फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogचाल,चरित्र आणि चेहरा...

चाल,चरित्र आणि चेहरा…

नागपूर,ता.२९ जानेवरी २०२६: समाज माध्यमावर कालच्या धक्कादायक आणि स्तब्ध करणा-या घटनेनंतर एक वेगळी चर्चा सुरु झालेली दिसून पडते.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता अनेक शंका-कुशंकेला पेव फूटले आहे. देशाचा संविधान हा देशातील नागरिकांना प्रश्‍न विचारण्याचा अधिकार देतो,हा नागरिकांचा घटनात्मक हक्क आहे,अजित पवार यांच्या अकाली,अपघाती मृत्यूची निष्पक्ष,पारदर्शक ,स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी सोशल मिडीयाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर ठलकपणे उमटली.लोकशाहीत संशय दाबला जात नाही,त्याचं उत्तर जनतेला सरकार आणि शासनाकडून अपेक्षीत असतं,त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या जनतेला झालेली गहरी जखम,शब्द ,संताप आणि अपेक्षेच्या रुपात आभासी भिंतींना रंगविताना दिसून पडते.
सोशल मिडीयावर सर्वाधिक व्हायरल झालेली एक पोस्ट आहे ती म्हणजे,दोन बातम्या अजितदादांच्या अपघाताबद्दल ठोस निष्कर्ष देत नाहीत,तर संशय आणि चौकशीचा ‘इशारा’देतात,ही पोस्ट…!काल मध्यरात्री महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मोठी’घडामोड म्हणून बातमी येते,दोन बड्या नेत्यांच्या बैठका,हालचाली,गुप्त चर्चा आणि सकाळी अजित दादांचा विमान अपघात.हा फक्त योगायोग आहे का?की वेळेचा संयोग काही असुविधाजनक प्रश्‍न विचारायला भाग पाडतो?जर त्या रात्रीच महत्वाच्या राजकीय बैठका सुरु होत्या आणि दूस-या दिवशी सकाळी तांत्रिक अलर्ट असलेलं विमान उडालं,मग वेळेचा हा संयोग संशयास्पद वाटतो,हे नाकारता येईल का?जर विमानाबाबत तांत्रिक अलर्ट आधीच होता,तर उड्डाणाची परवानगी कशी मिळाली?कोणाची जबाबदारी होती?त्या रात्रीच्या राजकीय हालचाली आणि सकाळच्या अपघातात कसलाही संबंध नाही,याची खात्री कोण देणार?असा सरळ प्रश्‍न या पोस्ट मध्ये विचारण्यात आला आहे….!
याची दूसरी बाजू, समाज माध्यमे तसेच मुख्य वृत्त वाहिन्यांमध्ये आता पायलट कसा मद्यपी होता,हे सुनियोजितपणे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरु झाला.या पायलटला पूर्वी मद्यपान केल्यामुळे तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते,हे वास्तव जरी असले तरी ज्या क्षणी अजित पवारांच्या विमानाने अवकाशात झेप घेतली त्या क्षणी ताे पूर्ण शुद्धीवर होता,हे नाकारता येईल का?दिवंगत पायलट कॅप्टन सुमीत कपूर यांच्या विषयी आता जो बदनामीकारक वृत्तांचा महापूर आला आहे यातून त्या मृतआत्म्याला व त्यांच्या कुटूंबियांना वेदना होत नसतील का?खासगी कपंनी ही नफ्यासाठीच व्यवसाय करीत असते,विमाने अवकाशात उडविण्यासाठी ,व्हीएसआर व्हेचंर्स या खासगी विमान कंपनी मालक हा साधन सुचिता,नीतीमत्ता पाळणारा होता हे गृहीत धरणे म्हणजे शुद्ध फसवणूक ठरते.१५ हजार तास उड्डाणाचा अनुभव असणा-या सुमित कुमार यांना दोन वेळा मद्यपान करुन सेवेवर आल्याने तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले हे वास्तव असले तरी,केवळ पायलटमुळेच अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला,असे या गंभीर दूर्घटनेला वळण देणे,हे सत्याचा विपर्यास करण्यासारखेच नाही का…?
दिल्लीस्थित अपघातग्रस्त विमान कंपनीचा मालकही,पायलट रनवे बघू शकला नसल्याने अपघात झाल्याचा दावा करुन मोक़ळा  झाला.पायलटला १५ हजार तास उड्डाणाचा अनुभव होता.सह पायलटला १५०० तास उड्डाणाचा अनुभव होता.विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता,आमच्याकडे अजून १७ विमाने आहेत,आम्ही आमचे उड्डाण बंद करणार नाहीत,डीजीसीए आमच्या विमानांचे परिक्षण करीत असल्याचे कंपनीच्या मालकाने माध्यमांना उघडपणे सांगितले.कुठून आला हा भिडस्तपणा त्यांचा अंगात?
