Advertisements


गडकरींच्या विजयात मुस्लिम मतांचा हातभार
पक्ष नव्हे प्रतिमेवरच मतदान
नागपूर,ता.११ जून २०२४: भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना एकूण ६ लाख ४८ हजार २०१ मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना ५ लाख १३ हजार ४१९ मते या निवडणूकीत मिळाली.गडकरी हे १ लाख ३४ हजार ७८२ मतांनी विजयी झाले.या विजयात मुस्लिम बहूल बूथमधूनही गडकरी यांना १६ हजार ४१४ मते मिळाली.भाजप आणि मुस्लिम मते यांचे राजकीय वैर बघता गडकरी यांच्या यशात मुस्लिम मतांची देखील २२ टक्के हिस्सेदारी खूप काही सांगून जाणारी आहे.एक प्रसिद्ध शेर आहे ‘ना हयात लेके चलो ना कायनात लेके चलो,चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो’.गडकरी यांचा चेहरा आणि एकंदरित प्रतिमा यांना मिळालेली ही मते होती,यात शंका नाही.
गडकरी यांचा विजय निश्चितच होता,हे मुस्लिम बहूल मतदारसंघातील मतदार देखील मानतात.आमचा ‘मसला’गडकरी नव्हे तर ‘भाजप’आहे हे स्पष्टपणे ते अधोरेखित करतात मात्र,भाजप असो किवा काँग्रेस दोन्ही पक्षात आमचे हितचिंतक,मित्र आहेत असे ते सांगतात.गडकरी यांच्या विजयासाठी आमच्याच समुदायातील काही नेत्यांनी मनापासून प्रयत्न केले.काही तर भाजपचेच पदाधिकारी आहेत.मात्र,त्यांची नावे सांगणार नाही,असे ते सांगतात.
गडकरी यांचे सुपूत्र सारंग गडकरी यांचा टेका-नाकाच्या सभेतील एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला होता,त्यात ते देखील गडकरी यांच्याकडे बघून मुस्लिमांनी मत द्यावी,असे आवाहान करीत होते.
आम्ही मागील ३० वर्षांपासून किमान ६ वेळा तरी मतदान केले आहे,आम्हाला आमच्या मतांचे मोल माहिती आहे,आम्ही कुणालाही घाबरत नाही,आमचे निर्णय आम्ही मुक्तपणे घेत असतो,कोणत्याही पक्षासोबत आमची बांधिलकी नाही,काँग्रेसने देखील आम्हाला गृहीत धरण्याची चूक करु नये,असे ते स्पष्टपणे सांगतात.काँग्रेसच्या उमेदवाराला एक लाख ३४ हजार मत कमी पडले,ते लाखभर मतदार कोण होते ज्यांनी काँग्रेसला मत दिले नाही?याचा विचार काँग्रेसनेही करने गरजचे आहे.
भाजपने देखील लॉकडाऊन आणि नोटबंदीचा विचार जरुर करावा.नागपूरातील सर्वसामान्य मुस्लिम मतदारा समोर काँग्रेस किवा भाजपा हे मसले नसून दररोजची ‘रोजीरोटी’हे आहे.आमचे प्रश्न कोण सोडवणार?या ही लोकसभेत ५४३ जागांमध्ये फक्त २४ खासदार मुस्लिम आहेत.आम जनतेत हिंदू-मुस्लिम भेद नाही आहे मात्र,नेत्यांमध्ये तो भेद आढळून येतो,यावरच त्यांचे राजकारण चालत असते.ज्याच्याकडे ताकत आहे तोच ती वापरुन वरचा मकाम हासिल करतो,जे कमजोर असतात ते घरात बसतात,असे सांगत जो अंहकार करेल त्याचे भविष्य बिघडेल,निश्चितच हे आमच्यावर निर्भर आहे कोणाला कुठे स्थान द्यायचे.दिल मे बिठाना है,घुटनो पे बिठाना है,या सिर पे बिठाना है,गडकरी साहेबांना आम्ही ‘दिल‘ मध्ये जागा दिली आहे.त्यामुळेच नागपूरात विविध बूथमधून त्यांना १६ हजार ४१४ मते मिळाली.या मुस्लिमांनी पक्ष नव्हे तर त्यांच्या शहराचा खासदार बघितला,असे ते सांगतात.
शहरातील १६५ मुस्लिम बहूल मतदारसंघातून गडकरी यांना इतकी मते मिळाली आहेत.
