फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशगुजरातमध्ये दर हजार नागरिकांमागे ५ हजार पीपीईकिट महाराष्ट्रात फक्त ७२३!

गुजरातमध्ये दर हजार नागरिकांमागे ५ हजार पीपीईकिट महाराष्ट्रात फक्त ७२३!

Advertisements

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अतारांकित प्रश्‍नावर केंद्राचे उत्तर

नागपूर,ता. १० मार्च:करोना विषाणू हा ‘समन्यायी ’ असून वर्ग,भाषा,लिंग,वय,धर्म,जात,पंथ यात कोणताही भेदभाव करीत नाही मात्र देशातील शीर्षस्थ नेता असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोना विषाणूपासून नागरिकांची सुरक्ष्ा होते त्या बाबींबाबत मात्र ‘प्रदेशनिहाय ’कश्‍याप्रकारे भेदभाव करतात हे नुकतेच हाती आलेल्या आकडेवारीवरुन सिद्ध झाले.

माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेच्या पार पडलेल्या अधिवेशनात १५ फेब्रुवारी २०२१ रोजी केंद्रातर्फे पीपीई किट,एन-९५ मास्कचा गुजरात,महाराष्ट्र,तमिळनाडू व पश्‍चिम बंगाल या राज्यात किती प्रमाणात पुरवठा केला जात आहे?या संबंधी अतारांकित प्रश्‍न उपस्थित केला.यावर लेखी उत्तर त्यांना प्राप्त झाले असता केंद्र हे गुजरातच्या तुलनेत कश्‍याप्रकारे महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे,ती आकडेवारी बघून यावर लख्ख प्रकाश पडला.

महाराष्ट्रात दर हजार लोकांच्या मागे ७२३ पीपीई किटचा पुरवठा केला जात आहे तर महाराष्ट्रपेक्ष्ा अर्धी लोकसंख्या असणा-या गुजरात राज्यात मात्र हीच संख्या दर हजार लोकांच्या मागे ४ हजार ९५१ आहे!एन-९५ मास्कच्या बाबतीत देखील महाराष्ट्र राज्याविषयी पराकोटीचा दूजाभाव मोदींच्या मनात दिसून पडतोय.महाराष्ट्रात एन-९५ मास्क दर हजारी लोकांच्या मागे १ हजार ५६० मास्क असून तेच गुजरातमध्ये दर हजार लोकांच्या मागे ९ हजार ६२३ एवढा आहे!

महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी तर गुजरातची ६ कोटी असताना देखील तसेच महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव देशात उच्चांकी असताना व गुजरातमध्ये फक्त १८ हजार बाधित आकडेवारी समाेर अाली असताना देशाच्या पंतप्रधान पदावरील महनीय व्यक्तींनी अश्‍या प्रकारचा दूजाभाव इतर राज्याप्रति दाखवणे म्हणजे हा मनाचा कोतेपणाच ठरत नाही का?

विशेष म्हणजे कालच पत्र परिषद घेऊन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाच्या बाबतीत ही केंद्र राज्यासोबत कश्‍याप्रकारे दुजाभाव करीत अाहे हे स:उदाहरण सांगितले.तेच देशाचे आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मात्र लसीकरणाच्या बाबतीत मर्यादा सोडून महाराष्ट्राने किती लसी वाया घालवल्या असे निव्वळ राजकीय वक्तव्य करण्यास धन्यता मानली.

असाच प्रकारचा भेदभाव हा तमिलनाडू,प.बंगाल इ.भाजपेत्तर राज्यांबाबत देखील केला असल्याचे आकडेवारीतून उघड झाले .मात्र दूसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र भरभरुन केंद्राने खजिना खाली केलेला आढळतो.भाजपेत्तर राज्यात देशाचे नागरिक राहत नाहीत का?की विषाणूपासून बचावाच्या सर्व सोयी सुविधांवर फक्त भाजपचेच राज्य असणा-यांचा संवैधानिक हक्क आहे?

गुजरातमध्ये तर १८ वर्षे वयाच्या वर सर्वांनाच मोफत लस पुरविली जात असल्याची धक्कादायक माहिती नुकतेच पुण्यात परत अालेल्या एका विद्यार्थ्याने दिली.दूसरीकडे गुजरात सोडून उर्वरित राज्यांमध्ये केंद्राने अद्याप फक्त ४५ वर्षे वयाच्या वर नागरिकांनाच लसीकरणाची परवागनी दिली आहे,याला काय म्हणावे?पंतप्रधानांचं ’अतिरेकी’गुजरात प्रेम?

दुसरीकडे गेल्या वर्षी रेमडिसिव्हिर औषधांच्या साठेबाजारीबाबत दक्ष् ता पाळणारे राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी करोनाच्या दुस-या लाटेत जेव्हा रेमडिसिव्हिर औषधांची सर्वाधिक गरज रुग्णांना असताना ते अचानकच ‘अज्ञातवासात’कसे गेले,याविषयीही औत्सुक्य व्यक्त केले जात आहे!महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव देशात सर्वाधिक असताना व मृत्यूंची संख्या ही देखील सर्वाधिक असताना देशाचे अारोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे साधा दौरा ही राज्याचा करीत नाही.जिल्हाधिका-यांसोबत बैठका घेत नाहीत.फक्त दिल्लीवरुन आदेश पारीत करतात किवा महाराष्ट्राबाबत राजकीय वक्तव्ये प्रसृत करताना आढळतात.

राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री यांनी देखील उपराजधानी नागपूराचा दौरा रेमडिसिव्हिर औषधांच्या तुटवड्याबाबत काढला नाही,ते केवळ मुंबईत बसून औषध कंपन्यांच्या मालकांसोबत बैठकीत व्यस्त असल्याचे दिसून पडत आहेत.

नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या आभासी संवादात रेमडिसिव्हिरचे दर हे १२०० रुपयां पेक्ष्ा अधिक असू नये,असा सूतोवाच केला होता,आरोग्य मंत्री राजेश टाेपे यांनी देखील याचीच ‘रि’ओढली होती मात्र नागपूरात परवाच एक रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन चक्क साढे तीन हजारात रुग्णाला विकत घ्यावे लागले.एवढंच नव्हे तर या इंजेक्शनचा पराकोटीचा तुटवडाही निर्माण झाला असून किंबहूना साठेबाजारी करुन करण्यात आला असून,यावर प्रशासकीय यंत्रणा मात्र गप्पच आहे.

थोडक्यात करोना महामारीच्या या काळात केंद्रापासून तर गल्लीतील मनपा आरोग्य केंद्रापर्यंत सामान्य जनतेचा कोणीच वाली नाही,मूळात ज्या राजकीय व्यक्तींना अश्‍याप्रकारच्या अापत्तीकाळात व महामारीच्या काळात प्रशासकीय कौशल्यचाचे प्रशिक्ष् णच नाही तेच आम जनतेचे धोरणकर्ते व प्रशासनकर्ते बनले असल्याचे दूर्देवी चित्र देशात उमटले आहे,हेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रावरुन सिद्ध होतं,असेच आता म्हणावे लागेल. करोना विषाणूचा प्रार्दुभाव हा भाजपेत्तर राज्यात सौम्य होतो तर भाजपाची सत्ता असणा-या राज्यात तीव्र होतो का?असा प्रश्‍न आता महाराष्ट्रातील नागरिकांना पडला आहे!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या