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिवंगत अजितदादांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा कट असल्याचा संशय व्यक्त केला.अजित दादा भाजपची साथ सोडून इंडिया आघाडीमध्ये परत येणार होते असा दावा त्यांनी केला.गेल्या काही दिवसांपासून हे स्पष्ट होत होतं की अजित दादा व देशात व राज्यात सर्वात शक्तीशाली भाजप यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.भाजपविरुद्ध अजित पवारांचे एक विधान थेट पंतप्रधान माेदी यांना लक्ष्य करणारे होते.‘जे मला चोर म्हणायचे ते आज माझ्यासोबत मांडिला मांडी लावून बसलेले आहेत…’हा मोदी आणि फडणवीस दोघांवरही शाब्दिक हल्ला होता.
अजित दादांनी भाजपवर ‘कट प्रॅक्टीस’चेही गंभीर आरोप आपल्या भाषणात लावले व त्याचे पुरावेही त्यांच्याकडे असल्याचा दावा केला.सिंचन प्रकल्पातील महाभ्रष्टाचारावर त्यांनी भाष्य केले होते…!१९९९ मध्ये जेव्हा पुरंदर लिफ्ट सिंचन योजनेची फाईल त्यांच्याकडे आली तेव्हा त्याची लागत ३३० कोटी नमूद करण्यात आली होती,मी ती फाईलच रद्द केली.चौकशी केल्यावर कळले की तो प्रकल्प फक्त २२० कोटींचा होता,यातील १०० कोटी भाजप पक्षाच्या पार्टी फंडसाठी ठेवण्यात आला होता तर १० कोटी हे त्या फाईल्सवर स्वाक्षरी करणा-या अधिका-यांचा वाटा होता,केवळ एकाच प्रकल्पात भाजपने सरळ-सरळ ११० कोटींचा बोजा महाराष्ट्राच्या जनतेवर टाकला होता,भाजपच्या अश्‍या अनेक घोटाळ्यांचे पुरावे माझ्याकडे असल्याचे दादांनी सांगितले अन्….!
हाच आरोप इंडिया आघाडीतील कोण्या एका पक्षाने दुस-या पक्षावर केला असता तर….!देशाच्या माध्याम विश्‍वास भूकंप आला असता,दिवस-रात्र हीच बातमी चालवली गेली असती,मात्र,अजित दादांनी भाजपवर आरोप केला असल्याने देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रादेशिक मुख्य वृत्त वाहिन्यांच्या बातम्यांमधून ती पूर्णपणे गायब होती…!अजित दादांनी एबीपी न्यूजला काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती.त्या मुलाखतीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये फेरबदल होण्याची अटकळ बांधली जात होती.देशातील उद्योगपतींची वृत्त माध्यमे दररोज त्या मुलाखतीबद्दल गोंधळ घालत होती,आता तो गोंधळ थांबला…सत्य नेहमीच शांतपणे का संपतो….?
अजित पवार हे महाराष्ट्राचे ११ वेळा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री राहीले होते,निश्‍चितच त्यांच्या शब्दांवर जनतेला सहज विश्‍वास बसला होता.ही भाजपची खरी अडचण ठरली होती.त्यांच्याकडे भाजपविरुद्ध ठोस पुरावे असल्यानेच त्यांचा घात झाला का?अजित दादांच्या मृत्यूचा नेमका फायदा कोणाला होणार होता?अश्‍या अनेक प्रश्‍नांनी आता सोशल मिडीया व्यापून टाकला आहे.खूप जास्त योगायोगी मृत्यू आणि अपघात जनतेने पाहिले आहे.गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी ज्या विमानात होते ते विमान अडीचशे प्रवाश्‍यांसह हवेतच जळून खाक झाले…!
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजकीय खटला हातळणारे न्यायमूर्ती लोया यांचा नागपूरात संश्‍यास्पद मृत्यू,अहवालामध्ये विसंगती,अनेक प्रश्‍न अनुत्तरित,कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली,सर्वोच्च न्यायालयाचा या प्रकरणात काहीही संशयास्पद नाही असल्याचा र्निणय आला तरी ही..लोकांच्या मनातील शंका दूर होऊ शकली नाही.आता प्रत्येक गोष्ट ‘अपघातच’आहे यावर महाराष्ट्राचा विश्‍वास राहीला नाही…महाराष्ट्रातील जनतेची ही भावना एका रात्रीत तयार झाली नाही,याला एक तपाचा(बारा वर्षांचा)इतिहास आहे…!
गेल्या काही वर्षात जनतेने पाहिले आहे,नेते अचानक अपघातात मृत्यूमुखी पडतात,महत्वाचे साक्षीदार साक्ष देण्याआधीच मरतात,कोठडीतील मृत्यू हा ‘नैसर्गिक’ठरतो,अनेक प्रकरणे सत्य समोर न येताच बंद होतात,प्रत्येक घटना वेगळी असू शकते पण,सतत असेच घडत राहील्यावर लोकांचा लाखमोलाचा विश्‍वास ढासळतो,लोक विचारु लागतात,सत्य कायम कटकारस्थानातून का संपतो…??
