फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजचार गर्भवतींना कोरोनाची बाधा!

चार गर्भवतींना कोरोनाची बाधा!

Advertisements

आज एकूण ६ पॉझिटीव्ह कोरोना बाधितांची भर: एकूण संख्या ३०४ वर

नागपूर,ता.१२ मे: ११ मार्च रोजी शहरात पहिला कोरोना बधिताची नोंद झाली. १२ मे या दोनच महिन्यात या अकड्याने ३०० ची संख्या पार केली.  विशेष म्हणजे कोरोना विषाणूने संक्रमित होणारे रुग्ण हे शहरातील वेगवेगळ्या वस्तीतील आता आढळून येत आहे. त्यातच सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने येथील रहिवासी अजूनही कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत आहे. मंगळवारी चार गर्भवती मातांसह आणखी २ संशयितांचा अहवाल कोरोनाबाधित आल्याने उपराजधानीत कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०४ वर पोहोचला आहे.विशेष असे की, मोमीनपुरा परिसरात स्वतःच्या घरीच या गर्भवती माता विलगीकरणात होत्या. एकाच वेळी चार गर्भवतींना कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आल्यामुळे प्रशासनाची चिंता ही वाढली आहे.

सतरंजीपुरा येथील ४२ वर्षीय तर मोमिनपुरा येथील ५२ वर्षीय व्यक्तींचे अहवाल मेडिकल, मेयोतील प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित आढळल्याचे आज स्पष्ट झाले.

शहरातील पन्नास पेक्षा अधिक वस्त्यांमध्ये सद्यास्थितीत संचारबंदी लागू आहे. पोलिस तैनात केले आहेत. येथील नागरिकांना विलगीकरणात पोहचवण्यात आले आहे. त्यात मंगळवारी दि.१२ मे रोजी आणखी ६ जणांची भर पडली.

६० दिवसांत साडेपाच हजारांपेक्षा जास्त कोरोना चाचण्या-

शहरात ५ मार्च पासून कोरोना संशयितांचे नमूने तपासणीचे काम मेयो रुग्णालयात सुरू झाले. यानंतर मेडिकल, एम्स, माफसू आणि नीरी या ठिकाणी प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र आतापर्यंत या सर्व प्रयोगशाळेतून एकाच दिवशी पाचशेपेक्षा अधिक चाचण्यांच तपासण्यात आल्या नाही. मात्र मंगळवारी प्रसिध्द केलेल्या महापालिकेच्या पत्रकातून तब्बल ५६८ नमूने तपासण्यात आल्याची माहिती पुढे आली. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. आतापर्यंत शहरात ५ हजार ७८५ नमूने तपासण्यात आले आहेत.

दैनिक संशयित : ३८७
एकूण संशयित : ३१३६
सध्या भरती संशयित : २२२
एकूण भरती संशयित : १९८३
एकूण भरती कोरोनाबाधित रुग्ण:२००
दैनिक तपासणी नमुने : ५६८
एकूण तपासणी नमुने: ५७८५
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने: ३०४
घरी सोडलेले सकारात्मक रुग्ण : १००
घरी सोडलेले संशयित : १७५७
आज विलगीकरण केलेले संशयित: ३२६
विलगीकरण कक्षात भरती संशयित:२४६६
विलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले संशयित: १८१
पाठपुरावा सुरू असलेले एकूण संशयित: ४४८

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या