आणि जनताच निकाल लावेल,त्यांना शिक्ष्ा देईल असे ते म्हणाले.
यावेळी गडकरी यांच्या मेट्रो प्रकल्पाविषयी प्रश्न विचारला असता मेट्रो हा फार मोठा मुद्दा आहे यावर लवकरच स्वतंत्र पत्र परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांच्या चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजनेचा देखील ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.२००७ मध्ये मनपात भाजपची सत्ता आली आणि पहीले काम त्यांनी नागपूरच्या जनतेसाठी कोणते केले तर मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून काम काढून घेऊन ओसीडब्ल्यू या खासगी कंपनीला काम दिले.या कंपनीने नागपूरचा पार बट्ट्याबोळ केला.त्यांच्या वरील ३२ कोटी दंडाची रक्कम ही मनपाच्या आम सभेत रद्द झाली!मग या कपंनीने ‘व्हिीवोलिया‘कंपनीला आपले काम दिले आणि मनपाचे पैसे लाटून पळून गेली,सर्वात महत्वाचे म्हणजे नागपूर मनपाच्या कामाच्या अनुभवावर ओसीडब्ल्यूला अनेक शहरातील मनपाचे काम मिळाले.दुसरीकडे जनतेला आज ही पाण्यासाठी दशदिशा वणवण फिरावे लागत आहे.शहराच्या आऊटर भागात तर पाण्याचेेेेे पाईप लाईन्स आहेत पण पाणी नाही,मनपातील ‘विश्वराज इन्सफ्रास्ट्रक्चर’कोणाची कंपनी आहे याचा शोध लावा मग जनतेकडून बक्षीस मिळवा,असा टोमणा त्यांनी मारला.
ओसीडब्ल्यूच्या कार्यकाळात तर मनपाचा जलप्रदाय विभाग पाणी पुरवठा करीत असताना जेवढे टँकर लागत नसतील त्यापेक्ष्ा जास्त टँकर आज लागत असल्याची टिका केली.
काँग्रेसच्या नूतन प्रदेश सरचिटणीस आ.अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत ब्लॉक क्रमांक-२ ची पारडी येथील हजारे लॉनमधील बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक व विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांच्यात झालेल्या कालच्या गोंधळासंबंधी प्रश्न विचारला असता,असा कोणातीही गोंधळ त्या ठिकाणी झाला नाही,ना माईकची फेकाफेकी झाली ना आ.वंजारी हे अर्धवट भाषण सोडून निघून गेलेत,असे ते म्हणाले.या बैठकीची सूचना ब्लॉक अध्यक्ष्ांनी सांगितल्याप्रमाणे हजारे यांच्या घरी जाऊन दिली होती,निरोप ही ठेवण्यात आला होता मात्र त्यांना तो मिळाला नसल्याने ‘मिस कम्यूनिकेशन’मुळे त्यांचा गैरसमज झाला असल्याचे आ.ठाकरे यांनी सांगितले.प्रसिद्ध झालेले वृत्त हे खोटे असून जवाबदारीने सांगतोय,आमचा पक्ष् जिवंत असून आपल्या अधिकाराप्रती सजग असल्याचेच हे उदाहरण आहे.इतर पक्ष्ात असे घडत नाही,असा उपरोधिक टोमणा ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता मारला.
येत्या निवडणूकीत राष्ट्रवादीसोबत युती करणार का कि स्वबळावर लढणार?यावर बोलताना हा निर्णय प्रांताध्यक्ष् नाना पटोलेच घेतील.ते जे ठरवतील तो निर्णय आम्ही मान्य करु.आमची तयारी सर्व पर्यायांसाठी पूर्ण असल्याचे ते म्हणाले.
गेल्या ७ वर्षांपासून तुम्हीच शहराध्यक्ष् पदी आहात आणखी किती वर्ष हे पद भूषवणार?असा मिश्कीलीतला सवाल करता,हे पक्ष् च ठरवेल,मी विना खूर्चीचे देखील काम करु शकतो,मनपाची निवडणूक हरलो असलो तरी आमदारकी जिंकली,असेच मिश्किलीतील उत्तर याप्रसंगी त्यांनी दिले.
ज्येष्ठ नेते प्रफूल्ल गुडधे पाटील इ.चेहरे व्यासपीठावर आज का नाही?यावर बोलताना लवकरच सगळेच चेहरे तुम्हाला डायसवर दिसतील,असे त्यांनी सांगितले.