केवळ ममता बॅनर्जीच नव्हे तर लालू यादव,शिवसेनेचे नेते संजय राऊत,जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अबदुल्ला,असाम पीसीसीचे प्रमुख गौरव गोगाई आणि वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यासारख्या देशातील प्रमुख नेत्यांनी देखील या घटनेच्या सखोल आणि प्रामाणिक चौकशीची मागणी केली.शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील फेसबुक पोस्ट करीत,कमी दृष्यमानतेमुळे अपघात झाला असं म्हटलं जातंय,पण तिथे धुक्याचं वातावारण असेल तर सीसीटीव्हीतील विमानाचे घिरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे?अजित दादांच्या नंतर पक्षातील ज्येष्ठता क्रम असणारे प्रफूल्ल पटेल,हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगले आहे?ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न अत्यंत महत्वाचे आहेत,ही चौकशी झालीच पाहिजे,अशी मागणी केली.ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा करु असं सत्ताधा-यांमधला एक ही नेता ठामपणे का बोलत नाही?असा सवाल करीत,अजित दादांचे जाणे हे फक्त पवार कुटूंबाचे नुकसान नाही अखख्या महाराष्ट्राचे नुकसान असल्याचे ‘रक्तरंजित राजकारण’असा हॅशटॅग देत सुषमा अंधारे म्हणाल्या.
शरद पवारांनी घेतलेली राजकीय भूमिका याचा आधार घेत अंधभक्त संशयचा वाव असल्याची भूमिका घेणा-यांवर तुटून पडले आहेत…!साहेबांनी संयम पाळून भूमिका घेतली,याला त्यांचे ओपिनियम म्हणता येणार नाही.सत्य त्यांना अवगत आहेत,हे ग्राह्य धरता येणार नाही, निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत विविध राजकीय शत्रूत्वातून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे,एका शब्दाच्या ठिणगीनेही महाराष्ट्र भडकला असता तर आवरणं कठीण झालं असतं इतका सुज्ञपणा शरद पवारांमध्ये नक्कीच आहे…!
एका रात्रीत सरकार बदलले,मोठ्या प्रमाणात आमदार पक्ष बदलू लागले,पक्ष फोडण्याचा राजकारणाने किळस येण्याची सीमा ही ओलांडली ,जनतेच्या मतांना अर्थच उरला नाही,सत्ता जनतेपेक्षा मोठी झाली,जेव्हा लोकशाही कमकुवत होते…तेव्हा काही सहज अपघातही ‘सहज‘वाटत नाही.
तपास यंत्रणांचा ‘दरारा’ वाटण्यापेक्षा ‘तिटकारा’ वाटू लागला,भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधकांवर कारर्वाया,स्वपक्षातील भ्रष्टाचारांना अभय,प्रत्येक निवडणूकी पूर्वी विरोधकांवर छापे,पक्ष बदलताच कारवाई थंड,न्यायालयातून निर्दोष सुटणे,पूर्वी माध्यमे सत्तेला प्रश्‍न विचारीत होती,आता तीच ‘प्रामाणिकपणे’सत्तेची  बाजू घेताना सर्वदूर दिसून पडतात…!प्रश्‍न विचारणारा देशद्राही ठरतो,लोकशाहीचे मंदिर असलेल्या विधान सभा परिसरात हाणामारी घडते…!महाराष्ट्राची गौरवशाली प्रश्‍ने विचारण्याची परंपरा, गांधीजींच्या नोटांखाली खोलवर गुदमरताना दिसून पडते…!सत्य विचारणा-या पत्रकारांचे याच देशात मुडदे पडले हे भयाण वास्तव आज पत्रकारच सोयीस्करपणे विसरले आहेत..,शाहू,आंबेडकरांच्या विचारांची सत्य शोधण्याची चिकित्सा  महाराष्ट्रात म्हणत नाही हे राजकीय खून आहेत,महाराष्ट्र इतकंच म्हणतो ‘सत्य समजेल इतकी पारदर्शी व्यवस्था जिवंत राहू द्या,’ही बंडखोरी नाही,हा राजद्रोह ही नाही,ही लोकशाहीबद्दलची खोल-खोल काळजी आहे…!
महाराष्ट्राच्या राजकारणात कट कारस्थान नवे राहीले नाही.एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारांना गुजरात मार्गे असाममध्ये कश्‍याप्रकारे नेले,हे जनतेला अजूनही आठवत आहे.महाराष्ट्रात लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत आपटून मार खालल्यानंतर विधानसभेच्या निवडणूकीत झालेले ‘वोटचोरीचे’ आरोप हे जगभर गाजले.महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची कमी केलेली सुरक्षा,इस्त्राईली यंत्र ‘पॅगेसस‘चा वापर करुन विरोधकांच्या मोबाईल फोनमध्ये सरळ गुपित प्रवेशाचा झालेला गंभीर आरोप,फक्त विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये तसेच फक्त विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरुद्ध ईडीचा झालेला पराकोटीचा दुरुपयोग,देशातील लोकशाहीवर किती गंभीर संकट आले आहे,याची प्रचिती देतात.राजकारणाची किंमत एखाद्या लोकप्रिय नेत्याचा जीव होऊ शकत नाही…महाराष्ट्रा वेळीच जागा हो…स्वत:चे खरे अस्तित्व आठव…अजित दादांचा मृत्यू संशयाने व्यापलेला आहे,अजित दादांचे असे निधन यावर विश्‍वास ठेवणं कठीण आहे…हा अपघात अविश्‍वसनीय आहे…अजित दादांच्या विमान अपघाताचे सत्य कधीच उघड होणार नाही आणि अजित दादा कधीच परत येणार नाही,जे घडणार होते,घडवायचे होते,घडून गेले..मात्र,ही घटना अनेक किंतू,परंतू आपल्या मागे सोडून गेली आहे…!अश्‍या हजारो पोस्टने आज सोशल मिडीया व्यापलेला आहे….!
