फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजगुज्जर सेलिब्रेशन लॉनवर २५ हजारांचा दंड

गुज्जर सेलिब्रेशन लॉनवर २५ हजारांचा दंड

Advertisements

नागपूर मनपाची कारवाई:कोविड नियमांचा भंग

नागपूर, ता. २७ : नागपूर महानगरपालिके तर्फे गुरुवारी (२७ जानेवारी) रोजी ८ प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ८८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने आशीनगर झोन अंतर्गत पाटणकर चौक येथील गुज्जर सेलिब्रेशन लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु २५,००० च्या दंड वसूल केला.

त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत अमरावती रोड येथील मोतीमहल बार आणि जय भोले भोजनालय यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन १५ हजार रुपयाचा दंड वसूल केला.

तसेच सतरंजीपूरा झोन अंतर्गत कुंदनलाल गुप्ता नगर येथील प्रकाश धकाटे आणि बापुजी अण्णे नगर येथील घनश्याम शाहु यांच्याविरुद्ध लग्न समारंभात कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करुन १८ हजार रुपयाचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या