हेच का गडकरी यांचे रिंगरोड!आ.अभिजित वंजारी
दिघोरी पूर्व नागपूर येथील ४५ किलोमीटरचा पारडीला जोडणारा सिमेंट रस्ता २६५ कोटी खर्च करुन निर्माण करण्यात आला मात्र या सिमेंट रस्त्यावर नुसतेच खड्डे पडले आहेत.मुंबईतील मनपाने सिमेंट रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्या कंत्राटदारला काळ्या यादीत टाकले,नागपूरात हे का घडत नाही?सिमेंट रस्ते गडकरी यांचा स्वपनातला प्रकल्प असून या प्रकल्पाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे,मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे.भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी देखील या रस्त्याच्या निकृष्टेबाबत गंभीर आरोप लावले आहेत.
या रस्त्याच्या कंत्राटदाराची चाैकशी झाली पाहिजे.याशिवाय पारडी उड्डाणपूलाचे काम गेल्या ७ वर्षांपासून सुरुच आहे.२०१७ मध्येच हा उड्डाण पूल पूर्ण झाला पाहिजे होता मात्र तो अपूर्णच राहीला,उलट कंत्राटदाराला मुदतवाढ देऊनसुद्धा अद्याप हा पुल अपूर्ण आहे.या अपूर्ण कामामुळे पारडीतील नागरिक नरकयातना भोगत असून या ठिकाणी ७ लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे उड्डाण पूल २०१७ मध्येच पूर्ण करणे अपेक्ष्ि त असताना ते अपूर्णच असल्याचे बक्षीस देखील जनतेकडून हवे आहे का?
विकासाचे फक्त दावेच अन् कल्पनेत विकास:विशाल मुत्तेमवार
कॉग्रेस पक्ष्ाची भूमिका नागपूर शहराच्या सर्वांगिण विकासाची राहीली आहे.काँग्रेस पक्ष् विकासाच्या विरोधात नाही मात्र गेल्या १५ वर्षांपासून मनपात भाजपची सत्ता आहेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे,भाजप सतत मोठमोठ्या विकासाचे दावे करत असते,लोकांना भास करुन देते,विकासाच्या विविध प्रकल्पांची आर्थिक बाजू काय?स्त्रोत काय?गरज काय?याची शहनिशा केल्यावरच प्रकल्प मार्गी लागत असतात,मात्र गेल्या ७ वर्षांत एका नेत्याच्या मनात ‘कल्पना’येते हा प्रकल्प करावा म्हणून आणि त्याची विश्वासहर्ता न तपासता प्रकल्प सुरु होतात नंतर ते रद्द ही होतात!
यात वेळ जातो,पैश्यांचा अपव्यय होतो,शेवटी तो जनतेचा पैसा असतो उदा.गडकरी यांच्या मनात कल्पना आली प्रदुषणमुक्त बायोफ्यूल ईंधनाचा वापर व्हावा,संसदेतही त्यांनी इथेनॉलचा गाजावाजा केला,हे इथेनॉल त्यांच्याच कारखान्यातून उपलब्ध हातो हा भाग वेगळा मात्र त्यांच्या कारखान्यातील इथेनॉल नागपूर सोडून इतर शहरात का चालत नाहीत?ज्या कंपनीसोबत या संबंधीचा करार झाला तीच कंपनी आता नुकसान भरपाईसाठी न्यायालात दाद मागतेय.
गडकरी यांच्या मनातील अशीच एक कल्पना म्हणजे ‘कच-यातून संपत्ती निर्माण करणे’.२०१७ मध्ये झी इन्फ्राला हे काम दिले २०२० मध्ये या कपंनीने हे काम सोडून ही दिले,हे काम अतार्किक असल्याचे त्या कपंनीने कारण सांगितले,अतार्किक प्रकल्प होते तर करायचेच कशाला?या कंपनीने करारापोटी ५ कोटींची बँक हमी दिली होती,एखादी कंपनी करार मोडते तेव्हा त्यांनी जमा केलेली रक्कम ही गोठवल्या जाते,येथे तर या कंपनीने आपला पैसा बँकेतून र्निधाेकपणे काढून ही घेतला,त्यांच्या अनामत रकमेचे समायोजन झालेच नाही मात्र सत्ताधारी भाजपला याची खबरबात ही नाही?
नागनदीत बोट चालविण्याची अशीच एक कल्पना गडकरी यांना सूचली,अगदी अंबाझरी ते गोसेखूर्दपर्यंत बोटिंगचे गडकरींचे स्वप्न आहे,मात्र प्रकल्पा पूर्वीच याचा किती अभ्यास झाला आहे?
जागतिक दर्जाचे इंटर मॉडल स्टेशन गडकरी यांना अजनीत निर्माण करायचे आहे.आमची पण ईच्छा आहे हे स्टेशन निर्माण व्हावे मात्र जगातील इंटर मॉडल स्टेशन हे किती एकर वर बनले आहेत?१५ ते २० एकरमध्ये,मग गडकरी यांना ४९६ एकरची जागा इंटर मॉडल स्टेशनसाठी का हवी आहे?गडकरी यांच्या या प्रकल्पाचा पहीलाच टप्पाच एकूण ५२ एकरचा आहे!मग दूसरा टप्पा ४८ एकर,असे एकूण ४९६ एकर मध्ये एक इंटर मॉडेल स्टेशन असणार आहे?