भाजपच देशाचे चाल,चरित्र आणि चेहरा असल्याचा वारंवार दावा करणा-या पक्षाची आणखी एक ‘मोठी कृती’,यावरही विविध समाज माध्मांत भरपूर टिकेचे सूर उमटले.अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीला येणार असल्याची घोषणा स्वत:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली,ते वृत्त,तो व्हिडीयो देशातील सर्व माध्यमांनी देशाच्या जनतेला दाखवले मात्र,मोदी हे अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला शब्द देऊनही आले तर नाही,परंतू ज्यावेळी विमान अपघातातील त्यांच्या चितेची अग्निही धगधगली नव्हती,त्यांचे छिन्नविछिन्न पार्थिव बारामतीच्या रुग्णायात निशब्द पहूडले होते,रुग्णालया समोर हजारोंची गर्दी ‘आपले अजित दादा’यांना बघण्यासाठी आतूर झाली होती,त्यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर तर मनात हिमालया एवढी वेदना होती,,त्याचवेळी सायंकाळी पाच-सहा वाजता मोदी हे काँग्रेसपेक्षा भाजपने अवघ्या १२ वर्षात कश्‍याप्रकारे विमान वाहतूक क्षेत्रामध्ये वाढ केली आहे, हैदराबादमध्ये विंग्स इंडिया-ट्वेंटी ट्वेंटी सिक्स कार्यक्रमात याचा आपल्या भाषणात ढोल पिटत होते…!
मूळात हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नव्हते तर देशातील नागरी व उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांचे होते.मात्र,मोदींना या ही योजनेचे श्रेय आपल्या मंत्रीला मिळू द्यायचे नसल्याने अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारापेक्षा आणि महाराष्ट्रातील शोकमग्न जनभावनेपेक्षा हैदराबादेतील कार्यक्रमाचे महत्व मोदींना अधिक होते,हे नग्न सत्य संपूर्ण देशाने पाहिले.महाराष्ट्राच्या संवेदनांवर मोदी आपली राजकीय प्रसिद्धी लाटण्यासाठी नेहमीसारखे सज्ज झालेले महाराष्ट्रातील जनतेला दिसून पडले…!नरेंद्र मोदींच्या भाषणाशिवाय देशात एकाही कार्यक्रमाचे,प्रकल्पाचे उद् घाटन हे संविधानानेच जणू वर्ज्य केले असल्याचा भास आता जनतेच्याही मनात निर्माण झाला आहे…!
साथियो..भारत के हवाई वाहतूक(एविअेशन) सेक्टर में ये तेजी इसलिये आई  क्योंकी हमारी सरकार एक लाँग टर्म विजन के साथ काम कर रही है।भारत में एअर ट्रॅव्हल्स अब ‘एक्सलूझीव्ह’ नही ‘इन्क्यूलझीव्ह‘बन रहा है।भारत का नागरिक आसानी से एअर ट्रॅवल कर पाये,ये हमारा मिशन है।इसलिए हमने टियर-२,टियर -३ सिटीज को एअरपोर्ट से जोडा है।साल  २०१४ में भारत में ७० एअरपोर्ट थे,आज भारत में एअरपोर्ट की संख्या बढकर १६० से ज्यादा हो गई है।यानी सिर्फ एक दशक में ही भारत में दो गुने से अधिक एअरपोर्ट बनाये गये।हमने देश में सौ से अधिक एरोड्रम्स को एक्टिवेट किया है।और इसके साथ ही अपने नागरिको के लिए अफर्डेबल फेअरवाली उडाण स्कीम लॉन्च की है।उडाण स्कीम के कारण देड करोड पॅसेंजर्स ने उन रुट्स पर ट्रॅव्लर्स किया है,जिनमे से पहले एक्झीज भी नही करते थे।
एविअशेन इंडस्ट्री का अगला युग बहोत एक्सप्रेशन्स से भरा हूआ है।और भारत इसका एक बडा प्लेअर बनता जा रहा है।एअरक्राफ्ट मॅनिफॅक्चरिंग,पायलट ट्रेनिंग,एडवासं एअर मोबॅलिटी,एअर क्रॉफ्ट लिजिंग ये ऐसे सेक्टर है जिन्हे लेकर भारत अनेक संभावित भावनाओ के साथ आपके समक्ष उपस्थित है।और एसलिए विंग्स इंडिया की ये समिट हम सभी के लिए इतनी अहम हो गई है।
पिछले एक दशक में भारत में भारत के पूरे एविगेशन सेक्टर में एक ऐतिहासिक ट्रान्सफर्मेशन हूआ है।कभी भारत दूनिया के ऊन देशो में था जहाँ एअर ट्रॅवन एक एक्सलूझीव्ह वर्ग तक सिमीत था।लेकीन आज स्थित एकदम बदल गई है।आज भारत दूनिया का तिसरा बडा डाॅमेस्टिक एविगेशन मार्केट है।हमारा पॅसेंजर ट्राफिक बहोत तेजी से बढा है।
ज्यावेळी विमान दूर्घटनेत देशातील इतक्या मोठ्या एका नेत्याचा ,अजित पवार यांचा मृत्यू झाला,त्याच वेळी देशाचे पंतप्रधान देशातील विमान वाहतूकीचा डंका पिटताना दिसून पडले.आम्ही विमानतळे वाढवली,विमान वाहतूकीत आम्ही भारताला आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहाचवले आहे,हे देशाला सांगत होते…!हे एक्सल्यूझीव्ह होते मोदींनी हवाई वाहतूक सर्वसामान्यांसाठी इन्कल्यूझीव्ह बनवले की ’डेथक्लूझीव्ह’बनवले,असा प्रश्‍न समाज माध्यमांत उमटला.
