
बाईकस्वारांनी धारदार शस्त्रांचे वार करुन केली कारचालकाच्या देहाची चाळण
नागपूर,ता २६ सप्टेंबर: शनिवार दि.२६ सप्टेंबर रोजी नागपूरकर नागरिक हे दैनदिन दिनचर्येप्रमाणेच घराबाहेर पडलेत. भोले पेट्रोल पंप चौकात एक काळ्या रंगाची कार ही देखील सिग्नल लागल्याने त्यांच्यामध्ये उभी झाली,सुमारे ४ वा.ची वेळ होती,अचानक एका बाईक वर दाेन तर एका बाईकवर तीन बाईकस्वार यांनी त्या काळ्या कारसमोर आपल्या बाईक्स आढव्या लावल्या. कार चालकाला काही तरी अघटीत होणार याची खात्री पटताच त्याने कार पुढे दामटण्याचा प्रयत्न केला मात्र दोन्ही बाईक्स या त्याच्या कारच्या चाकांसमोरच आडव्या पडल्या असल्याने त्याला कार पुढे दामटता आली नाही,हीच वेळ साधून त्या पाच बाईकस्वारांनी आपल्या जवळील धारदार शस्त्रांनी त्या कार चालकाला बाहेर ओढून वार करण्यास सुरवात केली,या घटनेत कारचालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची निर्घृण हत्या झाली.हे संपूर्ण हत्याकांड सीसीटीव्ही कॅम-यात कैद झाले आहे.
बाल्या बिनेकर हा कुख्यात जुगार अड्डा चालक असल्याचे सांगितले जात आहे.सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत भोले पेट्रोल पंपजवळ ही संपूर्ण चित्तथरारक घटना घडली.यावेळी सिग्नलवर उपस्थित वाहनचालकांची पाचावर धरण बसली,ज्याने त्याने आपले वाहन पुढे दामटले.मृतक हा गोळीबार चौकात सावजी भोजनालय चालवायचा तसेच नागपूर शहरात जुगार अड्डा चालवायचा. त्याच्यावर हत्या,हत्येचा प्रयत्न,जुगार तसेच दारु विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
घटनास्थळी सीताबर्डी पोलीस,क्राईम ब्रांचचे पथक तसेच वरिष्ठ अधिकारी पोहोचले.या कारचालकाचा पाठलाग करुन त्याचा ‘गेम’करण्यात आल्या.गुन्हेगारांची मजल ही भरदिवसा भर चौकात वाहनचालकांच्या गर्दीत एखाद्याचा खून करण्यापर्यंत पोहोचली,यावरुन शहराची कोलमडलेल्या कायदा-व्यवस्थेचे दर्शन होते.गुन्हेगार हे बुलेट तसेच एक्टीवावर पाठलाग करत होते.
सुरवातीला एका आरोपीने स्वत:जवळचा देशी कट्टा काढून गोळी झाडली मात्र कट्टा जाम झाल्याने आरोपींनी घातक शस्त्रे काढून कार चालकाच्या देहाची चाळण केली. या घटनेमुळे सिग्नलवर प्रचंड थरार निर्माण झाला.एकाने पोलीस नियंत्रण कक्ष्ाला ही घटना कळवली. त्यानंतर सीताबर्डी पोलीसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू यांनीही घटनास्थळी धाव घेतली.पोलीस सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहे.
रात्री उशिरापर्यंत आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.




आमचे चॅनल subscribe करा