अशीच एक कल्पना ऑरेंज सीटी स्ट्रीटची होती,त्याचे काय झाले?गडकरी यांना सेंट्रल बिजनेस डिस्ट्रीक्ट करायचंच आहे तर ते मिहानमध्ये का नाही करत?हॉटेल्स आणि मॉल्सच बांधायचे आहेत तर त्यासाठी शहराच्या मध्य भागातील संपूर्ण हिरवा पट्टाच नष्टच करतील का?या प्रकल्पात ४० हजार झाडांच्या वर झाडे कापली जाणार आहेत,याचे नागपूर शहराच्या पर्यावरणाला अतोनात नुकसान पोहोचणार आहे,त्यामुळेच जे व्हायरेबल आहेत ते प्रकल्प नंतर रद्द झालेत.
गडकरी हे गेल्या ३ वर्षांपासून ब्रॉडगेज मेट्रोची कल्पना नागपूरकरांना सांगत आहेत,मात्र यासाठी त्यांना रेल्वेची परवानगी मिळाली आहे का?अशी परवानगी मिळाली असल्यास ती नागपूरच्या जनतेला दाखवत का नाही?रेल्वेलाच या प्रकल्पातून उत्पन्न मिळणार आहे का,अशी शंका वाटत आहे.
गेल्या १५ वर्षांपासून मनपात भाजपने सत्ता इतकी व्यवस्थित चालवली की त्यांना जनतेने बक्षीस दयावे?स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत नागपूर पहील्या १०० मध्ये देखील नाही!हे शहर एका केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्रीचे शहर असताना देखील हे घडतंय.याचं बक्षीस जनतेने भाजपला द्यावे का?बक्षीस वगैरे काही नाही तुमच्या अतिशय वाईट आणि भ्रष्ट कामांसाठी जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवणार.
आधी सिमेंट रोड बनले नंतर केबलसाठी खोदले हाच विकास: उमाकांत अग्निहोत्री
डिप्टी सिग्नल रेल्वे क्रासिंग पासून तर नैवेद्यमपर्यंतचा सिमेंट रस्ता हा नुकताच बनला,त्याचा निधी देखील कंत्राटदाराला मिळाला मात्र पुन्हा हा सिमेंट रस्ता खोदून केबल टाकण्याचे काम सुरु आहे!हे फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण आहे,संपूर्ण शहराची हीच दशा आहे.याच ठिकाणी ड्रेनेजमध्ये ट्रांसफॉमर्र लागले आहेत!हे वाकडे-तिकडे झाले असून कधीही पडू शकतात,ज्या दिवशी हे ट्रांसफॉर्मर पडतील ते सिमेंट रस्ता उखडूनच खाली पडतील.
कंत्राटदाराला विचारले तर हे आधी नियोजनात नव्हते,मनपा प्रशासनातील अभियंत्यांनीच याचे नियोजन केल्याचे ते सांगतात!मनपात भाजपची सत्ता असल्याने प्रशासकीय नोकरशाहीला जाब विचारायचे काम कोणाचे?कंत्राटदार आणि सत्ताधारी यांच्या मिलीभगतनेच शहरातील हा सत्यानाश घडत आहे.जनता मरतेय याची त्यांना परवाह नाही,कंत्राटदार तरी कोण आहेत?तर नेतेमंडळीचेच बच्चे आणि नातेवाईक आहेत.अश्या कामगिरीसाठी गडकरी हे त्यांना नागपूरकर जनतेने ब देण्याचे आवाहन करतात आहेत का?
सीसीटीव्ही कॅमरे रात्रीचा अंधार टिपतच नाहीत!संदेश सिंगलकर
शहरातील सर्व चौकात व मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमरे लावण्याचा कंत्राट एलएनटी कंपनीला देण्यात आला.मात्र एकाही चौकात या सीसीटीव्ही कॅम-यांमध्ये रात्रीचे मॉनिटरिंग होत नाही!नाईट व्हीजनचा एक ही कॅमरा का नाही?असे या कंपनीला विचारले असता आम्ही करारात हे प्रपोजल दिलं होतं की नाईट व्हीजनशिवाय फायदा होणार नाही मात्र त्यांनीच ऐकलं नाही,त्यामुळे सीसीटीव्ही कॅम-यांच्या कामात देखील फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे,ब मागण्या ऐवजी या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे.




आमचे चॅनल subscribe करा