कोणाच्या भरवश्‍यावर बारामती एअरपोर्ट चालत आहे?हा गंभीर प्रश्‍न त्यातून निर्माण होतो.या ठिकाणी हवाई प्रशिक्षण केंद्र असल्याने विद्यार्थी व प्रशिक्षकांच्या भरवश्‍यावर हा विमानतळ चालत असल्याचे भयाण वास्तव या दूर्घटनेनंतर समोर आले…!बारामती एअरपोर्ट परिसरात दोन केबिन आणि एक खोली आहे.४५० एकर मध्ये स्थित असून परिसरात दोन प्रशिक्षण केंद्रे आहेत.येथील एअर ट्राफिक कंट्रोल(एटीसी)विद्यार्थी आणि प्रशिक्षकांच्या अधीन होती!
‘अनकंट्रोल’ एरोड्रोमच्या कॅटेगिरीमध्ये बारामतीचे हे विमानतळ येतं.या ठिकाणी संगणककृत एअर ट्राफिक सिस्टम कार्यरत नाही.विना लायलेंसवाले विमातळापैकी एक आहे.ही मोदींच्या भाषणातील मुद्दांशी विसंगत नाही का?आता पायलट संघटना मृतक पायलटच्या बचावसाठी समोर आली असून ,अश्‍या अनकंट्रोल विमानतळांवर पायलटला मौसम आणि धुक्याची सूचना कोण देणार?अश्‍या विमानतळांवर पायलटला आपला अनुभव व विवेकबुद्धीतून धावपट्टीवर विमान लॅण्ड करावं लागतं.येथील विद्यार्थी व प्रशिक्षकांवर ‘र्निभर ‘आहे बारामती विमानतळ…!याच धावपट्टीवर जून २०१३ मध्ये कार्बन एव्हीअेशनचे सस्ना १७२ विमान  दुर्घटनाग्रस्त झाले.प्रशिक्षक पायलट जखमी झाला,५ फेब्रुवारी २०१९ रोजी एक प्रशिक्षण विमान दूर्घटनाग्रस्त झाले,प्रशिक्षक पायलट गंभीर जखमी झाला.विमानाचे तुकडे झाले.२२ ऑक्टोबर २०२३ रोजी एक लेट बर्ड फ्लाई ट्रेनिंग अकदामीचे विमान क्रॅश झाले.सुदैवानक पायलटचा जीव वाचला.२००८ मध्ये याच विमानतळावर अकादमीचे कार्बन एव्हिीएशनचे सस्ना १५२ दूर्घटनाग्रस्त झाले,पायलट व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जखमी झाले.चार-चार दूर्घटनांनंतरही या विमानतळाची सुरक्षा अभेद्य करण्यात आली नाही.अजित पवारांच्या विमान दूर्घटनेनंतरही येथील स्थानिकांनी सांगितले की त्यांना वाटले पुन्हा ट्रेनिंग अकादमीचे विमान दूर्घटनाग्रस्त झाले असावे,इतकी ‘सवय’बारामती विमानतळावरील दुर्घटनांची स्थानिकांना झाली आहे…!
उत्तर प्रदेशमध्ये अश्‍या अनेक विमानतळांचे मोदींच्या हस्ते  उद् घाटन झाले आहे ज्यावर एक ही विमान उतरले नाही…!देशात द्वितीय महायुद्धाच्या काळातील अनेक ‘एअरस्ट्रीप्स’आहेत,त्यांचेच ‘नुतनीकरण’ करण्यात आले व देशाच्या जनतेसाठी ’आम्ही बांधले’असा डंका पिटण्यात आला.महत्वाचे म्हणजे फक्त विमान उतरण्यापूरती धावपट्टी निर्माण करण्यात आली,इतर कोणत्याही सुविधा त्या विमानतळांवर नाही,त्या फक्त धावपट्टींनाच विमानतळ घोषित करण्यात आले…!गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टचे देखील उद् घाटन झाले असून या ठिकाणाहून खासगी विमाने उड्डाण घेतात.हे हिंडन विमानतळ काेण्या तहसीलच्या बस स्थानकापेक्षाही वाईट स्थितीत आहे.कोणत्याही सुविधा नसून या ठिकाणी प्रवाशी उतरल्यावर मुख्य विमानतळापर्यंत बसने प्रवाश्‍यांना घेऊन जाण्यात येतं…!प्रवाश्‍यांची मोजणी होते,बस वाहनतळाच्या परिसरात दूरवर थांबते व प्रवाश्‍यांना स्वत:चे सामान हातात घेऊन मुख्य विमानतळाच्या आतून चालत येत बाहेर पडावे लागते…!
