


या निवेदनात त्यांनी अनेक खळबळजनक वस्तूस्थितींचा उहापोह केला. प्रतिबंधित गोरवाडा परिसरात खुलेआम अवैध गतिविधी घडत असून, या परिसराची सुरक्षा ज्या ओसीडब्ल्यू या खासगी कंपनीकडे आहे त्या कंपनीचे सुरक्षारक्षक या अवैध गतिविधींना रोखण्यास सक्षम नसल्याचे वास्तव समोर आले असल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.गोरेवाडा तलाव प्रतिबंधित असतानाही सकाळ,दूपार,सांयकाळीच नव्हे तर रात्री देखील सर्रास पोहण्याचा आंनंद लृटला जातो! ही धक्कदायक बाब असून महानगरपालिकेने तशी परवानगी दिली आहे का?पोहोणा-यांचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षेचे उपाय योजिले आहेत का?कोणतीही दूर्घटना घडल्यास सराईत गोताखोर नेमले आहेत का?सर्रास गोरेवाडा तलावात उतरुन पोहोणा-यांना जीवनरक्षक जॅकेट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत का? अपघात घडल्यास तलावात उतरण्यासाठी नाव (Boats)उपलब्ध आहेत का?जर गोरेवाडा तलाव हा सार्वजनिक तलाव नसून राखीव तलाव आहे तर यात कोणाच्या परवानगीने पर्यटक पोहोण्याचा आनंद लृटतात?त्यांच्या मूत्र विसर्जनाचे पाणी नागपूरकरांना पिण्यास का बाध्य केले जात आहे?असा सवाल त्यांनी निवेदनात केला.


गोरेवाडा प्लान्टच्या गेटच्या आत राहणा-या नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या परिसरात रात्रीला जुगाराचे अड्डे देखील चालतात.पूर्वी त्यांच्या क्वाटरपर्यंत मोर यायचे,दाणे खायचे आता मात्र,मोर दिसत नाही,जाफर नगर मधील काही उच्च वर्गीय नागरिक हे सायलंसर लागलेल्या बंदूकी घेऊन त्या ठिकाणी शिकारीसाठी येत असल्याचे धक्कदायक वास्तव तेथील नागरिक सांगतात. तातडीने त्या ठिकाणी ओसीडब्ल्यूची खासगी तसेच नागपूर पोलिसांची सुरक्षा चौकी तैनात करण्यात यावी.त्या ठिकाणी काही ब्रिटीशकालीन इमारती असून ज्या आता भग्नावस्थेत आहेत. त्या इमारतीच्या आत जुगार,दारुच्या पार्ट्या,अश्लील गतिविधी घडत आहेत.पुराव्या दाखल दोन व्हिडीयोज,गिट्टीखदान पोलीस ठाण्याला दिले असून दोन तरुण मुलांना अटक करुन पोलिसांनी समज देखील दिली आहे.

गेल्या दीड वर्षापासून या सर्व अवैध गतिविधीबाबत ‘अन्याय निवारण समितीची’ अध्यक्ष म्हणून मी ज्वाला धोटे सतत आपल्याला सुचना देत आहे मात्र,कोणतीही कारवाई झाली नाही.नुकतेच या तलावात एक १५ वर्षाचा मुलगा बूडून मृत्यू पावला.दीड-दोन वर्षा पूर्वी एका प्रियकराने प्रेयसीला गोरेवाडातील याच झुडपांचा आधार घेत जाळून टाकलं. हा परिसर तरुणांसाठी धोकादायक झाला असून, या तलावात जर कोण्या विघ्नसंतोषी लोकांकडून विषारी द्रव्य टाकण्यात आल्यास नागपूर शहरात त्राही-त्राही माजेल,यासाठी कोण जबाबदर असेल?असा सवाल त्यांनी केला.

नागपूर शहरासाठी धोरण राबविणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार तसेच उपमुख्यमंत्री या दोन्ही नेत्यांनी नुकत्याच सरकारी अधिका-यांसोबत बैठका घेतल्या मात्र,नागपूरकर जनतेच्या जिव्हाळ्याचे स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी,आरोग्य,वीज,रस्ते,शिक्षण,पर्यावरण इत्यादी अश्या किती विषयांवर शासकीय अधिका-यांसोबत चर्चा केली?असा सवाल त्यांनी केला. गडकरी यांनी नाग नदी स्वच्छतेचा दोन हजार चारशे चौतीस कोटींच्या प्रकल्पासाठी शासकीय अधिका-यांना घेऊन बैठक पार पाडली तर फडणवीस यांना कोराडीचे जगदंबा संस्थान,सीताबर्डीचे रिसर्च सेंटर,पूर्व नागपूरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलवर चर्चा करने महत्वाचे वाटले.हे सर्व विषय नेत्यांसाठी महत्वाचे असले तरी नागपूरकर जनतेसाठी अति महत्वाच्या असणा-या विषयांवर देखील तातडीने बैठक घेऊन, गोरेवाडासह शहरातील रस्ते,खड्डे,अपघात ,तलाव व पर्यावरणाच्या प्रश्नांकडे ही नागपूर शहराच्या या दोन्ही भाग्यविधात्यांनी लक्ष देण्याची मागणी त्यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केली.
……………………..




आमचे चॅनल subscribe करा
