
घरातच राहण्याचे नागरिकांना पुन्हा केले आवाहन
नागपूर: गेले दोन दिवस मिळून नागपूर शहरात नव्याने ५ करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही मात्र काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्हीडीयो क्लिपद्वारे सांगितले.
नागरिकांनी घरातच राहण्याचे आवहान करताना याची अत्यंत आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. ‘नागरिकांनाे घरामध्येच थांबा’असे आवाहन करताना फक्त आणि फक्त अतिशय महत्वाच्या कामाशिवास घराबाहेर पडू नका असे आवाहन त्यांनी केले.
खूपच जास्त अडचण येत असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०७१२-२५६२६६८ किवा नागपूर महानगरपालिकेच्या ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवहान त्यांनी केले.
नागपूर शहरात जुने ३८ वॉर्ड आहेत त्याची आता क्यूआरटी(Queek Response Teams)ची रचना केली जात असून त्यांचे देखील मोबाईल क्रमांक तसेच अधिका-यांची नावे ही लवकरच शहरातील सर्व भागात प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
संसर्ग वाढतोय अशी कबूली देताना त्यावर प्रतिबंध घालणे केवळ आपल्याच हातात असल्याचे त्यांनी सांगितले.हा संसर्ग बाहेरुन शहरात आल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