काय घाई होती हिंडन विमानतळ घोषित करण्याची?शिर्डीमध्ये ही विमानतळ सुरु केले,एअरस्ट्रीपवर विमान उभेच राहतात किमान एक,दीड तास कारण या ठिकाणी विमान पार्किंगची जागाच नाही.जेव्हा मुख्य विमाने उडाण घेतात,जागा मोकळी होते तेव्हा ती धावपट्टी खासगी विमानांना वापरण्यास मिळते!केंद्रीय उडाण मंत्रालय कश्‍या पद्धतीने देशात काम करते हे इंडिगोने चार महिन्यांत दाखवून दिले.एकाधिकारशाहीतून इंडिगाेने निव्वळ नफ्यासाठी केंद्रीय कायद्याचे उल्लंघन करीत पायलट्स,क्रू मेंबर्ससह कर्मचारी यांच्या नोकरीच्या,हवेत उडणा-या व आरामाच्या वेळेत बदल करण्यास चक्क नकार दिला.शेवटी यातून प्रचंड गोंधळ निर्माण होऊन लाखो विमान प्रवाशी यात भरडले गेले.विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,महिला,उद्याेगपती,व्यवसायिक..!अनेकांचे तिकीटांचे पैसे तर सोडा अत्याावश्‍यक सामान देखील प्रवाश्‍यांना वेळेवर परत मिळू शकले नाही…!या गोंधळानंतरही मोदी विमान वाहतूकी क्षेत्रात स्वत:च्या सरकारची कामगिरी सांगत स्वत:ची पाठ थोपटून घेत असल्याचे ‘विभत्स’चित्र देशाने पाहिले…!
प्रवाश्‍यांना विमानतळांवर आठ-आठ तास,१२-१२ तास उगाच थांबावे लागले.सरकारने केवळ इंडिगोवर २२ कोटींचा दंड लावून कर्तव्याची इतिश्री मांडली.या देशात सन्मानित प्रवाश्‍यांना अपमान करुन घ्यायचा असेल तर विमानातून प्रवास करावा,असा ट्रेण्डच त्यावेळी व्हायरल झाला.सुरक्षा रक्षकांपासून विमान कर्मचारी सगळ्यांकडून या देशाचा प्रवाशी अपमानित झाला.मूळात देशाच्या विमान वाहतूकी संबधीचे नियमच विस्कळीत आहेत.एका विमानतळावर परफ्यूम,पाण्याची बाटली,केसांचे तेल इत्यादी घेऊन जाऊ शकता तर दूस-या विमानतळावर यावर बंदी आहे!सगळ्यांचे आपापले कायदे आहेत.एका विमानतळावर पायातील जोडे ही तपासले जातात,दूस-या विमातनळावर जोडे तपासले जात नाहीत.मोदींनी डंका पिटलेला डिजिटल यात्रा योजनेतील डिजी यात्रा अनेक विमान वाहनतळांवरुन नदारद आहे.काही विमानतळांवर डीजी यात्रेच्या मशीन्स अश्‍या आहेत की प्रवासी तिथे तातकळत राहण्यापेक्षा रांगेत राहाणे पसंद करतात.देशातील अनेक विमानतळांवर प्रवाश्‍यांच्या सुविधांबाबत अनेक तक्रारी आहेत.केंद्राच्या पोर्टलवर तक्रारी टाकल्या तरी त्याचे उत्तर मिळत नाही,ना समाधान होतं.विमानतळांवर प्रवाशांची विविध सुविधाच्या नावावर वारेमाप लृट होते.भाषण देणारे पंतप्रधान तर स्वत:च्या अत्याधुनिक खासगी विमानांनीच उड्डाण घेतात,त्यांना भाषणात सांगायला काय जातं?साढे तीनशे रुपयांचा चहा सामान्यांना मिळतो,पाण्याची लहानशी बाटली सत्तर रुपयात मिळते ज्याची किंमत विमानतळा बाहेर फक्त दहा रुपये आहे,ही विमानतळाची खरी वस्तुस्थिती आहे.पंतप्रधानांनी कधी तर विमानतळावरील पार्किंगच्या लृटीविषयी व त्यांना समाधान देणारी बाब आपल्या भाषणात सांगावी!आठ मिनिटाच्या वर झाले तर नवव्या मिनिटाला प्रवाश्‍यांना घ्यायला येणा-या वाहनचालकांना दीडशे रुपयांचा भुर्दंड बसतो.जेवढा वेळ दिल्लीतून मुंबईत येण्यासाठी विमानाने लागतो,त्यापेक्षा जास्त वेळ प्रवाश्‍यांचे सामान मिळण्यास लागतो.वरुन पंतप्रधान म्हणतात आम्ही सामान्यांना विमानतळांवर सुविधा दिल्या!