जे उत्तर नागपूर काँग्रेसचा गड समजला जातो त्यातही गडकरी यांनी मुस्लिमांची मते घेतली आहे.यात मध्य नागपूरच्या बूथ क्र.५२ मधून ४ हजार २९१ मत,पश्चिम नागपूरच्या बूथ क्र.१५ मधून २ हजार,४१०,द.नागपूरच्या बूथ क्र.२७ मधून ३ हजार,२१३,उत्तर नागपूरच्या बूथ क्र.५४ मधून ४ हजार ७४४ तर पूर्व नागपूरच्या बूथ क्र.१७ मधून गडकरी यांना १७५९ मते मिळाली असल्याचा दावा आज एका दैनिकाने केला आहे.काँग्रेसच्या विकास ठाकरेंना याच बूथ मधून अनुक्रमे,२६ हजार ३६९,२३ हजार ०८०,७ हजार ६८७,१२ हजार ७३७ तसेच ६ हजार १३६ मत मिळाले.विकास ठाकरेंना मुस्लिम बहूल बूथमधून ७६ हजार ०९ मत मिळाले असल्याचा दावा केला जात आहे.
प्यारे खान यांनी मुस्लिम बहूल भागात घेतल्या दोनशे सभा-
ताजाबादचे ट्रस्टी प्यारे खान यांनी गडकरी यांच्यासाठी दोनशेपेक्षा अधिक सभा गडकरी यांच्या समर्थनासाठी मुस्लिम बहूल भागात घेतल्या हे विशेष. अनेक लहान मोठ्या सभांमधून त्यांनी
मुस्लिम बांधवांना गडकरी यांना मत देण्याचे आवाहन केले.गडकरी यांनी गेल्या दहा वर्षातच नव्हे तर त्यांच्या हयातीत कधीही जाती,धर्माच्या आधारावर भेदाभेद केला नाही.कोणत्याही जाती-धर्माचे नागरिक असो त्यांच्या दारी गेेल्यावर त्यांनी त्यांच्या समस्या सोडवल्या.गडकरी यांची हीच प्रतिमा मुस्लिमांच्या मनात रुजली असून, या वेळी गडकरी यांनी १६ हजारच्या वर मुस्लिमांची मते घेतली असल्याचे ते सांगतात.
गडकरी यांच्या सभेला अर्वाजून मुस्लिम मतदारांनी हजेरी लावली.गडकरी यांची भाषणे ऐकली.त्यांचे विचार त्यांना पटले आणि आपले मत त्यांनी गडकरींच्या पारड्यात टाकले.गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने मुस्लिम मतांचा केवळ त्यांच्या राजकारणासाठी फायदा करुन घेतला,मुस्लिमांचा वोट बँकसारखा वापर करुन घेतला.भाजपची भीती दाखवून राजकारणात आपली पोळी शेकून घेतली मात्र,मुस्लिम मतदारांनाही काँग्रेसची ही खेळी माहिती असून, ते आता विकासाला मत देण्यास सक्षम झाले आहेत.जो त्यांची गोष्ट करेल,शिक्षण,आरोग्य,रोजगार देईल त्यांनाच मत,हे आता मुस्लिमांना देखील माहीती झाले आहे,असे प्यारे खान सांगतात.गडकरींची स्वच्छ प्रतिमा आणि भेदभावरहीत राजकारण यामुळे गडकरींना भविष्यात देखील मुस्लिम मतदार भरभरुन मत देतील,असा माझा विश्वास आहे.
हिंदू-मुस्लिम मतदारांमध्ये भेद हा गुन्हाच-ॲड.फिरदौस मिर्झा(उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ अधिवक्ता)
मूळात देशाच्या मतदारांमध्ये हिंदू-मुस्लिम मतदार असा भेद करने हाच गुन्हा आहे.असे करणा-यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले पाहिजे.संविधानात ‘एक मत एक मूल्य’असताना यात धर्माची बाब आणने योग्य नाही.मतदारांची धर्माच्या नावाने संख्या मोजणे हे अनैतिक आणि लोकशाहीविरुद्ध कृत्य आहे.राहीला प्रश्न गडकरी यांना मुस्लिमांची मते मिळण्याचा तर ही चांगली बाब आहे,गडकरी यांची वैयिक्तक प्रतिमा ही फार चांगली आहे.त्यामुळेच त्यांना सर्वच मतदारसंघातून चांगली मते मिळाली,एवढंच मी म्हणेल.
……………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