भारतात एकेकाळी सात-सात एअरलाईन्स होत्या,आज या क्षेत्रात इंडिगोची मक्तेदारी प्रस्थापित झाली आहे.६० टक्के इंडिगो,३० टक्के स्पाईट जेटशिवाय देशातील सर्वसामान्यांसाठी या देशात कोणत्या विमानसेवा उपलब्ध आहेत?हे देखील पंतप्रधानांनी सांगितले असते तर बरे झाले असते.पंतप्रधान आपल्या भाषणात सांगतात देशात त्यांनी लहान लहान विमानतळे नागरिकांना उपलब्ध करुन दिली.अमरावतीच्या विमानतळाचेही उद् घाटन त्यांच्या हस्ते झाले,किती उड्डाणे होतात या विमानतळावरुन?मुंबई-कोल्हापूरची एक विमानसेवा अशाच राणा भीमदेवी थाटात घोषित झाली व सुरु झाली.महत् प्रयासाने एखादेच विमान या हवाई मार्गावर झेपावताना दिसून पडतं.नांदेडच्या विमानसेवेची देखील हेच हाल आहेत.हिंडनपासून नांदेडचे हवाई तिकीटच प्रत्येकी ११ हजार रुपये आहेत!कुटूंबातील चार जण विमानाने गेले तर ५० हजार रुपयांचा भुर्दंड पडतो.जाणे-येणे एक लाख रुपये पडतात.देवाच्या भरवश्‍यावर देशाची एविगेशन इंडस्ट्री आहे.
पायलट्सचे प्रशिक्षण अदानी करतील,देशातील विमानतळे अदानीच सांभाळतील.ज्या ज्या क्षेत्रात अदानी आहेत तिथेच पंतप्रधानांच्या शब्दात देशाचा विकास होतो!पंतप्रधानांच्या भाषणात देशात १६० विमानतळे निर्मित झाली आहे मात्र,दुस-या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांनी ते आधीच निर्मित केले होते,त्याचीच डागडूजी करुन विकासाचा डंका पिटण्यात आला.फ्लाईंग क्लबच्या एअरस्ट्रीप्स असतात.त्यावर कोणत्याही नाईट लॅडिंग्स होऊ शकत नाही.दिवसा पण धुके असते त्यावेळी देखील विमानांना नाईट लॅण्डिंगची गरज असते.अशा वेळी अश्‍या विमानतळांवर चक्क चार्टर विमाने उतरण्याची परवानगी देण्यात येत आहे.ही विमानतळे कोण चालवत आहे,प्रवाश्‍यांच्या जीवावर उदार होऊन बक्कळ पैसा कोण कमवित आहे,डीजीसीएला याची माहिती नसते का?मोदींनी तर उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे सैन्याचे जे तळ आहे त्याची देखील गणना देशाच्या विमानतळामध्ये केली!श्रावस्तीचे देखील तळ सैन्याचे आहे,त्याचा देखील समावेश सरकार निर्मित विमानतळाच्या यादीत केला.या श्रावस्तीमध्ये तर साधे बस स्थानकाची देखील सुविधा नाही,रेल्वे स्थानक देखील नाही,तिथे चक्क विमानतळाची सुविधा दिली असल्याची बाब तर अवर्णातीत आहे.यालाच ‘मोदी है तो मुमकीन है’धोरण म्हणतात का?असा प्रश्‍न विचारला जात आहे.
३२७ कोटी रुपयांचे विमानतळ बनण्यास दोन वर्षांचा कालवधी लागून देखील कुशीनगर विमानतळावरुन एक ही नियमित उड्डाण झाले नाही कुशी नगरच्या उद् घाटनाच्यावेळी मोदींनी हे विमानतळ जगभरातील बौद्धांसाठी आंतराष्ट्रीय बौद्ध पर्यटन सर्कीट होणार असल्याची ग्वाही दिली होती,देशातील वृत्तवाहिन्यांनी या बातमीला त्यावेळी खूप जोरदार कव्हरेज दिले होते,जगभरातून कश्‍या प्रकारे बौद्ध अनुयायांची विमाने कश्‍या प्रकारे या विमानतळावर उतरतील,झेप घेतील.चीन,कोरियासह अनेक देशांची नावे वृत्त वाहीन्यांनी घेतली होती.३२७ कोटींच्या या विमानतळावरुन २०२३ पासून एक पण शेड्यूल कमर्शियल फ्लाईट उडालीच नाही…!हे आकडे कुण्या खासगी संस्थेचे नसून एअरपोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडियाचे आहेत की नोव्हेंबर २०२३ नंतर कुशीनगर विमानतळावरुन एक ही विमानाचे उड्डाण झाले नाही…!
ऑक्टोबर २०२१ मध्ये या विमानतळाचे उद् घाटन मोदींनी केले होते.हे विमानतळ लुंबिनी,सारनाथ पासून तर सगळ्या बौद्ध तीर्थ क्षेत्राला जोडणार असल्याचे मोदी म्हणाले होते.या विमानतळाच्या उद्घाटानासाठी श्रीलंका,जापान,म्यामार,नेपाळ,दक्षीण कोरियासारख्या देशातून राजदूत देखील उपस्थित होते!अडीच वर्ष झाले एका ही विमानाचे उड्डाण नाही?२०२१-२१ मध्ये या विमानतळाच्या देखरेखीचा खर्च १३६ लाख रुपये,२०२२-२३ मध्ये हाच खर्च २२२ लाख,२०२३-२४ मध्ये ३०५ लाख रुपये,२०२४-२५ मध्ये हाच खर्च ३४२ लाख रुपये एवढा झाला आहे!तरी देखील पंतप्रधान देशातील विमानतळांच्या विकासावरुन स्वत:ची पाठ थोपटून घेताना दिसले,ते ही अश्‍या वेळी जेव्हा महाराष्ट्रातील एक फार-फार मोठा नेता विमान दूर्घटनेत मृत्यू पावला..!
अजित पवारांचा ऑडियो मॅसेज!
एआय जनरेटेड म्हणजे आर्टिफिशीयल तंत्रज्ञानाचा वापर करुन अजित पवारांच्या आवाजातील एक ऑडियो क्लिप तूफान व्हायरल होत आहे.यात अजित पवार यांच्या आवाजाचा वापर करुन एक संदेश देण्यात आला आहे,या संदेशातील एक ओळ अशी आहे जी,चाल,चरित्र आणि चेहरा उघडपणे दर्शविते…!महत्वाचे म्हणजे हा ऑडियो अजित पवारांच्या अंत्यसंस्कारच्या आधी व्हायरल झाला.
‘मला या विषयीचा अभिमान आहे की मी सगळ्याच्या कामी येऊ शकलो,असं होऊ शकतं की माझ्या स्वभावामुळे कोणाला दूखं ही झाले असेल,परंतू माझा प्रयत्न नेहमीच हा राहीला आहे मी सर्वसामान्यांच्या कामी येऊ शकू.नियती कोणाच्याही हातात नाही मात्र,’मी गेल्यावर ही विकासाची गती थांबली नाही पाहिजे,’उठा आणि कामाला लागा,माझा महाराष्ट्र सदैव पुढे राहील,मी आता सर्वांचा निरोप घेत आहे,महाराष्ट्राचे काम थांबले नाही पाहिजे,तुम्हाला माझी शपथ आहे,राजकारणात  विकासाच्या गतीला थांबवू नका….!’
नेमका हा ऑडियो भाजपच्या टूल किटने व्हायरल केला की स्वत: अजित दादांच्या पक्षातील नेते,मंत्र्यांनी हा उपदव्याप केला?कारण आता त्यांच्यासमोर त्यांच्याच अस्तित्वाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एक होणार असल्याची चर्चा आहे,दूसरीकडे एकनाथ शिंदेच्या दमखमने मुंबईत भाजपला महापौरांचे नाव घोषित करण्यापासून रोखून ठेवले आहे.कदाचित या ऑडियोमधून हा मॅसेज देण्याचा प्रयत्न सत्तेचे लोणी खाणा-यांनी अजित दादांच्या मंत्र्यांनी देखील दिला असावा…!अशी चर्चा समाज माध्यमात उमटली आहे….!
थोडक्यात,ज्यावेळी अजित पवार यांचे पार्थिव बारामतीत होते,त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीररित्या ते अंत्यसंस्काराला येणार असल्याचे सांगून देखील उड्डाण क्षेत्राच्या कार्यक्रमाला ऑन लाईन उपस्थिती लावणे जास्त पसंद केले.ते हा कार्यक्रम टाळू शकले असते.उड्डाण मंत्री हे ऑफ लाईन उपस्थित होते.त्यामुळे मोदींशिवाय देशाचे काही अडू शकणार नव्हते.
मोदी,काल अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहीले असते तर देशात एक सकारात्मक संदेश गेला असता की मोदी हे देशातील मोठ्या नेत्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहीले परंतू मोदींनी हे केले नाही वरुन,ते देशातील विमानतळ,त्यांची संख्या, विमान प्रवाशी सामन्यांची सुविधा,काँग्रेसच्या काळाची तुलना इत्यादीवर भाषण ठोकते झाले जेव्हा की महाराष्ट्रातील इतका मोठा नेता विमान दूर्घटनेतच मृत्यूमुखी पडला होता.एव्हीअेशनवर भाषण करतानाही मोदी विसरले की या देशात खासगी चार्टर विमानाने प्रवास करण्याचा जीव सतत जोखिमेत असतो.हेलि चॉपरचे सर्वाधिक अपघात वैष्णव देवींच्या घाटांमध्ये होतात. अहमदाबाद,पटनाचे विमानतळ आधीच जोखिमेचे घोषित झाले आहे.अहमदाबादमध्ये ड्रीम लायनरच्या विमान दूर्घटनेनंतर हे सत्य समोर आले की जी शेकडो एकर जमीन विमानतळाच्या विकासासाठी राखीव होती त्यावर ‘टाऊनशिप’ बांधून झाल्या आहेत..ज्या विजय रुपाणी यांनी ही जमीन विमानतळासाठी राखीव ठेवली होती तेच विमानतळाला जमीन मोकळी करुन देऊ शकले नाहीत..!
एविअेशन क्षेत्राची सर्वात महत्वाची अट आहे प्रवाश्‍यांच्या जिवितेची सुरक्षा,इतर बाबी क्षुल्लक ठरतात,आम्ही किती विमानतळे विकसित केली,आमचे विमान किती अद्यावत आहेत,किती डेकोरेटिव्ह आहेत,अजित दादांचे जे विमान धरातार्थी पडले ते ही फार डेकोरेटीव्ह व सुसज्ज होते,पण…!
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या